देव्युपासना-बंगाली कविता-ओळख

Submitted by सामो on 6 October, 2019 - 13:28

चित्रे जालावरुन साभार. जरी माझ्याकडे पुस्तक असले तरी, कविता गूगल करुन शोधुन टाकलेल्या आहेत.
.

कलकत्ता या नावचा उगमच मुळी "काली" या नावाशी आहे. अर्थात कल्कत्त्यामधील दुर्गापूजा, कालीपूजा, शाक्त, तंत्र संप्रदाय आदिंची माहीती देणारी काही पुस्तके आधाशासारखी वाचून काढली, त्यातीलच गोळा केलेली माहीती या भागात देते आहे.
.
बंगाली पंडीत "शशीभूषण दासगुप्ता" यांनी देवीवर रचलेल्या काव्याबद्दल पुढील टिप्पणी केलेली आहे - देवीविषयक बंगाली काव्यात प्रामुख्याने २ देवता आढळतात पैकी उमा ही शंकराची पत्नी जी की देवीचे सुमुखी, वरदायिनी, मंगल अशी सौम्यस्वरुपा आहे. तिचा काव्य प्रकारात अंतर्भाव होणे यात काहीच नवल नाही , आश्चर्य तेव्हा वाटते जेव्हा काली जी की काळी आणि रुद्र अशी मृत्युदेवता आहे, गळ्यात नरमुंडांची माळा लेऊन, कापलेल्या मानवी हातांचा कंबरपट्टा लेऊन देखील काव्यप्रांतात शिरते व येवढेच नव्हे तर सौम्य उमेपेक्षा वरचढ ठरते. ते आश्चर्यच म्हणावे लागेल.
.
पुरुष देवतांच्या उपासनेची परंपरा, देव्युपासनेपेक्षा लवकरच झाली. मग ९व्या शतकातील विष्णु व शंकर या देवतांची दक्षिण भारतातील परंपरागत उपासना घ्या किंवा १५ व्या शतकापासून बंगालमध्ये रुढ झालेल्या श्रीकृष्णाच्या मधुराभक्तीचे उदाहरण घ्या. त्यामानाने कालीउपासना सुरु होण्याकरता १८ व्या शतकाचा मध्य उजाडावा लागला. या उपासनाकाव्यांमध्ये देवीकरता जो समर्पणभाव व भक्ती आढळते तिज शाक्तपदावली असेही म्हणतात. शक्तीची उपासना म्हणुन शाक्तपदावली हे नाव सार्थच आहे.यातील देवीविषयक काव्य हे मुख्यत्वे २ भागात विभागलेले आढळते - एक म्हणजे श्यामा संगीत. काली ही देवी श्यामलवर्णाची म्हणुन श्यामासंगीत. बंगाली समाजात हे संगीत अधिक रुढ असून दुसरे उमासंगीत जीमध्ये शिवपत्नी उमेच्या संदर्भातील गाणी आढळतात. श्यामासंगीतामध्ये मानवी भावनांचे आरोपण, भक्ताच्या भावभावनांचा अविष्कार दृगोचर होतो मग त्यात श्यामादेवीचे वर्णन घ्या अथवा स्तुती घ्या, तिच्या आशीर्वादाची अभिलाषा, तिला सांगीतलेले गार्‍हाणे, तिला दिलेला दिलासाच काय परंतु तिने कृपा न केल्यास तिला दिलेली धमकी हिचाही समावेश होतो. श्यामासंगीतात कवि, देवीशी थेट संवाद साधतो व तिच्या शत्रुविनाशक, कमल-पदांच्या सान्नीध्याची अभिलाषा बाळगतो.
.
याउलट उमासंगीतात "आगमणी" प्रकारातील लहान कथा गायल्या जातात. या गाण्यांमध्ये उमेचे माहेरी येणे, माहेरवास वर्णिला जातो. दुर्गापूजेच्या सुमारास, नवरात्रात, म्हणजे वर्षातून एकदा उमा शंकरासमवेत, गिरीराज व मेनका या आपल्या मात्यापित्यांकडे माहेरी येते असे मानले जाते. ती दुर्गापूजेच्या ३ र्‍या दिवशी तिच्या सासरी कैलासावर परत जाते. हे वर्णन केलेली गाणी म्हणजे "आगमणी". तर या संगीतात अजुन एका प्रकारची गाणी आढळतात - "विजय(या?)" या प्रकारात दसर्‍यास दुर्गेने महिषासुरावर मिळविलेला विजय साजरा होतो. उमा माहेरी जाणे, दुर्गेचा विजय अशी आनंद व दु:ख संमिश्र भावनांची गाणी या प्रकारात येतात.
.
