इच्छाधारी (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 19 October, 2019 - 08:44

पावलांचा आवाज आल्यावर ती वैतागलीच. शहरापासून इतकं दूर येऊनही एकांत मिळू नये? कसं होणार चौथ्या सिझनचं लिखाण पूर्ण? चेनेलवाले मागे लागलेत.

कोणीतरी तलावाजवळून चालतंय. तिने मान वर करुन पाहिलं.

पण त्या तरुणाला तिच्या अस्तित्त्वाची जाणीवही नव्हती. तो आपल्याच नादात होता. नकळत ती त्याचं निरिक्षण करु लागली. जवळपास सहा फुटी उंची, पीळदार शरीर, तेजस्वी गौरवर्ण, कुरळे केस, विलक्षण बोलके डोळे आणि नजर खिळवून ठेवणारा चेहेरा. आपल्या लिखाणातला नायक मूर्तरुप घेऊन आलाय असंच वाटलं तिला. हे सत्य आहे का स्वप्न?

'Don't tell me इच्छाधारी नाग वास्तवमे होते है.' ती अनवधानाने बोलली.

त्या आवाजासरशी दचकून त्याने एकदम पाण्यात उडी घेतली.

'डराव डराव' करत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी. Lol

बरोबर आहे तुझा प्वाईंट, स्वप्ना. नेहमी नेहमी नाग-नागीणीच का इच्छाधारी? बेडूक, खवलेमांजर, डास वगैरेंनी काय पापं केलीयेत?

मस्तय शशक.. Happy

मी नागिन चे ३ हि सीझन पाहिले आहेत..
पहिला छान.. दुस्रा थोडा बोर..
तिसरा महाबोर आहे..

ही मालिका विनोदी आहे असे सम्जुन पाहिली की जाम मजा येते.. Proud
फारएण्ड, स्वप्ना, पायस आदि मंडळींनी जरुर पाहावी.. Happy
भरपुर मटेरीयल आहे.. मजा येइल वाचयला तुम्ही लिहीलेत तर Happy

@मामी
>>>>>> डास वगैरेंनी काय पापं>>>>> हाहाहा कल्पना करुनच हसू येतय.

मन्या ऽ :-) मामी, इच्छाधारी डास निदान मुंबईत तरी नको हो Proud

>>ससुराल सिमर का मध्ये , ती माशी पण ईच्छाधारी होती का ?

हो, असं अंधुक आठवतंय काहितरी.

>>कारण त्या सिझन मध्ये 100फुटाच्या वर नागिनी,इच्छाधारी मुंगूस,घार,मोर सगळ सगळं याची डोळा पाहिलंय

हो हो, इच्छाधारी मोरही होता. लांडोर होती खरं तर. तुम्ही म्हटल्यावर आठवलं मला. आणि ती इच्छाधारी गिधाडं होती....घार नव्हे. गरूड तरी घ्यायचे. गिधाडं काय? कैच्या कै.

>>फारएण्ड, स्वप्ना, पायस आदि मंडळींनी जरुर पाहावी.. 

फारएन्ड आणि पायस ह्यांनी पाहिली आणि त्यावर लिहिलं तर धमालच येईल.

सगळ्यांचे आभार! आणि दिवाळीच्या शुभेच्छाही Happy

ह्या दिवाळीत सर्वाना असाच इच्छाधारी अजस्त्र बोनस मिळो जो तुमच्या आवाजाने पटकन उडी मारून सेविंग अकाउंटमध्ये असंख्य तरंग निर्माण करो अशी शुभेच्छा !

Biggrin मस्त!!

कॉलेजात काही कार्टी ही इच्छाधारी गाढव असावीत अशी राहायची. रूम म्हणजे उकीरडा... कँटीनला निघाली की माणसात यायची...

Pages