प्रलय-१ते२०

Submitted by शुभम् on 28 September, 2019 - 09:57

प्रलय-०१

उपोद्घात

" विनाश मला विनाश दिसत आहे राजन ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील , अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जे मूल जन्माला येईल ते तुझ्या वंशाचा निर्वंश करेल . राजन तुझा निर्वंश फार दूर नाही ....!ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे.......!

" महर्षी , कोण ' ती '....? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात....? आणि हे कधी , कधी होणार आहे ? मला फार चिंता वाटत आहे ...?

" फार दूर नाही राजन . तुझा मृत्यू , लवकरच तुझा मृत्यू होईल . आणि तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातातून अधम व घोर पापकर्मे घडतील . त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासून तुझा वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल . तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल.....

" महर्षी तुम्ही थोर आहात , तुम्ही महान आहात , तुम्हाला काहीही अशक्य नाही , यातून वाचायचा काहीतरी उपाय असेलच , तुम्हीच मला सुचवा , महर्षी मी काय करू सांगा ? तुम्ही सांगा , तुम्ही सांगाल तसे मी करायला तयार आहे ? महर्षी मला वाचवा , महर्षी माझ्या वंशाला वाचवा , महर्षी हे राज्य वाचवा , सर्व काही तुमच्या हातात आहे....?

राजाने महर्षी च्या पायावर लोळण घेतली . तो हीनदीन झाला होता . त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते . त्याच्या वस्त्राचे त्याला भान नव्हते . त्याची अवस्था दयनीय होती.....!

" या सार्‍या घटना जर टाळायच्या असतील तर त्याला एकच उपाय आहे राजन , या घटनांची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते , ज्य घटनेपासून होते , ज्या व्यक्ती पासून होते ज्या स्थळापासून होते , त्या सर्वांचा नाश...

राजा समजूनही न समजल्या सारखे म्हणाला
" म्हणजे , म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला महर्षी ....? " त्याला हुंदका दाटून आला . तो मुसमुसून रडू लागला . त्याला महर्षीच्या बोलण्याचा अर्थ कळला होता......

राज्यावर येणारे संकट टाळण्यासाठी राजाने आपल्या राजपुत्राला राजमहालात झोपवून तो संपूर्ण राज महाल पेटवून दिला . संपूर्ण महाल जळून खाक होईपर्यंत , त्याची राख आसमंतात विखरून जाईपर्यंत राजा व राणी दोघे ते दृश्य पहात राहिले . त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर जळून राख झाला होता. त्याचा किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानात भरून राहिला होता . त्याच्या जळालेल्या मांसाचा वास त्याच्या नाकात रुतून बसला होता त्या घटनेने राजावर फार मोठा आघात केला.....

राजाचे संसारावरून , राज्यकारभारावरून मन उडाले . त्याने वानप्रस्थाश्रम स्वीकारूला . जंगलात एका बाजूला आश्रम बांधून तो राणीसह त्या ठिकाणी राहायला गेला . प्रधान मंडळ कसेतरी राज्य कारभार सांभाळत होते . पण जनतेला त्यांचा राजा हवा होता .. राजा विना राज्य पोरके झाले . राणीला सर्व काही समजत होते . राणीने राजाचे मन वळवायचे प्रयत्न केले पण तिला ते शक्य नव्हते. राज्याची संसारावर ची वासना उडाली होती . त्याच्या सर्वच वासना नष्ट झाल्या होत्या . तो दगडासारखा निश्चल असायचा . तो असुनही नसल्यासारखा होता . त्याच वेळी राणीच्या आयुष्यात तो आला . त्याने राणीला विश्वास दिला . स्थैर्य दिले . सुख दिले आणि राज्याला नवा राजपुत्र दिला . तो फक्त तिलाच दिसायचा . तिलाच जाणवायचा . साऱ्यांना वाटलं हा आपला खरा राजपुत्र , पण तिलाच माहीत होतं तो खरा राजपुत्र नव्हता. त्या राजपुत्राचा राज्याभिषेक सोहळा झाला . त्या नव्या राजपुत्राच्या नावाखाली राज्यांमध्ये राज्य सुरू झाले . पण ते राज्य ना राजपुत्राचे होते , ना जुन्या राजाचे होते , ना राणीचे होते . ते राज्य होते त्याचे . तो त्याच्या मनाप्रमाणे चालवत होता .

काही वर्षानंतर

सोनेरी नक्षीकाम केलेल्या त्या दारासमोर दोन बलदंड द्वारपाल उभे होते . एक माणूस त्या दारातून पुढे जाताना त्या दोन द्वारपालानी भाले आडवे लावून त्याला जाण्यास मज्जाव केला .

" मला कळत नाही , प्रधानजी तुमच्या सारखे मूर्ख द्वारपाल का म्हणून त्यांच्या सेवेत ठेवतात ? कधी कळणार तुम्हाला काय माहित ....? अरे मी आहे मी , मी हेर पथकाचा प्रमुख ,साधीसुधी वेशभूषा केलेले देखील तुम्हाला कळत नाही ......

तो हेर पथकाचा प्रमुख भिल्लव होता , तो आत गेला . प्रधानजी त्यांच्या मंचका वरती बसून काहीतरी वाचण्यात व्यस्त होते .

" क्षमा असावी प्रधानजी , एक महत्त्वाची बातमी आहे त्यामुळे आपणास व्यत्यय आणत आहे.....

" अरे राजाने हेर पथकाकडून आलेली बातमी अर्ध्या रात्री ही ऐकायला तयार असावं , बोल भिल्लवा तू काय बातमी आणली आहेस..?

" महाराजांनी पश्चिमेकडील काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे .......

" काय म्हणतोयस भिल्लवा तू , महाराज म्हणजे आपले जुने महाराज की राजकुमार......?

" प्रधानजी सत्य कितीही कटू असले तरी ते पचवायलाच हवे . राजकुमार आता राजकुमार राहिले नाहीत ते महाराज आहेत आणि त्याच महाराजांनी पश्चिमेकडील काळी भिंत पाडण्याचा आदेश दिला आहे.......

" भिल्लवा साऱ्यांना माहित आहे , ती काळी भिंत कशासाठी कधी आणि का बांधली गेली होती ते ? महाराजांनाही या गोष्टी माहीत आहेतच . आपल्या राज्याचा जो कुणी राजा होतो त्या राजाला या सार्‍या गोष्टी माहीत असतात , आणि त्या भिंतीपलीकडील शत्रूपासून रक्षण करण्याची जबाबदारी राजाची असते. आणि तोच राजा जर असे कृत्य करायला जात असेल तर जनतेने काय करावे......?

" प्रधान जी महाराजांचे म्हणणं आहे की या जुन्या गोष्टी आहेत , आणि या सर्व अंधश्रद्धा आहेत . कितीतरी वर्षापासून ती भिंत तिथेच आहे . त्या भिंतीपासून , भिंतीपलीकडील शत्रूकडून आपल्याला कधीच कोणताच अपाय झाला नाही . एखाद्या वेळेस ती एखादी अख्यायिका असू शकेल , जी कुणीतरी मुद्दाम तयार केलेली असेल.....?

" भिल्लवा काही गोष्टी असतातच आख्यायिकेसारख्या . ज्या गोष्टी हजारो वर्षापासून चालत आलेल्या असतात त्या गोष्टी मागे खरंच काहीतरी गूढ असतं उगाच तळाची माहिती न घेता विहिरीत बुडी मारू नये.....

" भिल्लवा काही जरी झालं तरी या आदेशाचं पालन होता कामा नये , आपल्याला कसेही करूण ती भिंत पडण्यापासून महाराजांना रोखलंच पाहिजे . एक तर महाराज वाईट संगतीत असतील किंवा विचार करण्याची त्यांची क्षमता राहिलेली नसेल , काहीही करून हा निर्णय आपल्याला थोपवला पाहिजे . अन्यथा राज्यावर येणारे संकट थांबवायला कोणी समर्थ असणार नाही.....

" प्रधानजी मला वाटतं यात चिंता करण्यासारखे काही नाही . माझे बरेच हेर त्या भिंतीपलीकडे जाऊन आले आहेत , आणि मीही बऱ्याच वेळा त्या भिंती पलीकडे जाऊन आलो आहे . त्याठिकाणी उजाड जमिनी शिवाय काहीच नाही . ना कोणती वनस्पती आहे , ना कोणता प्राणी आहे , ना कोणती जीव आहे . जीवन नावाची गोष्ट त्या भिंतीपलीकडे अस्तित्वातच नाही . मग आपल्याला कशापासून भीती आहे.....?

" त्यापासूनच आपल्याला खरी भीती आहे भिल्लवा भिंतीपलीकडे जीवन नाही जर ती भिंत पडली तर अलीकडेही पलीकडच्या सारखीच स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.....!

" ते सर्वथैव अशक्य आहे महाराज भिंतीपलीकडे ना कोणती नदी आहे पाण्यासाठी , ना जमीन सुपीक आहे पीक घेण्यासाठी , त्यामुळे त्या ठिकाणी कोणताच प्राणी किंवा जीवन आपल्याला दिसत नाही . मात्र उलट आपल्याकडे सर्व प्रकारची सुबत्ता आहे त्यामुळे आपली स्थिती तशी कधीच होणार नाही.....!

" भिल्लवा तुला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत एकेकाळी तो भागही आपल्यासारखा किंबहुना आपल्याहून अधिक सुबत्ता असलेला होता पण......

प्रधानजींचे वाक्य अर्धवटच राहिलं . मुख्य द्वारा बाहेर तलवारीचा आवाज येत होता . त्या पाठोपाठ दोन किंकाळी ऐकू आल्या . दारावर काहीतरी आपटलं आणि द्वार जोरात उघडले गेले .....

ते राजाचे निवडलेले खास अंगरक्षक होते.
" भिल्लवा पळू नकोस , तू राज्याशी द्रोह केला आहे ....

" भिल्लवा तू इथून निघून जा , तुला कसेही करून ती भिंत पडण्यापासून रोखलंच पाहिजे , अन्यथा मोठा अनर्थ होईल . मी कसेही करून त्यांना थांबवतो , तू निघ पटकन लाखो जणांचे जीवन तुझ्यावरच अवलंबून आहे.....

मागच्या बाजूला असलेल्या द्वाराकडे भिल्लवाने जोरात धाव घेतली . त्याच्या पाठोपाठ एक सैनिक ही गेला . घरातून बाहेर पडत असताना त्या सैनिकाने भिल्लवाच्या पायाला धरून जोरात ओढलं , त्यामुळे भिल्लव खाली आपटला , त्याच वेळी प्रधानजींनी बाजूलाच असलेला भाला घेऊन त्या सैनिकाच्या ह्रदयाचा वेध घेत मारला . त्या सैनिकांने जागेलाच प्राण सोडला . उरलेले चार सैनिक तलवार काढून त्वेषाने प्रधानजी वरती धावून गेले प्रधानजींनीही आपली तलवार काढून त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास उभे ठाकले.....

उरलेल्या एका सैनिकाने कमरेला अडकवलेला शंख काढून जोरात शंखनाद केला . त्याबरोबर बाहेर पडून घोड्यावर स्वार झालेल्या भिल्लावाच्या मागे तीस चाळीस घोडेस्वार लागले............

भिल्लव हा पट्टीचा घोडेस्वार होता . त्याने मुद्दाम हून अरुंद रस्त्यांतून व गर्दीच्या ठिकाणातून त्याचा घोडा घातला, त्यामुळे त्याच्या मागे लागलेल्या घोडेस्वारांना त्याचा पाठलाग करता येणे जवळपास अशक्य होतं . पण ते घोडेस्वार ही काही कमी नव्हते त्यांनीही भिल्लावाचा पाठलाग सुरुच ठेवला पण त्या दोघांमध्ये बरेच अंतर पडले. भिल्लव नगराच्या मुख्य द्वारा पर्यंत पोहोचला . पण मुख्य द्वारही बंद होते . त्या ठिकाणी असलेले सैनिक हे भिल्लवाची वाटच पाहत होते . भिल्लव दिसल्याबरोबर ते सैनिकहीनही मागे लागले . भिल्लवाला सर्वत्र सैनिक दिसत होते . त्याने मुख्य बाजाराच्या दिशेने घोडा वळवला व त्याला टाच दिली . काही क्षणातच तो मुख्य बाजारात पोहोचला . त्या ठिकाणी कायम गर्दी असायची . त्याने घोडा सोडून दिला व तो पायउतार होऊन गर्दीत मिसळला . सैनिकांना घोड्यावरून मुख्य बाजारात फिरता येणे शक्य नव्हते . त्यांनीही घोडा सोडून दिला व ते ही भिल्लवाला शोधायला बाजारात फिरू लागले . भिल्लव वेशभूषा करायला पटाईत होता . एका रेशमी कापड दुकानापुढे तो स्त्रीची वेशभूषा करून कापड पाहण्यात दंग झाला होता. कुणाही सामान्य माणसाला एखादी सुंदर स्त्री कापड घेण्यात व्यस्त आहे असेच वाटले असते . पण त्या सैनिकांना खास प्रशिक्षण दिलेले होते . ते राजाच्या खास तुकडीतील खास सैनिक होते . त्यातील एका सैनिकाने भिल्लवाला ओळखले व तो त्याच्याकडे धावू लागला.....

भिल्लवाला त्याच्याकडे येणारा सैनिक दिसला . त्याने त्याच्या डोक्यावर घेतलेले रेशमी कापड तिथेच फेकून दिले व जोरात धाव घेतली . तो पुन्हा एकदा गर्दीमध्ये मिसळा पण तो सैनिकही त्याच्या मागे धावत होता . त्या सैनिकाने भिल्लवाला एका महालात जाताना पाहिले होते तो सैनिकही त्या महालात घुसला.... पण आत गेल्याबरोबरच त्याला कोणाची तरी मिठी पडली ,

" आमच्या येथे किनइ सैनिकांना खास सूट देण्यात येते ,

तो एक किन्नर आणि त्याने सैनिकाला मिठी मारली होती आणि तो सैनिक एका वेश्यालयात घुसला होता . सैनिकाने किन्नराला जोरात धुडकावून लावले , तो किनऱ्या आवाजात ओरडत सैनिकाला शिव्या देत मागे पडला ,

" तू कोणाला येताना पाहिले का.....?

" पाहिले ना आत्ताच तर तुला पाहिले , तो किन्नर पुन्हा एकदा लाडिक नखर्‍यात येत त्याच्याजवळ जात बोलला....

सैनिकाने त्या किन्नर च्या श्रीमुखात भडकावुन दिली तो किन्नर त्याच्या त्याच्या लाडिक शैलीमध्ये रडू लागला.....

" राज्याच्या हिताचा प्रश्न आहे , तुला मी शेवटचं विचारतो या दारातून कोणी आत आलं होतं का आणि ते कुठे गेलं ....?
किन्नराने मागच्या बाजूच्या एका दरवाज्याकडे बोट करून सांगितलं त्या तिथे एक वेंधळा माणूस गेलाय... बघा सापडतो का ....?

तो सैनिक त्या दाराकडे पळत निघाला .

आता त्या किनाऱ्याला मागून कोणाची तरी मिठी पडली होती . " वा भिल्लवा वा , वेशांतर करायला शिकावं तर ते तुझ्याकडूनच ....

" आणि मी कशाचाही वेषांतर केलं तरी ते ओळखायला शिकाव तुझ्याकडूनच , सरोज " भिल्लवाणने सरोजला पुढे ओढून घेत त्याच्या मिठीत घेतले......

" आज कसं काय हेर पथकाचा प्रमुख या ठिकाणी अवतरला......
" तुला माहित नाही सरोज पश्चिमेकडची काळी भिंत पाडायचा आदेश दिलाय महाराजांनी.....
" पण हे सैनिक तुझ्या का मागे लागलं होते.....?
" प्रधानजीनी मला कसंही करून ती भिंत पाडण्यापासून थांबवायचा आदेश दिलाय....
" म्हणजे देशद्रोही झाला म्हणायचा की तू ....?ते असो काहीतरी , या देशद्रोहाची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे.....
सरोज त्याला ओढत खोलीकडे नेऊ लागली .
" सरोज ही वेळ नाही , आता क्षणाक्षणाची किंमत आहे . मी जर गडबड केली नाही तर लाखो जणांचा जीव जाण्याची शक्यता आहे , मला निघायलाच हवं आणि तू मला मदत करणार आहेस.....
" मी आणि तुला मदत हे शक्य नाही भिल्लव , ज्या ज्या वेळी तु माझी मदत मागतो आणि ज्यावेळी मी तुला मदत करते त्यावेळी मला नुकसानच होतं....
" सरोज तुझं नुकसान लाखो जीवांच्या किमती एवढं मोठं आहे का....?

पुन्हा एकदा दारावर थाप पडली . दार उघडलं गेलं नाही . पुढच्या वेळेस दारावर जोरजोरात झाडल्याचा आवाज होऊन , शेवटी दार उघडल्याचा आवाज झाला . दार उघडल्याबरोबर सात-आठ सैनिकांची एक टोळी आली व त्या टोळीने भिल्लवाला घेरले.....

इकडे प्रधानजीना बेड्या घालून राजासमोर उभं केलं होतं .

" महाराज तुम्ही लहान असल्यापासून किंबहुना तुमच्या जन्माच्या पूर्वीपासून मी या राज्याच्या सेवेत आहे . या राज्याचं भलं व्हावं अशीच माझी इच्छा आहे . म्हणूनच मी तुम्हाला सल्ला दिला होता की ती काळी भिंत पाडू नका...

राजा त्याच्या वैयक्तिक कक्षात होता . सुवर्ण पात्रात त्याच्यासाठी खास बनवलेली मदिरा प्राशन करत होता . राजा अजून किशोरवयीन होता , त्याला अजून धड मिसरूडही फुटलेलं नव्हतं .

" बस करा प्रधानजी मला तुमच्या या खोट्या वागण्याचा वैताग आलाय ...!किती दिवस चांगल्यापणाचं पांघरून घेऊन तुम्ही या राज्याच्या विरोधात कट कारस्थान करणार आहात..... मला माहित आहे भिंतीपलीकडे असलेल्या देशद्रोह्यांच्या गटाला तुम्ही रसद पुरवत आहात आणि त्या काळ्या भिंतीचा तुम्ही एक ढाल म्हणून वापर करत आहात . आता हे फार काळ चालणार नाही ती भिंत पाडून त्या पलीकडे असलेल्या देशद्रोह्यांना कंठस्नान घालण्याची वेळ आली आहे आणि सुरुवात तुमच्या पासून होणार आहे ....

" सैनिकांनो घेऊन जा यांना आणि उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर फाशी देऊन टाका यांना.......

प्रलय-०२

       भिल्लवाच्या भोवती वर्तुळाकार करून ते सैनिक भाला घेऊन उभे होते  . भिल्लव आता पूर्णपणे त्यांच्या ताब्यात सापडला होता .  त्या सैनिक पथकाचा प्रमुख ,  अधीरत होता , तो म्हणाला "  भिल्वावा आता तुझा खेळ संपला ,  उद्या सूर्योदयाबरोबर प्रधानजी सोबत तुलाही फाशी दिली जाईल......

" काय प्रधानजीला फाशी दिली जाणार आहे.....?

" होय आणि त्यांच्याबरोबर तुलाही तुम्ही दोघांनी देशद्रोहाचा मोठा गुन्हा केला आहे.....

" अरे अधिरथ तुझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधली आहे का...?  तुला माहित नाही का काळी भिंत पडली तर काय होईल ....? अरे प्रधानजी खरच राज्याचे सेवक आहेत आणि तू ही हो.....

" राज्याचे सेवक राजाच्या आज्ञेबाहेर नसतात . राजाच्या आज्ञा विरुद्ध जर कोणी वागत असेल तर तो देशद्रोही असतो......

" अधिरथ राजाचे काम आहे राज्याची सेवा करणे जर राजाचा निर्णय चुकीचा असेल तर त्या निर्णयाची साथ न देता त्या निर्णयाच्या विरुद्ध जाणं हेच राज्याच्या खऱ्या सेवकाचा काम असतं.......

" तू मला देशसेवेचा धडा शिकवू नकोस भिल्लवा . मला माहितीये काय करायचं आणि काय नाही ते , गुमान तुझी तलवार आमच्या स्वाधीन करून गपचूप आमच्याबरोबर चल.....

" ते शक्य नाही.....

" तू माझ्या विरुद्ध लढणार ,  फुकट मरशील भिल्लवा , गुमान चला आमच्याबरोबर......

     भिल्लवाने म्यानातून त्याची तलवार काढली त्याबरोबर त्याच्या भोवती उभे असलेले आठ ही सैनिक भाले सरसावून पुढे झाले . त्या सैनिकांना बाजूला सारत अधिरथ पुढे आला .

" ये रा* बाहेर हो गपचूप , तू एका देशद्रोह्याला तुझ्या वेश्यालयात लपवून ठेवले ,  नाही तुझा धंदा बंद केला तर नावाचा अधिरत नाही

" जा रे जा तुझ्यासारखे छप्पन्न येऊन गेले या सरोजचा एक केसही कोण वाकड करू शकले नाही अजून.....

