लव्ह बर्डस..

Submitted by Happyanand on 1 October, 2019 - 04:13

स्टेशन उतरल्यावर अचानक एक पावसाची सर आली नि श्लोक चिंब भिजुन गेला. तो धावत पळत जाऊन स्टेशन च्या बाहेरील एका टपरीवजा हॉटेल च्या आडोशाला जाऊन उभा राहिला.
,"झटक्या भाई ,एक फक्कड चाय आणि 1 क्लोमिक्स"
झटक्याने चमकुन वर पाहिले,

तीन वर्षानंतर तो ही हाक ऐकत होता. झटक्या ऊर्फ झरनालाल हा एक चाळीशीतला भैय्या,,,,
"क्या साहब इतने सालो बाद इस गरीब की दुकान पे"
श्लोक ने क्लोमिक्स पेटवली आणि झटक्याला उत्तर देनार इतक्यात त्याची नजर समोर गेली समोरुन एक व्हाईट ड्रेस मधील परी येत होती, नाजुक कमनीय बांधा, कुंतल कुरळे केस, हरीणीच्या पाडसारखे डोळे,,,,
अगदी तशीच, अगदी हुबेहूब
तो नकळत नेत्र्याच्या आठवणी मध्ये हरवुन गेला ..
सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी त्याने नेत्रा ला पाहीले आणि पहील्याच नजरेत प्रेमात पडला ...तो तिच्याकडे भारवुन पाहत होता तीने जवळ येऊन चुटकी वाजवली तसा तो भानावर आला
"excuse me"...नेत्रा
"Yes "...श्लोक
"RKS college
कुठे आहे सांगु शकाल का "..नेत्रा
आणि कॉलेज च्या पहिल्याच दिवशी श्लोक ला एक सुंदर मैत्रिण मिळाली... कॉलेज चे दीवस सरू लागले श्लोक, नेत्रा, शर्वरी, पायल निलेश, प्राजक्ता, आशुतोश छान ग्रुप जमला
खरंतर फक्त नेत्रा आणि श्लोक च ट्रेन ने येणारे पण त्यांचा पुर्ण ग्रुपच झटक्या भाई च्या टपरी वर जमत असे चहा सोबत गप्पा होत, मौज मस्ती, रुसवे,फूगवे सार काही चालु होते, कधी कधी झटका भाई पण त्यांच्या गप्पा मध्ये सामील होत असे,
आज नेत्रा एकटीच बसली होती रस्त्यावरची वर्दळ पहात,,,
आणि अचानक कांगावा झाला,, समोरच असलेल्या CAFE Coffee day (CCD) मधुन पोलिस त्या युवकाला पकडून नेत होते ,
ने्त्राने थोडे पुढे येऊन पाहीले तो युवक दुसरा तिसरा कोणी नसुन त्यांच्याच ग्रुप मधील आशितोश होता,

>>>क्रमशः >>>

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nileema madam.. lavkarch yeil next part actully pahilyandach lihnyacha praytn kelay..thoda vel लागेल नेक्स्ट परत la..