११ व्या शतकात कालीउपासनेच्या तांत्रिक मार्गाचा अवलंब केला गेला, सुरुवात झाली. त्या सुमारास तंत्र रुढींनी व तत्वज्ञानाने जनमानसाचा ताबा घेतल्याचे दिसुन येते. कुंडलिनी उपासना ही याच मार्गातील पोट उपासना. श्यामासंगीतावर देखील तंत्र उपासनेचा प्रभाव काही प्रमाणात आढळतो. उदा - मायेमधुन मुक्ती, मोक्ष हवा असेल तर कालीउपासना करणे आवश्यक आहे ही श्रद्धा, करुणामयी, अनंता व आदिशक्ती या रुपात कालीची पूजा. अजुन एक रुप तारा या देवतेचे. तारा म्हणजे भवसागर तारुन नेणारी ही बौद्धधर्मातील देखील मुख्य देवता, या मार्गात आढळून येते. दुर्गेच्या विविध रुपांचा अंतर्भाव तंत्र मार्गात होतो. या मार्गातील, उमेचे स्थान मग त्यामानाने बरेच वरवरचे आहे. मुख्यत्वे शांकरी अर्थ्यात शंकरांची पत्नी असल्याने त्याना विविध प्रश्न विचारुन स्तोत्रे, तंत्रमार्गाची गुह्ये जाणुन घेणे अशा संदर्भात उमा समोर येते.
काली व उमेची संस्कृत स्तोत्रे , काव्ये ही फक्त शाक्तपदावली नसून, त्यांची छाप एकंदरच बंगाली संगीतावर दिसून येते.
.
"मंगलकाव्ये" हा काव्याचा एक वेगळा प्रकार ज्यात देवीदेवतांची स्तुती, विजयाची वर्णने वगैरे आढळतात. १७ व्या शतकापर्यंत तरी काली ही "मंगलकाव्ये" जॉनरची नायिका नव्हती. १७ व्या शतकात कुठे ती या जॉनरमध्ये दिसू लागली, विशेषतः कालिकामंगलकाव्य व त्यातील "विद्या-सुंदर(रा?)" ही कथा. कालीच्या नरमुंडांची, ध्वस्त हातांच्या कंबरपट्ट्याची जागा यात रत्नमाणकांच्या अलंकारांनी घेतलेली दिसून येते. १७ व्या शतकात, जरी काली ही देवी या काव्यात आढळू लागली असली तरी उमेचे या काव्यातील स्थान केवळ अबाधित आहे. उमेची स्तुती तर आढळतेच पण रोचक वळण असलेल्या बंगाली कथा यात आढळतात. शंकर हा वृद्ध, जटाधारी, भस्मार्चित व कफल्लक, सांपत्तिकरीत्या विपन्न असाच यामध्ये वर्णिलेला असून, उमा तर त्याच्याबरोबर खूष नाहीच पण उमेच्या मात्यापित्यांचे ही दु:स्वप्न (नाईट्मेअर) असा जावई म्हणुन शंकर चित्रीत केलेला असतो.
.
बंगाली काव्यावरती एकंदर आधीच्या पुरुषदेवतांच्या काव्याचा विशेषतः कृष्ण व वैष्णव पदावलीचा प्रभाव निर्विवाद आढळून येतो. यमके, अनुप्रास, उपमा आदि अलंकारच काय पण "भणित" म्हणजे ती सिग्नेचर ओळ जिच्यात कवि आपले नाव गुंफतो ती पद्धतही वैष्णव पदावलींतून, बंगाली काव्याने जशीच्या तशी उचललेली दिसून येते. वैष्णव संप्रदायात हरीचे नाम "कृष्ण" जे की बंगाली काव्यात श्यामेचे नाव "कृष्णा" म्हणुन येते. वैष्णव काव्यातील यशोदेची बाळकृष्णाबद्दलची ओढ, माया, वात्सल्य हे बंगाली संगीतात मेनकेची, उमेबद्दलची ओढ बनुन जसेच्या तसे येते. काही विद्वद्जनांच्या मते "प्रति-वात्सल्य" म्हणजे, भक्ताची, देवतेबद्दलची ओढ या स्वरुपातही ते आढळते. अशा रीतीने शाक्त काव्यावरती, वैष्णव काव्याचा प्रभाव आढळतो.
.
शिव ही देवता तंत्रमार्गात समाविष्टच होत नाही तर ती उच्च देवता म्हणुन समाविष्ट केलेली आढळते. परमोच्च ध्येय हे शिवसान्नीध्य म्हणा किंवा कुंडलिनी मार्गातील शिव-शक्ती मीलन व कॉस्मिक नृत्य घ्या ना.कालीच्या पायांखाली शिव हा मृतप्राय, प्रेतावस्थेत जसा आढळतो, तसाच देवीचा कामक्रीडेतील जोडीदार म्हणुनही येतो. म्हणजे कुठे उमासंगीतातील, भणंग वृद्ध कपि तर कुठे तंत्रमार्गातील सर्वोच्च देवता शंकर. असे वैविध्य आढळते.
.
या पुढील भागात रामप्रसाद सेन, कमलाकांत भट्टाचार्य व अन्य बंगाली कविंच्या कविता देइन. तोच मुख्य जिव्हाळ्याचा विषय आहे, बाकी हा भाग म्हणजे कोरडी, शुष्क माहीतीच. असो.
_______________________________________________