" आता सारे काही होईल पण पहिल्यांदा भिल्लव मग बाकीचे , हो बाजूला गपचुप.....

सरोज बाजूला सरली  . त्याबरोबर अधिरथ  ने भिल्लवावर तलवारीचा वार केला . त्यांचे द्वंद्व चालू झाले .  अधिरत हा कसेही केले तरी  कसलेला सैनिक होता , आणि तलवारबाजीत त्या संपूर्ण राज्यात त्याचा हात धरू शकेल असा कोणीही तलवारबाज नव्हता .  त्यामुळे भिल्लवाचा  निभाव लागणे शक्य नव्हते , याची जाणीव सरोजला ही होती .  सरोजनी बाजूला जाता जाता नेहमी तिच्या जवळ बाळगीत असलेला छोटे दोन खंजीर काढले व भाला घेऊन सरसावलेल्या सैनिकांवरती चपळतेने वार केला . दोन सैनिकांच्या गळ्यात तिने दोन खंजीर खुपसले व क्षणात ते दोन सैनिक जागीच ठार झाले .  मग बाकीचे सैनिक ही एक एक करत तिच्या वरती चालून येऊ लागले .  तिकडे अधिरथ  भिल्लवाला भारी पडत होता . मात्र सरोज या सहा सैनिकांना भारी पडत होती . एकापाठोपाठ एक तिने सहाच्या सहा सैनिकांना मारून टाकले .  अधिरथ इकडे भिल्लवाला  मारण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या हातावरती चाकू फेकून त्याला निशस्त्र केले . निशस्त्र केल्याबरोबर भिल्लवाने  त्याच्या गळ्यावर तलवार ठेवत त्याचे दोन्ही हात बांधून , त्याला एका खांबाला  बांधून टाकले....

 " बेइमानीने लढलास तू भिल्लवा .....

" फार बोलतो नाही हा अधिरथ....  बाजूला पडलेले एक कापड घेऊन त्या कापडाने अधिरतचे तोंड बांधून टाकले व सरोजकडे वळत तो म्हणाला

" बापरे सरोज काय भयानक खंजीर चालवतेस तू ...कधी पाहीलच नाही मी.....

" तू अजून बऱ्याच गोष्टी पाहिल्या नाहीत.....

" सरोज चल लवकर आपल्याला कसेही करून प्रधानजींना सोडवलंचच पाहिजे.....

" थांब जरा मी मागच्या खोलीत जाऊन सगळ्यांना  सांगते मी चालले आहे ते ...मगाशी म्हणलं होतं ना मी ज्यावेळी मी तुला मदत करते त्यावेळी माझं नुकसानच होतं....

सरोज एक पंचविशीतली तरुणी होती . दिसायला अतिशय सुंदर , कोणताही पुरुष सहजपणे तिच्याकडे आकर्षित व्हावा इतकी .  त्याबरोबरच ती अनेक कलांमध्ये पटाईत होती .

 महाराजांनी सेनापतीला त्यांच्या वैयक्तिक कक्षात बोलावले होते  . "सेनापती आपली सेना काळ्या भिंतीकडे कधी रवाना होणार आहे ....? लवकरात लवकर ती भिंत पाडून टाका .....

"  महाराज सेना सकाळीच रवाना झालेल्या आहेत , पण तुमचा विचार नक्की आहे का...?  काळ्या  भिंतीबद्दल मीही बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत .  महाराज सर्व जाणकार लोक म्हणताहेत भिंत पाडणं बरोबर नाही.....

" मग त्या सर्व जाणकार लोकांनाही उद्या प्रधानजी बरोबर फाशी देऊन टाकायची का...?  , माझा निर्णय झालाय प्रधानजी ,  मला शिकवू नका राज्यकारभार कसा करायचा ते......

" जी महाराज ,  माफी असावी ..." असं म्हणत सेनापती बाहेर निघून गेले

     तो लुकड्या शरीरयष्टीचा , खोबणीत खोल गेलेले डोळे ,  अर्धवट टक्कल आणि अर्धवट लांब वाढलेले केस ,  हातात सदानकदा ते सुवर्णपात्र व त्यात त्याची विशिष्ट मदिरा , चेहऱ्यावरती नेहमी त्रासिक भाव ....या महाराजाला पाहून पाहून मंत्रीगणही  त्याच्या वागण्याला मनातल्या मनात वैतागले होते...

" आता प्रलय येणार , हाss हाss हाss

 सगळ्यांना बुडवून नेणार , हाs हाs हाs

 आता प्रलय येणार , सगळ्यांना बुडवून नेणार

 आता प्रलय येणार , सगळ्यांना बुडवून नेणार.......

  काळ्या भिंतीपासून मैल दीड मैलावर असलेल्या एकमेव घराबाहेर उभा असलेला , विक्षिप्त कपडे घातलेला आणि विक्षिप्त दिसणारा , म्हातारा माणूस असं गोल गोल फिरत ओरडत होता . ओरडत ओरडतच त्याने अंगावरती असलेले कपडे काढून दिले व त्याच्या घरासमोर असलेल्या गढूळ पाण्याने भरलेल्या डबक्यात उडी मारली . आतून एक सुंदर तरुणी बाहेर आली .

" बाबा हे काय करताय तुम्ही , निघा बर बाहेर ....किती वेळा सांगितले मी तुम्हाला असं बाहेर फिरत जाऊ नका म्हणून......

" अग माझ्या शान्या बाळा तू पण या काळ या भिंती पासून लांब जा , नाहीतर  प्रलय येइल आणि तुला पण घेऊन जाइल , लवकर जा , लवकर जा ....नाहीतर प्रलय येईल आणि आपल्याला पण घेऊन जाईल.....

" बाबा वर या बरं . तुमची काढा घेण्याची वेळ झालीय  उगाच काही बरळू नका , त्या डबक्यातून बाहेर या.....

  ती तरुणी खरच सुंदर होती .  वडिलांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या हाताला धरून ओढायचा प्रयत्न करत होती . पण वडील तिच्या हातून निसटून त्या गढूळ पाण्यात डुबक्या मारण्यातच व्यस्त होते . ते खाली बुडत होते आणि खालचा चिखल घेऊन स्वतःच्या अंगाला फासत होते. तरीही ती मुलगी प्रयत्न करीतच होती . पण वडील काही तिच्या हाताला येत नव्हते . तिच्या त्या चेहऱ्यावरती जरा त्रासिकपणाचा भाव आला होता.

" मी मदत केली तर चालेल का ...? अचानक आलेल्या आवाजाने ती तरुणी जरा दचकलीच

घोड्यावरती बसलेला , खांद्यापर्यंत लांब केस असलेला ,  कमरेला तलवार नि खंजीर असलेला , अंगावरती चिलखत आणि डोक्यावरती टोप , असलेला तो नक्कीच कुणीतरी योद्धा होता.....

   घोड्यावरून खाली उतरत त्याने त्याचा टोप काढून बाजुला ठेवला ,  वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर त्याचे काळे कुळकुळीत केस हवेत उडाले क्षणभरासाठी का असेना ती तरुणी त्याच्याकडे पाहतच राहिली.... त्यांची नजरानजर झाली . त्याच्या नजरेत तिच्याबद्दल आदर होता नि कोपऱ्यात कुठेतरी प्रेम होतं आणि तिच्या नजरेत त्याच्याबद्दल निवळ कुतूहल होतं . त्याच्या बरोबर असलेला दोर त्याने घेतला व एक गाठ मारत गोल फिरवून  तिच्या वडिलांभोवती फेकला व एका झटक्यात ओढून त्याने तिच्या वडिलांना बाहेर काढले...

 " मी तुमची आभारी आहे , थोडावेळ थांबून तुम्ही आमचा पाहुणचार का घेत नाही ...? संध्याकाळची वेळ झाली आहे तुम्ही जेवण करून तुमच्या पुढच्या प्रवासाला निघू शकता.....

" नाही पुन्हा कधीतरी मला खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे.....

" पश्चिमेकडचे प्रवास फार दिवस चालत नाहीत . तुम्ही योद्धा दिसत आहात . भले तुम्ही योद्धा असा,  पश्चिमेकडे जाऊ नका त्या काळ्या भिंतीपलिकडे जे काही आहे ,  ते सगळ्याला वरचढ आहे .....

" तुमची नजर फारच तीक्ष्ण आहे..... तुम्हाला कसं कळलं की मी काळ्या भिंतीपलीकडे चाललोय ते.....?

" माझी नजर आणि  आठवणीही तीक्ष्ण आहेत . काही वर्षांपूर्वी एक म्हातारा साधू , साधू म्हणता येणार नाही त्याला . इतर म्हाताऱ्या माणसाला सारखा असतो तसाच म्हातारा या ठिकाणाहून गेला . जाताना मला त्याने एक थैली दिली . काहीतरी होतं त्यात  .  दुसरी एक थैली दिली,  त्यात सोन्याच्या मुद्रा होत्या .  तो मला म्हणाला काही वर्षानंतर या ठिकाणाहून चिलखत घातलेला , कमरेला तलवार व खंजीर असलेला ,  डोक्यावरती टोप असलेला ,  खांद्यापर्यंत लांब काळे कुळकुळीत केस असलेला , घोड्यावरती स्वार होऊन एक योद्धा येईल . तो स्वतःहून तुला त्याची मदत देऊ करेल , त्या योद्ध्याला  त्याने ती थैली द्यायला सांगितली होती......

ती तरुणी तिच्या वडिलांना एका बाजूला बसवत , आत गेली व काळ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली पांढरी व धूळ बसून मळकट झालेली थैली तिने आणून त्या तरुणाच्या हातात सुपूर्त केली.....

" हा माझा हक्क नाही , पण मी विचारू शकते का , कि या थैली मध्ये काय आहे.....

 त्या तरुणाने थैलीची गाठ सोडत तिला त्यात असलेल्या काळ्या पांढऱ्या बिया दाखवल्या व म्हणाला " तुझे बाबा बरोबर बोलत आहेत , तुम्हाला काळ्या भिंतींपासून दूर जावंच लागणार आहे .

   तो आयुष्यमान होता . काळी भिंत पाडल्यानंतर जे काही संकट येणार होतं .  त्या संकटापासून रक्षण करण्यासाठी जे काही करावे लागणार होतं ते करण्याची शपथ त्याने व त्याच्या साथीदारांनी घेतली होती.

प्रलय -०३

जलधि राज्याचे अधिपती राज्यांची निर्मिती झाल्यापासून कैरव राजे होते . सध्या अकरावे कैरव महाराज राज्य करत होते. महाराज वृद्ध होते . शुभ्र पांढऱ्या केसांवरती सोनेरी मुकुट होता. वृद्धत्व आलेलं असूनही चेहऱ्यावरती एकही सुरकुती नव्हती . राज्याला दोन बाजूंनी समुद्राच्या सीमा असल्यामुळे त्याचं नाव जलधि पडलं होतं. जलधि हे राज्य इतर सर्व राज्यांपेक्षा भरभराटीचे राज्य होतं . असं म्हणतात जलधि मधील भिकारी हे बाकीच्या जगातील श्रीमंतपेक्षा श्रीमंत असतात. त्याच जलधि राज्याच्या राजमहालात आज ही राज्य सभा भरली होती . राजमहाल किती आलिशान होता . त्या ठिकाणी सिंहासने नव्हती तर कमलासने होते . शुभ्र पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेल्या कमळाच्या आकाराच्या आसना वरती कैरव महाराज आसनस्थ झाले होते. बाकीच्या मंत्रीगणांसाठी ही कमळाची आसने होती . ती राज्यसभा अर्धवर्तुळाकार होती . वर्तुळाच्या केंद्रस्थानी महाराज होते व वर्तुळाच्या परिघावर ती मंत्रीगणांसाठी आसने होती. महाराजांच्या बरोबर समोरून राज्यसभेत येण्याचा मार्ग होता . आसनांच्या आजूबाजूला इतर प्रजाजनांसाठी बसण्याची सुविधा केली होती. आज ही राज्यसभा काठोकाठ गच्च भरली होती. विषयही तितकाच गंभीर होता. हेर पथकाचे प्रमुख कौशिक समोर येऊन महाराजांना सांगत होते.....
" महाराज सर्वांनाच ज्ञात आहे पश्चिमेच्या रक्षक राज्याची तेव्हाच अधोगती सुरू झाली जेव्हा महाराज सत्यवर्मांनी ते अघोर कर्म केले ,पण आता त्यांचा पुत्र महाराज विक्रमांनी जे काही चालवले आहे त्याची फळे आपल्यालासुद्धा भोगावी लागणार आहेत. महाराज विक्रमांनी काळी भिंत पाडण्याचे आदेश दिले आहेत.......

कौशिका च्या या वाक्यासरशी संपूर्ण राज्यसभेत कुजबूज सुरू झाली . कौशिक पुढे बोलू लागला....
" त्यांच्या काही मंत्रीगणांनी त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला , तर महाराजांनी त्यांना बंदी बनवून फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे . यामध्ये त्यांच्या प्रधानजींचा आणि कही मंत्रीगणांचा समावेश आहे . रक्षक राज्याचे सैन्य काळ्या भिंतीकडे रवाना झालेले आहे . कोणत्याही दिवशी ते काळ्या भिंतीपाशी पोहोचून ती भिंत पाडण्याची प्रक्रिया सुरू करेल......

या वाक्यानंतर पुन्हा एकदा कुजबुज सुरू झाली . मधूनच आवाज येऊ लागले.....
" रक्षक राज्यावर स्वारी करा.... "रक्षक राज्य ताब्यात घ्या...... विक्रमांचा वध करा.... रक्षक राज्य ताब्यात घ्या......

तेव्हा महाराज कैरव म्हणाले , " शांत व्हा , कोणताही निर्णय विचार न करता घेतल्यास त्याची फळे आपल्याला भोगावी लागू शकतात .......काळ्या भिंतीच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत ,पण त्या फक्त गोष्टी म्हणूनच ऐकल्या आहेत . त्याची शहानिशा करण्यासाठी कौशिक यांनी आपले काही निष्णात हेर काळ्या भिंतीपलीकडे पाठवले होते . कौशिक त्यांची काही खबर आली आहे का....?

" होय महाराज आपण एकूण चार हेर काळ्या भिंतीपलीकडे पाठवले होते . त्यातील फक्त एकालाच माघारी आणण्यात यश आलं आहे .
त्याच वेळी सभेतून आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडले.
" तुमच्या संमतीने त्या हेराला तुमच्या समोर आणू इच्छितो.....

" संमती आहे कौशिक , लवकरात लवकर त्या हेराला राज्यसभेत उपस्थित करा....
" महाराज तो हेर बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता , वेड्यासारखा काहीही बोलत होता . आपल्याला राजवैद्यांनी त्याला औषधी देऊन निद्रिस्त केलं आहे .....

कौशिक आणि त्यांच्या सैनिकाला त्या हेराला आणण्याची आज्ञा दिली . एक चालता-फिरता तुरुंग , एका खोली एवढा तो तुरुंग मोठा होता . त्या तुरुंगामध्ये मध्ये दोन संपूर्ण वाढ झालेले मोठे वाघ डरकाळ्या फोडत इकडे तिकडे फिरत होते . त्या तुरंग्याच्या मधोमध एका छोट्याश्या पिंजरात त्या हेराला साखळदंडांनी बांधून ठेवले होते . तो तुरुंग दहा हट्ट्याकट्ट्या मल्लांनी ओढत राज्यसभेत आणला .
" कौशिक हे काय चालवलय, आपल्याच हेरास पिंजऱ्यात का म्हणून कोंडलं आहे ....? आणि ते वाघ कशासाठी आणले आहेत ? आपलाच माणूस वाघाच्या भक्ष्यस्थानी द्यायची हिंमत तरी कशी झाली तुझी , मोकळं करा त्याला आत्ताच्या आत्ता.....!
कैरव महाराज रागा रागाने बोलले..
" महाराजांनी गैरसमज करून घेऊ नये . आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठीच त्याला पिंजऱ्यामध्ये कोंडलं आहे महाराज......
" म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुम्हाला.....?
" महाराज मी सांगत बसायला जास्त वेळ घालवत नाही तुम्ही स्वतः पहा........
कौशिकाने एका सैनिकाला काहीतरी सूचना दिली . तो सैनिक पळत जाऊन त्या तुरुंगाच्या वर चढला . तुरुंगाच्या वर बरोबर मध्यभागी जात त्याने एक पाण्याची बादली घेतली व त्या हेरावरती मोकळी केली .
तो जागा झाला. तो सामान्य माणसा सारखा दिसत होता . पण जेव्हा त्याला शुद्ध आली तो ओरडू लागला....
" सिरकोडा इसाड कोते ......
" सिरकोडा इसाड कोते ........
तो मोठ्या आवाजात ओरडत होता . ओरडतच त्याने त्याच्या पिंजऱ्याचे गज त्याच्या हाताने सहजपणे उपटून बाजूला फेकायला सुरुवात केली . तो पिंज-यातून बाहेर आल्यावर डरकाळ्या फोडणारे वाघ त्याच्यावरती धावून गेले . तो हेर चपळतेने त्या वाघाचा हल्ला चुकवत होता . जेव्हा एका वाघाने त्याचा पाय पकडून त्याला ओढून खाली पडले त्याचवेळी दुसरा वाघाने त्याच्या दंडाचा लचका तोडला . संपूर्ण सभेतून विविध आश्चर्यकारक उद्गार येत होते . त्याच्या दंडाचा मांसाचा तुकडा निघाला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही अंश दिसत नव्हता . उलट तो जोरजोराने ओरडत होता ,

" सिरकोडा इसाड कोते ......, सिरकोडा इसाड कोते ......सिरकोडा इसाड कोते ......

ज्या वाघाने त्याच्या दंडाचा लचका तोडला होता त्या वाघाचे पुढचे दोन पाय धरून , गोल गोल फिरवत त्याला तुरुंगाच्या सळ्यावरती आपटले . जोरात आपटल्यामुळे त्या वाघाच्या मांसाचे शितोडे संपूर्ण राज्यसभेत उडाले . त्याबरोबर सभेतून भयकारक उद्गार निघाले . दुसरा वाघ घाबरून एका कोपर्‍यात जाऊन लहान आवाजात गुरगुरत मुडपून बसला . तो हेर अजूनही
" सिरकोडा इसाड कोते ......
सिरकोडा इसाड कोते ......"
असं ओरडतच होता . त्या बसलेल्या वाघाकडे जात त्या वाघाचे मस्तक त्याने आपल्या हाताने सहज धडावेगळे केले. आता तो मुख्य तुरुंगाच्या सळ्या तोडायला बघत होता. राज्यसभेतील लोकांमध्ये भीतीची लहर उसळली . लोक घाबरून पळू लागले . त्या हेराने मुख्य तुरुंगाच्या सळ्या तोडल्या व बाहेर पडून महाराज कैरवाकडे जाउ लागला . त्याबरोबर संपूर्ण राज्यसभा घाबरून पांगू लागली . सैनिक महाराज कैरवांकडे धावू लागले . पण काही अंतरावर जाताच तो हेर जागेला थांबला आणि पुन्हा मोठमोठ्या आवाजात ओरडू लागला
" सिरकोडा इसाड कोते ......
" सिरकोडा इसाड कोते ......

" ही राज्यसभा आत्ताच भंग होत आहे...." महाराज कैरवांनी मोठ्या आवाजात आदेश दिला " कौशिक त्या हेराला आपल्या संशोधन शाळेत घेऊन या . बाकीच्या मंत्रिमंडळींनीही त्या ठिकाणी उपस्थित रहावे . आपल्याला लवकरच काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे . रक्षक राज्यातील आपल्या हेरांना व सैनिक पथकाला सूचना पाठवा , युवराजांना घेऊन ताबडतोब जलद इकडे निघायला सांगा...... ....

सरोज व भिल्लव सैनिकांच्या वेशात गुप्त भुयारी मार्गाने प्रधानजींची सुटका करायला तळघरातील तुंरूगा कडे निघाले होते .
" भिल्लवा आपण त्या अधिरताला मारून टाकायला हवं होतं , तो सुटला तर....
" सरोज तू घाबरू नको आतापर्यंत माझ्याकडून कोणीही सुटले नाही ,
" काय बोलतो आहेस , ज्यावेळी पहिल्यांदा तू मला आणत होता , त्यावेळी मी तीनदा सुटले होते ,
" त्यावेळी मी नवखा होतो , आता माझ्याकडे अनेक क्लुप्त्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी मी तुझ्यावरती मोहित झालो होतो.....
दोघेही भुयारी मार्गातून जात होते . सात ते साडेसात फूट व्यासाचा वर्तुळाकार भुयारी मार्ग होता तो . तो नेहमीच्या वापरातील नसल्यामुळे ना तिथे दिवाबत्तीची सोय होती , ना चालायला येत होते . दोघे धडपडत पुढे सरत होते . भिल्लवाच्या हातात मशाल होती . त्या मशालीच्या उजेडात ते दोघे पुढे सरकत होते .

