दिवाळी अंक २०१९

Submitted by रंगासेठ on 17 October, 2019 - 05:49

यंदाच्या दिवाळी साठीच्या दिवाळी अंकासाठी धागा दिसला नाही अजून, म्हणून हा धागा काढतोय. इथे यावर्षीच्या दिवाळी अंकांची चर्चा करुयात.
नुकतीच बुकगंगा वर चक्कर टाकली तर मोजकेच अंक उपलब्ध आहेत, हळूहळू होतील. मागील वर्षी थोडा उशीरच झाल मला अंक घ्यायला, त्यामुळे काही अंक राहिलेच वाचायचे. निदान यावर्षी तरी ते चुकता कामा नयेत म्हणून हा प्रयत्न.

अक्षरगंध, लोकमत, कालनिर्णय, हंस, नवल, मोहिनी हे आहेत उपलब्ध.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chioo, तुम्ही लहान मुलांसाठी निसर्गावर आधारित अन्काबद्दल विचारलं होतं ना? ह्या अन्काची माहिती वाचून पहा.

20191116_120937.jpg

<<निलेश, विनय आणि सगळ्याच मायबोलीकरांचे अभिनंदन.

Submitted by सस्मित on 11 November, 2019 - 04:47>>

धन्यवाद सस्मित !!

लोकमतच्या अंकात जाहिरातीच जाहिराती. सगळी पानं जाड ग्लॉसी. त्यामुळे अंक जड. पडून वाचता येत नाही. Wink
अक्षर नेहमीप्रमाणेच. सतीश तांबेंच्या कथेची बांधणी आवडली. सुनील तांबेंचा लेख नेहमीप्रमाणे ब्लंट.

नवनव्या उद्योगाबद्दलचे लेख इंटरेस्टिंग आहेत.
पार्थ एम एन यांचा २०१९ च्या निवडणुकांवरचा लेख मी इंग्रजीत आधी वाचला होता.

गेल्या आठवड्यात दिवाळी अंक एकदाचे हातात पडले!
पहिल्यांदा माझा आवडता मुशाफिरीचा अंक वाचायला घेतला. आत्तापर्यंत बराच अंक वाचून झाला. ह्या वर्षीचा अंक छान झाला आहे. ह्यावेळी मायबोलीवरची बरीच ओळखी नावं आहेत शिवाय माझ्या शाळेतल्या दोन मैत्रिणींचे लेख आहेत ते ही वाचायची उत्सुकता होती. वाचायला सुरूवात ह्याच लेखांपासून केली. अदिती जोगळेकर ने लिहिलेला 'क्वीन ऑफ सुपरबाईक्स' हा मुळच्या इराणी आणि नंतर पुण्यात रहाणार्‍या महिला बाईकरची ओळख करून देणारा लेख मस्त आहे. एका माहिला बाईकरचे अनेक देशांतल्या मोटरबाईकवरून केलेल्या भटकंतीचे अनुभव भारी आहेत!
सायली घोटीकरने लिहिलेला अझरबैजानची राजधानी बाकु ची 'दुसरी बाजू' सांगणारा लेख खूप आवडला. बर्‍याचदा अशी दुसरी बाजू सांगणारे 'पहिल्या' बाजूला विनाकारण नावं ठेवतात आणि 'हट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती' मोडात जातात पण सायलीने ते टाळलं आहे. शिवाय लेखाचा शेवट पुन्हा सुरूवातीला मांडलेल्या विचारावर केला आहे (समेवर परतणं की काय म्हणतात तसं) ते ही आवडलं.
ह्यानंतर ललिताचा 'भटकंती जेव्हा सरप्राईज देते' हा लेख वाचला आणि नेहमीप्रमाणेच आवडला! उत्तर युरोप भटकंतीत आलेले सरप्राईजींग अनुभव ललिताने मस्तच लिहिले आहेत. ( ललिता न्युझिलंडची लेखमालिका पूर्ण कधी करते आहे आणि उत्तर युरोपबद्दल सविस्तर लिहायला कधी घेते आहे ह्याची वाट बघतो आहे!!)

