तिचा निर्णय

Submitted by VB on 30 September, 2019 - 01:23

ती, एक कॉर्पोरेट वुमन अन तो व्यवसाय करणारा. ऑफीस, तिथेले कामकाज, तिथली चॅलेंजेस काय असतात, याची कदाचित त्याला काहिच माहिती नसावी, अन माहित करुन घ्यायची ईच्छा सुद्धा. नविन नविन प्रेमात तो तिची खुप तारीफ करायचा, तिच्यावर कविता करायचा. सोशल मिडीयावर ती ईतकीशी अ‍ॅक्टीव्ह नव्हती, पण तो त्यात मास्टर होता. गोड गोड लिहुन ईतरांवर भुरळ पाडणे चांगलेच जमायचे त्याला. स्त्रियांवर होणार्या अन्यायाविरुद्ध हि खुप काही लिहायचा. या सगळ्यामुळे तर ती अजुनच प्रेमात होती त्याच्या.
हळुहळु, नवे ताजे प्रेम शिळे होऊ लागले, थोडे थोडे मतभेद, वाद होत होते, पण प्रेम त्याच्यावरचढ होते, सो कधी ती, कधी तो असे दोघेही अ‍ॅडजस्ट करत होते, तशी दोघांनाही कल्पना होतीच की रागात एकही कमी नाहीये. दिवस असेच जात होते, रुसणे - मनावने, ब्लॉक- अनब्लॉक चालुच होते, त्यातच एक दिवस परत एकदा दोघांचे कडाक्याचे भांडण झाले, पण हल्ली तीच्या लक्षात येऊ लागले होते की रागात त्याची भाषा खुप विचीत्र अन खालच्या दर्जाची असते, एरवी स्वत:ला सज्जन म्हणुन दाखविणार्या त्याची ती अपमानास्पद भाषा खुप टोकाची असते, मग काय आयुष्यात परत कधीच एकमेकांची थोबाडे न बघण्याचे ठरवुन दोघांनी एकमेकांना ब्लॉक केले.

अजुन काही दिवस गेले, दोघेही सगळे विसरुन आपापले आयुष्य जगत होते, त्याने तीला अनब्लॉक केले होते, पण तीला त्याची शिव्या देण्याची व्रुत्ती खुप खटकत होती, सो तीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरविले, पण शेवटी तीने त्याच्यावर मनापासुन प्रेम केले होते त्यामुळे ते तीतके सोपेही नव्हते. अशात एक दिवस तीच्या ऑफीसमध्ये प्रमोशनस डिक्लेअर झाली अन तीलाही प्रमोशन मिळाले, ति खुप खुश होती, अखेर तीच्या मेहनतीला फळ मिळाले होते. अन आनंदाच्या भरात तिच्याही नकळत तीने ही बातमी त्याला सांगीतली. खरतरं चुकलेच तीचे पण म्हणतात न दिल पे किसी का जोर नही. असो, तर, तोही तिच्या आनंदात सामील झाला, आपल्या आधीच्या क्रुत्याबद्दल माफी मागीतली, हीनेही नात्याला एक संधी द्यावी म्हणुन त्याला माफदेखिल केले.

