Submitted by सामो on 18 October, 2019 - 09:18
शुकशुक!!
किती?
पाश्शे.
२००?
चला.
कुठाय?
इथच १० पावलावं.
वाकुन या सायेब. हां हंगाश्शी!
चल उतर कपडे - माझेही , तुझेही. मला वेळ नाय.
.
.
<खसफस >
.
.
< खोलीत खूडबूड>
.
<घाबरुन> ए कोणाय पलंगाखाली? बाहेर नीघ.
ओ सायेब कोन नाय तिथं. उरका तुमचं. कुठुन येतात!!! नाय तर चल नीघ भायेर. नको तुजं पैसे, चल नीघ.
.
.
ओ ओ ओ सांगीतलं नं कोन नाय!!! चल निघ इथुन मुडद्या, हलकटा.
.
.
तुझा का?
.
नाय! आख्ख्या गावचा!! वर त्वांड करुन विचार्तय!! कशाला अब्रू चव्हाट्यावर आणता? तुमाला काय फरक पडतोय? ह्यो पंगू असतो इथं पडून. ना आध्यात ना मध्यात. < डोळ्यातून झरझर अश्रुंची संततधार>
.
गिर्हाईक ५०० ची नोट टाकून सुन्नपणे निघून जातो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे
अरेरे
ओह!
ओह!
विदारक !...
विदारक !...
वाईट..
वाईट..
नाही समजलं
नाही समजलं
> ह्यो असतो इथं पडून. ना
> ह्यो असतो इथं पडून. ना आध्यात ना मध्यात. > शरीर, बुद्धीने अपंग असलेला मुलगा आहे त्या वेश्येचा.
खूप च विदारक प्रसंग.
खूप च विदारक प्रसंग.
दुःख,हतबलता,आणि
सर्वावर मात करून जगण्याची धडपड .
मानवी दुःखाच्या असंख्य भावनांचे मिश्रण कथेत व्यक्त होत आहे
विदारक !...>>>>१
विदारक !...>>>>१
अॅमी केवढं कळलं तुला गं. मला
अॅमी केवढं कळलं तुला गं. मला तो अपंग आहे हे लिहीता आलं नाही. मग मी काल विचार करत होते ते कळेल का? रात्री ती त्याला अन्य समव्यावसायिकांकडे ठेउच शकत नाही (कारण त्याही तिच्यासारख्याच ) ना फूटपाथवर टाकू शकतेय.
लहानही आहे तो एक ७-८ वय असेल
रात्रीची वेळ त्याची झोपेची वेळ असू शकते. पंगू शब्द अॅडवलाय.
________________________________
अजुन एक ही कथा मी पाहीलेली की ऐकलेली (एखाद्या डॉक्युमेंट्रीत) आहे. त्याचे शशक केलेले आहे. इतकी टोचरी, विदारक, अतोनात हेलावणारी , अंगावर काटा आणणारी कथा माझी नाही.
कथा चांगली आहे.
कथा चांगली आहे.
मला आधी वाटलं तिचा अपंग नवरा
मला आधी वाटलं तिचा अपंग नवरा आहे खाली पडून
अशी अपंग नवरा असलेल्या हतबल
अशी अपंग नवरा असलेल्या हतबल वेश्येची कथा वाचण्यात आली होती
बेफिकीर यांच्या बुधवार पेठ
बेफिकीर यांच्या बुधवार पेठ डिस्को मध्ये समान प्रसंग असावेत.
ओह मी बेफिकीर यांची कथा वाचली
ओह मी बेफिकीर यांची कथा वाचली नाही. शक्य आहे. पण अगदी नकळतपणे.
मला तसं म्हणायचं नव्हतं.
मला तसं म्हणायचं नव्हतं. डिस्को बहुतेक लेखमाला आहे. मी वाचून खूप दिवस झाले.
नो वरीज. धन्यवाद.
नो वरीज. धन्यवाद.
ओह मी बेफिकीर यांची कथा वाचली
ओह मी बेफिकीर यांची कथा वाचली नाही. शक्य आहे. पण अगदी नकळतपणे.
नवीन Submitted by सामो on 21 October, 2019 - 10:01>>>>>> वाचून पहाच खरंच अप्रतिम आहे
धन्यवाद Dhangya पहाते.
धन्यवाद Dhangya पहाते.
विदारक सत्य आहे.
विदारक सत्य आहे.
एखादा प्रसंग शब्दांत कैद करणे सोप्प नसत.
छानच, मोजक्या शब्दात प्रसंग
छानच, मोजक्या शब्दात प्रसंग व्यक्त करण सोप नाही.