कवितांचा आढावा घ्यायचा तर इतके विविध भाव कालीच्या कवितांमध्ये आढळतात की सगळ्याकरता एकेक बकेट करावी लागेल आणि मग परत कुणाचा पायपोस कुणास उरणार नाही. तरी स्थूलमानाने पुस्तकामध्ये कवितांची वर्गवारी केलेली अहे तदनुसार कविता येत जातील. कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ नये म्हणुन प्रत्येक कवितेतील, काही ओळी गाळलेल्या आहेत.
पहीला प्रकार आहे ज्यात कवि त्याच्या मनामध्ये देवीचे रुपडे, तिची प्रतिमा पहातो आणि ती जशीच्या तशी कवितेत उतरविण्याचा प्रयत्न करतो. आता देवीच अशी रौद्र म्हटल्यावर या प्रकारातील बहुसंख्य कविता या तिचे रणांगणातील भीतीदायक रुप वर्णन करणार्‍याच आहेत.
महाराजाधिराज महताबचंद यांची-

Who is this, all alone? Whose woman is She,
shining like the moon, inky black? She's dread of face,
with blood streaming from Her mouth
and from Her tongue
clamped between Her teeth—yet She's young
and the flying streams of hair on that terrible body
shine. A pearl necklace swings at Her throat,
a girdle of human hands encircles Her waist.
Her breasts, plump and jutting out,
and the rest of Her monstrous body
are covered with rivers of blood. I see Her
children's corpses at Her ears, a half-moon on Her forehead, naked.
.
.
.
lothes are horrifying, and so is She, standing on Bhava's chest
with Her right foot forward. In every direction on the cremation grounds
the jackals howl and Sahkari cackles horridly.
Candra says: Promise me
that at my end I can meditate on You like this
Oh three-eyed Kali.
.

दुसर्‍या एका कवितेमध्ये रामप्रसाद सेन वर्णन करतात -
देवीचे केस सैराट मोकळे सुटलेले आहेत. तिच्या आसपास प्रेतांचा खच तर पडला आहे. तिच्या राक्षसगणांचे, भूतगणांचे थैमान रणांगणावर चालू आह. तिच्या मैत्रिणी नग्न रुपात तिच्या सेवेस आहेतच पण स्वतः देवीही आकाश व दशदिशा हेच वस्त्र ल्यालेली आहे. आणि ती अनेक हत्ती, घोडे, रथ एकामागे एक गिळत विजयोन्मादात रणागणावरुन चालली आहे. अशी ही रणरागिणी काली मला भवसागर पार करण्यास मदत करो. कमलाकांत भट्टाचार्य यांचीही अशाच अर्थाची ही कविता-

Jackals are dancing
among the corpses and non corpses
making horrid noises. Joining them
She cackles
a hideous laughter
and places Her feet
on the corpse-like Siva
tousling Her long
thick hair.
Kamalakanta (the poet) stares
absorbed
not even blinking his eyes.

तर अन्य एका कवितेत हेच कमलाकांत भट्टाचार्य देवीला क्रीडारत अशा सौम्य उन्मादक स्वरुपात स्वत:च्या हृदयकमळावर आरुढ पहातात. म्हणजे किती विविध रुपांनी कवि त्यांच्या प्रेयसाची मानसपूजा करत असतात हे कळून येइल. कधी ही रणरागिणी भावावस्था तर कधी उन्मादक प्रेयसी रुपातील.

So forgetful Mahadeva,
You have fallen in love!
You got her footprints
and now there is no separating you:
staring, staring,
you worship her.
.
.
.
Who knows the greatness of either of you -
you sky-clad sixteen year old,
and you naked Tripurari?
There is no end
to the bliss of Madana's bewitcher
lying lazily under the woman's hold,
he thirsts for the taste of love play
saying endearing things
he makes love to the beautiful one
in the lotus heart of Kamalakanta

देवीच्या चरणकमलांचा स्पर्श शंकरांना झाल्याने ते किती भाग्यवान आहेत अशा अर्थाचे पद्य बर्‍याच कवितांमध्ये आढळते. तसेच कविच्या हृदय कमळाचा (तंत्र मार्गातील अनाहत चक्र) उल्लेखही वारंवार येतो. व या कमळावरील शिव-शक्तीची संमोहक कामक्रीडा हा उल्लेखही वारंवार जाणवतो.
.
नंतर एका कवितेत रामप्रसाद सेन हे काळभैरवाचे दर्शन अंतचक्षूंनी घेतात. रामप्रसाद म्हणतात भर मध्यरात्री काळ्याकुट्ट अंधारात भैरव माझ्याकडे यायला, मला घाबरवायला निघाला आहे. हा भैरव कसा आहे तर तो "जय काली" असा जयघोष करीत नाचत, डमरु वाजवत व समवेत विद्रुप शिवगणांना, पिशाच्चांना घेऊन मला भिववण्यास येतो आहे. तो जटाधारी आहे, त्रिशूळ हातात घेऊन येणार्‍या त्याच्याही कपाळावरती चंद्रकोर आहे. तो आक्रमक आहे कधी साप तर कधी वाघ, कधी अस्वल असे वेगवेगळे रुप धारण करत तो माझ्या अंगावर झेपावतो आहे. पण कालीच्या साधकाला कसली भीती? माझे चित्त तसूभरही विचलित होत नाही आणि भैरव प्रसन्न होतो. तो मला बातमी देतो की तुझ्या मंत्राचा कालीने स्वीकार केलेला आहे. तू विजयी झाला आहेस.

