लतादीदी

Submitted by Asu on 28 September, 2019 - 11:44

स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त लतादीदींना काव्यमय शुभेच्छा, माझे चित्रकार मित्र श्री.लीलाधर कोल्हे यांनी केलेल्या सुंदर रेखाटनासह-

लतादीदी

सरस्वतीच्या कंठी झुलतो
सुंदर मौक्तिक हार
लतादीदींच्या गळ्यातला
जणू संगीत सूरबहार

कोकीळकंठी मृदुभाषी
जगताची तू शान
प्रत्येकाच्या हृदयी वसली
घेऊन अढळ स्थान

आम्ही पोसलो तुझ्या सुरांवर
केलेस जीवन छान
कसे फेडावे उपकार तुझे
गाऊ किती गुणगान

भारतरत्न तूच खरोखरी
रत्नांची जरी खाण
परि तुझ्यासम अन्य कोण?
सांगा घेऊन आण

किती चांदण्या लुकलुकती
भारतभूच्या नभांगणी
सर्वांहून परि सुंदर दिसते
तू शुक्राची चांदणी

भारतभूच्या मुकुटातला
हिऱ्याचा तव मान
भारत भूमी जन्म घेतला
असे आम्हां अभिमान

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.28.09 2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!

सर्व रसिकांना मनःपूर्वक धन्यवाद! आपल्याला माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या इतर कविता वाचण्यासाठी 'असुच्या कविता' हे माझे एफबी पेज लाईक करा.