इच्छाधारी (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 19 October, 2019 - 08:44

पावलांचा आवाज आल्यावर ती वैतागलीच. शहरापासून इतकं दूर येऊनही एकांत मिळू नये? कसं होणार चौथ्या सिझनचं लिखाण पूर्ण? चेनेलवाले मागे लागलेत.

कोणीतरी तलावाजवळून चालतंय. तिने मान वर करुन पाहिलं.

पण त्या तरुणाला तिच्या अस्तित्त्वाची जाणीवही नव्हती. तो आपल्याच नादात होता. नकळत ती त्याचं निरिक्षण करु लागली. जवळपास सहा फुटी उंची, पीळदार शरीर, तेजस्वी गौरवर्ण, कुरळे केस, विलक्षण बोलके डोळे आणि नजर खिळवून ठेवणारा चेहेरा. आपल्या लिखाणातला नायक मूर्तरुप घेऊन आलाय असंच वाटलं तिला. हे सत्य आहे का स्वप्न?

'Don't tell me इच्छाधारी नाग वास्तवमे होते है.' ती अनवधानाने बोलली.

त्या आवाजासरशी दचकून त्याने एकदम पाण्यात उडी घेतली.

'डराव डराव' करत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. एकदा टीव्हीवर द फ्रॉग नावाचा एक छान डच चित्रपट पाहिला. सबटायटल्स होती अर्थात. त्यात असा एक माणूस कम बेडूक दाखवलाय. लहान मुलांसाठीचा चित्रपट आहे.

सगळ्यांचे आभार. नागिन नावाच्या महापकाऊ सिरियलचा चौथा सिझन कलर्सवर लवकरच सुरु होतोय हे वाचून झालेली चरफड व्यक्त करायचा हा प्रयत्न होता Proud

>>तुमच्यामुळे बेडूक ही इच्छाधारी असतात हे कळाले

बेडूक काल्पनिक आहे हो. पण ससुराल सिमरका नावाच्या महान सीरियलमध्ये इच्छाधारी मुंगुस होतं.

एक्चुली त्या बेडकाला ही कथा नायिका इच्छाधारी नागिण वाटली असणार आणि म्हणून आपले प्राण वाचवायला त्याने पटकन पाण्यात उडी मारून आपल्या इतर बांधवांना डिस्ट्रेस कॉल दिला -- डराव S डराव !!

>>सहा फुटी बेडुक??

इच्छाधारी नाग असलेली एकही सीरियल किंवा चित्रपट पहायचं भाग्य सटवाईने तुमच्या कपाळी लिहिलेलं दिसत नाही Proud इच्छा असल्यास रिना रॉयचा नागिन, श्रीदेवीचा नगिना, रेखा-जितेंद्र ह्यांचा शेषनाग हे चित्रपट किंवा कलर्सवरील नागिन सिरीयलचे सिझन 1 ते 3 पहावेत. परिणामांना मी जबाबदार नाही. Happy

पाण्यात उडी घेताना तो तरुण आपल्या मूळ बेडूकरुपात परत आला हे अध्याह्रत होतं.

कलर्सवरील नागिन सिरीयलचे सिझन 1 ते 3 पहावेत. परिणामांना मी जबाबदार नाही. Happy>>>>याचे पहिला 1 सिझन आणि दुसरा अर्धा पाहिलाय, तुम्ही 6 काय 600 फुटी बेडूक,मुंगळा,नाकतोडा लिहिला असता तरी चालून जाईल
कारण त्या सिझन मध्ये 100फुटाच्या वर नागिनी,इच्छाधारी मुंगूस,घार,मोर सगळ सगळं याची डोळा पाहिलंय

जानी दुष्मन एक अनोखी कहानी या पिक्चरमध्ये नाचताना माणूस दिसतो पण आरशात साप नाचताना दिसतो या प्रसंगाची आठवण आली.

इच्छाधारी नाग असलेली एकही सीरियल किंवा चित्रपट पहायचं भाग्य सटवाईने तुमच्या कपाळी लिहिलेलं दिसत नाही Proud इच्छा असल्यास रिना रॉयचा नागिन, श्रीदेवीचा नगिना, रेखा-जितेंद्र ह्यांचा शेषनाग हे चित्रपट किंवा कलर्सवरील नागिन सिरीयलचे सिझन 1 ते 3 पहावेत. परिणामांना मी जबाबदार नाही. >>>>>>>>> Rofl

epic

@स्वप्ना_राज, अहो पहिला सिझन बघितलेला.. त्यानंतर नाही ब्वा!
1 ते3 सिजन परत बघायचे?? Uhoh आपल्याला ते प्रकरण अजिबात झेपणार नाही.. Rofl

Pages