Submitted by कटप्पा on 17 October, 2019 - 12:08
नमस्कार - गेल्याच महिन्यात माझा तिसावा वाढदिवस झाला .
हो आता heap च्या पलीकडे प्रवास सुरु |
एकदम म्हातारपणाची फील येते आहे . तिशी नंतर काय काळजी घ्यावी सांगू शकाल का. मला स्किन टाईट ठेवायची आहे . केस गळू द्यायचे नाहीयत. फिटनेस चांगला आहे आणि तो सुरु ठेवणार आहेच .
काही टिप्स ??
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीशीतच गळपाटलास लका. काय खरं
तीशीतच गळपाटलास लका. काय खरं नाय तूजं.
डर्टी थर्टी ओव्हर??? आता
डर्टी थर्टी ओव्हर??? आता मस्त चाळीशी, पन्नाशी येतेय. फुलपाखरी वय. मुले उडुन गेलेली व आपण सुटवंग. एन्जॉय करा

____________
गेल्या महीन्यात ? म्हणजे तुम्ही 'कन्या' सूर्य वाटतं? तरीच आतापासून चिंतेचा भुंगा
_________
ओह ओह ओव्हर नाही आत्ता सुरु झालय. ते चाळीशी-पन्नाशीचे माझे सल्ले विसरा. एन्जॉय युअर थर्टीज.
तुम्ही या गोंष्टीचा विचार
तुम्ही या गोंष्टीचा विचार करण्यास फ़ार तरुण आहत अजुन.
भरपूर पाणी पिणे
भरपूर पाणी पिणे
नियमित व्यायाम
आहारात प्रोटिनचे प्रमाण वाढवणे
नियमित स्ट्रेचिंग
शिळं अन्न टाळा
महाभृंगराज तेलाने डोक्याची
महाभृंगराज तेलाने डोक्याची आठवड्यातून किमान तीनदा दहा मिनिटे मालिश करा, मग अर्ध्या तासाने अंघोळ करा. (किंवा रात्री मालिश करून सकाळी अंघोळ)
शॅम्पू वापरणे बंद करून शिकाकाई आणि थोडासा रिठा वापरा. अंग धुवायला उटणे वापरा साबण आठवड्यातून एकदाच.
दर पंधरा दिवसातुन केसांना मेंदी + जटामानसी + भृंगराज +ब्राम्ही + आवळा + जास्वंद फूल यांची पूड समप्रमाणात घेऊन रात्री कालवून पहाटे केसांना लावा, तीन तास ठेवा आणि मग अंघोळ करा.
सूर्यनमस्कार घाला आणि सोबत चक्रासन, सर्वांगासन, अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन आणि आकर्ण धनुरासन करा.
जिम लावा.
सलाद, पालेभाज्या जेवणात भरपुर प्रमाणात राहू द्या, रोज दोन फळं खा. पॅकेज्ड फूड टाळा. रोज किमान दहा मिनिटे ध्यान करा. आनंदी रहा. हसा आणि हसवा.
आई ग्ग.. तीस म्हणजे निम्मेही
आई ग्ग.. तीस म्हणजे निम्मेही नाही.. आधी ते तिशीचे टेंशन घेणे सोडा .. काय बाई एकेक
बाई दवे
बाई दवे
आमच्याकडे तीस हे लग्नाचे वय आहे सध्या
ते सुद्धा मुलींचे
मुलांचे कांदेपोहे सुरु होतात..
एक इन्स्पिरेशन म्हणून धाग्यात
एक इन्स्पिरेशन म्हणून धाग्यात शाहरूख आणतोय. क्षमस्व.
पण शाहरूख सलमान आमीर या तीनही खानांनी पन्नाशी ओलांडली आहे. आजही ते रोमांचिक हिरोच्या भुमिका निभावून शंभरेक करोडचा गल्ला कमावतात...
तर जमल्यास ते काय करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा
या दवे बाई कोण?
या दवे बाई कोण?
केसांची अजिबात काळजी करु नका.
केसांची अजिबात काळजी करु नका..... ब्रह्मदेवाने वरदान दिले तरी ते गळणारच आहेत ,जर आनुवांशिक गुण असेल तर. ( १०% विमानतळ बांधुन झालेला कार्यकर्ता.)
