Submitted by @गजानन बाठे on 16 October, 2019 - 09:35
बाप
माय जशी राबते दिवसाकाठी,
बाप तेवढा जागतो रातीनं.
तापात जगतो जीवन सारं,
उपेक्षित का ठेवला नियतीनं ?
दिसतो जरी पाषाण रुक्ष,
हळवा असतो तो हिमतीनं.
बाप होणं सोपं नसतं,
जीवन जगतो शिस्तीनं.
बाप म्हणजे जीवन अनुभव,
समाजाशी जोडनारा दुवा असतो.
म्हणून बसलेला का असेना?
बाप तेवढा हवा असतो.
बाप म्हणजे छत्र सावली,
असता नसते कुणाची छाप.
किंमत त्याची कळते तेंव्हा,
आपल्यात जेंव्हा नसते बाप.
@गजानन बाठे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छानच
छानच
छानच की.
छानच की.