The world-mother's police chief
goes strolling
in the dead of night.
"Victory to Kaali! Victory to Kaali!" he shouts
clapping his hands and bab-bam!
striking his cheeks.
Ghosts, goblins and corpses roused by spirits
also roam about, In an empty house
at the crossroads
they hope to unnerve the devotee.
.
.
.
.
First he resembles a snake
then a tiger
then a huge bear!
This may alarm the devotee:
Ghosts will kill me!
I can't sit a second more!
He is turning toward me
blood-red eyes!
But can a true practitioner
fall into danger? The police chief is pleased:
"Well done!Well done!Kali
of the grisly face
has empowered your mantra.
You have conquered now and forever!"
Poet Ramprasad the slave
floats in a sea of bliss.
What can trouble a practitioner?
Are frightful scenes a threat?
He stays sitting on the hero's seat
with Kali's feet
for a shield.

एका कवितेत कमलाकांत भट्टाचार्य देवीला विनवतात की काली देवी तुझा पाय कोणावर पडतो आहे ते तर बघ. तू तुझ्याच पतीला तुडवते आहेस. तो जो की भूतनाथ आहे, तुझा प्राणप्रिय वल्लभ ज्याच्यावर केलेली टीका सहन न होऊन तूच पूर्वी एकदा आगीत उडी घेतली होतीस. आज तू नकळत त्याच्यावरच थयथय नाचते आहेस. बस कर ही माया. अति झालं यावेळेस.कृपा कर तुझी ही माया दूर कर.
म्हणजे कविला हे जग व त्यातील संकुचितपणा, स्वार्थ, माया-मोह सर्वाचा वीट आला आहे व त्याला आता विशालतेचा, आईमध्ये विरुन जाण्याचा ध्यास लागला आहे. जिने हे मायापटल आच्छादिले तीच ते दूर करु शकते. म्हणून तो शंकरांची उपमा मात्र घेऊन हीच विनवणी करत आहे की पुरे, आता सहन होत नाही.
.
अन्य एका अशाच कवितेमध्ये रामप्रसाद सेन म्हणतात की -आईच्या पायांखाली शंकर थोडीच आले आहेत? काहीतरीच बोलू नका, मार्कंडेय ऋषींनी चंडी पुराणात सांगून ठेवले आहे की राक्षससेनेचा विध्वंस करत आई गतीमान होती तेव्हा एक राक्षसाचे पोर तिच्या पायाखाली आले व केवळ तिच्या स्पर्शाने ते शिवतत्व पावले, शंकर बनले. कोणी पत्नी तिच्या पतीस अशी पायाखाली तुडवेल थोडीच अन मग हळूच आपली मागणी पुढे कर कवि (रामप्रसाद) म्हणतात- पण मी तर शंकर नाही ना आई. मी तर क्षुल्लक दास आहे, मग माझ्या हृतकमलावर पाय ठेवण्यास दिरंगाई का?
.
आईने किती परोपरीने आपणास त्रास दिला आहे हे तिला सांगुन खरं तर तिला गिल्टी भावना देऊन मनासारखे म्हणजे तिचे चरणकमळ प्राप्त करण्याची आसही अनेक कवितात दिसून येते. जसे की ही कविता जिच्यात रामप्रसाद आईला दूषण देतात की अनेकांना तू चांगलंचुंगलं खायला घालतेस, त्यांना धनैश्वर्याने समृद्ध करतेस मला, तुझ्या भक्ताला मात्र निर्धन भुकेकंगाल ठेवतेस. हाच का तुझा न्याय आणि मग असं बरच वाक्ताडन झाल्यावर तेच स्वतः मान्य करतात की नाही नाही, मी तुला विसरलो आणि मग दु:खाच्या खाईत बुडलो.
.
महेन्द्र्नाथ भट्टाचार्य देखील देवीला वेठीला धरत, गिल्टी भावना देत,असेच काहीसे म्हणतात की काय हे कशी आई आहेस तू! मी तुझ्या बेजबाबदार वर्तनाने अवाकच झालो आहे. आणि तू म्हणे जगदंबा (अंबा म्हणजे आई). तुझ्या लेकराला ना घालायला नीट वस्त्रे ना खायला काही. त्यात तो दिवसरात्र बघतो काय तू स्वतःच्याच नादात शंकरावरती नाचते आहेस.तू मला इतक्या प्रकारे त्रास देऊनही, मला भौतिक जगात भारवाही हमाल बनवुनही, आई मी तुला क्षमा केलेली आहे. मी तरीही आई-आई याच नावाने टाहो फोडतो आहे. आता नक्कीच तू माझ्यावर अशी कृपा करशील की तुझे नाव घेत जर मला मृत्यु आला तर ब्रह्मरंध्रातून माझा प्राण जाईल व मला मोक्ष लाभेल. ( माझ्या माहीतीनुसार प्राण विविध द्वारांतून जातो.पण जेव्हा तो टाळूतून निघुन जातो तेव्हा मग माणसास पुनर्जन्माचा फेरा चुकतो)
.
नजरुल इस्लाम यांची एक मोहक कविता आहे. जिच्यात ते आईला आईपण शिकवु इच्छितात की चल आपण भातुकली खेळू आणि मग तू बघ मी बाहुल्यांवर कसे प्रेम करतो, त्यांना कसा लळा लावतो, तू माझ्याकडुन हे मातृत्वाचे धडे घे.