भुयार पुढे सरकत होते . एके ठिकाणी भुयाराला दोन्ही बाजूनी अजून दोन मार्ग येऊन जुळत होते . त्यांच्या उजव्या बाजूच्या मार्गावरून त्यांना कुजबुज ऐकू येत होती आणि मशालीचा उजेडही येत होता .
सरोजने भिल्लावाच्या डोक्यात जोरात मारले " तू तर म्हणाला होतास कि हा मार्ग कुणालाही माहित नाही , मग ते कोण आहेत पहाऱ्याचे सैनिक......?
दोघेही सावधानतेचा पवित्रा घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत उभे राहिले . भिल्लव एका बाजूला व सरोज दुसऱ्या बाजूला उभी होती . भिल्लवाच्या हातातील मशाल त्याने विजवून टाकली होती . सरोजने हातात तेथीलच एक दगड उचलला होता . त्यांची कुजबुज ऐकू येत होती .
" अन्वी तुला नक्की खात्री आहे ना हाच तो भुयारी मार्ग आहे ते....
" होय देवव्रत मी बाबांबरोबर बऱ्याच वेळा या ठिकाणी आली आहे.....
" अग सरोजज या तर राजकुमारी अन्वी आहेत , टाक तो दगड खाली.....
भिल्लव समोर जात म्हणाला ,
" राजकुमारी अन्वी तुम्ही या ठिकाणी काय करत आहात तुमच्या साठी हे बरोबर नाही.....
अचानक समोर आलेल्या भिल्लवला पाहून राजकुमार देवव्रताने तलवार काढून भिल्लवावरती उगारली ...
" देवव्रता ते भिल्लवकाका आहेत हेरपथकाचे प्रमुख.
" तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला राजकुमारी म्हणत जाऊ नका मला म्हटलेलं आवडत नाही....
" पण तुम्ही या ठिकाणी काय करत आहात...
राजकुमारी बोलण्या अगोदरच देवव्रत म्हणाला
" आम्ही महाराज विश्वकर्मा यांना सोडवायला जात आहोत.....
" युवराज देवव्रत प्रधानजींचा महाराज विश्वकर्मा असा उल्लेख देशद्रोह आहे . सर्वांदेखत असा उल्लेख करत जाऊ नका अन्यथा तुम्हाला ही त्याच तुरुंगात राहावे लागेल .
" राजकुमारी आपण हे संकट पत्करू नका , तुम्ही जा . मी व सरोज प्रधानजींना सोडवायला जात आहोत आणि युवराज देवव्रतांना ताबडतोब जलधि राज्यात परतण्याचे आदेश आहेत .
" युवराजाला कोणाकडूनही आदेश घेण्याची गरज नाही
" युवराज आपले पिताश्री महाराज कैरव यांनी हा आदेश दिला आहे . वर नगरांमध्ये तुमचा शोध सर्वत्र सुरू आहे ....
" परंतु महाराज विश्वकर्मा यांना याठिकाणी सोडून जाणं युवराजाला शोभणारं नाही..... देवव्रत ठाम होता
" भिल्लव काका आम्ही ठरवलेलं आहे , पिताश्रींची सुटका करून त्यांना घेऊन आम्ही जलधिराज्यामध्ये जाणार आहोत.....
" पोरगी हट्टी दिसते , येऊ दे तिला पण बरोबर , उशीर करायला नको आपण जाऊया पटपट.....
सरोज विझलेली मशाल पेटवून म्हणाली...
शेवटी चौघांचा ताफा त्या तळघरातील तुंरूगाकडे निघाला....

उत्तरेच्या जंगलात महाराज सत्यवर्मा व महाराणी शकुंतला अजूनही राहत होते . ठराविक विश्वासू लोकांनाच त्यांचा हा ठिकाणा माहीत होता . त्या छोट्याशा पर्णकुटीत ते दोघे व त्यांच्या साठी लागणारी दुभती जनावरे होती . त्या छोट्याशा पर्णकुटी मागे त्यांना लागणारी कंदमुळे होते . बाकीचा ऐवज वेळोवेळी नगरातून पाठवला जात असे .
रोज रात्री जेवणानंतर महाराज सत्यवर्मा ध्यान-धारणा करीत असत . आजही ते ध्यानधारणेसाठी मृगचर्मा वर बसलेले असताना महाराणी शकुंतलेला ते सहन झाले नाही .
" दुपारी नगरातून दूत आला होता . विक्रमाने काळी भिंत पाडायची आज्ञा दिली आहे . विश्वकर्म्यालाही तुरुंगात टाकून फाशीची शिक्षा सुनावली आहे . तुम्ही किती काळ असेच गप्प बसणार आहात ? तुम्ही काहीतरी करायलाच हवं ...! राज्य व राज्याची जबाबदारी टाकून , तुमचं कर्तव्य सोडून , तपश्चर्या केली तरीही काही प्राप्त होणार नाही . कारण जो आपले कर्तव्य पूर्ण करत नाही त्याला ईश्वर सुद्धा प्रसन्न होत नाही .....
महाराज सत्यवर्मांनी डोळे देखील उघडले नाहीत . त्याची चीड येऊन महाराणी शकुंतला त्या पर्णकुटीतून बाहेर पडल्या , बरोबर त्यांनी छोट्या राजकुमारांनाही घेतले . हा राजकुमार सत्यवर्मा व शकुंतला यांचा दुसरा मुलगा होता . विक्रम हा शकुंतला व '_त्याचा_' पुत्र होता . हे फक्त महाराणी शकुंतलेला माहित होते . बाकी सर्व जनता असेच समजत होते की महाराज विक्रम हे सत्यवर्माचेच पुत्र आहेत . पाठीवरती खऱ्या राजकुमारांना घेऊन घोड्यावरती बसून त्या नगराच्या दिशेने निघाल्या ..
प्रलय-०४

ते चार घोडेस्वार होते . त्यांच्या पोषाखावरून ते योद्धा असावेत असे वाटत होते . काळ्या भिंतीकडे निघाले होते .
" चैत्या तुला वाटत नाही का आपला आयुष्यमान जेव्हापासून त्या मुलीकडून या बिया घेऊन आलाय तेव्हापासून जरा शांत शांतच आहे ..... " भरत हा आयुष्यमानचा मित्र आणि साथीदार होता . चैतन्य , कनिष्क , भरत आणि आयुष्यमान या चौघांनी शपथ घेतली होती . आणि या चौघांची निवड झाली होती .
" होय रे लगा भरत्या , मला पण तसंच वाटतंय , कन्या तुला काय वाटतंय रे ....? आयुष्मान आपला शांत शांत झालाय जणू हरवलाय कुणाच्या तरी आठवणीत......
" आयुष्मान आहेत ते , आठवणीत रामतील किंवा ज्यांची आठवण येते त्यांच्याकडे जातील , त्यांना कोण अडवणार...... " कनिष्क ही आयुष्यमान ला चिडवत म्हणाला .
आयुष्मान शांत होता. तो खरंच तिच्या आठवणीत रमला होता . तिचं ते रूप , तिचं ते दिसणं , तिचं ते हसणं , तिचं बोलणं , तिचं ते चालणं , सारं काही त्यानं त्याच्या डोळ्यांमध्ये साठवलं होतं . तो तिला पुन्हा पुन्हा आठवत होता . तो तिला पुन्हा पुन्हा पाहत होता .
" आता कशाला मित्रांची गरज लागते ..? आता आम्हाला विसरणार हो तुम्ही...? " पुन्हा एकदा चैत्या त्याला म्हणाला...
" चला रे गुपचूप , समोर भिंत दिसायला लागलीय , आता आपल्याला सुटे व्हावे लागणार आहे , दोघांना दक्षिणेकडे दोघांना उत्तरेकडे जावे लागणार आहे.....
" ते करु हो आपलं रोजच काम आहे , पण आम्ही काय म्हणतोय.....भरत म्हणाला
" कुणीही काहीही म्हणू नका , कामाच बघा आपल्या , ते महत्त्वाचं..... असं म्हणत आयुष्यमान ने घोड्याला टाच दिली व तो सगळ्यांच्या पुढे निघाला.....
तिघांनी बरोबर ओळखलं . तेही त्याच्या पाठोपाठ निघाले . म्हणजे आयुष्यमानला ती खरेच आवडली होती .

ते चौघेही काळ्या भिंतीपाशी पोहोचले . कितीतरी पिढ्यांपासून ती काळी भिंत त्याठिकाणी तशीच होती . तिच्याबाबत कितीतरी आख्यायिका सांगितल्या जात होत्या . त्यातल्या किती खरे किती खोटे हेच या भिंतीलाच माहित.... ती भिंत काळ्याकुट्ट पाषाणापासून बांधली होती . 10 ते 12 फूट उंच आणि पाच-सहा फूट रुंद अशी ती भिंत होती . रक्षक राज्याच्या पश्चिम सीमेवरती ती भिंत बांधलेली होती . उत्तरेपासून दक्षिणेकडे संपूर्ण भूखंडावर 5000 मैलाहून अधिक लांब असलेली ती भिंत उभी होती .......
" त्याठिकाणी गोल खड्डा दिसतोय का....? " आयुष्यमानने भिंतीस समोर एक दहा फूट अंतरावर असलेल्या छोट्या गोल खड्ड्याकडे बोट करत सगळ्यांना विचारले....
" असेच खड्डे प्रत्येक अर्ध्या मैलावरती उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे आहेत..... त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये हा एक एक बी टाकायचा आहे.... पहिल्या खड्ड्यामध्ये काळा बी टाकल्या नंतर दुसरा खड्ड्यांमध्ये पांढरा , त्याच्यापुढे काळा असे बी टाकत जायचे आहेत.....
" मी आणि कन्या दक्षिणेकडे जातो, तू भरत्याला घेऊन उत्तरेकडे जा..... चैत्या म्हणाला
" चैत्या गडबड करू नकोस , इतकी साधी सोपी गोष्ट नाही ही ,हजारो मैलांचा प्रवास आहे . बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मानवी वस्ती भेटणार नाही. खाण्याची पिण्याची सुद्धा व्यवस्था नसेल . त्यामुळे सगळी तयारी करूनच निघूया.....

ज्या गुप्त भुयारी मार्गाने सरोज अन्वी देवव्रत आणि भिल्लव निघाले होते . तो गुप्त मार्ग शस्त्रागारात निघत होता .
" काय म्हणतोयस हा मार्ग शस्त्रागारात जातो , अरे त्या ठिकाणी तर चोवीस तास पहारा असतो..... "
" मी त्या पाहऱ्याची व्यवस्था केली आहे सरोज ,"
त्याने त्याच्या खिशातून वाळूचे काळमापक यंत्र काढले. त्यातील एका बाजूची वाळू संपूर्णपणे रिकाम्या होण्याच्या बेतात आली होती. अजून काही काळ गेल्यानंतर एका बाजूची वाळू पूर्ण रिकामी झाली . त्यावेळी एका मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला....
" हे काय होतं ? भिल्लवकाका तुम्ही महालामध्ये स्फोट घडवून आणला की काय.....? " अन्वी
" त्याशिवाय सैनिकांचे लक्ष विचलित होणार नाही , नाहीतर आपल्याला प्रत्येक सैनिकाला सामोरं जावं लागलं असतं....... भिल्लव
" काही काळ थांबू , मग आपण शास्त्रागारातून बाहेर पडू , शस्त्रागारातून पुढे गेल्यानंतर थोड्याच अंतरावर तळघराला जाणारा रस्ता आहे , त्या तळघरातच प्रधानजी असतील......
सैनिकांच्या पावलांचा आवाज त्यांना जाणवला , हळूहळू कमी झाला . सैनिक निघून गेल्यानंतर, काहीवेळ थांबून ते शास्त्रागारात आले . शस्त्रागारात एकही सैनिक नव्हता . भिल्लवाने दोन तलवारी घेतल्या . सरोज ने तिच्यासाठी दोन छोटे खंजीर व एक तलवार घेतली . अन्वी नेही एक तलवार घेतली . देवव्रताने एक तलवार व धनुष्यबान घेतला . शस्त्रागाराच्या दारातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही बाजूला दोन रस्ते जात होते . उजव्या बाजूचा रस्ता वर महालाकडे तर डाव्या बाजूचा रस्ता तळघराकडे जात होता . डाव्या बाजूच्या रस्त्याच्या शेवटला चार शिपाई तैनात होते .
" कोण म्हणत होतं मी सैनिकाचा निकाल लावला आहे......? देवव्रत भिल्लवाला चिडवत म्हणाला
देवव्रताने पुढे होत एकापाठोपाठ एक तीन बाण चालवत तीन शिपायाच्या कंठाचा वेध घेतला , तर सरोज ने एक खंजीर फेकून एका सैनिकाला घायल केले . पण तो सैनिक तळघराचे दार उघडुन तळघरात पळत गेला . त्याच्यापाठोपाठ हे चौघेही पळाले पण त्या तळघराच्या दारापर्यंत पोहोचतायेत त्या अगोदरच मागुन महाला कडून येणाऱ्या वाटेने पाच-सहा शिपायांचा घोळका चालत येत होता . त्या घोळक्याने या चौघांना व पडलेल्या तीन शिपायांच्या प्रेतांना पाहिले , तो घोळका त्वेषाने यांच्यावर ती चालून आला . चौघेही पटपट त्या तळघरात गेले . पण मघाशी तळघरात गेलेल्या शिपायाने तळघरातील सैनिकांना एकत्र केले होते . त्या ठिकाणी पंधरा ते वीस सैनिक व वरून पाच ते सहा सैनिक या चौघांच्या मागावर होते . काही झालं तरी आता या चौघांचं काम अवघड होतं चौघे विरुद्ध पंचवीस असा हा मुकाबला होता......

जलधि राज्याच्या संशोधन शाळेत सर्व मंत्रीगण जमले होते . कौशिक त्यांना काही सांगत होता . तो गुप्तहेर ज्याने काही काळापूर्वी राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडवले होते , अजूनही " सिरकोडा इसाड कोते " असं बडबडतच होता . पण आता त्याचा आवाज मंदावला होता . त्याला तेथील पलंगावरती झोपवले होते व त्याचे हात पाय बांधले होते .

" महाराज काळ्या भिंतीपलीकडील आपल्या मोहिमा कितीतरी वर्षापासून चालू आहेत , पण हा असा अनुभव पहिल्यांदाच आला आहे . काळ्या भिंती पलीकडील महालाच्या परिसरात असलेली दुर्मिळ खनिजे आपण वेळोवेळी आणत असतो ; पण इतक्या वर्षात हा असा अनुभव आपल्याला कधीच आलेला नाही . आपल्याला हे सारं कळालंही नसतं जर योगायोगाने बाटी या फिरत्या जमातीचा कबिला त्या ठिकाणी थांबला नसता... .

कौशिकने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका इसमाकडे बोट करून सांगितले की
" हे बाटी जमातीच्या त्या कबिल्याचे नायक आहेत . त्यांनीच आपल्या हेराला पकडलं व ज्यावेळी आपण दुसरे हेर पाठवले होते त्यावेळी त्यांच्या हाती सुपूर्द केलं . पण त्यांच्यामार्फत आपल्याला बऱ्याच बहुमूल्य गोष्टी कळल्या आहेत महाराज.......

" हे फार विलक्षण आहे कौशिक , इतक्या वर्षात आपल्याला त्या काळ्या भिंतीपलीकडे कोणताही अनुभव आलेला नाही . अचानक हे कसं उद्भवलं असावं , यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र असण्याची संभाव्यता नाकारता येत नाही , तुम्हाला कोणत्या गोष्टी कळल्या आहेत...

" सर बाटी ही जमात काळी भिंत बांधण्याच्या अगोदर पासून काळ्या भिंतीपलीकडे राहत आलेली आहे , काळी भिंत बांधल्यानंतरही ज्या काही घटना घडल्या त्या घटना घडत असतानाही , त्या ठिकाणीच राहत होती . असं म्हणतात काळ्या महालाच्या पहिल्या सम्राटाने बाटी जमातीला अभय दिलं होतं . पण जेव्हा पहीला सम्राटाचा अस्त झाला व काळी भिंत बांधली गेली , त्यानंतरच्या काळात देखीलही बाटी जमात तिथेच राहत आली आहे . पण आता असे काहीतरी घडत आहे की बाटी जमात स्वतः स्थलांतर करत आहे . त्यांचे बरेच कबिले भिंतीला पार करून रक्षक राज्यात किंवा जलधि राज्यात येताना दिसत आहेत.......

" या सगळ्याचं कारण काय असावं कौशिक.....?
" या सगळ्याचं कारण , महाराज एकच आहे , ते म्हणजे ' सिरकोडा इसाड कोते '
" म्हणजे नक्की काय म्हणत आहात ....?
" महाराज आपल्या या हेरासारखे अनेक जण त्या काळ्या भिंतीपलीकडे आहेत....
" पण हा तर आपल्या नियंत्रणात वाटतो आहे .....?
" महाराज तो आपल्या नाही या बासरीच्या नियंत्रणात आहे , ज्यावेळी तो तुरुंग तोडून बाहेर पडला त्यावेळी बाटी जमातीच्या लोकांनी बासरी वाजवायला सुरुवात केली होती ते बासरीचे स्वर कानी पडताच तो एका जागी बसून बडबडत बसला......
" अजूनही तिथे कोपऱ्यात बसलेल्या बाटी जमातीचे लोक बासरी वाजवत आहेत म्हणून हा आपला हेर शांत आहे अन्यथा....
" अन्यथा काय होऊ शकतं कौशिक.......?
" हे होऊ शकतं " असं म्हणत संशोधन शाळेच्या दारावरती उभ्या असलेल्या एका इसमाने त्या दोन बाटी जमातीच्या लोकांना एका बाणात मारून टाकलं व त्या बाटी जमातीच्या नायकावरती ही बाण सोडला.......

काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी तुकडी काळ्या भिंतीकडे चालू लागली होती त्या तुकडीचा प्रमुख होता अद्वैत . अद्वैत हा रक्षक राज्यात असलेल्या नामांकित योद्ध्यांपैकी एक योद्धा होता . काळी भिंत बांधल्यानंतर प्रत्येक राज्यातील योद्ध्यांना काळ्या भिंतीपलीकडे जाऊन आपली तयारी सिद्ध करण्याची नवीन पद्धत चालू झाली . जो कोणी काळ्या भिंतीपलीकडे जाऊन कोणतीही फार मोठी दुखापत न होता परत येत असे त्याला अभिजीत ही उपाधी बहाल केली जात असे . अद्वैत हाही एक अभिजीत होता . तो बऱ्याच वेळा काळ्या भिंतीपलीकडे जाऊन आला होता . काळ्या भिंतीपलीकडे आलेल्या अनुभवाचे व्रण त्याच्या संपूर्ण शरीरावरती होते . आता तोच अद्वैत काळी भिंत पाडण्यासाठी निघाला होता . काळ्या भिंतीपासून काही मैलांच्या अंतरावरती त्यांची तुकडी विश्रांतीसाठी थांबले होती .
मध्यभागी पेटवलेल्या शेकोटीभोवती दिवसभर प्रवास करून थकलेले सैनिक , जिव्हाळ्याच्या गप्पागोष्टी करत बसले होते . आजूबाजूच्या परिसरात स्मशानासारखी किर्रररर शांतता होती . रात्र असूनही रातकिड्यांच्या ओरडण्याचा आवाज अजिबात येत नव्हता .

आणि अचानक चहूबाजूने मोठमोठ्याने
" सिरकोडा इसाड कोते " असं ओरडल्याचा आवाज येऊ लागला...

