Submitted by कटप्पा on 22 October, 2019 - 23:10
हा क्लब मी उघडेन असे कधी वाटले नव्हते . पण आता तिशी ओलांडली आणि टिटोलिसम अनुसारायला सुरुवात केली आहे .
तुमचे अनुभव कळू द्या |
तुमच्यापैकी कित्येक जण सुरुवातीपासून फॉलो करत असतील . तुमच्या मागची प्रेरणा कळू देत. आमच्या सारख्याना फायदा होईल |
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
....
टीटोटलर म्हणजे काय?
टीटोटलर म्हणजे काय?
कट्टर मुसलमान.
कट्टर मुसलमान.
शराब हराम है , असे मानून त्याचे पालन करणे , म्हणजे टी टोटलर,
https://en.m.wikipedia.org/wiki/Teetotalism
बाउंसर गेल हो.
बाउंसर गेल हो.
हात्तीच्या मला चहाशी संबंधित
हात्तीच्या मला चहाशी संबंधित काहीतरी असेल असं वाटलं
दारू सोडण्याचे प्रयत्न
दारू सोडण्याचे प्रयत्न
यावर लिहा
हर्पेन : जो आयुष्यात आजवर आपण
हर्पेन : जो आयुष्यात आजवर आपण किती प्रकारचे चहा प्यालो आहोत, प्रत्येक प्रकारचे किती कप्स, एकुण किती कप्स, यांची टोटल केव्हाही सांगू शकतो तो टीटोटलर.
मानव
मानव
तुमच्यापैकी कित्येक जण
तुमच्यापैकी कित्येक जण सुरुवातीपासून फॉलो करत असतील . तुमच्या मागची प्रेरणा कळू देत>>>>>>
मी 11-12 वि मध्ये गेल्यावर बिल्डिंग मधल्या मोठ्या मुलांच्या ग्रुप मध्ये प्रमोट झालो, या मुलांच्या न्यू इयर, पिकनिक ला पार्टी होत, त्यात दारू काम चाले,
22 25 वर्षे मुलांची जास्त दारू पिणे म्हणजे जास्त एन्जॉयमेंट अशी कन्सेप्ट असल्याने ,पहिल्या काही पार्टीज मध्येच दारू लोकांचे कसे माकड करते हे दिसले
या पोरांचे दारू चढल्या नंतरचे वागणे अक्षरशः किळस यावी असे असायचे.
त्यामुळे मी दारू प्यायल्यावर असाच वागीन हे मनात इतके घट्ट बसले की कधी दारू प्यावीशी वाटली नाही.
पुढे प्रोफेशनल आयुष्यात दारू पीत नाही म्हणून कधी कधी थट्टा झाली, मग त्यावर उपाय म्हणून कुठल्याही रंगीबेरंगी ड्रिंक चा एक ग्लास हातात धरून फिरायचे किंवा वाइन चा अर्धवट भरलेला ग्लास हातात वागवत फिरायचे वगैरे प्रयोग केले
बाकी या सगळ्या प्रोफेशनल पार्टीज मध्ये बॉसेस आणि आदरणीय कस्टमर दारू पिऊन जो दंगा घालतात त्याने दारू न पिण्यास अजून प्रेरणा मिळते
हात्तीच्या मला चहाशी संबंधित
हात्तीच्या मला चहाशी संबंधित काहीतरी असेल असं वाटलं>>>मला पण तसेच वाटले,
रच्याकने
टिटोटलर म्हणजे नक्की काय,दारू सोडणारा का?
सगळी टोटल धरून फक्त टी पिणारा
सगळी टोटल धरून फक्त टी पिणारा/री
टिटोटलर म्हणजे दारू न पिणारा
टिटोटलर म्हणजे दारू न पिणारा .
नवरा आणि मी दोघेही टीटोटलर
नवरा आणि मी दोघेही टीटोटलर आहोत. नवरा तर जहाजावरती कित्येक वर्षे असूनही सर्व जहाजांवर असा रॅगिंग प्रकार असतो की नाही माहीत नाही पण तो ज्युनिअर असताना, त्यांच्या जहाजावर होता. विषुववृत्त ओलांडलं की, ज्युनिअर्सना दारु पाजायची, ऐकले नाही तर, मुसक्या बांधुन बळजबरीने पाजायची. त्यामध्ये त्याला नॉशिआ बसला.