Let's be girls maa.
and play with dolls;
come into my playroom.
I will take the mother's role, so I can
teach you how.
If you make one dull or wretched
hold him to your bossom;
who else will ease his pain?
.
.
.
but all play games of hide-and-seek,
crying as they leave at night, returning with morning.
This little boy,
you made him cry
you made him fear.
Now love away his fear,
cease to make him cry-
Or casting you he will run away.
When this play is finished
lull him to sleep,
hold him in your arms.


या कवितेतील रात्रीचा व दिवसाचा लपंडाव हा जन्म मृत्युचा खेळ आहे. ही कविता मला फार आवडते कारण कवि आईला वात्सल्याचे धडे देत देत, तिच्या कुशीत विसावा घेण्याची आशा बाळगुन आहे.
.
अशा अनेक कविता आहेत, नाना भाव आहेत, देवीला वेठीस धरण्याचे, तिच्यावरती विसंबण्याचे, स्वतःला तिच्या हाती सोपवुन देण्याचे, तिला वाक्ताडन करुन दटावण्याचे - सर्वच्या सर्व अतिशय लोभस वाटतात. अशाच काही कविता पुढील भागात देईन.
___________________________________________________

रघुनाथ दास यांची एक कविता बरीच लांबलचक आहे पण खूप मनोरंजक आहे जिचा अर्थ पुढे देत आहे. बर्‍याच कवितांमधुन शंकराबद्दलचा मत्सर जाणवतो. म्हणजे कवि किती विविध सच्च्या भावनांतून या कविता लिहीतात (स्फुरतात) ते कळून येते.-
.
आई, शिवाला तुझा पादस्पर्श अगदी सहजतेने साध्य झाला आहे आणि पहा तर शिव काही तो खजिना कोणाबरोबर वाटून घ्यायला तयार नाही. पण मीही काही कमी नाही मीही त्या शंकराचाच पुत्र आहे, यावेळेस तर मी निश्चयच केलेला आहे की पहातोच माझा वारसाहक्क माझे वडील मला कसे देत नाहीत ते. वडीलोपार्जित संपत्तीवरती माझाही काही हक्क आहे की नाही? बरं आता जर बर्‍या बोलाने मला तुझ्या चरणकमळांचे सामिप्य दिले नाही ना तर मीसुद्धा लढेन शंकराशी. लव-कुश कसे अरण्यात रामाशी, रामाच्या सैन्याशी लढले तसाच मी शिवाशी लढेन. आणि मी एक तर लढून तरी तुझ्या चरणांवरील माझा हक्क प्रस्थापित करेन किंवा मग ते चोरुन तरी नेईन.माझी साधना हेच माझे धनुष्य, समर्पण, भक्ती आणि गुरुमंत्र हा बाण. हा बाण मी शंकरावर सोडेन जो की त्याच्या हृदयास छेदेल , एकदा का शिवा घायाळ झाला की पटकन चरण चोरुन तिथून पळून जाईन, प्रयाण करेन. आणि एकदा तुझ्या पायांचे सान्निध्य मिळाले तर मग ना मला मृत्युची भीती राहील ना कोणाची, अगदी शिवाचीही आणि मग मी डमरु वाजवत "जय दुर्गा" असा विजयघोष करेन.
पण ............ मग मध्येच काय की हृदयपालट होऊन कवि म्हणू लागतो किंवा असं करु शकेन शिवास अनेक बिल्वपत्रे वाहीन आणि माझे भोळे वडील माझ्यावरती प्रसन्न होऊन मला माझा वारसाहक्क देऊनही टाकतील.
.
ही जी नाट्यमयता आणि मग एकदम हळवा शेवटचा ट्विस्ट आहे तो इतका लोभस आहे. वरील कवितेत गुरुमंत्राचा जो उल्लेख येतो, तो बर्‍याच बर्‍याच कवितांमधुन आढळतो. देवीचे चरण हे तर जवळजवळ प्रत्येक कवितेत आढळतात. हे चरण कसे आहेत तर आरक्त आहेत. त्यांच्यावरती जे फूल वाहीलेल आहे ते आहे जवसाचे लाल बुंद फूल. मला वाटते जवस म्हणजेच जास्वंद.
जगात अनेक फुले उमलली आहेत जी सुगंधी आणि आकर्षक आहेत पण या जवसानेच असे काय पुण्य केले की कालीचे चरण त्यास प्राप्त झाले अशा आशयाच्याही कविता आहेत.
.
वरील मनोरंजक कवितेहूनही एक रामप्रसाद सेन लिखित विनोदी कविता आहे . कवि म्हणतो - मला वडीलोपार्जित संपत्ती मिळेल याची सुतराम आशा राहीलेली नाही. बापाने त्याचे सर्वस्व परक्यास , अर्थात कुबेरास दान करुन टाकळे आहे. (इथे हे लक्षात घ्या की शंकरास कुबेरमित्र म्हटले जाते) बाप आता नुसता बसून असतो. बरं मग मला आईचे चरण तरी मिळतील तर ते ही नाही, ते भाग्य तरी कुठलं; बापाने ते पाय कोणी चोरुन नेऊ नयेत म्हणून स्वतःच्या छातीशी घट्ट धरुन ठेवले आहेत. बरं बाप मरेल आणि मग मला आईचे चरण मिळतील तर ते ही नाही, बाप आहे मृत्युंजय , मृत्युवर विजय मिळवुन बसलेला. मरायचाही नाही.
.
It is silly to hope for father's wealth.
everything he owned
he deeded to someone else.
He gave all his money to Kubera
and sits around completely mad.
I used to hope for mother's feet
but father took them too.
ANd least anyone steal them,
he has placed them on his chest.
"When the father dies
the son inherits his wealth:"
so say the scriptures
but my father has beaten death,
he is not a dying type.
.