प्रलय-०५

" आता काय करायचं भिल्लवा , " सरोज वैतागून भिल्लवाला म्हणाली . त्यांच्यासमोर वीस सैनिक व मागच्या बाजूला पाच सैनिक , असं त्यांच्या भोवती पंचवीस सैनिकांचा गराडा पडला होता . महाराज विक्रम त्यांना देशद्रोही ठरवून फाशी द्यायला कमी करणार नव्हते . कसेही करून त्यांना प्रधानजींना घेऊन थेट तिथून जायलाच हवे होते . चौघेही लढायला सिद्ध झाले . सैनिक त्यांच्यावर चाल करून येणार त्या अगोदरच त्यातील काही सैनिकांनी इतर सैनिकांना मारायला सुरुवात केली . सैनिका सैनिकांमध्ये लढाई सुरू झाली होती . या चौघांना काहीच कळेना हे काय चाललं होतं . मागून आलेल्या सहा सैनिकांना या चौघांनी मिळून जागीच ठार केलं। आणि सैनिका सैनिकांमध्ये झालेल्या लढाईत आठ सैनिक जिवंत राहिले .
" अरे वा प्रधानजीनी त्यांची व्यवस्था अगोदरच केलीय म्हणायची , भिल्लव त्या आठ सैनिकांकडे पाहत म्हणाला . " आमच्या अगोदरही प्रधानजजीला कोणीतरी सोडवायला आले म्हणायचे..... , चला आपल्याला आता गडबड केली पाहिजे.....
" भिल्लवा ओळखलं नाहीस का मला....? त्या आठ सैनिकातला सगळ्यात हट्टाकट्टा व पहिलवान सैनिक त्याला म्हणाला ,
" अरे हा तर देशद्रोह्यांच्या टोळीचा प्रमुख योद्धा दिसतोय....
" काय भिल्लवा तुही असच बोलतोयस , तुला माहितीये सारं काही , आणि तु ही आम्हाला देशद्रोही म्हणतोयस.....
" अरे सर्थक चेष्टा करतोय मी .....
असं म्हणत भिल्लवाने सार्थक ला मिठी मारली ....
" तुमचा बंधू मिलाफ झाला असेल तर मला सोडवाल का......?
प्रधानजी बाजूच्या तुरुंगातून म्हणत होते
" क्षमा असावी प्रधानजी लगेच सोडवतो ,
असं म्हणत सार्थक व ते सात सैनिक पुढे झाले . त्यांनी तुरुंगाचे दार तोडून काढले . आत जात प्रधानजीच्या हाताला बांधलेल्या साखळ्या त्यांनी तोडून काढल्या . अन्वी ने पळत जाऊन तिच्या बाबांना मिठी मारली .
" अन्वी बाळा तुला किती वेळा सांगितले , नसते पराक्रम करत जाऊ नकोस .....
" बाबा मी तुम्हाला फाशी जाताना कसं पाहू शकत होते....?
" तुला असं वाटलं का , कि मी गपचुप फाशी गेलो असतो....? , देवव्रत तू तरी कमीत कमी आन्वीला समजवायचं होतं ....?
" हा कसला समजावतोय , हाच तिला घेऊन आलाय.....
सरोज प्रधानजीला म्हणाली , देवव्रताने सरोज कडे रागाने बघितलं , त्याच्या नजरेत एका युवराजचा अपमान झाल्या सारखा भाव होता . मात्र प्रधानजीना अन्वी बरोबर संभाषणात असल्याने सरोजजचं हे वाक्य त्यांना ऐकू गेलं नाही .
" आपण त्या भुयारी मार्गाने जाऊ म्हणजे सैनिकाची आपल्यावर नजर पडणार नाही .....
" अरे भिल्लवा तुझ्या मार्गाने गेलो तर आपण नगरातच पोहोचू , आपल्याला लवकरात लवकर नगराबाहेर जायला हवं . त्यासाठी मला एक गुप्त मार्ग माहित आहे ......
" काय बोलत आहात प्रधानजी , मी हेरखात्याचा प्रमुख असून मलाही तो गुप्त मार्ग माहित नाही ......
" अरे भिल्लवा काही गोष्टी फारच गुप्त ठेवाव्या लागतात....
" चला लवकर.....
प्रधानजी पुढे , बाकी त्यांच्या मागे निघाले......

जलधि राज्याच्या संशोधन शाळेत जेव्हा दारात उभ्या असलेल्या इसमाने बासरी वाजणाऱ्या दोन बाटी जमातीच्या लोकांना ठार केले व नायका वरती बाण सोडला , त्यावेळी कौशिकाने नायका वरती उडी घेत बाटी समाजाच्या नायकाला वाचवले . पण संगीत बंद झाल्यामुळे इतका वेळ शांत असलेला तो हेर पुन्हा आक्रमकपणे ओरडत त्याच्या क्रिया करू लागला.....

" सैनिकांनो महाराजांना व सर्व मंत्रीगनांना सुरक्षितपणे येथून बाहेर घेऊन जा , आणि काही जण ज्यानं बाण मारला त्याच्या मागे जा.......
कौशिकाने सर्व सैनिकांना आदेश दिला . पण त्या हेराने ' सिरकोडा इसाड कोते ' असं ओरडत बाजूला पडलेले भाले घेऊन एकापाठोपाठ एक सैनिकांवर ती फेकायला सुरुवात केली . तेथील भाले संपल्यानंतर , कोपऱ्यात पडलेला धनुष्यबाणाकडे तो पळाला . मात्र त्याआधीच कौशिकने तलवार फेकून त्याचा पाय जायबंदी करायचा प्रयत्न केला , पण त्याने चपळतेने ती तलवार चुकवली व तेथील धनुष्यबाण त्याच्या हाती घेतला . ज्यावेळी त्याने धनुष्यबाण हाती घेतला , त्याच वेळी कौशिकने सर्व सैनिकांना त्यांच्या ढाली महाराजांच्या व मंत्री यांच्या रक्षणासाठी समोर धरायला सांगितल्या . मात्र त्याआधीच त्या हेराने ' सिरकोडा इसाड कोते ' असे ओरडत महाराजांवर ती एक बाण चालवला . आलेला बाण चुकवण्यासाठी महाराज खाली वाकले , तेव्हा त्याने दुसरा बाण चालवला . तो बाण महाराजांना लागणार , मात्र एका शिपायाने पुढे होत तो बांध त्याच्या ह्रुदया वरती झेलला . ढालीच्या सुरक्षीततेखाली सर्व सैनिकांनी महाराजांना व मंत्रीगनांना बाहेर नेले . त्यापाठोपाठ कौशिक बाहेर पडत , त्याने संशोधन शाळेच्या दाराला कुलूप घातले तो हेर एकटाच आत मध्ये ओरडत नासधूस करत बसला .

आयुष्यमान व भारत उत्तरेकडे निघाले होते . प्रत्येक पावकोसा वरती असलेल्या गोल खड्ड्यांमध्ये एक काळा व त्यापुढील खंडांमध्ये पांढरा असे बी टाकत त्यांची यात्रा चालू होती . आतापर्यंत त्यांनी 22 खड्डे संपवले होते . पुढच्या खड्ड्याकडे जात असताना भरत्या म्हणाला
" आयुष्यमान तुला काय वाटतं वेड्या आबाजीला खरंच आपल्या कार्याची माहिती असेल का ....? आपण त्याचं ऐकून काही चूक तर करत नाही ना....?
" तुला माहित आहे का ज्यावेळी आपल्या अगोदरच्या वारसदारांनी आपली निवड केली त्यावेळी आपल्याला एक वाक्य सांगितलं होतं ' इसाटीकोपा मिसाटीकोपा ' म्हणजेच " मार्ग एकच आहे, लक्ष एकच आहे " आणि हेच वाक्य तुम्हाला तुम्हाला पुढे मदत करेल असेही ते म्हणाले होते.....
" ते माझ्याही लक्षात आहे पण मला त्या वेड्या आबाजीचा विश्वास वाटत नाही . मला वाटतं तो वेडेपणाच सोंग करतोय त्याच्या मागं नक्कीच काहीतरी गोम आहे.....
" भरत तू फारच विचार करतोयस , ज्यावेळी त्याची व माझी पहिली भेट झाली होती त्यावेळी तोच मला म्हणाला , ' इसाटीकोपा मिसाटीकोपा ' आणि हे वाक्य फक्त वारसदारांनाच माहीत असतं.....
" पण आयुष्यमान तू हे विसरतो की एकदा वारसदाराने पुढचा वारसदार निवडल्यानंतर त्याला मागच्या सर्व गोष्टी विसरून आपल्या दैनंदिन आयुष्य जगायचं असतं , आणि कोणत्याही परिस्थितीत नव्या वारसदाराशी संपर्क साधायचा नसतो....
" अरे भरत हे नियम मोडण्यासाठीच असतात . आता त्या मूर्ख विक्रमाने काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे , आणि तसं जर झालं तर जो आहाकार माजेल तो थांबवण्यासाठी हे असले फालतू नियम कामाचे नाहीत....

ते बोलत बोलत पुढच्या खड्ड्या पाशी आले होते . आयुष्यमाने पिशवीतून एक काळा बी काढला व त्या खड्ड्यामध्ये टाकला , ज्यावेळी बी खड्ड्यांमध्ये पडला त्यावेळी तो जमिनीत रुतायला लागला व त्यातून छोटासा काळा अंकुर बाहेर पडला.....

त्याच वेळी भरत व आयुष्यमान दोघांच्याही कानावरती कुणीतरी हाक मारत असल्यासारखा आवाज पडला . त्यांनी मागे वळून पाहिले दुरून एक घोडेस्वार त्यांच्याकडे येत होता . अंधार पडायला आला असल्याने त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता , पण ज्यावेळी तो जवळ आला त्यावेळी आयुष्यमानला एक सुखद धक्काच बसला . तो घोडेस्वार नव्हता , ती एक स्त्री होती . ती तीच होती जिच्याकडून आयुष्यमानाने त्या बिया घेतल्या होत्या . जिच्या आठवणीत तो रमला होता.....

महाराणी शकुंतला छोट्या राजकुमारांना घेऊन घोड्यावरती स्वार होऊन निघाल्या खऱ्या , पण दोन-तीन कोसाच्या अंतरावर जाताच घनदाट अंधार पडला . जंगली श्वापदांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला . इतक्या दिवस जंगलात राहत असूनही त्यांना त्या आवाजाची अजिबात सवय झाली नव्हती . त्या जरा घाबरल्याच . इतका घनदाट अंधार पडला होता की हात भरा वरचे डोळ्याने नीट दिसत नव्हते आणि यात भर म्हणून त्यांच्याकडे मशाल ही नव्हती . नाईलाजाने त्यांनी माघारी जायचं ठरवलं....

माघारी जाण्यासाठी त्या वळल्या खऱ्या पण त्यांच्या मागे सात-आठ घोडेस्वार उभे होते . त्यांनी त्यांची तोंड काळ्या कापडाने झाकली होती . त्यांच्या खांद्यावरती धनुष्यबान व कमरेला तलवार लटकत होती . ते घोडेस्वार कोण होते ? त्यांना काय होतं ? याची जराही कल्पना महाराणींना नव्हती . मुळात त्यांना लढाई अजिबात येत नव्हती पण तरीही त्यांनी बरोबर घेतलेल्या तलवारीला हात घातला . त्याचवेळी मागून कुणीतरी त्यांच्या तोंडावरती कापड टाकले , त्याला कसला तरी विचित्र गंध होता हळूहळू त्यांना जाणीव झाली त्यांच्या सर्व संवेदना बधीर होत आहेत . शेवटी त्या बेशुद्ध झाल्या व घोड्यावरून खाली पडल्या......

काळी भिंत पडण्यासाठी निघालेल्या पहिल्या शिपाई तुकडीचा प्रमुख अभिजीत अद्वैत आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारण्यासाठी त्याच्या विश्वासू सैनिकांबरोबर गेला होता , इकडे सैनिक शेकोटी पेटवून बसले होते . ज्यावेळी तो परतून माघारी आला , त्यावेळी त्याला जे दृष्य दिसले ते त्याच्या हृदयाचा थरकाप उडवणारं होतं . त्याच्या सर्व सैनिकांची हत्या झाली होती . आता शेकोटीभोवती पंधरा मनुष्य बसले होते . मारलेल्या सैनिकांची माणूस त्यांच्या हातात होते ते चवीने ते मांस खात होते व मधुनच ओरडत होते
" सिरकोडा इसाड कोते ......
अभिजीत अद्वैत त्याच्या विश्वासू सैनिकांबरोबर तिथून पळाला . तो कितीही शूर आणि वीर असला तरीही मूर्ख नव्हता. त्याचे दीडशे ते दोनशे सैनिक फारच पराक्रमी होते . त्याच्या तुकडीला त्याच्या राज्यातील सर्वात उच्च बहुमान मिळाला होता . त्याची तुकडीही कधीही न हारनारी होती ..... आणि त्या संपूर्ण तुकडीच्या विनाश फक्त पंधरा लोकांनी केला होता ........

कौशिक त्याच्या कक्षामध्ये विचारमग्न परिस्थितीत बसला होता . जे काही झालं होतं ते नक्कीच विचार करायला लावणारं होतं . जो कोणी इसम होता आणि ज्याने ते बाण मारले होते , त्याचा नक्की हेतू काय होता हे कळणं आवश्यक होतं . त्यामागे त्याचा सर्वात विश्वासू हेर भार्गव गेला होता . तो कोणत्याही क्षणी परतून त्या इसमाला बरोबर घेऊन येणारच याची त्याला खात्री होती. मनातल्या मनात तो लवकर येऊ दे अशी कौशिक प्रार्थना करीत होता , आणि दारात भार्गव आला . त्याने आल्या आल्या कौशिकची क्षमायाचना केली . भार्गव त्या मनुष्याला पकडू शकला नव्हता . पण त्याला एक कळाले होते , ते म्हणजे तो मनुष्य मारुत राजाच्या आज्ञेवरुन हे सारं करत होता...
प्रलय-०६

" तू इथे काय करतेस ....? आयुष्यमानने तिला विचारलं ......
आयुष्यमान व भरत तिला त्या ठिकाणी पाहून आश्चर्यचकीत झाले होते . ती त्याठिकाणी कशासाठी आली असावी याचा विचार करत आयुष्यमान मनोमन आनंदित होत होता . त्याला वाटत होतं कि ती त्याच्यासाठीच तिथे आली असावी .

" मी कसं सांगू हे मला कळत नाही , खरंच.....
तिला काहीतरी सांगायचं होतं , पण ती संकोचत होती . आयुष्यमानच्या मनात लाडू फुटत होते .
" तुम्हाला काही सांगायचं असेल तर निसंकोच बोला , तुम्हाला मदत करायला आम्ही केव्हाही तयार आहोत ......" आयुष्यमानच्या मनातले वाक्य भरत बोलला , त्यामुळे आयुष्यमान मनात चरफडला .हळूच त्याने भरत्याला गुद्दा घातला...
" इसाटीकोपा मिसाटीकोपा .....
ती स्त्री म्हणाली
" तुम्हाला हे वाक्य कसं माहित.....? , ते अधिक सावध झाले.......
" मीही एक वारसदारच आहे . माझ्या वडिलांनी माझी निवड केली होती....
" पण गेल्या आठवड्यात झालेल्या वारसदारांच्या सभेला तुम्ही उपस्थित नव्हता..... आणि तसेही आपल्या स्वतःच्या नातलगास वारसदार म्हणून निवड करण्याची बंदी आहे , मुळात वारसदाराला तोपर्यंत स्वतःचा संसार थाटता येत नाही जोपर्यंत तो पुढचा योग्य वारसदार निवडत नाही . त्यामुळे तुमची वारसदार म्हणून निवड होणे अशक्यच आहे...... आयुष्यमान म्हणाला .
" म्हणूनच वारसदाराच्या सभेने बाबांच्या निर्णयाला त्यावेळी मान्यता दिली नव्हती . पण नंतर काळ बदलत गेला , ज्यावेळी विश्वनाथ वारसदाराच्या सभेचे प्रमुख झाले , त्यावेळी त्यांनी या निर्णयाला मान्यता दिली . माझं काम माझ्या क्षेत्रातपुरतंच मर्यादित होतं , मला कुठे फिरायची मुभा नव्हती . त्यामुळे मला वारसदारांच्या सभेत जायलाही बंदी होती .
" विश्वनाथांनी मला याबद्दल कधीच काही सांगितलं नाही , ज्यावेळी माजी सभेचा प्रमुख म्हणून निवड झाली त्यावेळी विश्वनाथांनी याबाबतीत सांगने क्रमप्राप्त होतं...... ते असो पण तुम्ही इथे काय करताय.....?
" बाबांची वारसदार म्हणून निवड होण्यामागचे एक प्रमुख कारण होतं , ते म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना काही घटनांचं पूर्वज्ञान व्हायचं , स्वप्नातून किंवा अंतर जाणिवेतून , त्यांना पुढे घडणाऱ्या घटना कधी कधी समजायच्या..... पण बाबा एकदा काळ्या भिंतीपलीकडे गेले होते . वारसदारांच्या सभेत काहीतरी निर्णय झाला होता . बाबांना काहीतरी समजलं होतं . त्यासाठी ते काळ्या भिंतीपलीकडे गेले . तेव्हापासूनच त्यांची मानसिक स्थिती ढासळत गेली..... जेव्हा त्यांना व्यवस्थित समजत होतं , त्या वेळीच त्यांनी पुढचा वारसदार म्हणून माझी निवड केली होती.....
" ते असू द्या हो पण तुम्ही इथे काय करताय हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं..... भरत म्हणाला.....
" जरी त्यांची मानसिक स्थिती ढासळली असली तरी अजूनही त्यांना काही घटनांचे पूर्वज्ञान होतं . तुम्ही त्या बिया घेऊन गेल्यानंतर बाबासारखे पळत होते ....' काळी भिंत , बिया , आयुष्यमान धोका......' मला वाटतं ते म्हणत होते की आयुष्यमानला काळ्या भिंतीपासून व बियांपासून धोका आहे.....
" पण हे कसं शक्य आहे ....?मधूनच भरत म्हणाला.....
" मी बरेच धोके पचवलेले आहेत , तुम्ही माझी काळजी करू नका , तुम्ही परतून घरी जा त्या ठिकाणी तुमचे बाबा एकटे असतील..... आयुष्यमान असं म्हणत असतानाच त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . कारण तिला आयुष्यमानची काळजी वाटत होती आणि तिला त्याची काळजी वाटत असल्याने त्याला मनोमन आनंद झाला होता....
" मी बाबांना शेजारच्या गावात असलेल्या धर्मशाळेत बाबांना सोडून आलेली आहे , मी तुमच्याबरोबर उत्तरेकडे येणार आहे.....
" आयुष्यमान ती तुझी काळजी घेण्यासाठी उत्तरेकडे येणार आहे .....भरत आयुष्यमान च्या कानात कुजबुजला व नंतर तिच्याकडे वळून म्हणाला " अहो तुम्ही आमची काळजी घेण्यापेक्षा आम्हाला तुमची जास्त काळजी घ्यावी लागेल.....! "
आयुष्यमानला मनोमन वाटत होते कि तिला बरोबर घेऊन जावे . पण तो तसं करू शकत नव्हता , कारण झालेल्या निर्णयानुसार त्या दोघांनाच उत्तरेकडे जाणे भाग होते . भरतचं म्हणही बरोबर होतं तिचीच अधिक काळजी घ्यायला लागणार होती , आणि ती बरोबर असल्यामुळे त्यांचा वेगही मंदावणार होता .
" तुम्ही आमच्यासाठी तुमच्या बाबांना धर्मशाळेत सोडून येऊ नका . आम्ही आमचं कार्य करू शकतो , आणि काळजीही घेऊ शकतो.....
" माझा निर्णय झालेला आहे आणि तुझा ही झालेला आहे . आयुष्यमान तुला वाटत नाही का मी तुझ्याबरोबर यावं.....
" इथं मला काय वाटतं याचा प्रश्न नाही निर्णय काय झालाय याचा प्रश्न आहे....? सभेने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जाणं हे योग्य नाही.....
" बरं मग मला सांगा , उत्तरेकडच्या जंगलात भरपूर जंगली प्राणी आहेत . जर एकाच वेळी तुमच्यावरती चार-पाच वाघांनी धावा बोलला तर काय कराल.....
" आम्ही काहीतरी करू शकतो , पण जर तू आमच्या बरोबर असली तर आम्ही काहीच करू शकणार नाही . कारण तुझ्या सुरक्षेसाठी आम्हाला वेगळी कसरत करावी लागेल.....
" फार लांब कशाला आत्ताच पाहूया , समजा मी इथे नाही आहे आणि या वाघांनी तुमच्यावरती धावा बोललेला आहे ........" जेव्हा तिनं हे वाक्य संपलं तेव्हा त्यांच्या मागून वाघाची डरकाळी ऐकू आली.....

आयुष्यमान मागं वळून पाहिलं त्या ठिकाणी तीन वाघ आक्रमकतेचा पवित्रा घेऊन कोणत्याही क्षणी उडी मारायच्या बेतात उभे होते . ते वाघ साधेसुधे नव्हते . त्या जंगलातील वाघाचा आकार साधारणपणे असलेल्या वाघाच्या आकारापेक्षा दुप्पट होता . असे ते विचित्र आणि पूर्ण वाढ झालेले मोठे व एका माणसाला सहजपणे त्यांच्या नाश्त्याला पचवणारे वाघ होते . त्यांची तलवार त्यांच्याजवळ नव्हती . त्यांचे घोडे त्यांच्यापासून काही पावलांच्या अंतरावर होते . पण त्यांनी हालचाल केली असती तर वाघाने त्यांच्यावरती धाव घेतली असती . आयुष्यमान तसाच थांबला . वाघ ही तसेच स्थिर होते . हळूहळू करत तो घोड्याकडे जात होता . भरत ही हळूहळू घोडा कडे सरकत होता . दोघेही घोड्यापाशी पोहोचले . त्यांनी त्यांच्या तलवारी हातात घेतल्या . त्याच वेळी एका वाघाने भरत वरती तर दुसऱ्या वाघाने आयुष्यमान वरती उडी घेतली . भरतने बाजूला सरत तलवार अशी धरली जेणेकरून वाघाने उडी घेतली तरी ती तलवार सरळ वाघाच्या काळजात आरपार जाणार होती . पण वाघाने खूपच उंच उडी घेत मागच्या पायाने भरतला तोंडावरती पाडले . आयुष्यमानच्या खांद्यावरती पंजा मारत त्या वाघाने आयुष्यमानलाही खाली पाडले . आयुष्यमाने त्याच्या हातातली तलवार पडू दिली नाही . दुसऱ्या वेळी तो वाघ त्याच्यावरती उडी घेत पंजे मारायला येत असतानाच आयुष्यमाने तलवार चालवत त्याच्या पुढच्या एका पायाचा पंजा कापून टाकला.....
त्यामुळे वाघ अधिकच चवताळला , त्याने लंगडत लंगडत येत आयुष्यमानच्या पायाला धरले व त्याला भिरकाउन दिले . आयुष्यमान जोरात जाऊन झाडाला आपटला . उभा असलेला तिसरा वाघ चवताळून जाउन आयुष्यमानवरती उडी घेतली . त्याच्या गळ्याचा घोट जाणारच होता , पण तीनही वाघ एकाच वेळी स्तब्ध झाले , पुतळ्या प्रमाणे.....