भरपूर पाणी
भरपूर पाणी
7 किंवा 8 तास झोप
दिवसातून फक्त एक चहा किंवा कोफी
रात्री एरंडेल, आर्गन ऑईल आणि इव्हिटामिन कॅप्सूल फोडून मिक्स करून मसाज
+१ अनु
+१ अनु
>>>>>>> 7 किंवा 8 तास झोप
दिवसातून फक्त एक चहा किंवा कोफी>>>>>>>>
आवश्यक तेवढी आणि नियमित झोप - हा एक अंडररेटेड मुद्दा आहे.
इतका कमालीचा फरक पडतो - जर नियमितता व पुरेशी झोप पाळली तर.
बायपोलरमध्ये शरीरातील इन्टरनल क्लॉक म्हणजे circadian rhythm दोषपूर्ण असते. लहान्पणापासून माझे झोपेचे प्रॉब्लेम्सच होते. पण एकदा डायग्नोस झाल्यावर औषधांच्या मदतीने ती र्हिदम एकदम जिगसॉ पझल सारखी चपखल बसली. इतका गुण आला लगेच. मानसिक आरोग्यात, संपूर्ण आमूलाग्र सकारात्मक बदल घडला.
आतासुद्धा वीकेंडला मी झोपेशी खेळायचं टाळते. अंगाशी येतं.
एकदा थायरॉईड चेक करून घ्या.
एकदा थायरॉईड चेक करून घ्या.
म्हणून सांगतो मैदानी खेळ खेळत
म्हणून सांगतो मैदानी खेळ खेळत जा. ते मोबाईलवर पब जी खेळत बसलं की असंच होणार.
<<तिशी नंतर घेण्याची काळजी>>
<<तिशी नंतर घेण्याची काळजी>> लग्न झाले नसेल तर लवकर उरकून टाका
एकच काळजी घ्या - अजून पुढची
एकच काळजी घ्या - अजून पुढची १० वर्षे असल्या गोष्टींची काळजी करणे सोडा आणि आपण अजूनही तरुण आहोत हे मनाला बजावून आयुष्य मनसोक्त जगून घ्या. चाळीशी ओलांडल्यावर ४० नंतर घ्यावयाच्या काळजीचा धागा शोधा आणि फॉलो करा.
धन्यवाद |
धन्यवाद |
लग्न झालेले आहे आणि एक अपत्य देखील आहे.
आणखी एक प्रश्न आहे पण वेगळा धागा उघडेन त्यासाठी|
आपल्याला कसलीही काळजी करायची
आपल्याला कसलीही काळजी करायची गरज नाही, जे काही करत आहोत तेच बरोबर आहे, आपण तरुण आहोत, तरुणच रहाणार आहोत अशा समजूतीत रहाल तर काही वर्षातच "काय ना, शेवटी मनाने तरुण असणे महत्वाचे" अशा दयनीय अवस्थेच्या समर्थकांमध्ये सामील व्हाल.
"काही वर्षातच "काय ना, शेवटी
"काही वर्षातच "काय ना, शेवटी मनाने तरुण असणे महत्वाचे" अशा दयनीय अवस्थेच्या समर्थकांमध्ये सामील व्हाल" ----> असे समर्थक असणाऱ्यांची अवस्था दयनीयच असते असे ढोबळ अनुमान काढणे अत्यंत चुकीचे आहे. उलट तो एक जगण्याकडे पाहण्याचा पॉसिटीव्ह दृष्टीकोन पण असू शकतो...नव्हे आहेच. शेवटी आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकजण असा विचार करतोच. त्यात चुकीचे किंवा वाईट काहीच नाही. 'मनसोक्त जगणे' याकडे हल्ली फक्त चुकीची जीवनपद्धती अवलंबणे याच दृष्टीने केवळ पाहिले जाते ही खरी शोकांतिका आहे.
सामान्यत: पन्नाशी पुढे
सामान्यत: पन्नाशी पुढे तारुण्य ओसरत जाते. पण सत्तरीच्या पुढे वय असताना बाप झाल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे जेंव्हा तुम्ही स्वत:ला "म्हातारे झालो" असे समजल तेंव्हा व्हाल. बरेचसे आपल्या मनावर असते. केस आणि त्वचेची काळजी तर सर्वच वयात घ्यावी लागतेच. त्वचेसाठी इ वीट्यामीन वाले पदार्थ खा, व्यायाम करा, पाणी प्या. केस गळण्याची जास्त चिंता नको. वयाचा केसाचा आणि तरुण असण्याचा काही संबंध नाही. बोनी कपूर चाळीशीच्या पुढे गेला होता पार टकला झाला होता तेंव्हा त्याने श्रीदेवीबरोबर लग्न केले होते व तिच्यापासून दोन मुली पण जन्माला घातल्या.
