मैत्री.."Friendship

Submitted by Happyanand on 1 October, 2019 - 13:17

मैत्री कॉलेज Canteen मधील
गरमागरम चहाप्रमाणे वाफळणारी असावी..
मैत्री पावसाळ्यात Treking ला गेल्यावर
धबधब्याच्या खाली भिजणारी असावी
मैत्री पावसात ओलीचिंब होणारी असावी..
कधी ती distilled वॉटर सारखी नितळ असावी..
तर कधी ती seawege वॉटर सारखी गढूळ असावी..
मैत्री म्हणजे chemistry लॅब मधील प्रत्येक reaction असावी..
तर मैत्री कधी micro lab च्या autoclave सारखी शिट्टी मारत बसावी..
मैत्री zoology च्या starfish सारखी सुंदर असावी..
मैत्री botany च्या Root सारखी खोलवर रूजावी..
मैत्री रडणाऱ्या डोळ्यांना रुमाल देणारी असावी..
मैत्री मरेपर्यंत हसवणारी असावी..
मैत्री एकमेकांना चीडवणारी असावी..
रुसल्यावर मनवणारी असावी..
. मैत्री मन भरून शिव्या देणारी असावी
मैत्री कधी कानफटात मारणारी असावी..
दंगे मस्ती करत एकमेकांना साथ देणारी असावी..
मैत्री जीवा ला जीव देणारी असावी..
डोळ्यात अश्रू असताना सुद्धा
गालावर हसू आणणारी असावी..
मैत्री श्वासाला श्वासात गुंफनारी असावी..
मैत्री स्पंदन बनुन हृदयात धडकणारी असावी..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> मैत्री zoology च्या starfish सारखी सुंदर असावी..
मैत्री botany च्या Root सारखी खोलवर रूजावी..>>>> हे आवडलं.