तिन्ही वाघ एखादा पुतळा असावा तसेच होते . ते सजीव आहेत हे अजिबात जाणवत नव्हते . त्या दोघांनाही नक्कीच भास होत असावा ,
" बघितली मी तुमची शक्ती साधे वाघ तुमच्यावरती धावून आले तर तुमचा जीव जाणार होता , आणि उत्तरेच्या जंगलात वाघापेक्षा बरेच चित्रविचित्र प्राणी सुद्धा आहेत हे माहित नाही वाटतं तुम्हाला......?
" काय ....? काय केलस तू हे...... हे वाघ असे का स्तब्ध झाले आहेत......?
" म्हणूनच मी म्हणते मला तुमच्या बरोबर येऊ द्या तुम्हाला माझी गरज आहे.....
ते दोघेही वाघापासून दूर झाले . त्यावेळी घोड्यावर बसून तिने डोळे झाकून काही क्षण थांबली. ते वाघ गपचूप जंगलात निघून गेले ....
" तुम्ही हे नक्की कसं केलं ..... ?आश्चर्यचकित झाला होता .
" अरे भरत्या ती सर्व प्राण्यांच्या मनावर नियंत्रण करू शकते.....! आयुष्यमान म्हणाला.....
" तरीही तू आमच्या सोबत येणार नाही , कारण सभेच्या विरुद्ध कोणताही निर्णय आचरणात आणला जाऊ शकत नाही . तू आताच्या आता माघारी जा.....
आयुष्यमानला जरी मनातून वाटत असले तिने त्याच्याबरोबर यावं, पण सभेच्या निर्णयाविरुद्ध जाणे त्याच्या मनाला पटणारे नव्हते . तो कर्तव्यनिष्ठ होता.....

ते दोघेही घोड्यावरती बसले व उत्तरेकडे निघाले . त्याने तिच्याकडे वळूनही पाहिले नाही . आयुष्यमानला मनोमन खूप वाईट वाटत होतं . त्याने मनातल्या मनात तिची क्षमायाचना केली . जाता जाता शेवटचा पहावं म्हणून त्यांनी मागं वळून पाहिलं पण ती तिथे नव्हतीच .
तिचा घोडा दक्षिणेकडे चाललेला दिसत होता . त्याने मनातल्या स्वतःला दोष देत घोड्याला टाच दिली व तो पुढच्या खड्ड्याकडे निघाला .

प्रधानजी , अन्वी , देवव्रत प्रधानजीसाठी लढलेले आठ सैनिक , भिल्लव नि सरोज प्रधानजींच्या मागोमग त्या भुयारातून नगराबाहेर पोहोचले . नगराच्या तटबंदी बाहेर दोन कोसावर असलेल्या जलधि राज्याच्या पहारा कक्षाकडे जायचा त्यांचा बेत होता . काही काळ विश्रांतीसाठी ते त्या ठिकाणी थांबले होते . रात्रीचा अंधार पडला होता . दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानजीला फाशी देण्यात येणार होती . चौथ्या प्रहराला बदली सैनिक त्याठिकाणी येणार होते . त्यावेळी तळघरातील तुरुंगात पडलेली प्रेते पाहून प्रधानजींचा कसून शोध घेतला जाणार होता . त्यामुळे लवकरात लवकर पुढे जाणे गरजेचे होते . पण सरोज नगराकडे निघून गेली होती . तिच्या सखी त्या वेश्यालयात होत्या त्यांना एकटे सोडून ती जाऊ शकत नव्हती . भिल्लवाला तिला सोडून पुढे जाणे जिवावर आले होते . तो उदास होऊन एका बाजूला बसला होता .
" भिल्लवा तुला आमच्याबरोबर येण्याची गरज नाही , तू या आठ सैनिकांना घेऊन उत्तरेच्या जंगलात जा .... उत्तरेच्या जंगलात असलेले सैन्य गोळा कर . पुढचे आदेश मी तुला पाठवेनच ......
सार्थक व त्याच्या साथीदार सैनिकांबरोबर तो नगराच्या बाजूने उत्तरेकडे च्या जंगलात निघाला .
इकडे अन्वी , देवव्रत व प्रधानजी जलधि राज्याच्या पहारा कक्षाकडे निघाले...
प्रलय-०७

त्या गोल वर्तुळाकार नकाशा भोवती सर्व जण जमले होते . जलधि राज्यात आज कितीतरी वर्षांनी त्या युद्ध कक्षात ही तात्काळ बैठक बोलावली होती . काही विशेष मंत्रीगण , हेर पथकाचे प्रमुख , सेनाप्रमुख प्रमुख सल्लागार आणि स्वतः महाराज कैरव त्या ठिकाणी उपस्थित होते . महाराज कैरव बोलत होते ,
" आपल्या राज्यसभेत आणि संशोधन शाळेत ज्या काही गोष्टी झाल्या त्या तुम्ही पाहिल्या . तो माणूस आणि त्याचे ते विचित्र शब्द , हे आपण सर्वांनी ऐकलं आणि पाहिलं आहे . तो काय करू शकतो हे ही आपल्याला ज्ञात आहे . आपला शत्रू त्या काळ्याभिंतीपलीकडे आहे आणि त्यांची संख्या जरी कमी असली तरी ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत आणि महाराज विक्रमांनी ती भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहेत . त्यांच्या काही सैन्याच्या तुकड्या त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी पश्चिमेकडे निघाल्या आहेत . आपल्या राज्याची पुढची दिशा काय असावी ? आणि पुढे कोणती पावले उचलावीत यासाठी ही बैठक तात्काळ बोलावलेली आहे . कारण आपण लवकर कृती केली नाही तर त्याची फळे आपल्या संपूर्ण राज्याला , राज्यातील सामान्य जनतेला भोगावी लागतील . एक जबाबदार राजा म्हणून राज्यातील प्रमुखांचे मते घ्यावीत असं मला वाटलं , म्हणून या ठिकाणी तुम्हाला बोललेलं आहे . यशवंत जी तुम्ही राज्याचे सेनाप्रमुख आहात , तुम्ही या समस्येकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता....
" महाराज कैरव आपली सेना कोणत्याही क्षणी युद्ध लढण्यास तयार आहे आपण फक्त आदेश द्यावा....
" यशवंतजी मी तुमचं मत विचारले आहे....?
" महाराज खरं बोलायचं झालं तर या पृथ्वीतलावर ती आपले राज्य सर्वात शक्तिशाली व सामर्थ्यशाली आहे . आपल्या राज्यातील सैन्य व सैनिक सर्व बाजूनी इतर सर्व राज्यांपेक्षा उजवे आहेत . त्यांची प्रशिक्षण पद्धती त्यांच्याकडे असणारी हत्यारे त्यांना पुरवले जाणारे चिलखत , टोप हे सर्व उच्च प्रतीच्या संशोधनातून तयार केले जातात . त्यांना सहजासहजी हरवने कोणालाही शक्य नाही...... काळी भिंत जरी पाडली तरीही आपल्याला काही फरक पडत नाही . कारण राज्यसभेत आणि संशोधन शाळेत जे काही अवतरलं होतं त्याला काळी भिंत थांबवू शकली नाही , त्यामुळे ती पडली तरी काही हरकत नाही . उलट आपण त्या बाटी जमातीकडून त्या बासऱ्या व त्यांची वाजवण्याची पद्धत शिकून घेतली पाहिजे . त्या बासऱ्याचं उत्पादन सुरू करून आपल्या सैनिकांना त्याच पद्धतीने वाजवायला शिकवलं पाहिजे . जेणेकरून आपण त्या तसल्या व्यक्तींवर ती त्याचा वापर करू शकतो....
" त्यांना दक्षिणेकडच्या देवाचे पुजारी किंवा अंधभक्त असे म्हणतात . बाटी जमातीचा नायक ही त्या सभेसाठी उपस्थित होता . त्याने सेनाप्रमुखांना सांगितले ,
" आमच्या पारंपरिक कथेमध्ये या अंधभक्तांचा उल्लेख आहे , ज्यावेळी दक्षिणेकडील देव जागृत होईल त्यावेळी जागोजाग असे अंधभक्त उद्भवतील , ही खरे तर सामान्य माणसे असतात . पण या सामान्य माणसांना जेव्हा दक्षिणेकडचा देव त्याच्या सेवेत घेतो , त्यावेळी हे लोक अंधभक्त बनतात . त्यांना काही दिसत नाही , त्यांना फक्त तेच दिसते जे त्यांचा देव दाखवतो . त्यांना स्वतःचं मत नसतं , ना व्यक्तित्व असतं , ना ते विचार करू शकतात , ना स्वतः कोणती कृती शकतात . त्यांना कोणतीच जाणीव नसते . ज्यावेळी एखादा माणूस अंधभक्त होतो त्यावेळी आपण समजून जायचं की तो मृत आहे आणि सर्वशक्तिमान आहे ....
" पण तुम्हाला ती बासरी आणि त्या बासरीची धून याबाबत माहिती कशी झाली ...? महाराज कैरवांनी आणि त्या नायकाला विचारले
" आमच्या सर्व जमातीचे त्या भिंतीपलीकडे एक प्रार्थना स्थळ होतं . त्याठिकाणी आमच्या त्या प्रार्थनास्थळांची मुख्य पुजारीन , जिला आम्ही राणी देवालिका असं संबोधतो , ती आम्हाला कथा सांगते , भविष्य सांगते आणि भूतकाळही सांगते..... राणी देवालिका पद हे परंपरेने चालत आलेले असतं . ज्या राणीनेच आम्हाला बासरी विषयी सांगितलं , ती अकरावी राणी देवालिका होती , मी लहान होतो तेव्हापासून तीच राणी देवालीका होती , तिने आम्हाला हे सर्व सांगितले...
" मग या रानी देवालिकेला भेटणं शक्य आहे का...? महाराजांनी विचारलं
" ज्यावेळी दक्षिणेकडचा देव जागृत झाला त्यावेळी पहिल्यांदा आमचं प्रार्थनास्थळ त्याच्या प्रकोपाने नष्ट झालं . नष्ट झालं म्हणण्यापेक्षा आमच्या स्वतःच्या लोकांनीच ते नष्ट केलं अंधभक्त पहिल्यांदा बाटी समाजात उद्भवले . त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जमातीचे सर्व लोक मिळूनही त्या अंध भक्तांना थांबवू शकले नाहीत . त्यावेळी ही बासरी ची संकल्पना कोणाच्याच लक्षात आली नाही . नंतर जेव्हा ही घटना सगळीकडे पसरली त्यावेळपासून आम्ही सर्वजण स्वतःजवळ बासरी बाळगू लागलो ....
" या अंध भक्तांविषयी तुम्हाला अजून काय माहित आहे...? त्यांना कशाप्रकारे मारू शकतो आणि त्यांच्या अजून कोणत्या कमकुवत जागा आहेत....? महाराज कैरवांनी त्याला विचारले....
" मला फक्त त्या बासरी विषयी माहित आहे आमच्या कबील्याचीही एक पुजारीन आहे, तिला या जुन्या पुराण्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत . तुम्ही तिला विचारू शकता ,
तो बाटी जमातीचा नायक म्हणत होता...
" मी लहानपणापासून बऱ्याच गोष्टी ऐकत आलो आहे ,पण त्या फक्त गोष्टी म्हणूनच मी मानत होतो . मात्र या गोष्टी खऱ्या होत आहेत, एकूण एक , एकापाठोपाठ एक . त्यामुळे आम्हाला आमचे मूळ घर सोडून स्थलांतरित व्हावे लागत आहे.....
महाराज कैरवानी कौशिककडे पाहिले ,
कौशिक म्हणाले....
" महाराज मी अगोदरच त्यांच्या संर्व कबिल्याना आपल्या राज्यात स्थलांतरित करण्यासाठी आपली सैनिकांची तुकडी पाठवलेली आहे . यांच्यापैकी यांचे बरेच कबीले आपल्या राज्यात आलेले आहेत , तर काही कबीले अजून येत आहेत . नायकांनी आत्ताच ज्या पूजारनीचा उल्लेख केला , त्या पूजारनीला आणण्यासाठी आत्ताच सैनिकांची एक तुकडी पाठवतो ......

पुढे सेनाप्रमुख , कौशिक व इतर मंत्र्यांनी आपले विचार मांडले . त्यांचा निष्कर्ष एकच निघत होता . महाराज विक्रमांनी भिंत पाडायची ठरवली आहे तर त्यांना पाडू दे त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही , आपण आपल्या राज्यातील लोकांचा विचार करून त्यांच्या साठी जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या करू .

बऱ्याच वेळानंतर राज्याचे प्रमुख सल्लागार महर्षी सोमदत्त बोलले...
" महाराज कैरव जेव्हा तुमचे वडील हयात होते त्या वेळेपासून मी या राज्याचा महर्षी म्हणून सेवा करत आहे . काळ्या भिंतीपलीकडे जे काही आहे , त्याने एकेकाळी या संपूर्ण पृथ्वीतलावर हाहाकार माजवला होता . काळ्या भिंतीपलीकडील सम्राटाने पृथ्वीवरती प्रलय आणला होता . त्या प्रलयानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली . त्या सम्राटाला हरवण्यासाठी पृथ्वीतलावरील सर्व राज्ये एकत्रित झाली होती . अजूनही त्यांना सहयोगी राज्ये म्हणून संबोधले जाते . त्या सर्व राजांनी मिळून त्याला त्या भिंतीपलीकडे बंदिस्त करून , ती भिंत बांधली. इतकी वर्ष झाली तरी अजूनही ती जमीन , तो भाग राहण्यालायक नाही , तिकडे जीवन नाही... मागच्या वेळी जेव्हा काही मूर्ख लोकांनी त्या काळ्या भिंती पलीकडील मदतीने जेव्हा पृथ्वीतलावरचे राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता , त्यावेळी भिंतीच्या अलीकडील सहयोगी राज्यांनी मिळून त्या मुर्खांना मृत्युदंड दिला होता...... अधूनमधून असे लोक उद्भवताच जे काळ्या भिंतीपलीकडील मदतीने पृथ्वीवरचे साम्राज्य ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात... पण इतकी वर्षे झाली एकदाही ती भिंत पाडण्याचा प्रयत्न झाला नाही . कुणाचीही भिंत पडण्याची हिंमत झाली नाही . आणि आत्ताच असे काय झाले महाराज कि विक्रमांनी हा आदेश दिला.....? खरेतर त्या मूर्ख विक्रमला महाराज म्हणायला माझी जीभ लवत नाही . ज्यावेळी महाराज विक्रमाचा राज्याभिषेक होणार होता व सर्वांना निमंत्रणे गेली होती ; त्यावेळेस मी आपल्याला सल्ला दिला होता , विक्रम एवजी महाराज विश्वकर्मा ना रक्षक राज्याचे राजा बनवावे.... मला विक्रम मध्ये पूर्वीपासूनच काहीतरी विचित्र दिसत होतं . तो रक्षकाचा वंश असू शकत नाही . महाराज सत्यवर्मा व महाराणी शकुंतलेचा पुत्र असू शकत नाही . त्याने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे म्हटल्यानंतर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असणार आहे , जी आपल्याला दिसत नाही . आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . महाराज माझं मत विचाराल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की कसंही करून त्या मूर्ख विक्रमाला ती भिंत पाडण्यापासून थांबवायलाच हवं . एक मिथक व अंधश्रद्धा म्हणून जर आपण त्याकडे बघत असाल तर आपलं चुकत आहे . महाराज जर ती भिंत पडली तर आपल्याला , आपल्या सर्वांना , सर्व मानव जातीला फार मोठे बलिदान द्यावे लागेल.....
" पण महर्षी कितीतरी शतकात आपण त्या भिंती मुळे आपले रक्षण झालय अशा गोष्टी ऐकल्याच नाहीत...
उलट ती भिंत आपले अस्तित्व दाखवून देत आपल्याला त्यापलीकडे जाण्यापासून थांबवण्याचा आलेली आहे . त्या पलीकडे असलेली खनिज संपत्ती जर आपल्या राज्यात आली तर आपल्या राज्यात, व इतरही अनेक राज्यात अजून मोठ्या प्रमाणावर सुख-समृद्धी येऊ शकते..... सेनाप्रमुख यशवंतजी महर्षींना विचारत होते....
" सेनाप्रमुखजी काही गोष्टींचे अस्तित्व जरी दिसत नसले तरी त्या असतात . आपण त्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही . एखादी गोष्ट दिसत नाही म्हणून ती नाही असे नसते . एखादी गोष्ट आपल्याला जाणवत नाही म्हणून ती नाही असे नसते . एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही म्हणून ती नाही असेही नसते . बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कुठेही दिसत नाहीत जाणवत नाहीत पण वेळ आल्यावरती आपले अस्तित्व दाखवून देतात......
महर्षींच्या या वाक्यांवरती संपूर्ण सभा विचार मग्न झाली....
प्रलय-०८

