मला काहीच आठवत नाहीये - भाग ८ - मला सगळं आठवतंय!!!!!

Submitted by अज्ञातवासी on 5 October, 2019 - 22:42

भाग ७
https://www.maayboli.com/node/70137

"हा काय प्रकार आहे?" मी ओरडले.
"शांत हो."
"काय शांत हो, हे सगळं काय होतंय?"
"तू आधी शांत हो."
"नाही..." मी जोरात किंचाळले.
"डबा आता पूर्ण उलट झाला होता. आजूबाजूचं वातावरण डोळ्यासमोर क्षणाक्षणाला बदलत होतं."
"शांत हो," तो ओरडला.
मी डोकं गच्च धरून खाली बसले.
हळूहळू सगळं शांत होऊ लागलं.
"तुला काहीच आठवत नाहीये बरोबर?"
"कोण आहेस तू?"
"मी आहे कुणीतरी, बाहेरून आलेला, तुझ्या या जगात."
"म्हणजे?"
"हे तुझं जग नाहीये मानसी."
"मानसी?"
"हो मानसी, मानसी गजानन इनामदार!"
माझ्या डोळ्यासमोर अचानक काही चित्रे येऊ लागली.
तो मोठा बंगला...
'बाईसाहेब उठा,' म्हणून कुणीतरी आवाज देतंय...
एक लहान मुलगी तिच्या बाबांना घट्ट मिठी मारून रडतेय.
'काही नाही होणार तुला,' बाबा तिला सांगतायेत.
मला रडू फुटलं, ट्रेन आता थांबली होती.
"तू कोमात आहेस मानसी, आणि हे जग फक्त आणि फक्त तुझ्या कल्पनाशक्तीने बनवलंय. जस तुला हवं होतं तसं."
"नाही, हे खरं नाहीये."
"हेच खरंय मानसी, हे सगळं खोटं आहे. विचार करून बघ, ही ट्रेनही खोटी असली तर?"
माझं डोकं प्रचंड दुखू लागलं.
"थांबव हे सगळं."
"तेच तुला सांगतोय मानसी, थांबव हे सगळं."
तो माझ्या जवळ आला. त्याने माझा हात घट्ट पकडला.
"सगळं नीट होईल, चल परत जाऊयात."
"मला कुठेही जायचं नाहीये, माझ्या आई बाबांना सोडून."
"मानसी, तुझे बाबा तुझी वाट बघतायेत खऱ्या जगात."
माझ्या अश्रूंना पारावर उरला नव्हता.
"हे जग खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मी जर इथून गेले तर आई, बाबा, आयुषी... सगळ्यांनाच दुरावेल."
"मानसी, ती फक्त तुझी कल्पनाशक्ती आहे. असं समज एक स्वप्न..."
"म्हणजे स्वप्न संपलं, तर हे सगळे नष्ट होतील."
"हो," तो उद्गारला.
"मग मला कुठेच जायचं नाहीये. कुठेही नाही... समजलं. निघून जा इथून. मला घरी जायचंय परत."
ट्रेनचा वेग प्रचंड वाढला होता. तो क्षणाक्षणाला इकडेतिकडे आदळत होता.
"थांबव हे सगळं मानसी, परत चल."
"नाही...."
धाड!
तो दूर जाऊन कोसळला.
"थांब ग मने... "मागून आवाज आला.
आई? इथे???
"आई...." मी तिला घट्ट बिलगले.
"शांत हो, काही नाही होणार."
"आई हा मला कुठेतरी घेऊन जायला बघतोय. मी गेले, हे सगळं संपेन."
आईने बराच वेळ मला थोपटले.
"मनी. आता लक्ष देऊन ऐक. वेडी, आम्ही कधी नव्हतोच, तर आमच्या जाण्याची चिंता का करतेस. कल्पनेच्या स्वर्गात राहण्यापेक्ष्या वास्तवाचं चार भिंतीच घरच खूप महत्वाचं असतं.
तू खूप स्ट्रॉंग आहेस. आहेस ना? मग वास्तवाला सामोरं जायला शिक, आणि जिंकून घे त्याला....
आम्ही राहूच ग तुझ्या आठवणीत कायम. आणि काय माहीत, पुन्हा भेटूसुद्धा!"
पण आता जा!"
... आणि आई विरून गेली....
मला रडू आवरत नव्हतं.
"चल मानसी," त्याने माझा हात पकडला. मला उठवलं. घट्ट मिठी मारली...
... आणि खिशातून बंदूक काढली व माझ्यावर गोळी चालवली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!!!!
अज्ञा लवकर येऊदे पुढचा भाग.. Happy

इतक्या gap नंतर लिहील्यावर
वाचकांना काही आठवेल का?
>> म्हणून तर सकारात्मक विधान केलय ना - मला सगळ आठवतय!

तिसऱ्या भागा नंतर वाचलेच नव्हते...आज एकदमच सगळे भाग वाचले ..छानच आहे उत्कंठा वाढत आहे..आता पुढचा भाग लवकर येऊ दे