दिवाळी अंक २०१९

Submitted by रंगासेठ on 17 October, 2019 - 05:49

यंदाच्या दिवाळी साठीच्या दिवाळी अंकासाठी धागा दिसला नाही अजून, म्हणून हा धागा काढतोय. इथे यावर्षीच्या दिवाळी अंकांची चर्चा करुयात.
नुकतीच बुकगंगा वर चक्कर टाकली तर मोजकेच अंक उपलब्ध आहेत, हळूहळू होतील. मागील वर्षी थोडा उशीरच झाल मला अंक घ्यायला, त्यामुळे काही अंक राहिलेच वाचायचे. निदान यावर्षी तरी ते चुकता कामा नयेत म्हणून हा प्रयत्न.

अक्षरगंध, लोकमत, कालनिर्णय, हंस, नवल, मोहिनी हे आहेत उपलब्ध.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंदणचा अंक मला मिळालाय. कथा चांगल्या आहेत, पण नवोदीतांनी लिहेल्यासारख्या वाटल्या. लेख अजून वाचले नाहीत.

दर वर्षीच्या 3 हुकमी एक्क्यांपैकी लोकमत कालच हातात पडलाय. किल्ला आणि भवताल दिवाळीच्या आधी मिळाले की मज्जानु लाईफ Proud बाकी कुठले घ्यायचे ते पेपरातलं परिक्षण वाचून ठरवेन.

लोकमतचा दिवाळी अंक कसा आहे? मी लोकमत, अक्षरगंध, नवल, दुर्ग आणि शब्दालय हे मागवावे असा विचार करतोय.
लोकसत्ताचा अंक अजून आला नाही वाटतं.

मी पण खूप फॅन आहे दिवाळी अंकांची, दरवर्षी माहेर, मेनका आणि लोकसत्ता चा घेतेच, मागच्या वर्षी धनंजय घेतला होता. कथा special कोणता अंक चांगला आहे?

काल दोन अंक हातात पडले .
प्रसिद्ध विनोदी दिवाळी विशेषांक - आवाज आणि श्री व सौ .
विनोद आवडणाऱ्यांसाठी आवाज नेहमीच पहिली पसंती आहे .
श्री व सौ मध्ये कथा आहेत .
आणि राजन खान यांच्या ' खुद्द आणि पाऊस 'या कादंबरीचा पहिला भाग आहे .
मी आपल्याशी हे नम्रपणे शेअर करू इच्छितो -
या अंकांमध्ये माझ्या कथा आहेत .
आवाज - विनोदी कथा
अन श्री व सौ - ऐतिहासिक , काल्पनिक दीर्घ कथा .

लहान मुलांसाठी, फिक्शन कमी पण माहितीपूर्ण लेख जास्त, निसर्गाबद्दल असे दिवाळीअंक कोणते?
या तिन्ही वेगळ्या कॅटेगरीज आहेत. Happy
आणि सध्या युरोपमध्ये अंक कुठून मागवता येतील?
भारतातही कुठून मागवता येतील?

मी साप्ताहिक सकाळचा वाचायला घेतला आहे. अमृता हर्डीकर आणि शिरीन महाडेश्वर यांच्या कथा आवडल्या. बाकी आजून वाचते आहे. इतर अंकांमध्ये मी इत्यादी, अक्षरधन, किशोर आणि शब्दालय मागवले आहेत.

लहान मुलांसाठी, फिक्शन कमी पण माहितीपूर्ण लेख जास्त, निसर्गाबद्दल असे दिवाळीअंक कोणते? >>>>>> माझ्या माहितीप्रमाणे ' वयम' हा अश्या कॅटेगरीतला अंक आहे. किशोरसुद्दा छान आहे.

युरोपमध्ये माहिती नाही पण भारतात तुम्ही बुकगन्गा, अक्षरधारा हे वेबसाईटस ट्राय करु शकता.

सई जी,
इत्यादी चा अंक छान असतो, वाचनीय .

मी आता त्याचं काम करत नसलो , तरी मी अगोदर त्या अंकाचे संपादन पाहत असे .

@बिपीन सांगळे,
अरे वाह! गुड टू नो!
मला सई जी म्हणू नका. सई म्हंटलं तरी चालेल!

अभिनंदन बिपीन.
धन्यवाद सुलू.
मला लिहितानाच वाटत होते की तिन्ही असलेला अंक सुचवला जाईल. ते छानच, पण तिन्हीपैकी एकातलापण चालेल.
१. लहान मुलांसाठी
२. फिक्शन कमी पण माहितीपूर्ण लेख जास्त
३. निसर्गाबद्दल

सुलु
विनिता
चिऊ
निलेश
तुमचे आणि इतरही साऱ्यांचे नम्र आभार

माझे शब्दालय आणि किशोर आले. किशोर अगदीच नाही आवडला यावेळी. पण शब्दालयची "बदलते नाते संबंध" ही थीम छान आहे. त्यात आत्तापर्यंत मुकेश माचकर यांचा "हाच मुलीचा बाप" हा लेख, प्रणव सखदेवची "पेयिंग गेस्ट" आणि डॉ. उर्जिता कुळकर्णी यांचा "समजून कुणी घ्यायचं" हा लेख वाचला. तीनही आवडले.
मुकेश माचकरांचा लेख सगळ्यात आवडला. फेबुवर त्यांची वेगळीच इमेज पाहत असते त्यामुळे त्यांचा हा लेख एकदम वेगळा वाटला
अंक सगळा वाचून झाला की पुन्हा पोस्ट करेन.

मी आपल्याशी हे नम्रपणे शेअर करू इच्छिते,
या अंकांमध्ये माझ्या कथा आहेत . __/\__
आवाज - विनोदी कथा
गोंदण - वैज्ञानिक कथा
धनंजय - क्षणकथा

अजून काही आहेत. अंक हातात आले की सांगते. Happy

Pages