रक्षक राज्याची राज्यसभा आज बर्‍याच दिवसांनी भरली होती . महाराज राजसिंहासनावरती आपल्या हातात सुवर्णपात्र घेऊन मदिरापान करत बसले होते . प्रधानजींना कारागृहात टाकल्यापासून प्रधान पदाचा भार सेनापतीकडे सोपवण्यात आला होता . सेनापती अंबरीश बोलत होते...
" महाराज आपल्या सैन्याची जी पहिली तुकडी आपण काळ्या भिंतीपलीकडे पाठवली होती त्याबाबत एक बातमी आहे.....
" कोणती बातमी आहे अंबरीश....
अलीकडे महाराज थोरामोठ्यांचा मान ठेवायचा विसरत होते. ते सर्रास सर्वांना एकेरी नावाने संबोधत होते . बऱ्याच जणांची फरफट होत होती पण महाराज पुढे कोणी काही बोलत नसे . जेव्हा सेनापती अंबरीशजींना महाराजांनी अंबरीश असे संबोधले तेव्हा त्यांना राग अनावर झाला , कारण जेव्हा महाराज जन्मलेही नव्हते तेव्हापासून सेनापती अंबरीश हे रक्षक राज्याच्या सेवेत होते . त्यांना राग येणे सहाजिकच होते, पण महाराजांपुढे त्यांनी नमते घेत . पुढे बोलायला सुरुवात केली....
" महाराज आपल्या राज्यातील सैन्यातील ती सर्वात धाडसी , पराक्रमी आणि कधीही न हरवली जाण्यासारखी तुकडी होती.....
" एवढी प्रस्तावना कशाला करताय अंबरीश ...? सरळ सांगा बातमी काय आहे....? उगाच आमच्या वेळेचा अपव्यय करू नका.....
" महाराज भिंतीकडे गेलेल्या आपल्या तुकडीतील फक्त पाच सैनिक शिल्लक आहेत . ते माघारी परतले आहेत . बाकी सर्वांना शत्रूने मृत्यूच्या दारी पोचवलं आहे....
" कोण आहे हा शत्रू ....? जो आपल्या राज्याबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे.....
" महाराज आपले सैनिक व त्या तुकडीचा प्रमुख अभिजीत अद्वैत जे काही सांगत होता त्यावरून हे साधंसुधं नाही . तुम्ही स्वतः ऐका ......
राज्यसभेत एका बाजूला उभा असलेल्या अद्वैतकडे सेनापतीने पाहिले . अभिजीत अद्वैत पुढे येऊन बोलू लागला....
" महाराज आम्ही काळ्या भिंतीपासून अर्ध्या कोसावर ते असू . दिवसभराच्या प्रवासानंतर सैनिक दमले होते . आम्ही त्या ठिकाणी मुक्काम करायचं ठरवलं . सर्वांनी आपापले घोडे बांधून दिले व शेकोटी पेटवून त्या ठिकाणी बसले . मी माझ्या काही मित्रांबरोबर फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो . जेव्हा परत आलो तेव्हा मी जे दृश्य पाहिले ते फारच भयानक होतं..... महाराज आपले सर्व सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते . शेकोटीभोवती पंधरा माणसे बसली होती . ती माणसे विचित्र आवाजात काहीतरी ओरडत होती व आपल्या सैनिकांचे मांस खात होती.....।
हे ऐकल्यानंतर महाराज विक्रम मूर्खासारखे मोठमोठ्याने हसत सुटले . त्यांच्या हसण्याच्या आवाजाने संपुर्ण राज्यसभा भरून गेली . बऱ्याच वेळ हसल्यानंतर त्यांनी अद्वैत व त्याचा साथीदार मित्रांना पकडून तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला....
त्यावेळी सेनापती म्हणाले " महाराज अद्वैत हा विश्वासू तुकडी प्रमुख आहे . त्याला तुरुंगात टाकण्याचे कारण मला समजले नाही.....?
" अंबरीश एवढी साधी गोष्ट कळत नाही का....? अद्वैत व त्याचे साथीदार मित्र जेव्हा बाहेर गेले तेव्हा हल्ला झाला , याचा अर्थ काय होतो....? याचा अर्थ एकच होतो अंबरिष . तो म्हणजे अद्वैत व त्याचे मित्र हे शत्रूला मिळाले आहेत . त्यांनी शत्रूला त्यांचा ठावठिकाणा दिला व वेळही दिली . जेव्हा सैनिक बेसावध होते तेव्हा त्यांनी शत्रूला आपल्या सैन्यावर आक्रमण करू दिले . व स्वतः जाऊन लपून बसले . नंतर ही बनावट कथा आपल्याला सांगत आहेत.....
" महाराज मी बनावट कथा का सांगेन ....? मी माझ्यासाठी साथीदार सैनिकांचा , मित्रांचा असा सौदा करू शकत नाही . ते माझ्या तुकडीतील सैनिक नव्हते ते माझे बंधू होते . त्यांच्या जीवाशी खेळ मी कधीच करणार नाही....
अद्वैतला तुरुंगात जातोय , याचं दुःख वाटत नव्हतं . पण जो गुन्हा त्याने केला नव्हता , जो गुन्हा त्याच्या ध्यानीमनी नव्हता , त्या गुन्ह्याचे पातक त्याच्या माथी लावले जात होते . तो रडवेला झाला होता . त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते . ज्या राज्याच्या प्रति तो इतका विश्वासू व प्रामाणिक राहिला त्याच राजाने त्याच्या माथी देशद्रोहाचे इतके मोठे पातक लावावे हे त्याला सहन झाले नाही.......
" महाराज असे करू नका असे केले तर आपल्या सैन्याचे मनोबल खच्ची होईल.........."सेनापती शेवटची विनवणी करत म्हणाले
इतर मंत्र्यांनी सेनापतीच्या बोलण्याला दुजोरा दिला तेव्हा महाराज ओरडून म्हणाले
" मी या राज्याचा राजा आहे आणि मी आदेश दिला आहे या सैनिकांना आताच्या आता तुरुंगात टाका अन्यथा त्यांच्याबरोबर तुम्हालाही तुरुंगात जावे लागेल.......
सर्व गप्प झाले अद्वैत व त्याच्या साथीदारांना पकडून तुरुंगात नेण्यात आले.....
" अंबरीश अजून काही आहे का ....? आम्हाला आमच्या कक्षात जायची घाई आहे......
" महाराज विश्वकर्मा तुरुंगातून निसटला आहे......
या वाक्यावर ती महाराज विश्व महाराज विक्रम एकदम शांत झाले . त्यांचा चेहरा क्रोधाने पूर्ण भरून गेला . डोळे इतके मोठे झाले होते की ती बाहेर पडतील की काय असे वाटत होते . त्यांनी त्यांच्या हातातील सुवर्णपात्र अंबरीश यांच्यावर फेकून मारले.....
" तुम्ही सेनापती आहात आणि प्रधानजीही.... काय करत आहात तुम्ही .....? आपल्या सैन्याची एक तुकडी होत्याची नव्हती झाली . देशद्रोही विश्वकर्मा पळून गेला आणि तुम्ही आम्हाला तोंड वर करून सांगताय......?
" महाराज काल रात्रीपासून विश्वकर्मा च्या शोधात चारी दिशांना सैनिकांच्या तुकड्या गेलेल्या आहेत.....
" झालं , झालं ना , एवढच होताना ....? का अजून काही बातमी द्यायची आहे......? " महाराज विक्रम वैतागून आणि ओरडून बोलत होते
त्यावेळी परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे वृद्ध मंत्री उठून उभा राहिले. महाराजांच्या भितीमुळे ते वृद्ध मंत्री थरथरत होते . थरथरतच त्यांनी बोलायला सुरुवात केली....
" महाराज संसाधन समूहाच्या राज्यातून दूत आलेला आहे.....
पूर्वेकडे असलेली पाच राज्य ही संसाधन समुहाची राज्य म्हणून प्रसिद्ध होती .या पाच राज्यातून मिळणारी खनिज संपत्ती ही मौल्यवान होती . ती खनिज संपत्ती संपूर्ण पृथ्वीतलावर ती वापरली जात होती.....
" बोलवा त्याला पुढे , तो काय भेट घेऊन आला आहे काय आपल्यासाठी .....? महाराज म्हणाले
" नाही महाराज .....असं म्हणण्याचे त्या वृद्ध मंत्राचे धाडस झालं नाही . तो दूत एक पत्र घेऊन आला होता . महाराजांनी बोलल्यानंतर तो पत्र वाचू लागला.....

" प्रति रक्षक राज्याचे महाराज विक्रम यांस सप्रेम नमस्कार.......

महाराज संसाधन समूहाच्या पाच राज्यावर आक्रमण करून मातीतल्या लोकांनी राज्ये त्यांच्या ताब्यात घेतली आहेत . पाचही राजांना बंदी बनवून कारागृहात टाकले आहे . आम्हाला मदतीची पुकार करण्यासाठी हे पत्र लिहिण्याची संधी दिली आहे . परंपरेने चालत आलेल्या आपल्या सहयोगी राज्यांना आम्ही पत्र लिहीत आहोत . इतकी वर्षे आम्ही तुम्हाला खनिजसंपत्ती पुरवत आलो आहोत , आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे . ती भिंत पाडण्याची आज्ञा तुम्ही दिली आहे , भिंत पाडण्याच्या ऐवजी इकडे येऊन आमची राज्य आम्हाला प्राप्त करून द्यावीत . भिंत काय कोणीही पाडू शकतो . भिंत पाडण्यात कसले आले आहे मोठे राजेपण .... तुम्ही खरेच राजा व मर्द असाल तर संसाधन समूहातील पाचही राज्य त्या लोकांपासून सोडूवून आमच्या ताब्यात द्या......

त्या दुतांने पुढचं वाचायच्या अगोदरच महाराजांनी त्यांची तलवार घेत त्या दुताच्या जवळ जात , त्याचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केलं . संपूर्ण राज्यसभेत रक्ताचे शिंतोडे उडाले......

आयुष्मान व भरत या दोघांना मिळून बाराशे पन्नास व चैतन्य आणि कनिष्का या दोघांना मिळून बाराशे पन्नास असे चौघांना मिळून पंचवीसशे कोसाचं अंतर पार करायचं होतं . प्रत्येक पाव कोसांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये बी टाकत चौघेही निघाले होते . भरत व कनिष्क दक्षिणेकडे बरेच अंतर पार करून भरपूर पुढे गेले होते , कारण दक्षिणेकडे फार काही जंगले नव्हती . रस्ते होते . फक्त प्रवास करायचा होता . मात्र उत्तरेकडे रस्ते व्यवस्थित नव्हते . बऱ्याच वेळा घोड्यावरुन उतरून पायी चालत जावं लागायचं . त्यामुळे आयुष्मान व भरत यांची चाल जरा मंद होती . त्यांनी आतापर्यंत फक्त दीडशे कोसाचं अंतर पार केलं होतं . एवढे अंतर पार केलं पण त्यांना एकही मनुष्याची वस्ती दिसले नाही , किंवा एकही जंगली प्राणी त्यांच्या वाटेत आला नाही . आकाशात उंचावर ती उडणारा एक गरुड मात्र त्यांना दिसला होता....

" आयुष्यमान तुला जर वाटत होतं , तर तू तिला बरोबर घेऊ शकला असता . तसेही सभेचा प्रमुख होता तू , तू घेतलेल्या निर्णयाला कोणी विरोध केला नसता . आपण कोणाला सांगितलंही नसतं....
जेव्हा पासून ते तिला मागे सोडून आले होते तेव्हापासून आयुष्यमान गप्प गप्पच होता . त्यामुळे भरत आयुष्यमान ला म्हणाला....
" भरत्या मी कुणाला सांगितलं नाही , पण मला ती खूप आवडते . आतापर्यंत मी इतका फिरलो. इतक्या स्त्रिया बघितल्या . तिच्या होऊनही कैक पटीने सुंदर , रूपवती पण माझं मन कधीच मोहित झालं नाही.....
" मग काय आता पुढचा वारसदार निवडून संसार थाटायचा विचार दिसतोय.....?
" नाही भरत्या , अरे हा काळ फार विचित्र आहे . महाराज विक्रमने भिंत पाडण्याचे आज्ञा दिली आहे . त्याबरोबर सर्वत्र कोलाहल माजलेला आहे . भिंत पडल्यानंतर काय होईल काही सांगता येत नाही . आणखी बऱ्याच गोष्टी आहेत . त्यामुळे याच वेळेला जर मी वारसदारांच्या सभेचा त्याग केला तर ते योग्य ठरणार नाही.....
" तेही आहेच म्हणा आणि अचानक ओरडला
" अरे तो बघ ....केवढा मोठा रेडा आहे तो..... " भरत एका मोठ्या रेड्या कडे बोट करत म्हणाला . तो खरच खूप मोठा , काळा रेडा होता . साधारणपणे अडीच तीन हात लांब आणि तेवढ्याच उंच . वजनात कमीत कमी पाच ते सहा मणाचा (१मण=१६०किलो)तर नक्की असेल.....

" अरे भरत्या त्यावरती कुणीतरी बसल्यासारखं वाटतंय बघ......
रेडा संथ गतीने चालला होता त्या . रेड्या वरती टाकलेल्या कापडाच्या झोळीत एक लहान मुल , व रेड्यावरती एक माणूस बेशुद्ध पडल्यासारखा वाटत होता . दोघांनी आपल्या घोड्याची गती वाढवली . रेड्याच्या बाजूला गेले . त्यांनी त्याला थांबवलं . वरती बसलेल्या माणसाला त्यांनी खाली उतरवले . ते त्या झोळीतील मुलाला उतरून काढणार होते पण जंगलातून सिंहाची गर्जना ऐकू आली .गर्जना ऐकल्यानंतर तो रेडा जरा हालचाल करू लागला . भरताने त्याची येसन (येसन म्हणजे रेड्याच्या नाकातून आरपार काढलेले दावे ) धरत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , पण आता सिंहाची गर्जना फार जवळून येत होती. तो रेडा भारताच्या हातून सुटून पळाला. तो रेडा वेड्यावाकड्या उड्या मारत फिरत होता . त्याच्यावरच असलेली झोळीही हलत होती . ती झोळी कोणत्याही क्षणी खाली पडू शकत होती व त्यातील मुलाला मार बसून ते मुल दगावण्याची होण्याची शक्यता होती . इकडे सिंह गर्जना करत आयुष्यमान च्या अंगावर धावून येत होता . " भरत्या तु जा आणि त्या झोळीतील मुलाला कसेही करून वाचवा , मी या माणसाकडे बघतो ...........
त्याच वेळी रेड्याने उंच उडी मारली , त्याच्यावर असलेली झोळी उंच उडाली आणि खाली दगडावर आपटणारच होती तेव्हाच इकडे सिंहाने आयुष्यमान वरती धाव घेतली........
पुन्हा एकदा तो सिंह आणि रेडा जागीच स्तब्ध झाले . उंच उडालेली झोळी गरुडाने त्याच्या चोचीत पकडून व्यवस्थितपणे खाली ठेवली .........

जलधि राज्याच्या युद्ध कक्षात भरलेल्या तात्काळ बैठकीचा निर्णय झाला होता . बाटी जमातीच्या लोकांना जलधी राज्यात आश्रय दिला जाणार होता . त्या लोकांनी सैनिकांना फक्त त्या विशिष्ट प्रकारच्या बासर्‍या कशा बनवायच्या व ती धून कशी वाजवायची हे शिकवायचे होते . त्याचबरोबर कसेही करून महाराज विक्रमांना ती भिंत पाडण्यापासून थांबवायचे असाही निर्णय झाला होता . बैठक संपल्याची घोषणा झाली होती पण हेर पथकाचा प्रमुख कौशिक म्हणाला.....
" महाराज अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो , ती म्हणजे काल आपल्या संशोधन शाळेत झालेला हल्ला मारुत राजाच्या आज्ञेवरून झाला होता .....
मारूत राजाचे नाव ऐकल्यानंतर कैरव महाराजांच्या कपाळावर आठ्या पडल्या ....
" इतक्या वर्षात मारूत राजांची खबरबात नव्हती अचानक हे कसे उद्भवले .......
" ज्या व्यक्तीने हल्ला केला होता , तो मनुष्य अजूनही फरार आहे . त्याला शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत . तू सापडल्यानंतर आपल्याला याबाबत अजून माहिती कळू शकेल . पण आता अशाप्रकारचे हल्ले होणार नाहीत असं आपण म्हणू शकत नाही , आपल्याला आपली सुरक्षा वाढवावी लागेल..........

" व्यतयाबद्दल क्षमस्व , पण रक्षक राज्याचे प्रधान विश्वकर्मा , राजकुमारी अन्वी आणि राजकुमार देवव्रत जलधि राज्याच्या सीमेत आलेले आहेत..... पुढच्या काही तासाच ते राजमहली असतील.....
कौशिका चा विश्वासू हेर भार्गव आत येत बोलला....
प्रलय-०९

संसाधन राज्ये . पृथ्वीतलावरती सर्वात मोठ्या प्रमाणात खनिजाचा साठा असलेली ही पाच राज्ये एकमेकाला लागून मोठ्या प्रदेशावर पसरलेली होती . सुवर्ण नगर हे सोन्यासाठी प्रसिद्ध होत . लोहगड हे राज्य लोह नि त्यासदृश्य धातूंसाठी व रत्न पंचक हे राज्य रत्नासाठी प्रसिद्ध होते . अग्नी व ज्वाला ही राज्ये खनिज तेल व कोळशासारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध होती..........
पृथ्वीतलावरील इतर भागातही खनिज संपत्ती विपुल प्रमाणात सापडत होती . पण ज्या त्या राज्यात सापडणाऱ्या साधनसंपत्तीवर ज्या त्या राज्याचा अधिकार होता . पण या पाच राज्यातील संपत्तीवरती संपूर्ण पृथ्वीतलाचा अधिकार होता . प्रत्येक राज्याचा हिस्सा ज्या त्या राज्याला पुरवला जाई . प्रत्येक राज्याची त्याठिकाणी भागीदारी होती . प्रत्येक राज्यातील सैनिकांची तुकडी त्या ठिकाणी उपस्थित होती . प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होता . सर्व राज्यांनी मिळून त्या ठिकाणी असलेली मूळ रहिवाशांना ही संपत्ती खाणायचा रोजगार दिला होता . त्याबदल्यात त्यांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पुरवल्या जात होत्या . ज्या त्या स्वतः पुरूवू शकत नव्हते . तेथील मूळ रहिवाशांना मातीतले लोक असं म्हटलं जाई .

पण हे सगळं विद्यार्थीदशेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी होतं . त्या पाच राज्यात मात्र उलटाच कारभार चालत होता . जोपर्यंत त्या ठिकाणी कोणीही बाहेरचा माणूस गेला नव्हता तोपर्यंत तेथील जमात सुखाने त्यांचे त्यांचे जीवन जगत होती . तेथील मूळ रहिवाशांचे जीवन शिकारीवरती असायचं . त्यांना शेती माहीत नव्हती व ते टोळ्याटोळ्यांनी नेहमी फिरत राहायचे. जेव्हा हे लोक त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन त्या सर्वांना शस्त्रांच्या जोरावर खान काम करायला भाग पाडलं . सर्वांना जुलूम जबरदस्ती ने कामाला लावले . कितीतरी शतके ही गुलामगिरीत चालू होती . त्याला कोणी विरोध केला नव्हता . सर्व राज्यांनी त्याला मूक संमती दिली होती . वेळोवेळी मूळ रहिवासी या साऱ्याला विरोध करत होते . उठाव करत होते पण त्यांचा उठाव यशस्वी झाला नव्हता . या साऱ्यांमध्ये हाल होते तेथील सामान्य जनतेचे . तेथील मूळ रहिवाशांचे म्हणजेच मातीतल्या लोकांचे . मातीतल्या लोकांची संख्या कमी नव्हती . पण ती मागासलेली असल्यामुळे त्यांच्यावरती या सर्व राज्यांनी मिळून गुलामगिरी लादली होती . त्यांना दररोज खाणीत काम करावे लागे . अकरा वर्षाच्या मुलापासून मरेपर्यंत प्रत्येकाला काम करावे लागे . ज्याला कोणालाही काम होत नसे त्याला एक तर मरावं लागे किंवा आपण दुसऱ्या कोणत्यातरी कामाच्या लायक आहोत हे दाखवून द्यावं लागे . हे सर्व चालू असताना सर्व राजे चूप होते . पण अकराव्या महाराज कैरवांनी , म्हणजे आता राज्य करत असलेल्या कैरव महाराजांनी , त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष या गुलामांना मूलभूत अधिकार मिळावेत यासाठी घालवली होती . आज त्यांच्या कृपेमुळेच मातीतल्या लोकांचे कामाचे तास कमी झाले होते . वृद्धांना काम करण्याची गरज नव्हती . लहान मुलांना खेळण्याची परवानगी होते . विश्रांती , अन्न-वस्त्र-निवारा व इतर बऱ्याच सुविधा त्यांच्यामुळे मिळाल्या होत्या . मातीतल्या लोकांना त्यांचे सण-उत्सव साजरे करायची परवानगी नव्हती , पण कैरव महाराजांनी त्यांना तीही उपलब्ध करून दिली . इतर राज्यांनी मात्र कैरवांना याबाबतीत वेड्यात काढलं होतं . या सर्वांच्या बदल्यात कैरव महाराज आपल्यातील खनिज संपत्तीचा बराच भाग इतर राज्यांना देत होते . पण तरीही ती गुलामगिरी होती . कैरवांनी कधीच गुलामगिरीची भलावण केली नाही , पण संपूर्ण जगाच्या विरोधात ते जाऊ शकत नव्हते . त्यामुळे बळजबरीने का असेना त्यांनी या व्यवस्थेला मान्यता दिली होती .

या पाच राज्यांसाठी सर्व राज्यांनी मिळून पाच राजे नेमले होते . ते पाच राजे या ठिकाणी राज्य करत होते व ज्याची त्याची खनिज संपत्ती ज्याच्या त्याच्या कडे पोच करत होते. हे पाच राजे सुरुवातीला निवडले गेले होते पुढे पिढ्यानपिढ्या तीच पाच राजघराणी चालत आली होती. या पाच राज्यांची राजसत्ता या संसाधन राज्यावरती होती . या पाच राजांकडे स्वतःचं असं सैन्य नव्हतं. इतर सर्व राज्यांच्या सैन्य व इतर पाठबळ या राज्यांना होतं . त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे गुलामांना वरती नियंत्रण ठेवायचं त्यांच्याकडून खनिज संपत्ती काढून घ्यायची व जिकडेतिकडे पोच करायची .

पण संसाधन राज्यात आता मातीतल्या लोकांची सत्ता होती . मातीतल्या लोकांनी पाच राजांना तुरुंगात टाकले होते . मातीतल्या लोकांनी आपला राजा पाच राज्यांच्यासाठी निवडला होता . त्या राजाच्या नेतृत्वाखाली सर्व मातीतल्या लोकांनी मिळून उठाव केला . सर्व सैनिकी तुकड्या , राजे यांना तुरुंगात बंदी बनवून पाच राज्यांचा कारभार त्यांच्या स्वतःच्या हाती घेतला . सर्व जगाला कळावं म्हणून त्या पाच राजांना मदतीसाठी पत्र पाठवण्याची व्यवस्था करून दिली होती . तेच पत्र घेऊन दूत सर्व राज्यांमध्ये गेला होता .

रक्षक राज्यात आलेला दूत मृत्युमुखी पडला होता महाराज विक्रमांनी सर्वांना आदेश दिला .
" आपल्या राज्यातील सर्व सैन्य गोळा करा जे सैनिक सुट्टीवर ती असतील त्यांनाही बोलून घ्या , सर्व सैन्यांना गोळा करून काळ्या विहिरीपाशी जमा......
जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर . आता काळी भिंत पाडल्या वाचून पर्याय नाही . हे सर्व शत्रू व दहशतवादी तिकडुनच येत आहेत . काळी भिंत पाडून आपण त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांना जिंकून घेऊ . नंतर संसाधन राज्यांकडे जाऊन तीही आपल्या ताब्यात घेऊ . सर्व सैनिक गोळा होऊन काळ्या विहिरीपाशी जमा हा आपला युद्ध काळ आहे... साऱ्या जगाला कळले पाहिजे रक्षक राज्याने जेव्हा रक्षण सोडून आक्रमण केलं त्यावेळी संपूर्ण जग त्याच्या पायापाशी झुकलं.......
ज्यांनी ज्यांनी आपला अपमान केला होता त्या साऱ्यांचा प्रतिशोध घेण्याची वेळ आली आहे..... .....