असेच अजुन काही दिवस गेले , परत एकदा, येरे माझ्या मागल्या म्हणत, रुसवे फुगवे, भांडणे चालू. पण यावेळी एक फरक होता, त्याला शिवीगाळ करायची सवय होतीच पण यावेळी त्याने तिच्या चारित्र्याविषयी अपशब्द वापरले. त्याच्या मते बायकांना ऑफीसात प्रगती करायची असेल, प्रमोशन हवे असेल तर रंगरलीया कराव्या लागतात अन तेव्हाच त्यांना प्रमोशन मिळते. तिच्यासाठी त्याचे हे असले विचार खुप धक्कादायक होते. ती मानी होतीच, चांगल्या घरची, संस्कारी अन स्वावलंबी देखील होती, त्यामुळे हे सगळे पचवायला कठीण गेले तीला. सोबत त्याच्या विचारधारेची किवही आली. अन काहीही झाले तरी अश्या व्यक्ती बरोबर ती तीचे आयुष्य जगुच शकली नसती. प्रेमासाठी केली असती अ‍ॅडजस्टमेंट गरज पडल्यास, पण हे असे चारित्र्यावर शिंतोडे शिंपडणे तीच्या सहनशक्तीबाहेरचे होते, यापेक्षा अख्ख आयुष्य एकटीने काढने चालले असते तीला, तसेही स्त्रियांना, खासकरुन आर्थिक द्रूष्ट्या स्वावलंबी स्त्रियांना, पुरुष नावाच्या कुबड्यांची गरज नसते असे तीचे ठाम मत होते. तीने तीचा निर्णय घेतला त्याला तिच्या आयुष्यातुन हाकलुन लावायचा कायमसाठी . तसेही एका खोट्या, सज्जन बुरख्या मागे असलेल्या खर्या मानसाला, स्त्रियांचा फक्त तोंडदेखिल मान राखणार्या पण प्रत्यक्ष त्यांच्याविषयी ईतके घाणेरडे विचार असणार्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात स्थान नव्हतेच. त्याने नंतर बर्याचदा तीची माफि मागीतली, अजुन एक संधी देखिल मागीतली पण....

तिचा निर्णय झाला होता, स्वाभिमानाने जगण्याचा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार करण्या योग्य.
तिला निदान लग्नापूर्वी हे ओळखून निर्णय तरी घेता आला.बऱ्याच जणींना बऱ्याच काळानंतर हिपोक्रसी कळते.

ती जिथे र्हस्व पाहिजे तिथे दीर्घ व दीर्घ पाहिजे तिथे र्हस्व झाली आहे. आशय चांगला. व्हर्बल अब्युज सहन करायची गरज नाही. शुद्धलेखन एकदा चेक करून घ्या फक्त. इ ई

आवडला निर्णय!
> तिला निदान लग्नापूर्वी हे ओळखून निर्णय तरी घेता आला.बऱ्याच जणींना बऱ्याच काळानंतर हिपोक्रसी कळते. > खरंय.

ek number

सुंदर लिहिलंय. फिल्ड वेगळे वेगळे असले की कामातल्या अडचणींचा, पध्दतीचा अंदाज एकमेकांना येत नाही. पण चारित्र्यावर संशय घेणे विकृत व्यक्तीचं लक्षण आहे. आवडला तिचा निर्णय.

डार्क लिप्स्टिक लाव णारी स्त्री अवेलेबल असते असे ही मला एकां नी बोलून दाखव ले होते. काय ही मान सिकता.

तिला निदान लग्नापूर्वी हे ओळखून निर्णय तरी घेता आला.बऱ्याच जणींना बऱ्याच काळानंतर हिपोक्रसी कळते.>>>>+१.

सुंदर आहे कथा. मी मगाशी एका धाग्यावर अगदी हेच्च विचार मांडले की - आर्थिक स्वावलंबन = निर्णयक्षमता व खंबीर मन हे समीकरण नेहमीच असते असे नाही. आर्थिक स्वावलंबन इज अ नेसेसरी कंडिशन बट नॉट सफिशिअंट.

>> डार्क लिप्स्टिक लाव णारी स्त्री अवेलेबल असते असे ही मला एकां नी बोलून दाखव ले होते. काय ही मान सिकता.>> अगदी भयंकर आहेत हे. त्या माणसाचे विचारच तो अन्य लोकांवर आरोपित करत आहे वर त्याला ते माहीतही नाही. अन सर्वात कडी म्हणजे तो हे विचार जगाला सांगतोय.

