Submitted by स्वप्ना_राज on 19 October, 2019 - 08:44
पावलांचा आवाज आल्यावर ती वैतागलीच. शहरापासून इतकं दूर येऊनही एकांत मिळू नये? कसं होणार चौथ्या सिझनचं लिखाण पूर्ण? चेनेलवाले मागे लागलेत.
कोणीतरी तलावाजवळून चालतंय. तिने मान वर करुन पाहिलं.
पण त्या तरुणाला तिच्या अस्तित्त्वाची जाणीवही नव्हती. तो आपल्याच नादात होता. नकळत ती त्याचं निरिक्षण करु लागली. जवळपास सहा फुटी उंची, पीळदार शरीर, तेजस्वी गौरवर्ण, कुरळे केस, विलक्षण बोलके डोळे आणि नजर खिळवून ठेवणारा चेहेरा. आपल्या लिखाणातला नायक मूर्तरुप घेऊन आलाय असंच वाटलं तिला. हे सत्य आहे का स्वप्न?
'Don't tell me इच्छाधारी नाग वास्तवमे होते है.' ती अनवधानाने बोलली.
त्या आवाजासरशी दचकून त्याने एकदम पाण्यात उडी घेतली.
'डराव डराव' करत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी.
भारी.
बरोबर आहे तुझा प्वाईंट, स्वप्ना. नेहमी नेहमी नाग-नागीणीच का इच्छाधारी? बेडूक, खवलेमांजर, डास वगैरेंनी काय पापं केलीयेत?
मस्तच!
मस्तच!
मस्त
मस्त
ससुराल सिमर का मध्ये , ती
ससुराल सिमर का मध्ये , ती माशी पण ईच्छाधारी होती का ?
मस्तच शेवट
मस्तच शेवट
मस्म आयडीया.
मस्म आयडीया.
एकदम डरावनी आहे
एकदम डरावनी आहे
मस्तय शशक..
मस्तय शशक..
मी नागिन चे ३ हि सीझन पाहिले आहेत..
पहिला छान.. दुस्रा थोडा बोर..
तिसरा महाबोर आहे..
ही मालिका विनोदी आहे असे सम्जुन पाहिली की जाम मजा येते..
फारएण्ड, स्वप्ना, पायस आदि मंडळींनी जरुर पाहावी..
भरपुर मटेरीयल आहे.. मजा येइल वाचयला तुम्ही लिहीलेत तर
अरे, मला वाटलं की ते
अरे, मला वाटलं की ते 'प्रिन्सेस आणि फ्रॉगशी' संबधित आहे शेवटाला.
@मामी
@मामी
>>>>>> डास वगैरेंनी काय पापं>>>>> हाहाहा कल्पना करुनच हसू येतय.
हाहाहा.... छानच
हाहाहा.... छानच
मस्त. सॉलिड ट्विस्ट.
मस्त. सॉलिड ट्विस्ट.
मन्या ऽ :-) मामी, इच्छाधारी
मन्या ऽ :-) मामी, इच्छाधारी डास निदान मुंबईत तरी नको हो
>>ससुराल सिमर का मध्ये , ती माशी पण ईच्छाधारी होती का ?
हो, असं अंधुक आठवतंय काहितरी.
>>कारण त्या सिझन मध्ये 100फुटाच्या वर नागिनी,इच्छाधारी मुंगूस,घार,मोर सगळ सगळं याची डोळा पाहिलंय
हो हो, इच्छाधारी मोरही होता. लांडोर होती खरं तर. तुम्ही म्हटल्यावर आठवलं मला. आणि ती इच्छाधारी गिधाडं होती....घार नव्हे. गरूड तरी घ्यायचे. गिधाडं काय? कैच्या कै.
>>फारएण्ड, स्वप्ना, पायस आदि मंडळींनी जरुर पाहावी..
फारएन्ड आणि पायस ह्यांनी पाहिली आणि त्यावर लिहिलं तर धमालच येईल.
सगळ्यांचे आभार! आणि दिवाळीच्या शुभेच्छाही
ह्या दिवाळीत सर्वाना असाच
ह्या दिवाळीत सर्वाना असाच इच्छाधारी अजस्त्र बोनस मिळो जो तुमच्या आवाजाने पटकन उडी मारून सेविंग अकाउंटमध्ये असंख्य तरंग निर्माण करो अशी शुभेच्छा !
मस्त!!
मस्त!!
कॉलेजात काही कार्टी ही इच्छाधारी गाढव असावीत अशी राहायची. रूम म्हणजे उकीरडा... कँटीनला निघाली की माणसात यायची...
झी युवावर नुकतीच 'प्रेम पॉयजन
झी युवावर नुकतीच 'प्रेम पॉयजन पंगा' नावाची सिरीयल सुरु झालीये.. रसिकांनी आस्वाद घ्यावा.
Pages