अरे रे काळजाला टोचनारी
अरे रे
काळजाला टोचनारी ,मनाला हेलावणारी कथा .. तेही इतक्या मोजक्या शब्दांत.. परिस्थितीशी झुंज देणाऱ्या आई चे वाईट वाटून घ्यावे की कौतुक करावे कळत नाही
एकीकडे पापी पेट का सवाल
एकीकडे पापी पेट का सवाल म्हणावं, तर वाटतं की या स्त्रिया दुसरे काही काम का करत नाहीत.. मग उत्तर येतं शक्य असतं तर त्यांनीही दुसरं काम नक्कीच निवडलं असतं, गुंड लोक असतात त्यांना बळजबरीने धंदा करायला लावणारे.. मग अजून एक प्रश्न, कितीतरी NGO या स्त्रियांना या सगळ्यातून बाहेर काढायला मदत करत असतात, तिथे का नाही जात या स्त्रिया? मग अजून उत्तर येतं की teen age पासूनच धंद्याला लागल्यामुळे इतर काही काम यांना जमत तरी नाही किंवा देहविक्रयच सोपा वाटतो.. आणि सोबतच कधीकाळी वाचलेल्या बातम्या- महिला सुधार गृहातील जाच/ आश्रमात होणारे अत्याचार वगैरे बातम्या आठवतात..
मी तिसऱ्या वर्षाला असताना पुण्याला आलो होतो, दगडूशेठचं दर्शन घेतल्यावर कुतूहल म्हणून बुधवारात गेलेलो.. (203 डिस्को वाचून झालेली बहुतेक तेव्हा, नीट आठवत नाही) त्या इमारतींचे मजले, मजल्यानुसार असणारी वेश्यांची विभागणी, आतली लाकडी कपाटांसारखी एका पलंगापुरती खोक्यांसारखी रचना.. जिन्यावर भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या, लुळी मुले, वेश्यांच्या शरीरावरुन फिरणाऱ्या अधाशी नजरा आणि त्यांच्या शरीराचे त्यांनी सांगितलेले भाव, त्यावरून भाजी खरेदी करावी तसे घासाघीस करणारे ते ग्राहक.. वास मारणारी भेळ विकणारे भैय्ये, दुसऱ्या मजल्यावरचा पानवाला, थोडंफार वय झालेल्या, दारात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्याला ओंगळवाणे स्पर्श करणाऱ्या, तो बुजून पुढं गेल्यावर "दम नहीं क्या?" म्हणत हसणाऱ्या वेश्या.. रडणाऱ्या लहान लेकराला पदराखाली घेणारी वेश्या, आणि ते रडतंय म्हणून तिच्यावर खेकसणारा - गळ्यात सोन्याच्या साखळ्या घातलेला दारूचा वास मारणारा गुंड..
मेलेल्या मनाने सगळं पाहिलं, जीवनात मी बरंच काही depressing पाहिलंय, पण हॉस्टेलसमोर accident झाल्यावर छाती फुटलेली असताना आपल्या पुतण्याला विचारत असलेला सुट्टीवर आलेला एक सैनिक तरुण, चाकाखाली अडकलेला 11 वर्षाचा त्याचा जीव गेलेला पुतण्या अक्षरशः ओढून काढला होता.. गाडी रक्ताने भरेल म्हणून लोक गाड्या थांबवत नव्हते, आणि त्यांनी गाडी थांबवावी म्हणून आम्ही पोरांनी हातात उचललेला दगड.. डोळ्यासमोर 2 जीव गेले.. तो एक दिवस आणि ही बुधवारातली फेरी. हे दोन प्रसंग डोळ्यांपुढून जाता जात नाहीत.. मग प्रश्न येतो की हे असं का.. आणि उत्तर कधीच सापडत नाही, प्रश्नातून प्रश्न येतच राहतात..
बराच मोठा लिहिला गेला
बराच मोठा लिहिला गेला प्रतिसाद.. थोडं विषयांतर देखील झालं.. क्षमस्व.
खूपच मन विषण्ण करतेय ही कथा,
खूपच मन विषण्ण करतेय ही कथा, आणि त्यानंतर हे शब्द तुमचे आहेत पण प्रसंग इतरत्र पाहिलाय हे प्रामाणिक स्पष्टीकरण कौतुकास्पदच
अजिंक्य, तुम्ही लिहिलेले दोन्ही प्रसंग अंगावर काटा आणतात
अजिंक्य, तुम्ही लिहिलेले
अजिंक्य, तुम्ही लिहिलेले दोन्ही प्रसंग अंगावर काटा आणतात++१११ मन आनि डोळे भरुन आले.
अंगावर काटा आणणारं आहे हे.
अंगावर काटा आणणारं आहे हे. कमी शब्दात छान मांडलंय.
बाप रे अजिंक्य राव भयानक आहे
बाप रे अजिंक्य राव भयानक आहे ती पेठ. मी बसने जायचे लहानपणी तेव्हा वर पाहीलं नं की खिडक्यात ओठ, गाल रंगविलेल्या बायका दिसायच्या. लहान पोरी सुद्धा टीनेजर टीनेजर
सर्वांचे प्रतिसादांबद्दल, आभार.