डोप!

Submitted by अज्ञातवासी on 5 October, 2019 - 04:39

मी पडलोय बेडवर, वर पंखा चालुये, गोल...गोल...
कालचा पेपर, वाचलाच नाही...
आजकाल जरा किक कमी बसतेय, दोन गोळ्या वाढवाव्या का?
नकोच!
एक वाढवली तर काय हरकत आहे?
की नवं औषध घेऊ?
तो म्हटला यासारखं औषध नाही.
मी उठलो. डबीतून गोळी काढली, जिभेखाली ठेवली.
पंख्याचा वेग वाढलाय, की?
बसली...किक बसली...
बल्ब पिवळाच होता ना? आता इंद्रधनुष्य दिसायला लागलाय.
पंखा जोरात फिरतोय, अजून जोरात, अजून जोरात...
मी वाऱ्याने उडून जाईल असा...
"मला कुशीत घे ना?"
मी दचकलो... हा आवाज? शक्यच नाही.
"मला खूप थंडी वाजतेय, फॅन कमी कर ना!"
तू...तू... कुठे आहेस?
"मी लपलेय, तुझ्यापासून!"
शक्य नाही मनस्वी, तू जिवंत असणं शक्य नाही.
"मग माझं भूत बोलतंय का?"
मी सैरभैर होऊन उठलो. सगळ्या घरात शोधू लागलो.
कुठे आहेस तू, मनस्वी?
"आहेच ना, तुझ्याच जवळ..."
मनस्वी!!!!!!
मला गरगरतय, सगळं जग वाऱ्याने उडतय, हा पंखा इतका का जोरात चालू झालाय.
"मला कुशीत घे ना."
गॅलरीतून आवाज येतोय.
आलो, आलो... मी गॅलरीत उभा राहिलो.
खाली... मनस्वी खाली रस्त्यावर उभी आहे... माझी मनस्वी.
थांब मनस्वी... मी आलोच...
मी खाली उडी टाकली...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी खाली उडी टाकली, पण काय सांगू, मी तरंगतोय, मुक्त पिसासारखा, हलकं वाटतंय,
आणि हो माझी मनस्वी माझ्या जवळ आहे,
खाली थोडीफार लोक जमा झालीत, पोलीस आले आहेत, रुग्णवाहिका आली आहे.
...पण माझी मनस्वी, फक्त माझ्या कुशीत आहे. फक्त माझ्या...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

He is drug addict. >
Sanju मुव्हीतला सिन आठवला..

>>>>>>>>>I felt he is taking drugs.>>>>>>> होय मधुरा मला ९९% वाटतं डोप म्हणजे ड्रग्स च.