डार्क लिप्स्टिक लाव णारी स्त्री अवेलेबल असते असे ही मला एकां नी बोलून दाखव ले होते. काय ही मान सिकता. >> बरोबर आहे. लोक असाच विचार करतात. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणार्या, सतत डीपी अथवा प्रोफाइल पिक्चर बदलणार्या, टॅटू काढून घेणार्या स्त्रीयांबद्दल असाच विचार केला जातो. खरं तर चारित्र्यहीन ठरवण्यासाठी नवनवीन कारणं शोधली जातात. याबाबतीत अजूनही भारत पूर्णपणे मागासलेलाच आहे.

माझ्या शेजारी राहणाऱ्या बारावी झालेल्या मुलीचं नुकतंच कॉलेज बंद केलंय का तर त्या मुलीच्या वडिलांकडे आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली की ती डार्क लिपस्टिक लावून फिरते म्हणून. आता तिला केसांना पफ पण अलावूड नाही. प्रत्यक्षात ती घरी सगळं शेअर करते तरीही लोकांमुळे ती नजरकैदेत आहे...

डार्क लिपस्टिक म्हणजे अव्हेलेबल हा म्हणजे कहरच झाला ! कुछ तो लोग कहेंगे ! लोगो का काम हे कहना .. पर तुम भी अपने बात पे अडे रहना !

> माझ्या शेजारी राहणाऱ्या बारावी झालेल्या मुलीचं नुकतंच कॉलेज बंद केलंय का तर त्या मुलीच्या वडिलांकडे आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली की ती डार्क लिपस्टिक लावून फिरते म्हणून. आता तिला केसांना पफ पण अलावूड नाही. प्रत्यक्षात ती घरी सगळं शेअर करते तरीही लोकांमुळे ती नजरकैदेत आहे... > हो अशाप्रकारच्या केसेस ऐकल्या आहेत...

तुम्हाला नसेल माहिती - अशा गोष्टी बाहेर थोदीच येतात. आपली सोसायटी अजुन टिनेज प्रेम , टिनेज सेक्स वगैरे अक्सेप्ट करन्याइतकी म्याचुअर नाही झालीय.

तुम्हाला नसेल माहिती - अशा गोष्टी बाहेर थोदीच येतात. आपली सोसायटी अजुन टिनेज प्रेम , टिनेज सेक्स वगैरे अक्सेप्ट करन्याइतकी म्याचुअर नाही झालीय. >> बरोबर आहे तुमचे. ती मला सगळंच शेअर करते. तिनं एका वयाने खूप मोठ्या मुलावर प्रेम असल्याचं वडिलांना सांगितले तेंव्हा एवढा इश्यू झाला नाही, पण जेव्हा त्यांचे मित्र त्यांना बोलले की तुझी मुलगी फारच नखरेल राहते, लिपस्टिक लावते, केसांचे फुगे पाडते तेव्हा मात्र त्यांना सहन झाले नाही. जरा विचित्रच आहे पण खरं आहे. ( आमचं गाव शहर नाही पण अगदी खेडं पण नाही. इथे लोकांची अशीच अर्धवट मानसिकता आहे.)

टिनेज सेक्स वगैरे अक्सेप्ट करन्याइतकी म्याचुअर नाही झालीय

भारतात हा गुन्हा आहे .
16 वर्षाच्या आतील मुलींनी सहमती न जरी सेक्स केला तरी त्याला rape च समजल जाते

> आपली सोसायटी अजुन टिनेज प्रेम , टिनेज सेक्स वगैरे अक्सेप्ट करन्याइतकी म्याचुअर नाही झालीय. > लग्न न झालेल्या टीनेजच सेक्स अस लिहायला हवं होतं. लग्न झालं असेल तर चालतंय सगळं https://m.economictimes.com/news/politics-and-nation/no-of-married-girls...

२००० साली ३५ लाख मुलींची लग्न <१९ असताना झालेली- आता तो आकडा १४ लाख इतका कमी झाला आहे.