बर्‍याच कवितांमधुन ६ चोरांचा, धटिंगणांच उल्लेख येतो, ज्यांचा कालीच्या नामस्मरणाने बिमोड होतो. हे ६ म्हणजे षडरिपुच असावेत.
.
रामप्रसाद सेन यांची के कविता आहे जी तंतोतंत, शंकराचार्यांच्या एका स्तोत्रासारखी आहे. अगदी तशीच भावना. ते शंकराचार्यांचे स्तोत्र आत्ता सापाडत नाही. पण सेन यांच्या कवितेचा अर्थ असा की - माझे चालणे, फिरणे हीच आईची प्रदक्षिणा, माझे झोपणे हेच आईपुढे घातलेले लोटांगण, कानावर पडणारा प्रत्येक शब्द हा कालीमंत्रच, माझे अन्न हाच तिला लावलेला भोग.
.
अनेक कविता अगदी रुटीन जीवनामधुन स्फुरलेल्या आहेत. अगदी रोजच्या जीवनातील प्रसंग आहेत.
.
रामदुलाल नंदी म्हणतात - हे मना तू त्या समाजामध्ये चल जिथे लोक एकमेकांना नावे ठेवत नाहीत, या समाजाचा प्रमुख (शंकर असावा) अतिशय नम्र मनुष्य असून तो भस्माचे पट्टे कपाळावर ओढतो. जरी तू तिथे कफल्लक, विपन्नावस्थेत पोचलास तरी तो तुला धुतकारणार नाही तर तिथे तुझे स्वागतच होईल, तुला तिथे एक पैसा द्यावा लागणार नाही. हां पण एक मात्र लक्षात ठेव जर काही खोडी काढलीस, व्रात्यपणा केलास तर मग तुझी पैसे चारुनही कोणी सुटका करु शकत नाही. मग तुला तिच्या (काली) सख्यांचा वशीला लावुन माफी मागावी लागेल आणि ती करुणामयी तुला माफही करेल.
.
एका कवितेत, रामप्रसाद म्हणतात - हे मना तुझं शेत तर पार ओसाड पडलं आहे. यात काहीच पिक निघत नाही. मी शिकवतो तुला शेती. गुरुने दिलेला बीज मंत्र पेरुन त्याला सतत भक्तीचे पाणी घाल. हळूहळू सोनसळं पिक निघू लागेल.तेव्हा तू कालीनामाचे कुंपण घाल. काली महासामर्थ्यशाली आहे, तिच्या नामाच्या कुंपणापर्यंत येण्याची मृत्युचीही छाती नाही. आणि असं पिक तू दिवस-वर्ष-शतकानुशतके घेत रहा.
.
Oh mind you don't know how to farm,
your human field has fallen fallow.
Cultivate it and the crops you will grow
will gleam like gold, fence it round with Kali's name
So your harvest won't be harmed
The wildhaired one is strong
Death won't come near that fence
.
.
The teacher sowed the mantra;
now water his seed with devotion's showers
ANd oh if you can't do it alone, mind,
take Ramprasad along
.

कल्याणकुमार मुखोपाध्यायांचीही कविता अशीच चाकोरीमय जीवनावरती आधारीत आहे. व त्यातील उपमाही भन्नाट आहे. - आई ती पहा ट्रेन निघुन चालली आहे. मला टिकट-चेकर बाबूने अटक केली आहे का तर माझ्याकडे तिकिट नाही म्हणुन. मला हात बांधुन रेल्वे फल्कावरती बसविण्यात आले आहे. पण हे काय माझ्याकडे तर तिकीट सोडाच तुझ्या नावाचा पास आहे. हां आता पहा तिकिटचेकर बाबु कसा गोंधळला आहे.
अर्थात ही ट्रेन म्हणजे आयुष्य आहे आणि टिकिट बाबू म्हणजे मृत्यु/यम. पण ज्याने नामाची कास आयुष्यभर सोडली नाही तो आता या परलोक प्रवासात फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करणार.
.
Ma, the mail train is leaving now,
it's time for it to go.
But I have no ticket
and no credit.
says the "Rail babu."
Without money, I can't even
exit through the gate, so I guess
they'll tie up my hands
and I'l sit on the platform,"
branded by the Guard babu's blows.
But when I listen inside,
.
.
.
That's why at the end when destiny knocks
I will speak tha name
and get a first class seat;
the "Ticket babu" will go away
confounded
.

