" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
माझा प्रश्न असा आहे की यात अस्तादचं काय चुकलं? खरंच संवाद एवढ्याशा गोष्टीवरून संपतो? स्त्रियांपेक्षा पुरुष कमी बोलतात हे संशोधनाअंती सिद्ध झालंय, मग 'तू माझ्याशी बोल' असा तिचा हट्ट का? उलट तिनेच एखाद्या विषयावर त्याचं मत विचारून त्याला बोलकं करता आलं नसतं का? घराघरात चालणाऱ्या नवरा बायकोंच्या वादाला सुरुवात, नवऱ्याकडून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्या बायकाच करतात असं वाटतं. परिणामी जे सहजीवन असायला हवं त्याचं काहीं काळानंतर केवळ सोबत यात परावर्तन होतं, आणि आयुष्य मजेत जगण्या ऐवजी एखादी शिक्षा भोगण्यात कंठावं असं होऊन जातं.
मागच्या आठवड्यात रविवारी सकाळीच मुलगा आणि सून यांच्यात धुसफूस सुरू झाली. पत्नीला विचारले तेव्हा कारण कळले कि मुलगा त्याच्या बायकोला गुणवत्ता वेळ (क्वालीटी टाईम) देत नाही म्हणून ती मुसमुसत होती. तिच्या नवीन सलवार कमीझचे त्याने कौतुक केले नव्हते म्हणून तिचा घसा दाटून आला होता. तो तिला " आय लव यू " असे म्हणून सहा वर्षे झाली अशी तिची तक्रार होती. वादविवाद करून थकल्यावर शेवटी समझोता या मुद्यावर झाला कि त्याने तिला लांब फिरायला न्यावे, बाहेरच खावे आणि त्यानंतर सिनेमा बघूनच घरी परतावे. मुलाने तिचे म्हणणे मान्य करताच तिची कळी खुलली आणि वीस मिनिटांत दोघं बाहेर पडली सुद्धा. अर्थात नातवाला आमच्याकडे सोपवून.
माझे मन भूतकाळात शिरले. मी माझ्या आजी आजोबांचे एकमेकांवर असण्याऱ्या प्रेमाच्या आठवणीत गुंगून गेलो. त्याच आजी आजोबांचा माझा मुलगाही एक भाग होता. जेव्हा जेव्हा माझी आजी माझ्याबरोबर असायची तेव्हा ती आजोबांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत असे, तिची आणि आजोबांची भेट कशी झाली, तिला आजोबांची भीती कशी वाटायची, त्यांच्या खोलीत जाताना तिच्या छातीत कशी धडकी भरायची, बाहेरच्या खोलीतच तिला कशी डुलकी लागायची, आजोबांशी बोलणे व्हायचे ते कधीतरीच असायचे आणि तेही त्यांच्या चेहऱ्याकडे न बघताच, इत्यादी. परंतु ह्या गोष्टी सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत असे. आजोबांबद्दल बोलताना तिच्या आवाजात एक प्रकारचा आदर असायचा, प्रेम असायचं.
मला खरोखरच आश्चर्य वाटायचे कि आजोबात तिने काय पाहिले ? माझ्या आजोबांच्या कपाळावर तर कायम आडव्या रेषा असायच्या. आवाज नेहमी गुरगुरल्या सारखा यायचा आणि हसण्याशी असणारे त्यांचे वैर तर सर्वश्रुतच होते.
मला प्रश्न पडायचा कि गेली पन्नास वर्ष एकमेकांसोबत असणारी हि दोघं कशी काय एकमेकांवर इतकं उत्कट प्रेम करू शकतात?. माझी आजी अजूनही त्यांच्यावर कशी काय भाळू शकते? ते कसे काय तिच्यासाठी जगातले एकमेव पुरुषोत्तम असू शकतात? त्यांच्याही आयुष्यात वादळे येऊन गेली असतीलच. विसंवाद झाला असेलच. वादविवाद घडले नसतील कशावरून? जगात असे कुठलेही कुटुंब नसेल कि ज्यात वाद झालाच नसेल आणि तरीही ही वृध्दा त्यांचे नाव घेतल्यावर एखाद्या षोडश वर्षीय तरुणी सारखी लाजते. तिच्या डोळ्यात चमक येते. जगाचा अनुभव तिला काय कमी आहे? तिचे सारे आयुष्य सुखाचा त्याग करण्यातच तर गेले आणि तरीही माझ्या आजीनी माझ्या आजोबांबद्दल एकही वावगा शब्द कधीही काढला नाही. काय म्हणावे तिला? मी तिला विचारलं " आजी, तू आजोंबाशी संवाद कसा साधतेस गं? ती म्हणाली, " ज्ञानेश्वर काय म्हणाले माहीत आहे ना तुला..? ते म्हणतात, " शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादू। हे तव कैसेनि गमे।परेहि परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे। "
मी अगदी शपथेवर सांगू शकतो कि आजोबा तिला कधीच " आय लव्ह यू " म्हणाले नसतील.
आताच्या काळात नवरा 'सह'चर
आताच्या काळात नवरा 'सह'चर जास्त असतो, मित्र जास्त असतो, समसमान असतो.
पूर्वीच्या काळी तो अधिकतर 'प्रोव्हायडर, रक्षणकर्ता, कर्ता पुरुष' अशा रोलमध्ये असे हे कारणही असू शकेल. तेव्हा वयात अंतरही जास्त असे. तेव्हा प्रेमविवाहदेखील होत नसत.