>> पुढे प्रोफेशनल आयुष्यात
>> पुढे प्रोफेशनल आयुष्यात दारू पीत नाही म्हणून कधी कधी थट्टा झाली, मग त्यावर उपाय म्हणून कुठल्याही रंगीबेरंगी ड्रिंक चा एक ग्लास हातात धरून फिरायचे किंवा वाइन चा अर्धवट भरलेला ग्लास हातात वागवत फिरायचे वगैरे प्रयोग केले
Cranberry Juice सगळ्यात चांगला हातात घेवुन फिरण्या साठी
पण हे असे उलटे का?
पण हे असे उलटे का?
जेव्हा जगायला जवानीची म्हणजे तारुण्याची नशाच पुरेशी असते तेव्हा वेड्यासारखे दारूच्या नादी लागायचे
आणि जेव्हा आयुष्याचा उत्तरार्ध सुरू होईल. उरलेसुरले आयुष्य रडतखडत खेचायचे आहे. तेव्हा मस्त दारूत चूर व्हायचे सोडून तिला दूर लोटायचे.
एकंदरीत हे लॉजिक पटले नाही
मी णिषेध नोंदवतो !
पुढे प्रोफेशनल आयुष्यात दारू
पुढे प्रोफेशनल आयुष्यात दारू पीत नाही म्हणून कधी कधी थट्टा झाली, मग त्यावर उपाय म्हणून कुठल्याही रंगीबेरंगी ड्रिंक चा एक ग्लास हातात धरून फिरायचे किंवा वाइन चा अर्धवट भरलेला ग्लास हातात वागवत फिरायचे वगैरे प्रयोग केले Wink
>>>>
दुर्दैवाने आपल्याकडे लोकं निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगायला घाबरतात.
खरे तर दारू पिणारेच आपल्यातील हा दोष लपवायला दारूचे उदात्तीकरण करतात आणि न पिणारयांची थ्ट्टा उडवायला बघतात.
>>>>>> आणि जेव्हा आयुष्याचा
>>>>>> आणि जेव्हा आयुष्याचा उत्तरार्ध सुरू होईल. उरलेसुरले आयुष्य रडतखडत खेचायचे आहे.>>>>> मी याचा णिषेध नोंदवते
(No subject)
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/68789
ह्यांना घ्या
कृपया विषयांतर करू नका .
कृपया विषयांतर करू नका . चहाचा आणि धाग्याचा काहीही संबंध नाही आहे.
चहाचा व धाग्याचा काही संंबंध
चहाचा व धाग्याचा काही संंबंध नाही हे आधीच लिहायचे ना. कारण टी म्हणल्यावर मी लग्गेच उड्या मारत आले.
कृपया विषयांतर करू नका .
कृपया विषयांतर करू नका . चहाचा आणि धाग्याचा काहीही संबंध नाही आहे. >>>
तुम्ही मथळ्यामधेच टीटोटलरचे भाषांतर करा म्हणजे विषयांतर होणार नाही (बहुतेक)
मला अजूनही नीट कळले नाहीये टीटोटलर म्हणजे ज्याने दारू कधीच प्यायली नाही तो की करून करून भागल्यानंतर (झेपत / परवडत नाही ई. कारणांनी) सोडली तो.
दुर्दैवाने आपल्याकडे लोकं
दुर्दैवाने आपल्याकडे लोकं निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगायला घाबरतात.>>>>
आत घाबरण्याचा प्रश्न नाही, पार्टीत माझा निर्णय टोटल 5 10 रँडम लोकांना एक्स्प्लेन करायचा कंटाळा हा प्रश्न आहे,
)
त्या ऐवजी एक ग्लास हातात ठेवणे सोपा पर्याय आहे ( एकदा तर बर्फ घातलेले पाणी हातात पाहून मी वोडका पितोय अशी समजूत करून घेतलेली एकाने
सो चुज युअर बॅटल.
My battle is not to discourage every one from drinking alcohol, my battle is to protect my decision of not drinking and maintain my peace of mind.
दुर्दैवाने आपल्याकडे लोकं
दुर्दैवाने आपल्याकडे लोकं निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगायला घाबरतात.
