ती, एक कॉर्पोरेट वुमन अन तो व्यवसाय करणारा. ऑफीस, तिथेले कामकाज, तिथली चॅलेंजेस काय असतात, याची कदाचित त्याला काहिच माहिती नसावी, अन माहित करुन घ्यायची ईच्छा सुद्धा. नविन नविन प्रेमात तो तिची खुप तारीफ करायचा, तिच्यावर कविता करायचा. सोशल मिडीयावर ती ईतकीशी अॅक्टीव्ह नव्हती, पण तो त्यात मास्टर होता. गोड गोड लिहुन ईतरांवर भुरळ पाडणे चांगलेच जमायचे त्याला. स्त्रियांवर होणार्या अन्यायाविरुद्ध हि खुप काही लिहायचा. या सगळ्यामुळे तर ती अजुनच प्रेमात होती त्याच्या.
हळुहळु, नवे ताजे प्रेम शिळे होऊ लागले, थोडे थोडे मतभेद, वाद होत होते, पण प्रेम त्याच्यावरचढ होते, सो कधी ती, कधी तो असे दोघेही अॅडजस्ट करत होते, तशी दोघांनाही कल्पना होतीच की रागात एकही कमी नाहीये. दिवस असेच जात होते, रुसणे - मनावने, ब्लॉक- अनब्लॉक चालुच होते, त्यातच एक दिवस परत एकदा दोघांचे कडाक्याचे भांडण झाले, पण हल्ली तीच्या लक्षात येऊ लागले होते की रागात त्याची भाषा खुप विचीत्र अन खालच्या दर्जाची असते, एरवी स्वत:ला सज्जन म्हणुन दाखविणार्या त्याची ती अपमानास्पद भाषा खुप टोकाची असते, मग काय आयुष्यात परत कधीच एकमेकांची थोबाडे न बघण्याचे ठरवुन दोघांनी एकमेकांना ब्लॉक केले.
अजुन काही दिवस गेले, दोघेही सगळे विसरुन आपापले आयुष्य जगत होते, त्याने तीला अनब्लॉक केले होते, पण तीला त्याची शिव्या देण्याची व्रुत्ती खुप खटकत होती, सो तीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरविले, पण शेवटी तीने त्याच्यावर मनापासुन प्रेम केले होते त्यामुळे ते तीतके सोपेही नव्हते. अशात एक दिवस तीच्या ऑफीसमध्ये प्रमोशनस डिक्लेअर झाली अन तीलाही प्रमोशन मिळाले, ति खुप खुश होती, अखेर तीच्या मेहनतीला फळ मिळाले होते. अन आनंदाच्या भरात तिच्याही नकळत तीने ही बातमी त्याला सांगीतली. खरतरं चुकलेच तीचे पण म्हणतात न दिल पे किसी का जोर नही. असो, तर, तोही तिच्या आनंदात सामील झाला, आपल्या आधीच्या क्रुत्याबद्दल माफी मागीतली, हीनेही नात्याला एक संधी द्यावी म्हणुन त्याला माफदेखिल केले.
असेच अजुन काही दिवस गेले , परत एकदा, येरे माझ्या मागल्या म्हणत, रुसवे फुगवे, भांडणे चालू. पण यावेळी एक फरक होता, त्याला शिवीगाळ करायची सवय होतीच पण यावेळी त्याने तिच्या चारित्र्याविषयी अपशब्द वापरले. त्याच्या मते बायकांना ऑफीसात प्रगती करायची असेल, प्रमोशन हवे असेल तर रंगरलीया कराव्या लागतात अन तेव्हाच त्यांना प्रमोशन मिळते. तिच्यासाठी त्याचे हे असले विचार खुप धक्कादायक होते. ती मानी होतीच, चांगल्या घरची, संस्कारी अन स्वावलंबी देखील होती, त्यामुळे हे सगळे पचवायला कठीण गेले तीला. सोबत त्याच्या विचारधारेची किवही आली. अन काहीही झाले तरी अश्या व्यक्ती बरोबर ती तीचे आयुष्य जगुच शकली नसती. प्रेमासाठी केली असती अॅडजस्टमेंट गरज पडल्यास, पण हे असे चारित्र्यावर शिंतोडे शिंपडणे तीच्या सहनशक्तीबाहेरचे होते, यापेक्षा अख्ख आयुष्य एकटीने काढने चालले असते तीला, तसेही स्त्रियांना, खासकरुन आर्थिक द्रूष्ट्या स्वावलंबी स्त्रियांना, पुरुष नावाच्या कुबड्यांची गरज नसते असे तीचे ठाम मत होते. तीने तीचा निर्णय घेतला त्याला तिच्या आयुष्यातुन हाकलुन लावायचा कायमसाठी . तसेही एका खोट्या, सज्जन बुरख्या मागे असलेल्या खर्या मानसाला, स्त्रियांचा फक्त तोंडदेखिल मान राखणार्या पण प्रत्यक्ष त्यांच्याविषयी ईतके घाणेरडे विचार असणार्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात स्थान नव्हतेच. त्याने नंतर बर्याचदा तीची माफि मागीतली, अजुन एक संधी देखिल मागीतली पण....
तिचा निर्णय झाला होता, स्वाभिमानाने जगण्याचा 
<गर्भार पत्नीला सोडणाऱ्या
<गर्भार पत्नीला सोडणाऱ्या रामापेक्षा दुसऱ्याच्या पत्नीवर जबरदस्ती न करणारा रावण मला जास्त विचारी वाटतो>>>> रावणकी मजबूरी थी वोह! त्याला कोण्या एका गंधर्व स्त्री कडून शाप होता की परस्त्रीच्या अंगास तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला तर त्याची १०० शकले होतील का तत्सम काहीतरी.
हे रामाला माहीत होते का? असेल तर रामाने सीतेला पहिले अग्निदिव्य करायला सांगितले तेव्हा सीतेने परवानगी दिली असती, असे त्याला वाटत होते असा अर्थ लावायचा का?
रामायण घडायच्या आधीच
रामायण घडायच्या आधीच स्क्रिप्ट लिहिली गेली होती. त्यामुळे त्या त्या पात्रांना तसं तसं वागणं भागच होते.
स्पर्श म्हणजे - कामभावनेने
स्पर्श म्हणजे - कामभावनेने बरोबर.
Pages