तिशी च्या अगोदर आरोग्य चांगले
तिशी च्या अगोदर आरोग्य चांगले राहावे म्हणून कोणतेच प्रयत्न केले नसतील.
उलट ते कसं बिघडेल ह्याची अगदी मनापासून काळजी घेतली असेल.
त्या साठी करायच्या सर्व गोष्टी केल्या असतील तर .
तिशी नंतरच आरोग्य भगवान भरोसे च सोडा .
तो जेवढे दिवस निरोगी ठेवेल तेवढे दिवस रहा .
आता प्रयत्न करून परिस्थिती मध्ये जास्त सुधार होण्याची शक्यता नाही .
इमारतीच्या जसा पाया मजबूत लागतो तसा
जीवनाच्या सुरवातीच्या वर्षात आरोग्याचा पाया
मजबुत करावा लागतो .
तोच जर ठिसूळ असेल
तर नंतर प्रयत्न करून काय फायदा.
निराश होवू नका जीवन आशेवर च सुखी होत
तिशीच्या अगोदर आरोग्य चांगले
राजेश ह्यांच्या प्रतिसादास खालील प्रमाणे अनुमोदन
तिशीच्या अगोदर आरोग्य चांगले राहावे म्हणून कोणतेच प्रयत्न केले नसतील
उलट ते कसं बिघडेल ह्याची अगदी मनापासून काळजी घेतली असेल.
त्या साठी करायच्या सर्व गोष्टी केल्या असतील तर .
तिशी नंतरच आरोग्य भगवान भरोसे च सोडा.
तो जेवढे दिवस निरोगी ठेवेल तेवढे दिवस रहा .
आता प्रयत्न करून परिस्थिती मध्ये जास्त सुधार होण्याची शक्यता नाही .
@अज्ञानी
@अज्ञानी

Submitted by अज्ञानी
Submitted by अज्ञानी
(No subject)
अज्ञानी Rofl Rofl Rofl
अज्ञानी
वय या संकल्पनेत का अडकायचं?
वय या संकल्पनेत का अडकायचं?
वयाच्या चौकटीत राहून आयुष्याची गणितं सोडवण्याच्या अट्टहास करणं म्हणजे दूध उतू गेल्यावर गॅस बंद करण्यासाठी धावण्यासारखं आहे.
वय कागद पत्रांवरच राहू दे. त्याचा शिरकाव मनातून, डोक्यातून, अगदी केसांपर्यंत जाऊन पोहचतो अन मग आपण "एवढं वय झालं आता हे करायला हवं, ते करायला हवं" यात गुंतत जातो. शारीरिक व मानिसक आरोग्य यावर होणारे परिणाम नैसर्गिक आहेत, ते बदलता आले नाहीत तरी त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शेवटी काय.. "मला आज हे करायचं आहे" यामध्ये वय कुठेच येत नाही.
वरील तज्ञ लोकांनी सुचवलेल्या
वरील तज्ञ लोकांनी सुचवलेल्या गोष्टी जमत नसल्यास आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट यावर आपली १०~१२ वर्ष कमी वयाची जन्मतारिख नोंदवून घ्या आपल्या बालपणीचा फोटो डकवून.
आरसा वगैरे गोष्टी झूट आहेत समजून वर्ज्य करा. आपला चेहरा बघायची इच्छा झाल्यास वरील कागदपत्रे बघावीत.
आपल्या आपत्याला आपल्याला बाबा, पप्पा डॅडी अशा हाक मारायला शिकवू नये, नावाने अथवा आपले लंगोटीयार ज्या नावाने आपला उद्धार करतात त्या नावाने हाक मारायला लावावे.
इमारतीतील / गल्लीतील लहान पोरात कच्चा लिंबू म्हणून खेळावे.
बायकोवर सढळ हस्ते खर्च करून तीला आपल्या वयाचा उल्लेख करू नये अशी कळकळीची विनंती करावी. वाटल्यास ती कशी आपल्याच आपत्याची लहान बहीण शोभते अशी पुडी सोडण्यासाठी हरकत नसावी.
हाकानाका
(No subject)