आणखी बऱ्याच गोष्टींवरती महाराज विक्रमांनी भाषण केलं . या भाषणानंतर मात्र त्यांचा प्रभाव चांगला पडला . सर्व राज्यांमध्ये एक नवा हुरूप साकारला . जो तो लढाईच्या गोष्टी करू लागला , अपमानाचा प्रतिशोध , देशद्रोह्यांना शिक्षा , राष्ट्रभक्ती , देशभक्ती या वरती जो तो बोलू लागला.....

या राष्ट्रवादाच्या उन्मादात सारेजण काळी भिंत व तिची आख्यायिका विसरून गेले . ती पाडल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा साऱ्यांना विसर पडला . राष्ट्रभक्तीचा ताप इतका चढला होता की खऱ्या समस्यांचा साऱ्यांना विसर पडला होता . काळ्या विहिरीच्या परिसराला सैनिक छावणीचे रूप आलं होतं . पण सगळेच सैनिक त्या ठिकाणी नव्हते . काहीजणांचं डोकं ठिकाणावर होतं . ते डोकं ठिकाणावर असलेल्या सैनिकांपैकी अधिरत होता .

सरोज जोपर्यंत माघारी परतून आली होती तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या . तिचा महालाची अवस्था झाली होती . जागोजागी झटपटीची चिन्हे दिसत होती . आधिरथही सुटून गेला होता . तिची एकही मैत्रीण तिला दिसत नव्हते. तिने काढायचा तो अर्थ काढला . तिला वाटलं अधिरथ सुटून गेला , नंतर सर्व सैनिकांना आणून त्याने तिच्या मैत्रिणींना बंदी बनवून दिले असावे...... ज्या मैत्रिणीसाठी ती भिल्लवाला सोडून आली होती , त्याच मैत्रिणींना बंदी बनवलं तर तिला या ठिकाणी राहून काहीच उपयोग नव्हता ती बाहेर पडायला निघाली . त्याचवेळी मागून आवाज आला...

" तुझ्या मैत्रिणींना तू सोडणार नाहीस का ...? हीच का तुझी मैत्री.....
तो अधीरताचा आवाज होता . ती लढण्याच्या सावध पवित्र्यात आली....
" तू मैत्रीबद्दल बोलू नको . भिल्लव तुझा मित्र नव्हता तर काय.....? त्याच्यावरती तलवार घेऊन धावून आला होतास....
" त्यावेळी माझे डोळे झाकले होते . मला खरच वाटलं होतं तो देशद्रोही आहे , पण आता महाराजांनी जे काही चालवलेलं आहे , ते पाहून मला भिल्लवाच म्हणंण योग्य वाटतय , त्यासाठीच मला तुझी मदत पाहिजे.....

सरोज वैतागली , चिडुन बोलली , " एक तर माझ्या मैत्रिणींना तू बंदी बनवलं , आणि वरून माझीच मदत मागतोय तुला लाज कशी वाटत नाही.......

" तुला खरंच वाटतं काय मी निष्पाप मुलींना बंदी बनवून तुरुंगात टाकीन . मी त्यांना व्यवस्थित नगराबाहेर सोडलेलं आहे आणि हे मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नको ......

त्याने अजून कोणाला तरी बाहेर बोलावलं . ती शालीनी होती . तिने सरोजला सांगितलं कि अधिरतने त्यांच्या सर्व मैत्रिणींना नगराबाहेर व्यवस्थित पोच करून , तिची वाट पाहतो येथे थांबला होता........

" माझ्याकडून कसली मदत हवी आहे तुला.....
" आपल्याला काही कैद्यांना सोडवायचा आहे तुरुंगातून ......
" पुन्हा त्या तुरुंगात जाणार नाही मी , मागच्या वेळेस कशीतरी वाचले.....
" तू भिल्लावाला बरोबर गेली होतीस . मला तो भुयारी रस्ता माहित नाही , म्हणून मी तुझी मदत मागत आहे.... आणि तुरुंगात आहे ते माझे खास मित्र आहेत . अद्वैत आणि त्याचे साथीदार . त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत ज्या भिल्लवाला ही माहित असायला पाहिजेत..... तू त्यांना सोडवायला माझी मदत कर मी तुला भिल्लवापर्यंत पोहोचायला मदत करीन......
सरोजला आता नगरात राहण्याचे काही प्रयोजन नव्हते . तिच्या सर्व मैत्रिणी सुखरूप होत्या . तिला आता भिल्लावा बरोबर जायचे होते . त्यामुळे अधिरताला मदत करायला तयार झाली . दोघांनी अद्वैत व त्याच्या मित्रांना सोडवायची जबाबदारी घेतली.....

तो सिंह आणि तो रेडा दोघेही जागेला स्तब्ध झाले होते . आकाशातून आलेल्या गरुडाने त्या लहान मुलाला व्यवस्थितपणे खाली ठेवलं होतं , आणि तेव्हाच मागून घोडा येत असल्याचा आवाज आला . त्या घोड्यावर तीच होती जिला त्यांनी माघारी पाठवलं होतं . ती कधी माघारी गेलीच नव्हती , त्यांच्यामागून येत होती , इतक्या गुपचूपपणे की त्या दोघांनाही समजले नव्हते .....

घोड्यावरून उतरला ती म्हणाली
" म्हणून मी म्हणत होते , मला बरोबर येऊ द्या . माझी गरज आहे तुम्हाला . तुमचा प्रवास सुखाचा झाला असता.....
आयुष्यमानला तिला पाहून खरंतर आनंद झाला होता . पण कुठे तरी त्याचा पुरुषी स्वाभिमान दुखावला गेला होता . तो हे सर्व काही करू शकत होता , किंवा नव्हता . तरीही एका स्त्रीने येऊन त्याला मदत करावी व शब्द सुनाववे हे त्याच्या पुरुषी मनाला न पटणारे होता.....

तो तिच्यावर ती ओरडत म्हणाला

" तू इथं काय करतेस .....? आम्ही तुला माघारी जायला सांगितलं होतं . तू आमच्या मागे मागे येऊन नकोस . आम्ही आमची काळजी घ्यायला समर्थ आहोत . तू तुझी शक्ती तुझ्यापाशी ठेव . आम्हाला त्याची गरज नाही . आम्ही वारसदार आहोत आणि आम्ही आमचं कार्य कोणत्याही शक्ती विना करू शकतो......
तो हे सर्व खूप मोठ्या आवाजात एका दमात बोलून गेला . पण दुसर्‍या क्षणी त्याला वाटलं की हे सर्व ऐकून तिला वाईट वाटेल , म्हणून झालेली चूक सावरत काळजीच्या सुरात तिला म्हणाला....
" मला तुझं नाव नाही माहित नाही . पण जेव्हा पासून मी तुला पाहिले तेव्हा पासून तु मला मोहित करून घेतले आहेस . आतापर्यंत मी कितीतरी रूपवती पाहिल्या पण मी त्यांच्यावर ती कधीच मोहित झालो नाही . कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात एखादिने मला मोहित करावे आणि मी तिला गमावून बसावे हे मला आवडणार नाही . म्हणून तू घरी जा , जेव्हा मी माघारी परतून येईल व ही सर्व ठीक होईल तेव्हा आपण सुखाने राहू......
" मोहिनी माझं नाव मोहिनी आहे . आणि मी तुला मोहित केलं नाही , तर तू मला मोहित केला आहे . बाबा बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी बोलत असतात , पण मी सर्व गोष्टी ऐकून कुठेही धावत फिरत नाही . बाबांनी जेव्हा तुझ्याबद्दल बोललं , त्यावेळी मला राहवले नाही म्हणून मी तुझ्या मागे आले . मला वाटलं तुला सांगून कार्यापासून परावृत्त करावे , मलाही तुला गमवायचं नव्हतं . त्याचासाठीच हा अट्टहास होता . पण तु मला बरोबर येऊ दिलं नाही व माघारी पाठवले . पण मी तुला सोडू शकत नव्हते . माझं कर्तव्य होतं म्हणून मी तुझ्या मागे मागे येत राहिले......
एवढं बोलल्यानंतर मोहिन्याच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले . ती रडू लागली . आयुष्मानने जवळ जात तिला त्याच्या मिठीत घेतले......
बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते . एकमेकांना अनुभवत होते .
" अरे त्या रेड्याला आणि त्या सिंहाला मोकळं करा... किती वेळ झालं ते तिथेच स्तब्ध आहेत....?
भरत्या म्हणाला . भरत्याचा आवाज ऐकून मोहिनी आयुष्यमानच्या मिठीतून बाजूला झाली . तिने काही क्षण डोळे झाकून उघडले , त्यावेळी तो सिंह निघून गेला . रेडा शांत होऊन त्या ठिकाणी उभारला . भरताने जाऊन ते लहान मूल उचलून आणले . तोपर्यंत तो माणूसही शुद्धीवर आला होता...
प्रलय-१०

आज जलधि राज्याची राज्य सभा भरली होती . महाराज विक्रम , त्यांची काळी भिंत पाडण्याची आज्ञा , अंधभक्त , या साऱ्यांवर ती आज निर्णय होणार होता . राज्यसभेत सर्व मंत्रीगण , राज्यातील काही प्रतिष्ठित लोक , महाराज विश्वकर्मा म्हणजे रक्षक राज्याचे प्रधान , त्यांची मुलगी अन्वी , युवराज देवव्रत असे सर्व जण जमले होते .

प्रधानजी जलधि राज्यात पोहोचल्यानंतर कळालेल्या गोष्टींमुळे फारच आश्चर्य चकीत झाले . अंधभक्तांची गोष्ट त्यांना भयकारक वाटली . अंधभक्तांना काळी भिंत अडवू शकत नाही म्हटल्या नंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला . संशोधन शाळेत झालेला किस्सा व त्यामागे असलेला मारूत राजाचा हात ऐकून त्यांना असुरक्षिततेची भावना दाटून आली , जी त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती .

राज्यसभेत महाराज कैरव बोलत होते....
" काल बोलावलेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते म्हणजे कसेही करून काळी भिंत पाण्यापासून महाराज विक्रमांना थांबवायचं व दुसरे म्हणजे बाटी जमातीतील लोकांकडून बासरी बनवून ती धून वाजवायची शिकून घ्यायची.........
दुसऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे पण पहिला निर्णय कसा अमलात आणावा याबाबत मुख्यत्वे ही राजसभा बोलावलेली आहे . जलधि राज्याने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आज जलधिराज्य या समृद्धीच्या स्थितीला पोहोचले आहे . पण आज आपल्याला एक निर्णय घ्यावा लागणार आहे , तो म्हणजे महाराज विक्रमांना काळी भिंत पडण्यापासून थांबवण्याचा........ आत्ताच कळालेल्या बातमीनुसार महाराज विक्रमांनी त्यांची सर्व सैना काळ्या विहिरीपाशी जमा केली असून ते स्वतः त्या ठिकाणी निघालेले आहेत . त्यामुळे भिंत पाडण्याचा त्यांचा निर्धार पक्का दिसत आहे . जर आपण भिंत पडण्यापासून त्यांना थांबवलं नाही तर अनर्थ होईल . ज्या काही भिंती बाबतच्या गोष्टी आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत त्या खऱ्या असो की खोट्या . एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे आतापर्यंत इतकी वर्षे कुणाचीही ती भिंत पाडण्याची हिम्मत झाली नाही . आपले राज महर्षी सोमदत्त यांनीही याबाबत एक विचार करण्यायोग्य सल्ला दिलेला आहे , त्यामुळे कसेही करून आपल्याला महाराज विक्रमांना ती भिंत पडण्यापासून रोखायलाच हवं......
त्यांना थांबवण्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे रक्षक राज्य बरोबर युद्ध.......।

महाराज कौरवांच्या या वाक्याबरोबर संपूर्ण राज्यसभेत कुजबुज वाढली . पुन्हा एकदा लोक रक्षक राज्य ताब्यात घेण्याच्या घोषणा देऊ लागले . त्यानंतर महाराज कैरव काही क्षण थांबले व बोलू लागले......
" मी जलधी राज्याचा अकरावा सम्राट , रक्षक राज्याचा राजा विक्रम याच्या विरोधात युद्ध घोषित करत आहे . आपले युद्ध हे कुणा व्यक्ती , कुठले राज्य व कुणा राज्यातील जनतेच्या विरुद्ध नाही , तर त्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आहे . जेवढं शक्य होईल तेवढी प्राणहानी टाळत आपल्याला फक्त आपला हेतू साध्य करायचा आहे . तो म्हणजे राजा विक्रमाला कसेही करून ती भिंत पाण्यापासून थांबवायचे........

" मी आदेश देतो की आपले सैन्य गोळा करा , जे सैनिक सुट्टीवर आहेत , त्यांना बोलून घ्या . सर्व सैनिकांना गोळा करून आपण ताबडतोब रक्षक राज्यातील काळ्या विहिरीकडे कूच करणार आहोत.....।

महाराजांच्या ह्या गोष्टीनंतर राज्यसभेत एकच गोंधळ उडाला . जो तो महाराजांचा जयजयकार करत होता .
जलधी राज्याचा जयजयकार करत होता .

सर्वांना शांत करत महाराज बोलले
" आपला हेतू आहे महाराज विक्रमांना ती भिंत पडण्यापासून थांबवायचा ,.त्यासाठी महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून काढून आपल्याला महाराज विश्वकर्माना रक्षक राज्याचे महाराज बनवावे लागेल..।।।
जे आज आपल्यात याठिकाणी उपस्थित आहेत....।

मग महाराज कैरवांबरोबर , महाराज विश्वकर्मा यांच्या नावाचा जयजयकार सुरु झाला व जयजयकार करत करत राज्यसभा संपली......

महाराज विक्रम भल्या मोठ्या रथामध्ये काळ्या विहिरीकडे निघाले होते . त्यांचा हा रथ ओढण्यासाठी अकरा घोडे होते . तो रथ एखाद्या बंद आलिशान खोली सारखा होता . त्या खोलीमध्ये महाराज विक्रमांसाठी सर्व प्रकारची व्यवस्था होती . त्या बंदिस्त चालत्या फिरत्या एका खोलीच्या राज महालातून महाराज विक्रम राजधानी कडून काळ्या विहीरीकडे कुच करत होते . त्यांच्या बरोबर पाच हजार सैनिकांचा फौजफाटा होता . अडीच हजार सैनिक पुढे अडीच हजार मागे व मध्ये महाराज विक्रमांचा रथ होता . हे पाच हजार घोडेस्वार सैनिक युद्धात निपून होते . काळ्या विहिरीपाशी अजून पाच हजाराच्या आसपास सैनिक जमले होते । एकूण मिळून दहा हजाराची सैना काळी भिंत पाडण्यासाठी एकवटली होती . काळी भिंत आता पडणारच होती आणि आपल्या बरोबर अंधारच घेऊन येणार होती..........

महाराज विक्रम सगळा फौजफाटा फाटा घेऊन काळ्या विहिरीकडे गेल्याने , राजमहालावरती फारसे सैनिक नव्हते . जे काही होते त्यांच्यापासून लपून छपून , एखाद-दुसरा सैनिक आला तर त्याचा काटा काढून , अधिरथ व सरोज या दोघांनी मिळून अद्वैत व त्याच्या साथीदारांना सोडवले . नंतर ते सगळे उत्तरेकडील जंगलाकडे निघाले . त्याच जंगलाकडे ज्या जंगलात महाराणी शकुंतला व महाराज सत्यवर्मा राहत होते , ज्या जंगलात महाराणी शकुंतलेला काही लोकांनी बेशुद्ध करून पळवलं होतं . त्याच जंगलाकडे ज्या जंगलाकडे भिल्लव , सार्थक आणि त्याचे साथीदार निघाले होते.......

दूर कुठेतरी , कोणत्या तरी राज्यात , एका अंधाऱ्या जागी , अंधाऱ्या खोलीत , अंधारऱ्या सिंहासनावर ती राजा मारुत बसला होता . त्याचं घडणाऱ्या सर्व घडामोडींवर ती लक्ष होतं व कोणत्या चाली चलायच्या याचा तो विचार करत होता....
प्रलय-११

कितीतरी शतके अगोदर , काळी भिंत सुद्धा बांधण्याच्या अगोदर , संपूर्ण पृथ्वीवरती फक्त एकच राजा राज्य करत होता . संपूर्ण पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदत होती . पृथ्वीवरचा तो पहिला राजा होता ज्या राजानं देवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवरती आपले आधिपत्य आणून सगळीकडे सुख शांती व समृद्धी पसरवली होती....

असं म्हणतात राजा साक्षात ईश्वर होता आणि राणी साक्षात देवी . त्या राणीकडून राजाला तिळं झालं . एकाच वेळी तीन राजपुत्र राजमहालात रांगू लागले .
एकाचं नाव होतं कैरव , दुसऱ्याचं सोचिकेशा आणि तिसऱ्याच मारुत .तिन्ही राजपुत्र एकत्र शिकू लागले . सर्व काही समजून घेऊ लागले , युद्ध कलेपासून नीतिशास्त्र पर्यंत सर्व काही त्यांना शिकवले जात होतं . तिन्ही राजपुत्र एकमेकांना वरचढ होते..... अशी वेळ आली की तिन्ही राजपुत्रांनी पृथ्वीतलावरच्या असलेल्या सर्व प्रकारच्या युद्धकला निपुण केल्या . नीतिशास्त्राचे धडे त्यांना मुखोद्गत झाले . आता वेळ होती त्यांच्या विवाहाची त्यांच्यासाठी सर्वत्र राण्यांचा शोध सुरू झाला ज्याला त्याला योग्य ती राणी सापडली व तिघांचाही एकाच वेळी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला . असं म्हणतात ज्यावेळी तीन राजांचा विवाह सोहळा होता , त्यावेळी संपूर्ण पृथ्वीतलास पुरेल इतकं इतकं अन्न त्याठिकाणी बनलं होतं....

पण जेव्हा राजा वृद्ध होऊ लागला त्यावेळी वारसदार निवडायची वेळ आली . तेव्हा इतक्या दिवस गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या तीन राजपुतांमध्ये वादावादी होते की काय असे साऱ्यांना वाटत होतं . पण त्या वृद्ध राजाने आपल्या राज्याचे तीन विभाग करून तीन राजपुत्रांना त्यांचे त्यांचे राज्य सोपवले व उत्तरे च्या जंगलात निघून गेला.......

तेव्हापासून या पृथ्वीला त्रिखंडी पृथ्वी असं म्हणायचा प्रघात पडला . एका खंडावर मारुत राज्यांचं मारुती हे राज्य दुसऱ्या खंडावर ती सोचिकेशा राजांचं अग्नेय हे राज्य आणि तिसरं कैरवांच जलधि हे राज्य......

पुढची कैक शतके या तीन राजांच्या पिढ्यान् पिढ्याया संपूर्ण पृथ्वीतलावर , त्रिखंडी पृथ्वीवरती राज्य करत होत्या. मात्र जशा पिढ्या पुढे सरकत होत्या तसे राजे अधिक अधिक विलासि बनत गेले . ते नेहमी राजमहालात असायचे , बाहेर निघाले तर फक्त शिकारीला किंवा पर्यटनासाठी निघायचे . त्यांना प्रजेची मुळीच चिंता नसायची . आपल्या ऐषो-आरामासाठी प्रजेची पिळवणूक करायलाही मागे-पुढे बघायचे नाहीत . त्यामुळे राज्यातील प्रजा या राजांच्या विरोधात उभी राहू लागली . याला अपवाद होता तो म्हणजे जलधि राज्याचे कैरव राजे , त्यांनी कधीच प्रजेला उघडे पडू दिले नाही . दुष्काळ असो वा सुकाळ असो , वर्षा होवो अथवा न होवो त्यांनी नेहमी प्रजेची काळजी घेतली . त्यामुळे जलधि राज्याने सुख-समृद्धी च्या सर्व रेखा पार केल्या . उलट मारुत व अग्नेय राज्यांमध्ये गरिबी , भुक , बेरोजगारी , यासारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या . जनता संतापली होती . त्यामुळे वेळोवेळी जनतेतून उठाव होऊ लागले .

नेहमी चालणाऱ्या अशा उठावातून मारुत व अग्नेय राज्यातून फुटून , छोटी-छोटी राज्य बनू लागली . मारूत व अग्नेय राज्यांचे विघटन झाले व त्यातून अनेक राज्य बनली पण जेव्हा विघटन झाले त्याच वेळी मारुत व अग्नेय या वंशांचाही निर्वंश झाला . क्रांतिकारी गटांनी सर्व राजवंशी लोकांना शोधून शोधून मारले . तेच क्रांतिकारी गट नवीन राजे झाले व पुढे त्यांच्याच पिढ्यानपिढ्या त्या राजसत्ता उपभोगू लागल्या.....