बँकेचे पासबुक, नावड्यास दिले जाणारे भाडे, बचत, नफा-तोटा, बुक-कीपिंग अशा कित्येक उपमांतून ही कालीविषयक बंगाली कविता फुलत जाते. क्वचित एकदम अनवट आणि विचित्र उपमाही समोर येते व फार काहीतरीच वाटतं उदा - स्त्रीच्या छातीवरती, दोन स्वयंभू लिंगे असतात आणि अंगुलीरुपी , पाच बेलपानांनी ती पूजली जातत. बाप रे असली उपमा वाचून दचकायलाच होते.
.
शेवटी एक विलक्षण काव्यमय गोड कविता रामप्रसाद सेन यांची.- काळे मेघरुपी, काली आणि मनमोर.
Black clouds have risen in my sky,
and my mind my peacock
dances prancing in joy.
Thundering "maa! maa! maa!!"
clouds clash
bedecking mountains
with lightning flashes
smile of bliss.
There is no stopping for me, no rest for me:
water rains from my eyes
soothing my heart's thirsty bird,
.
.
.
.
.

Group content visibility: 
Use group defaults

आहा.. काय सुंदर विषय निवडलात.
खूप आवडला लेख.

<आई, शिवाला तुझा पादस्पर्श अगदी सहजतेने साध्य झाला आहे आणि पहा तर शिव काही तो खजिना कोणाबरोबर वाटून घ्यायला तयार नाही. पण मीही काही कमी नाही मीही त्या शंकराचाच पुत्र आहे, यावेळेस तर मी निश्चयच केलेला आहे की पहातोच माझा वारसाहक्क माझे वडील मला कसे देत नाहीत ते.>>
किती सुंदर कल्पना आहे कवीची.

धन्यवाद श्रद्धा Happy मला खालील कविता फार आवडते. -
>>>>>>>>>>> एक रामप्रसाद सेन लिखित विनोदी कविता आहे . कवि म्हणतो - मला वडीलोपार्जित संपत्ती मिळेल याची सुतराम आशा राहीलेली नाही. बापाने त्याचे सर्वस्व परक्यास , अर्थात कुबेरास दान करुन टाकळे आहे. (इथे हे लक्षात घ्या की शंकरास कुबेरमित्र म्हटले जाते) बाप आता नुसता बसून असतो. बरं मग मला आईचे चरण तरी मिळतील तर ते ही नाही, ते भाग्य तरी कुठलं; बापाने ते पाय कोणी चोरुन नेऊ नयेत म्हणून स्वतःच्या छातीशी घट्ट धरुन ठेवले आहेत. बरं बाप मरेल आणि मग मला आईचे चरण मिळतील तर ते ही नाही, बाप आहे मृत्युंजय , मृत्युवर विजय मिळवुन बसलेला. मरायचाही नाही.>>>>>>>>>>>

खरंच छान आहे कविता..
महादेव आणि महाकाली माझे आराध्य असल्याने विशेष आवडली. Happy

फार सुरेख लेख. वेगळ्याच काही गोष्टींची ओळख झाली. मनापासून धन्यवाद! मूळ बंगाली कविता वाचायला किती छान असतील. बंगाली शिकायची इच्छा पुन्हा प्रबळ झाली. Happy

अनिंद्य धन्यवाद.

काल रात्री पुस्तक चाळत होते. देवीच्या ध्यानावरतीच किती कविता रचलेल्या आहेत.
--------
बंगालच्या रामप्रसाद सेन, नझरुल इस्लाम, शशीभूषण गुप्ता यांच्या पंक्तीतच आपले विष्णुदास आहेत असे जाणवते.

@ सामो,

मला दुर्गा- काली ही स्रीरुपे आद्य rebels वाटतात. हवा तो जीवनसाथी प्राप्त करण्यासाठी हवे ते करायला ठाकलेली, कठोरतम त्याग-तपस्या- प्रेम अर्पिणारी, सशक्त, स्वयंभू आणि सक्षम स्त्री … बरे, “त्याच्याकडून”अपेक्षा नाही. हवे तसे जगण्याचा पूर्णाधिकार स्वत:कडेच ठेवणारी स्त्री ….. she chooses her partner herself, the one who lives in Kailas, a tough terrain. He loves mahasmashan, smears ash on himself, dresses scantily and in a oddish way, smokes weed, does ‘bhaang’ and yet is true ‘Natraj’ .. sings, plays, enacts and dances the cosmic dance that destroys. Yet, her feminine charm, her love and energy only fires his, blends with his in sublime divinity that creates the universe. Again and again.

Very very powerful, no wonder she is revered as ‘Shakti’ herself.

अगदी बरोबर अनिंद्य तुम्ही शुभांगी भडभडे यांचे 'शिवप्रिया' पुस्तक वाचलेले आहेत का त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिका म्हणतात पार्वती ही खरोखर पहीली स्त्रीमुक्तीवादाची प्रणेती आहे असे त्यांना वाटते. शंकर - पार्वती हे नेहमी बरोबरीच्या नात्यात दाखवतात अनलाईक पाय चुरुन देणारी लक्ष्मी.

ते पुस्तक मी नाही वाचले पण clearly looks like case of great minds thinking alike Happy

बरोबरीच्या नात्याबद्दल अनुमोदन, तुलसीदास म्हणतात - जगत मातु पितु शंभू भवानी
एही शृंगार न जाई बखानी.

शिव-शक्तीचे प्रेम, त्यांचा शृंगार वर्णनापलिकडचा आहे,
They compliment One another, they are ONE.

