लहान मुलांसाठी कार्टून सोडून पाहण्यासारखे काही

Submitted by KulkarniRohini on 3 October, 2019 - 07:43

आज कालची मुले सुद्धा खूप हुशार झाली आहेत. मी जेव्हा माझ्या इतर फ्रेंड्स वैगरे सोबत चर्चा करते तेंव्हा माझी मुलं आणि इतर यात नाही म्हणाल तरी थोडी तुलना होतेच। त्यात जेंव्हा बॉस म्हणतो माझ्या मुलाला चेस चे सगळे rule माहीत आहेत तेंव्हा वाटत की अरे हा एवढासा पोरगा याला एवढं कसं काय माहिती तर कळतं की tv. त्यांच्या कडे सदन कदा स्पोर्ट्स चॅनेल चालू असतात.
मी एकत्र कुटुंबात राहते सो माझ्या चिमुरडीला रिमोट मिळणं लांबची गोष्ट. पण अशा काही मालिका किंवा काहीतरी आहे का की ऑनलाईन का असेना पण आपण त्यांना दाखवू शकतो.
या माध्यमाचा परिणाम होतोच आणि तो थोडा सृजनात्मक का होऊ नये.

Group content visibility: 
Use group defaults

@च्रप्स - त्यांनी ऑलरेडी

@च्रप्स - त्यांनी ऑलरेडी कार्टून सोडून सुचवायला लावलंय!

मी माझी पुतणी, वय वर्षे ३, युट्युबवर creativity चे व्हिडीओ दाखवतो. उदा. मातीपासून वस्तू बनवणे, टाकाऊ वस्तूंपासून छोट्या टिकाऊ वस्तू बनवणे इत्यादी. सध्यातरी ती यातलं स्वतःहून काहीही करू शकत नसली, तरी भविष्यात उपयोगी पडेल. फक्त त्या विडिओबरोबर आपणही लाईव्ह कॉमेंट्री चालू ठेवायची (हे बघ, कशी माती गोल केली, आता कलर देतील) अशी.
तिच्या शाळेत एकदा बाई मातीपासून वस्तू बनवत असताना 'नीट मळून घ्या बरंका' असं फर्मान सोडून बाईला भोवळ आणायचं बाकी ठेवलं होतं Biggrin
टीवी जास्त बघितला जात नाही.

रोहिणी 'पहिले' च पाहिजे असे आहे का? पाहण्यापेक्षा ऐकायला लावलेले जास्त चांगले असे मला वाटते.
गोष्टी, गाणी मुलांना पहायला दिली कि त्यांचे इमॅजिनेशन संपते. त्यापेक्षा गाणी, गोष्टी ऐकायला लावल्या तर मुले खुपश्या
गोष्टी इमॅजिन करतात आणि क्रिएटिव्हिटी वाढते .

सामी, सहमत आहे. आपण परीकथा, साहसकथा आणि मग प्रेमकथा असा प्रवास करत असताना दृकमाध्यम कमीच होतं. दूरदर्शन होतं पण ठराविक तासच. त्यामुळे मुख्य भर वाचून कल्पना करणं, मनात चित्र उभे राहणे हे व्हायचंच. याने नक्कीच कल्पनाशक्ती वाढत असणार.

YouTube हा खूप मोठा शिक्षक व्हायला लागलाय. चांगल्या गोष्टी कश्या बघितल्या जातील ह्यावर पालकांचा control हवा. शक्यतो मुलांचा आणि पालकांचा फोन वेगळा असला तर बरं नाहीतर दरवेळेस फोन मुलांच्या हातात देताना न-चुकता setting adjust करून द्यायचे. मुलं youtube वर वेगवेगळ्या गोष्टी आपापल्या explore करतात आणि हळूहळू preferences तयार होतात.

मीसुद्धा आता हेच लिहिणार होतो की चुकूनही युट्युबवर 'गाडी वाला आय घरसे कचरा निकाल,' 'फुगे घ्या फुगे' किंवा 'छोटू पाणीपुरीवाला' हे व्हिडीओ नजरेस पडू देऊ नका.
अर्थ कळत नसला तरी नेहमीचे शब्द, नाच, गाणं आणि कॉमेडीमुळे कितीही समजावलं तरी तेच बघत असतात.

Howstuffworks नावाची एक अफलातून वेबसाईट आहे अतिशय सुंदर कंटेंट आहे, आपण
वयाने मोठी माणसे सुद्धा मंत्रमुग्ध होतो