>>>>>>>>मग 'तू माझ्याशी बोल' असा तिचा हट्ट का? उलट तिनेच एखाद्या विषयावर त्याचं मत विचारून त्याला बोलकं करता आलं नसतं का?>>>>>>>> तिचा तो हट्ट आणि त्याला जे वाटते आहे 'मत विचाराव यंव न ट्यंव...' तो मात्र समंजसपणा का? आईस ब्रेक दर वेळी तिच करुन करुन कंटाळली असेलही.
शिवाय ती आजीच्या वयाची आहे का? त्या वयाची झाल्यावरती पहा ना तिला अभिमान वाटतो, प्रेम वाटतं का ती अजुनही हट्टी आहे वगैरे. कधीकधी ते वय आल्याशिवाय त्यातील खुमारी कळत नाही.
आजोबा तिला कधीच " आय लव्ह यू
आजोबा तिला कधीच " आय लव्ह यू " म्हणाले नसतील>>>> काहीही. आय लव्ह यू नसतील म्हणाले तर काही दुसरं बोलले असतील प्रेमाने खासगीत. जुन्या काळी सगळ्यांदेखत रागीटपणा दाखवाय्चा ट्रेंड होता. एकांतात करत असतीलच की संवाद.
यश, माझ्याशी बोलना>>>> नाटकाचा विषय वैगेरे चांगला आहे. पण हे प्रोमोतलं माझ्याशी बोलना मला पण जरा खटकतंच. माझ्याशी बोलना काय? आणि मग त्यावर काय बोलु असं येणारच.
बोलकी तुला काय बोलायचंय ते मग तो बोलेलंच की.
बरं निवेदक डायरेक्ट आजी आजोबापर्यंत गेले. मधे स्वतःची बायको-संसार चा स्टॉप का नाही?
अगदी शपथेवर सांगू शकतो कि
अगदी शपथेवर सांगू शकतो कि आजोबा तिला कधीच " आय लव्ह यू " म्हणाले नसतील.>> म्हणून कोणी म्हणूच नये आणि कोणी अपेक्षा ही ठेवू नये का?मुळात ते शब्द नाहीत तर भावना व्यक्त करणं अपेक्षित असतं
तुमचे विचार एककल्ली आहेत. अजिबात पटले नाहीत.
शब्देविण की शब्दाविन???
शब्देविण की शब्दाविन???
बाकी एकच धागा ५ वेळा पोस्ट केल्याने ५ धाग्यांचे फळ मिळत नाही...
संत ज्ञानेश्वरांच्या कानडा
संत ज्ञानेश्वरांच्या कानडा हो विठ्ठलु या प्रसिद्ध अभंगात ' शब्देविण संवादु' ही ओळ आहे. तीही तितकीच प्रसिद्ध आहे. अवतरण म्हणून सर्रास वापरली जाते.
प्रसिद्ध अभंगात ' शब्देविण
प्रसिद्ध अभंगात ' शब्देविण संवादु' ही ओळ आहे. तीही तितकीच प्रसिद्ध आहे. अवतरण म्हणून सर्रास वापरली जाते.>>> ओह!! माहिती नव्हतं... धन्यवाद!
नवरा बायकोच्या निरोगी नात्यात
नवरा बायकोच्या निरोगी नात्यात असा संवाद अधिक चांगला असतो. पत्नीला इतकं गृहित धरतो पण जेव्हा ती काही दिवस परगावी जाते तेव्हा तिची उणीव भासते. करमणुकीची कितीही साधनं असोत, आजूबाजूला मित्रमंडळी असो, पण तिच्याशिवाय काहीतरी पोकळी आतमध्ये जाणवत राहते. पूर्वीच्या बायका कुंकू सहिसलामत असले की तेवढ्यात समाधानी असायच्या. फार अपेक्षा नसायच्या त्यांच्या पतीकडून.
कधीकधी ते वय आल्याशिवाय
कधीकधी ते वय आल्याशिवाय त्यातील खुमारी कळत नाही.> +1
अवांतर - अति बडबड करणार्या नवऱ्यांना बायका कशा वैतागतात हे भोवतालच्या काही घरांत पाहिलं आहे.. डोमा:
बरं निवेदक डायरेक्ट आजी
बरं निवेदक डायरेक्ट आजी आजोबापर्यंत गेले. मधे स्वतःची बायको-संसार चा स्टॉप का नाही?
Submitted by सस्मित on 5 October, 2019 - 01:40
हो, धागा लेखकांनी स्वतःचे अनुभव पण सांगावे.
बरे पण हे इतक्या वेळा का बरे
बरे पण हे इतक्या वेळा का बरे ??????/
मनातल्या मनात मी तुझ्या समीप
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो .... असं असावं काहीतरी ... आजीच सांगू शकेल!
मीही अश्या आनंदी बायका पाहिल्यात.... कधीकधी प्रेम समर्पणाच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलं असतं.
आजीसमोरची आणि सुनेसमोरची
आजीसमोरची आणि सुनेसमोरची परिस्थिती बदलली आहे, दोघींना एक तागड्यात तोलायचा आग्रह का? आजी ला जे वाटले ते आणि तसेच सुनेला कसे वाटेल, तिलाही काही कारणाने टेन्शन आले असेल, हार्मोनल चेंजस मुळे मूड स्वीन्ग होत असतील, तिला नवऱ्याबरोबर थोडा वेळ घालवायची इच्छा असेल,
राहत राहिला प्रश्न नातवंडांचा, इथे लिहिण्यापेक्षा स्पष्ट बोलून जबाबदारी नाकारायची असल्यास नाकारू शकता. संवादानेच कुटुंबातले प्रश्न सुटतात.