Goddess Durga and Sacred Female Power
Book by Laura Amazzone

मधून साभार -

देवीच्या कारकत्वाखाली आयुष्याचे ऋतु येतात ; जन्म-बाल्य-तारुण्य-वृद्धत्व आणि मृत्यु.
देवी नानाविध रुपात आपल्याला भेटत रहाते, सहाय करत असते - कधी सृजनसरस्वती तर कधी समृद्धीलक्ष्मी, कधी आनंदमयी रमणिय ललिता तर कधी मृत्यु आणि आमूलाग्र बदल घडवून स्थित्यंतर घडविणारी काली, कधी कोपिष्ट चंडिका तर कधी जगज्जननी अंबा रुपात देवी पावलोपावली आपल्याला भेटते, सामोरी येते, आपल्या आजूबाजूस वावरते. तिची शस्त्रे अस्त्रे देखिल अर्थवाही, गूढ अशी आहेत, प्रतिकात्मकता हा त्यांचा गाभा आहे. जन्म-मरणाच्या चक्रामधुन भक्तांना सुखरुप पार करणारी नौका दुर्गा आहे. तिची तलवार ही फक्त दुष्टांचे निर्दालनच करत नाही तर, सुष्टांचे रक्षण करते, देवीच्या भक्तांना, मोक्ष प्रदान करते. भक्तांना क्लेषकारक आणि अवजड होणारे निरुपयोगी तत्व, तिच्या तलवारीचे पाते छाटून टाकते जसे - सदोष धारणा, मृतप्राय नाती आणि अहंकार व अन्य दुर्गुणांची विषवल्ली असे प्रत्येक निरुपयोगी अंश , देवी तलवारीच्या तीक्ष्ण पात्याने छाटुन टाकते. तिच्या तलवारीचे टोक हे एकाग्रतेचे, तिच्या न्यायप्रियतेचे आणि विवेकस्वरुपाचे प्रतिक आहे. अध्यात्ममार्गात प्रवासी असणार्‍या प्रत्येक व्यक्तीकरता विवेक हा गुण अत्यावश्यकच आहे. तिची सर्व धारदार शस्त्रे, भक्तांच्या समोर येणार्‍या अडचणींचे जंजाळ कापून टाकते, प्रगतीची वाट मोकळी करते. तिची ढाल हे तिच्या भक्तास दिलेल्या अभयाचेच प्रतिक आहे तर धनुष्य हे जिद्दीचे, एकाग्रतेचे व बाण भेदक अंतर्दृष्टीचे प्रतिक मानले जावे. हाती धरलेली अक्षमाला, त्यातील प्रत्येक मणी हा भक्तास अनुभवास येणार्या आणि अध्यात्मिक प्रगतीकरता आवश्यक अश्या धड्यांचे प्रतिक आहे. तर त्रिशूळ हे भूत-भविष्य आणि वर्तमान तीन्हीला भेदून , मायेचे आवरण छेदून तसेच सृजन-स्थिती-अंत या तीन्ही अवस्थांच्या परे असणार्‍या ब्रह्माचे निदर्शक आहे. शंख आणि हातातील घंटा हे वातावरणातील, आजूबाजूच्या नकारात्मक लहरी भेदणारे अस्त्र आहे. सुदर्शन चक्र स्थूल प्रतलावरील, मायेचा अंत करणारे प्रतिक आहे. हातात धरलेले मुंडके, गळ्यात घातलेली मुंडमाळ ही अहंकाराचा नाश दर्शविते.

ध्यानधारणेचे 'न्यास' हे अंग आहे ज्याचा अर्थ स्वतःला, आपल्या देहाला, त्या त्या देवतेच्या शक्तीचे वहन करण्याचे आवाहन असते. षडंगन्यास, हृदयंगन्यास वगैरे स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर येतात, जे की मी म्हनत असे. मात्र पुस्तक वाचल्यानंतर मला त्याचा अर्थ आज, ध्यानात आला. तंत्रमार्गात हे पवित्र ते अपवित्र असा विधीनिषेध नाही. किंबहुना हे दोन्ही, तंत्रमार्गात एकत्रच हातात हात घालून येतात. 'न्यास' क्रियेमध्ये भक्त हा स्वतःला त्या त्या देवतेच्या रुपातच पहातो. देवतेचे प्रतिबिंब, स्वतःमध्ये अनुभवतो.

भग म्हणजे उर्जा, प्रकाश असा अर्थ असतोच परंतु भग या शब्दाचा 'योनी' अर्थसुद्धा आहे, हे माहीत नव्हते. या पुस्तकातून ते कळले. भगवती म्हणजे तिच्यामधून अखिल जग जन्म घेते. शाकंभरी म्हणजे विविध भाज्या, फळे हे देवीचेच एक रुप आहे. उदा - लज्जागौरीचे रुप हे विश्वसृजनाचे प्रतिक आहे. जिथे पाश्चात्य देशांत अनेक विषय टॅबु (गुप्तता बाळगण्याचे, न बोलण्याचे) मानले जातात, people shy away & deny, तिथे पौर्व्रात्य संस्कृतीत हे विषय त्याज्य मानलेले नाहीत तर त्यांना आदराने स्वीकारलेले आहे.