खरे तर दारू पिणारेच आपल्यातील हा दोष लपवायला दारूचे उदात्तीकरण करतात आणि न पिणारयांची थ्ट्टा उडवायला बघतात. >>. अगदी अगदी ऋ .
माझा नवरा , सासरे , नणंदेचा नवरा तिघेही पीत नाही .
काही काही फॅमिली पार्टीजना (अगदी सख्खे चुलत-मावस भावंडे) आम्हाला आमंत्रणच नसते .
नविन नविन असताना , एक दोन वेळा मला जरा विचित्र वाटलं , आता सवय झालीय , उलट आनंदच होतो .
कोणाचा साखरपूडा , लग्न , पाच परतावन ईतकच काय बाराव्या-तेराव्याला पण लोकांच बाटल्यां शिवाय चालत नाही ईथे.
आणि माझ्या जावा-नणंदाना वाटत , माझा नवरा लग्नानंतर पीत नाही . मग समजवाव लागतं - तो पहिल्यापासूनच पीत नाही . माझ क्रेडीट काही नाही .
My battle is not to
My battle is not to discourage every one from drinking alcohol,
निर्व्यसनी असण्याचा अभिमान बाळगणे हे वेगळे झाले आणि लोकांना दारूपासून परावृत्त करणे हे वेगळे झाले. ते तुम्ही करावे च अशी अपेक्षा नाही.
my battle is to protect my decision of not drinking and maintain my peace of mind.
एक्झॅक्टली! पिणारे लोकं न पिणारयांचे पीस ऑफ माईंड हिराऊन घेऊ शकतात हे दुर्दैव्य आहे आणि ते तसे का आणि कसे हिराऊन घेतात यावरच विचार करणे अपेक्षित आहे.
>>>>> पीस ऑफ माईंड हिराऊन
>>>>> पीस ऑफ माईंड हिराऊन घेऊ शकतात हे दुर्दैव्य आहे>>>>> तसं नसेल ऋन्मेष. १०० भोचक लोकांना उत्तर देत बसण्यात खूप उर्जा जाते. त्याऐवजी पेला हातात धरुन ठेवणं परवडलं.
यांचे पीस ऑफ माईंड हिराऊन घेऊ
यांचे पीस ऑफ माईंड हिराऊन घेऊ शकतात हे दुर्दैव्य आहे आणि ते तसे का आणि कसे हिराऊन घेतात यावरच विचार करणे अपेक्षित आहे.>>>>>
आता माझी पीस ऑ माईंड टिकवण्यासाठी मी उत्तर देणार नाहीये ;), भले लोक मला चुकीचा समजोत.
>>! पिणारे लोकं न पिणारयांचे
>>! पिणारे लोकं न पिणारयांचे पीस ऑफ माईंड हिराऊन घेऊ शक<<
डिफाइन पीस ऑफ माइंड. कारण पीस (Piece) आणि (Peace), या दोन्हिंचा अर्थ वेगळा आहे, पीस ऑफ माइंडच्या संदर्भात. बाय्दवे, आय प्रिफर दि फॉर्मर ऑन मेनी ओकेजन्स...
>> आता माझी पीस ऑ माईंड
>> आता माझी पीस ऑ माईंड टिकवण्यासाठी मी उत्तर देणार नाहीये ;), भले लोक मला चुकीचा समजोत. >>
जाम हसतोय!
आता माझी पीस ऑ माईंड
आता माझी पीस ऑ माईंड टिकवण्यासाठी मी उत्तर देणार नाहीये ;), भले लोक मला चुकीचा समजोत.
>>>>
एक्झॅक्टली डूड.!
पार्टीतही तुम्ही हेच करा. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ नका. आणि आपले पीस ऑफ माईंड शाबूत ठेवा. हा मला सोपा आदर्श पर्याय वाटतो.
पण तुम्ही मात्र मी पण पितो हं याचा दिखावा करून हे पीस ऑफ माईंड मिळवायचा पर्याय निवडला आहे हे मला खटकले.
प्रश्न तुमचा वा माह्या एकट्याचा नाही. तर समाजमनाचा आहे. जी बाजू योग्य आहे ती अशी झुकतेय हे मला पटत नाहीये. झाल्यास वेगळा सविस्तर धागा काढतो.
Pages