प्रकाश काळेल ह्यांचा मेघालयाबद्दलचा लेखही खूप आवडला. प्रकाश काळेलांनी काढलेले फोटो याआधी मायबोलीवर पाहिलेले आहेत, त्यामुळे मेघालयाचे फोटो अंकात रंगित स्वरूपात बघायला नक्कीच आवडलं असतं. (खरतर मुशाफिरीच्या संपादकांनी संपूर्ण रंगीत पानांचा काढण्याबद्दल नक्की विचार करावा. 'निळी मशिद' किंवा 'रात्रीची रोषणाई' असे फोटो ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात देऊन काहीच धड साध्य होत नाही. ना ते फोटो छान दिसतात आणि उगीच लेखाची जागा जाते! )
ईशान्य भारत भटकंतीबद्दलचाच यशोदा वाकणकरांचा 'कांचनगंगाच्या कुशीत' हा लेखही आवडला. ह्यापूर्वी मला ह्या लेखिकेचं लिखाण फार आवडलं नव्हतं. मागे त्यांचा एकल प्रवासाबद्दलचा लेख वाचला होता. 'आपण करतो ते लय भारी' असं कोणी लिहित असेल तर ते ठिक आहे पण त्याच्या जोडीला 'दुसरे करतात ते अगदी टाकाऊ' असा प्यॅकेजकाढू टोन आला की मग मात्र ते अजिबात आवडत नाही. त्या एकल प्रवासाबद्दलच्या आणि अजून एका लेखाबद्दलही असं काहीसं वाटलं होतं. पण हा लेख मात्र त्याला अपवाद ठरला आणि म्हणून आवडला.
'नदीच्या संगतीने' ह्या सदरातले नमामि नर्मदे आणि अ‍ॅमेझॉनच्या अंतरंगात हे लेख ठिकठिक वाटले. हल्लीच ह्या दोन्ही नद्यांच्या काठच्या प्रवासाबद्दल/पर्यटनाबद्दल काहीबाही वाचलेलं असल्याने तसं झालं असावं.
मोहना जोगळेकरांचा 'अगत्य आणि वाळवंट' हा इस्राईल आणि जॉर्डनमधल्या अनुभवांची तुलना करणाला लेख आवडला. इस्राईलबद्दल ह्यापूर्वी अगदी उलट एकलेलं असल्याने हे अनुभव लेखिकेला आलेले अपवादात्मक अनुभव असावेत असं वाटलं.

दिनेश शिंदे ह्यांचा उझबेकिस्तानातल्या समरकंद शहराबद्दलचा लेख ठिकठाकच वाटला. मला समरकंद असं शहर उझबेकिस्तानात आहे हेच माहीत नव्हतं! त्यामुळे वाचायची उत्सुकता होती. पण दिनेशदांनी केलेल्या वर्णनातून तिथल्या इमारती डोळ्यांसमोर काही नीट उभ्या राहिल्या नाहीत. कदाचित जोडीला चांगले (आणि रंगीत) फोटो नसल्याने असेल. बाकी त्यांचे बाजारातले अनुभव किंवा फळ वगैरेंचे वर्णन वाचायला ठिक होते.
'साईकिल बडी नामी चिझ है' हा सायली महाराव ह्यांचा पूर्व ते पश्चिम भारत सायकलस्वारीचा लेख खूप घाई घाईत उरकल्यासारखा वाटला. खरतर एव्हड्या मोठ्या सायकल राईडबद्दल आशुचॅम्प स्टाईलने तब्बेतीत १५-२० भागांची लेखमाला लिहायला हवी! तीन चार पानांच्या लेखापेक्षा लेखिकेची मुलाखत चांगली वाटली असती कदाचित.
हिमालय भटकंतीबद्दलच्या लेखांपैकी असिम आव्हडांचा बुरान घाटी ट्रेक बद्दलचा लेख कंटाळवाणा वाटला तर शैलजा रेगे ह्यांचा तुंगनाथ चंद्रशिला शिखर ट्रेक बद्दलचा लेख आवडला.

ह्या अंकातलं बाकीचं आणि बाकीचे अंक वाचून होतील तसं अजून लिहिन इथे.

Pages