व्हाटसअ‍ॅप चा एसएमएस मेसेज

Submitted by पाषाणभेद on 28 September, 2019 - 12:37

तो: हॅलो.

ती: हं बोला.

तो: काय गं, झोप झाली का?

ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.

तो: हं.

ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअ‍ॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.

तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?

ती: तुमचा तोच व्हाटसअ‍ॅप चा मेसेज वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअ‍ॅप केले आहे ना तेच बोलत आहात ना?

तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी. व्हाटसअ‍ॅपचा मेसेज नाही.

ती: तुम्ही ना माझे व्हाटसअ‍ॅपच काढतात जेव्हा पहावं तेव्हा. वाचला ना मेसेज व्हाटसअ‍ॅपवरचा.

तो: अग मी एसएमएस बद्दल बोलतोय. जुन्या मोबाईलमध्ये, पुर्वी व्हाटसअ‍ॅप होते का? महत्वाचे काय? एसएमएस का व्हाटसअ‍ॅप?

ती: एसएमएस नाही वाचला. वाचते.

तो: व्हाटसअ‍ॅप मध्ये किती तरी गृप्सचे मेसेजेस असतात. माझा मेसेज खाली गेलेला असू शकतो ना?

ती: हं

तो: पहिल्यांदा काय पाहशील मोबाईल उघडल्यावर?

ती: तुमचं ना नेहमीचंच आहे. झालं चालू लेक्चर. अहो, मी तुमची बहीण येणार असल्याचा मेसेज वाचला अन लगेच चहा बनवायला घेतला माझा. डोकं नका दुखवू आणखी.

तो: अगं मी एसएमएसवरचा मेसेज बोलतोय.

ती: तेच तर मी मेसेज वाचला तुमचा. उद्या बहीण येतेय तुमची तो.

तो: देवीच्या देवळात गेली अन तेथे गणपती दिसला तर पहिल्यांदा कुणाचे दर्शन घेशील?

ती: हां मला ज्याचे दर्शन घ्यायचे ते घेईल.

तो: अगं एसएमएस कुणाकडून आला ते लगेच समजते अन तो पटकन वाचता येतो. अन ते व्हाटसअ‍ॅप मेसेज सारखे पाचशे पाचशे येत नाहीत गं. तुझ्यासाठी महत्वाच्या होता एसएमएस म्हणून पाठवला होता.

ती: हं ठेवता का फोन, तरच वाचता येईल मला.

तो: वाच बाई एसएमएस वाच. व्हाटसअ‍ॅप, व्हाटसअ‍ॅप नको खेळू.

ती: हं...या घरी संध्याकाळी ऑफीसातून.

- पाभे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महत्त्वाचे निरोप पाठवल्यावर कॉल करून ते बघा सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण मेसेज दुर्लक्ष करण्यासारखे /फक्त टैमपासचे हजारोंनी येतात.
नणंद येणार हे कळवण्याची गरज नसते. कळवून आली तरी घंटानाद करणारच आहे हे सर्वांना माहिती आहे. मालिका त्या एका पात्रामुळेच चालू राहतात.

मालिका त्या एका पात्रामुळेच चालू राहतात.
Submitted by Srd on 28 September, 2019 - 19:2
>>> म्हणून ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे, " उतडणीला केळी आन् घरात नंद खेळी."
उतडण = पुर्वी एकावर एक मातीची भांडी रचून ठेवत.
केळी= पाण्याचा छोटा माठ, अक्षय तृतीया वेळी वापरतात तो.

@ srd ,

नणंद येणार तो व्हाॲ वरचा मेसेज.
अन दुस-या विषयावरील, त्या व्यतिरिक्त मेसेज हा एसएमएस केला आहे त्याने टॉप प्रायोरिटी म्हणून.

आणखी सोईचे जावे म्हणून एकदोन वाक्य जास्तीचे टाकले आहे वरील कथानकात.

लागले तर पुन्हा वाचावे हि विनंती.