३५ लाख ते १४ लाख हा आकडा जरी दिसत असला तरी मुलींची टिनेजमधे असतानाच आजही लग्न लावुन दिली जातात..त्यांच प्रमाण शहरांमधे कमी असलं तरी शहराच्या जवळपासच्या खेडेगावात दिसुन येतं..

18 वर्षाच्या आतमध्ये मुलीच लग्न केले तरी भारतात तो गुन्हा आहे .
साधी तक्रार जरी जागरूक लोकांनी केली तरी ती विवाह प्रशासन थांबवते आणि मुलीला सुधार गृहात पाठवले जाते .
Teenege पोर्न बघणे सुद्धा जगातील खूप देशात गुन्हा आहे .
ह्याच कारणामुळे मध्ये कोणाला तरी अमेरिकेने विसा नाकारला होता अशी न्यूज वाचली आहे .
Teenage सेक्स स्वीकारणे म्हणजे mature पना हे नाही स्वीकारता येणार .
ह्या वयात मुलांनी खेळले पाहिजे,बाकी बऱ्याच गोष्टी मध्ये आपले कौशल्य develop केले पाहिजे की सेक्स मध्ये अडकले पाहिजे .

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार Happy

@ अमा, अहो, शुद्धलेखनाचीच तर बोंब आहे, त्यामुळे खुप सारे लिहीलेले मी ईकडे टाकत नाही. पण एक माझ्यालेखी महत्वाचा मुद्दा आहे, त्यावर लिहायचा विचार आहे

@ अनु , <<< तिला निदान लग्नापूर्वी हे ओळखून निर्णय तरी घेता आला.बऱ्याच जणींना बऱ्याच काळानंतर हिपोक्रसी कळते. >>> अगदी खरेय

>> डार्क लिप्स्टिक लाव णारी स्त्री अवेलेबल असते असे ही मला एकां नी बोलून दाखव ले होते. काय ही मान सिकता.>> ह्या असल्या लोकांपैकी एकाला मी भेटलेय, आपल्या ईकडचेच आहेत. माझे रिक्षाचे वाईट अनुभव लिहीले होते न तेव्हा त्यांनी मला सल्ला दिला होता तसा की तु जरा त्या भडक लिप्स्टीक लावल्या नाहीस तर बरे... पण मुख्य म्हणजे, माझ्याकडे लिप्स्टीक खुप आवडती असल्याने डार्क - लाईट अश्या खुप सार्या शेडस आहेत, पण डार्क लिप्स्टीक मला जास्त सुट होते म्हणुन जास्त आवडते. असो
मला आवडतात लिप्स्टीक, रादर मला टापटीप रहायला आवडते, स्त्री कोणत्या शेडची लिप्स्टीक लावते, काय कपडे घालते, कोणाशी कशी बोलते यावरुन तिची चाचणी करणारे हे कोण? मुळात राहणीमान चांगले असले , अन निट कॅरी करता येत असेल तर त्या डार्क शेडही थिल्लर न वाटता सुंदरच वाटतात. कुणीतरी म्हटले आहे न - Beauty lies in the eye of the beholder.
म्हणुनच ह्या असल्या मानसिकतेच्या लोकांना समजावण्या पेक्षा दुर्लक्ष करणे हिताचे.

ह्या कथेचा किस्सा मला अतुल पाटील यांच्या अन्न, वाद आणी मी, या कथेवर आलेल्या प्रतिसादामुळे आठवला अन लिहीला ईकडे.

@ Rajesh188 , टिनेज सेक्स हा मुद्दा फक्त मुलींनाच नाहीतर मुलांना पण लागु होतो, अर्थात तो खुप मोठा विषय आहे, तर कृपया, नविन धागा काढुन तिकडे यावर विस्तारीत चर्चा करा, ईकडे नको Happy

Ok
Vb जी
पण वरती कमेंट मध्ये त्याचा उल्लेख आला आणि त्याचा संबंध mature mentality शी जोडला म्हणून माझ्या कमेंट आल्या.

आता त्या विषयावर इथे माझ्याकडून कमेंट येणार नाही

Pages