पण या साऱ्यातून मारुत राजाचे काही वंशज जिवंत होते . त्यांनी पृथ्वीतलावर असलेल्या एका गुप्त ठिकाणी आसरा घेतला होता . कित्येक पिढ्या ते त्याच ठिकाणी लपून होते . त्यांनी जगाला आपल्या अस्तित्वाची चाहूल लागू दिली नव्हती . मात्र त्यांना जगाच्या अस्तित्वाची चाहूल होती . त्यांच्या मनात संपूर्ण जगाची सत्ता घ्यायची महत्त्वाकांक्षा होती . अजूनही ते सत्तेसाठी सत्ताकारण करायला विसरले नव्हते . नवीन जन्मलेल्या मारुताला सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवल्या जात होत्या . सर्व प्रकारची शस्त्रांची शिकवणी त्याला दिली जात होती . मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण युद्धकलेत निपुण होता .

मारूत परिवारांचा एक छोटंसं गाव वसलेलं होतं . त्या गावाचा सर्व कारभार अकरावा मारुत राजा पाहत होता . सध्या तो अंथरुणाला खिळून होता . पुढचा वारस निवडून त्याच्याकडे सर्व सूत्रे द्यायची ती वेळ होती . राजाच्या शेजारी त्याचे सर्व पुत्र बसले होते . आजूबाजूला प्रमुख लोक उभे होते . एका बाजूला पत्नी व मुलगी आरूषी उभी होती. लहान आवाजात थांबत थांबत राजा बोलत होता....
" हीच ती वेळ आहे . मूर्ख विक्रमाने भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे . मातीतल्या लोकांनी संसाधन राज्ये ताब्यात घेतली आहेत . भिंत पडल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजेल . हीच ती वेळ आहे . पुन्हा पृथ्वीवरती मारूतांची सत्ता प्रस्थापित करण्याची . आपल्या पूर्वजांचा प्रतिशोध घेण्याची . "
आरुषीला जवळ बोलून तिचा हात हातात घेत राजा म्हणाला
" आरुषी तू आता सर्व मारूतांचे नेतृत्व करशील . आपल्या पूर्वजांचा प्रतिशोध घेशील . आपल्या पूर्वजांना ज्यांनी मारले , आपल्या राजस्त्रियांचा ज्यांनी बलात्कार केला , आपल्या लहान मुलांच्या ज्यांनी कत्तली केल्या त्या सर्वांच्या वंशजांना नरकयातना देऊन मृत्यू दारी पोहोचवायचं आहे तुला...... त्या सर्वांच्या पिढ्यांचा निर्वंश तुला करायचा आहे . आणि आपले बंधू राजे कैरव यांनाही सोडू नकोस . ज्यावेळी आपला निर्वंश होत होता त्यावेळी षंढासारखे हे गप्प बसले . त्यांचाही प्रतिशोध घ्यायचा आहे तुला...... त्या सार्‍या लोकांना नरकयातना द्यायच्या , जे लोक एकेकाळी मारुताच्या निर्वंशसाठी , अपमानासाठी कारणीभूत ठरले.......

आणि आरुषीच्या हातात हात असताना अकराव्या मारुत महाराज यांनी प्राण सोडले आता आरुषी ही बारावी मारुत महाराणी होती. तिच्या नजरेतून जणू ज्वाला निघत होत्या . प्रतिशोध हेच तिच्या जन्माचं उद्दिष्ट होतं आणि आता ती मारूतांची महाराणी झाली होती........

महाराज विक्रम त्यांच्या फौजफाट्यासह काळा विहिरीपाशी पोहोचले . काळी विहीर कित्येक शतके त्या ठिकाणी होती . असं म्हणतात जर खरा सैनिक मृत्यू दारी असेल व त्यांनं जर का विहिरीचे पाणी प्यायला तर तो मरणाच्या दारातून सुद्धा परत येऊ शकतो . अशा काळ्या विहिरीपाशी दहा हजारांचा फौजफाटा घेऊन महाराज विक्रम उभे होते . सर्व सैनिकांच्या पुढं एकच उद्दिष्ट होतं . ते म्हणजे तिथून काही कोसावर ते असलेली काळी भिंत पाडायची . काळी भिंत पडल्यानंतर पलीकडे जाऊन देशद्रोह यांच्या अड्ड्यावर छापा मारून देशद्रोह्यांना कंठस्नान घालायचं.......

महाराज विक्रम सैनिकांसमोर उभे होते . सैनिका समोर उभा राहून ते भाषण करत होते . त्यांचा आवाज वाढवण्यासाठी त्यांनी समोर ध्वनिवर्धक धरला होता. दहा हजारांच्या सैन्यासमोर महाराज विक्रम जोश पूर्वक मोठ्या आवाजात बोलत होते.....

" माझे सख्खे काका व राज्याचे प्रधान हे आपल्या राज्याच्या विरोधात जाऊन देशद्रोह यांच्या टोळीला सामील झाले . राजा बनण्याची त्यांची वासना इतकी मोठी होती की ; ते राज्याशी , राज्यातील जनतेची ही द्रोह करून बसले . भिंतीपलीकडे असलेल्या देशद्रोह्यांची टोळीला त्यांनी शस्त्र साठा पुरवला . वेळोवेळी त्यांना ते सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सुविधा पुरवत आले . पलीकडे असलेली देशद्रोह्यांची टोळी वेळोवेळी आपल्या राज्यात येते . आपल्या राज्याला लुटते , आपल्या राज्यातील स्त्रियांचा बलात्कार करते , लहान मुलांना पळवून नेते . या सर्व गोष्टी साठी कारणीभूत आहे ती म्हणजे काळी भिंत . त्याआख्यायिका जाणून-बुजून पसरवले गेल्या आहेत . कारण तिकडे सर्व राज्यांना त्रास देणारी देशद्रोह्यांची टोळी असते . बरीच राज्य त्या देशद्रोह यांच्या टोळी मुळे त्रस्त आहेत पण त्या देशद्रोह यांच्या टोळीला सर्व राज्यातील काही लोक सहाय्य करतात कारण त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची असते . आत्ताच ती वेळ आहे आपल्या देशासाठी लढण्याची आत्ताच वेळ आहे आपल्या देशातील स्त्रियांच्या सन्मानासाठी लढण्याची , आत्ताच वेळ आहे स्वतःच्या संरक्षणासाठी आक्रमण करण्याची..... रक्षक राज्यांनी नेहमी रक्षण केलेला आहे . पण आता रक्षक राजे आक्रमण करतील आणि ज्यावेळी रक्षक आक्रमण करतात त्यावेळी साक्षात मृत्यू ही घाबरतो......
तुम्ही सर्वजण तयार आहात ना मृत्यूला घाबरवायला..... रक्षण करणं आता बास झालं आता वेळ आहे आक्रमण करण्याची..... काळ्या भिंतीकडे .....
असं म्हणून महाराजांनी घोषणा दिली . त्यांच्या पाठोपाठ सर्वजन ओरडले " काळ्या भिंतीकडे ....
महाराज विक्रमांच्या जयघोषात सर्व सैनिक भिंतीकडे रवाना झाले.......

आयुष्यमान भारत व मोहिनी या तिघांच्या समोर त्या मनुष्याने प्राण सोडला . जाता जाता तो एकच वाक्य बोलू शकला होता
" उत्तरेला न्या , माझ्या मुलीला . उत्तरेला न्या , माझ्या मुलीला.....।

ती छोटीशी लहान मुलगी होती . जिला त्यांनी त्या रेड्याच्या झोळीतून काढलं होतं . तिचे डोळे काळे कुट्ट होते . डोळ्याभोवती असलेल्या काळ्या व्रणामुळे ती फार विचित्र दिसत होती . ती मोहिनीच्या हातात होती . आयुष्यमान म्हणाला
" मोहिनी तू या मुलीना घेऊन माघारी जा ...आम्हाला लवकरात लवकर उत्तर कडे जात सर्व बिया टाकल्या पाहिजेत . कोणत्याही क्षणी महाराज विक्रम ती भिंत पाडू शकतात . त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला आमचं काम केलं पाहिजे....
" आयुष्यमान मी तुझ्याबरोबर येण्यासाठी इतक्या दूर आले आणि तू मला माघारी पाठव . या मुलीचा वडीलही म्हणत होता मुलीला उत्तरेकडे घेवून जा , मी या मुलीला घेऊन तुमच्याबरोबर येणार आहे....
आयुष्यमान ला मोहिनीला नकार देण्याचं जीवावर आलं .
" पण तुझा हा घोडा फार अंतर चालू शकणार नाही . माझ्या मते या घोड्यावर फार तर तू अजून काही कोस येऊ शकते . त्यामुळे मी तुला सांगू इच्छितो की या घोड्याबरोबर आमच्याबरोबर येणार असशील तर तू घरी माघारी गेलेलं बरं होईल , कारण काही अंतर गेल्यानंतर हा घोडा दमून जागेला बसल्याशिवाय राहणार नाही....

" असं म्हणतोस........
असं म्हणत मोहिनीने डोळे झाकले काही क्षणात तिच्या मागे असलेला तिचा जुना घोडा चौखूर उधळत निघून गेला व जंगलातून एक विचित्र प्राणी बाहेर येताना दिसला . तू घोडाच होता पण त्याला घोड्यासारखे तोंड नव्हतं ते तोंड मानवा सारखं होतं.....

" हा माझा जुना मित्र अश्वराज पवन.......
तू स्वराज भवन लांब उड्या मारत त्यांच्यापाशी पोहोचला होता .
" वारसदारांचा सभा प्रमुख आयुष्यमान याला माझा नमस्कार......
तो अश्व प्रमुख पवन म्हणाला .
आयुष्यमान आश्चर्यचकित झाला . त्यावेळी मोहिनी म्हणाली

" अश्वराज पवन हा त्यांच्या प्रजातीचा उरलेला शेवटचा अश्व आहे . ज्यावेळी भिंती पलीकडील सम्राटाने काळी भिंत बांधण्याचा अगोदर पृथ्वीतलावरती आक्रमण केलं होतं ,त्यावेळी अश्वराजांची संपूर्ण प्रजात नष्ट झाली होती . पण हा तेव्हा लहान होता . त्या वेळेपासून तो या जंगलात लपून छपून राहत आहे . मी लहान असताना एकदा जंगलात गेल्यानंतर मला याची जाणीव झाली होती आणि त्यानेही माझ्यातले गुण ओळखले . तेव्हापासून तो माझा मित्र आहे . अश्वराजांचे जीवन फार दीर्घकालीन असते . आत्ता कुठे त्याने तारुण्यात पदार्पण केले आहे.....।

अश्वराजावरती स्वार होऊन त्या मुलीला घेउन मोहिनीही आयुष्यमान व भरताबरोबर उत्तरेकडे निघाली . त्यांना आता बडबड करायला हवी होती , कारण काळी भिंत बांधण्यासाठी महाराज विक्रम सर्व सैन्य घेऊन निघाले होते....

जलधि राज्याचे वीस हजाराची सैना रक्षक राज्याकडे निघाली होती . सैन्याच्या पहिल्या रांगेत महाराज स्वतः त्यांच्याबरोबर युवराज देवव्रत , महाराज विश्वकर्मा व राजकुमारी अन्वी , हेर प्रमुख कौशिक आणि जलधि राज्यातील इतर मंत्रीगण होते . 20000 घोडेस्वारांची सैना रक्षक राज्यशरती चालून निघाली होती . त्यांचे उद्दिष्ट फक्त एकच होतं , ते म्हणजे महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून पदच्युत करून विश्वकर्मां रक्षक राज्याचा महाराज बनवायचं . त्यासाठी युद्ध करायला लागलं तरीही ते तयार होते . कारण काळी भिंत पाण्याची जी आज्ञा महाराज विक्रमांनी दिली होती ती युद्धापेक्षा भयंकर होती.....

त्यांनी जलधि राज्याची सीमा त्यांनी कधीच ओलांडली होती . काळ्या भिंतीच्या समांतर ते निघाले होते . त्यांना महाराज विक्रमांची सैना काळ्या भिंतीपर्यंत जाण्याच्या अगोदर अडवायची होती .

सर्वत्र फक्त घोड्यांच्या टापा व वाऱ्याच्या वाहण्याचा आवाज पुरून उरला होता . मात्र अचानक भिंती पलीकडून उंच उंच आवाजात चित्र-विचित्र घोषणा ऐकू येऊ लागल्या . त्या घोषणांचा आवाज इतका मोठा होता की घोडेही घाबरून खिंकाळू......

" ही तर त्रिशूळांच्या सैन्याची घोषणा आहे .....
महाराज कैरव म्हणाले.......

" काय ....... त्रिशूळांच्या सैन्याची घोषणा ........?
त्रिशूळांचे सैन्य ही एक काल्पनिक कथा आहे ना ......? " युवराज देवव्रत महाराज कैरवांना म्हणाले...

" बऱ्याच गोष्टींचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही जोपर्यंत त्या गोष्टी आपल्या समोर येऊन उभा टाकत नाहीत ती स्त्री शिवरायांचे नाही जरी कल्पना असली मात्र आता ते आपल्यासमोर उभा आहे आणि आतापर्यंत जो दुसऱ्यांच्या सैन्यासमोर टाकले आहे त्याचा त्याचा नायनाट झाल्याशिवाय राहिला नाही......
महाराज कैरवांच्या चेहऱ्यावर जन्मजात भीती दिसत होती . महाराज कैरव घाबरल्याचे आतापर्यंत त्यांच्या कोणत्याच मंत्र्याने कधीच पाहिलं नव्हतं .....

" महाराज विश्वकर्मा तुम्ही सैनिकांची एक तुकडी घेऊन जा व कसेही करून महाराज विक्रमांना भिंत पडण्यापासून थांबवा . आम्ही या त्रिशळांच्या सैन्याबरोबर काही काळ काढतो......

महाराज विश्वकर्मा काही घोडस्वार स्वार घेऊन निघाले ......
प्रलय-१२

ज्यावेळी भिंत बांधली नव्हती आणि भिंतीपलीकडील सम्राट जागृत झाला होता . त्यावेळी त्याने तीन प्रकारच्या सैना बनवल्या होत्या . एक म्हणजे त्रिशूळाची सेना दुसरी म्हणजे तलवारीची सेना व तिसरी म्हणजे धनुष्यबाणाची सेना...... त्यावेळी भिंतीपलीकडे जे काही लोक होते ते , त्या सर्वांना त्यांने सैनिक बनवून पृथ्वीतलावरील प्रत्येक राज्य जिंकायला पाठवलं होतं . प्रत्येक सैन्यात जरी सामान्य लोक असले तरी त्यांच्याकडे असणारी हत्यारे म्हणजेच , तलवार सैन्यात असलेल्या तलवारी , धनुष्यबाण सैन्यात असलेले धनुष्यबाण व त्रिशूळ सैन्यात असलेले त्रिशूळ हे चमत्कारिक होते.....

त्रिशूळ सैन्याकडे असलेला त्रिशूळ जर एखाद्या व्यक्तीला , प्राण्याला किंवा सजीवला मारला असता त्या व्यक्तीचे अथवा सजीवाचे जागेला मातीत रूपांतरण व्हायचे . त्रिशुळाच्या बळावर त्रिशूळ सैना संपूर्ण विश्व पादाक्रांत करत भिंतीपलीकडील सम्राटाच्या छत्रछायेखाली आणत होती . मात्र त्यावेळी असलेल्या जलधि राज्याच्या महाराजांनी त्या संपूर्ण सेनेला एकट्याने हरवलं होतं असं म्हणतात . त्रिशुळ सैन्याच्या शेवटच्या युद्धाबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध होत्या . त्रिशुळाच्या सैन्याची मुख्य शक्ती त्रिशूळ होता व त्रिशूळ हे कोणत्याही सजीव गोष्टीचं रूपांतर मातीत करत असायचा . त्यामुळे त्याविरुद्ध लढण्यासाठी जलधिच्या त्यावेळच्या महाराजांनी पाण्याची मदत घेतली . असं म्हणतात त्यावेळचे कैरव महाराज पाण्याला स्वतःच्या बळावर ती नियंत्रित करु शकायचे . त्यांनी समुद्रातले पाणी आणून संपूर्ण त्रिशूळ सैना त्याखाली बुडवून मारली . मात्र ती सेना शापित असल्यामुळे मुक्त न होता त्याच भागावरती भटकत राहू लागली . ती सैना तो भूभाग सोडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यानंतर ती काळी भिंत बांधली गेली . पण काळी भिंत त्रिशूळांच्या सैन्याला कधीच अडवू शकली नाही .

.अशा वेगवेगळ्या दंतकथा जरी सांगितल्या जात असल्या तरी खरं काय आणि खोटं काय हे कुणालाच माहीत नव्हतं . समोरून त्रिशूळाच्या सैन्याची आरोळी ऐकू येत होती हे मात्र खरं . इतक्या वर्षात भिंतीपलीकडे एकही सैनिक दिसला नव्हता तरीही आता त्यांची आरोळी कशी काय ऐकू येत होती हाच मोठा प्रश्न होता . त्रिशूळांची सैना पुन्हा जागृत करू शकेल असं या पृथ्वीतलावर कोणीही जिवंत नव्हतं . याचा अर्थ एकच होता ,भिंतीपलीकडचा सम्राट पुन्हा जागृत झाला होता........

त्रिशूळांच्या सेनेबरोबर लढण्याचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अनुभव नव्हता . गोष्टीतल्या प्रमाणे लढायचं म्हटलं तरीही गोष्टीतही वेगवेगळे प्रकार सांगितले होते . त्यामुळे त्यांच्याकडे आता कोणताच उपाय नव्हता....

एवढे सगळे होऊनही जलधि राज्याचा एकही सैनिक घाबरला नव्हता . प्रत्येक सैनिक लढाईच्या तयारीत उभा होता . कोणत्याही क्षणी भिंत पार करून त्रिशूळांची सेना अलीकडे येऊ शकत होती . प्रत्येक जण आपापल्या जागा घेऊन लढण्यासाठी उभे राहिले . ती वीस हजाराची सेना त्रिशूळाच्या सैन्या विरुद्ध लढण्यासाठी आता तयार होती...........

ते सैनिक बराच वेळ त्या ठिकाणी थांबले . पलीकडे त्रिशूळांचे सैन्य होते . फक्त आरोळ्यांचा आवाज ऐकू येत होता . कोशिकाने भिंतीवरती चढून पाहिले . पलीकडे जिवंत लोकांची मोठीच्या मोठी फोज दिसत होती . प्रत्येकाच्या हातात त्रिशूळ होता आणि सर्व विचित्र आवाजात आरोळ्या देत होते . भिंतीपासून काही पावलांच्या अंतरावर सर्वजण थांबले होते व मोठमोठ्या विचित्र आवाजात ओरडत होते . जणू काही ते कुणाच्या तरी आदेशाची वाट बघत होते . उत्तरेकडून दक्षिणेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे जितक्या दूर नजर जावी तितक्या दूर ती त्रिशूळांची सैना दिसत होती .......

" बाबा , तुम्हाला माहित आहे ना.... त्या विक्रमाने काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे ती......
" अरे शौनक तुला किती वेळा सांगू असल्या राजकारणाच्या फंदात पडत जाऊ नकोस ......आपण भलं आणि आपलं काम भलं .....तसेही लोक आपल्याला घाबरतात . चेटूक करतो म्हणून तर आपल्या गावा बाहेर काढलय....।
" बाबा पण आपण समाजात राहतो आपली जबाबदारी आहे की नाही......
" अरे बाबा अजून तुला जग समजत नाही . जगातील राजकारण समजत नाही , नाही पडणार ती भिंत .मी शपथेवर सांगायला तयार आहे
" बाबा मी पाहिलं भिंत पडताना , निळ्या गोलात ....
" तुला कितीवेळा सांगितलं शौनक , माझ्या कोणत्याही गोष्टीला न विचारता हात लावत जाऊ नकोस....
" पण बाबा मी हात नाही लावला.....
" मग.....
" गोलावरील कापड जळाले आणि गोलाचा रंग बदलला आहे . अर्धा लाल आणि काळा झाला आहे . ज्यावेळी ते कापड जळत होतं त्यावेळी मी त्या ठिकाणी होतो. ते जाळणारं कापड बाजूला सारलं , त्यावेळी त्या गोला मध्ये फार भयानक गोष्टी दिसल्या , म्हणून मी त्यावरती दृश्य रूपांतर कापड टाकलं ......
हे बघा त्या दृश्य रूपांतर कापडावरती काय काय दिसतंय......?
असं म्हणत त्याने ते कापड दाखवलं . आणि त्या कापडावर जे काही दिसलं त्याने कोणाच्याही अंगावर काटा आला असता.......

आयुष्यमान व भरत या दोघांचे अश्व अश्वराज पवन यांच्या पेक्षा फार धीम्या गतीने चालत होते . अश्वराज पवन यांची गती फार होती . त्यामुळे अश्वराज पवन व मोहिनी नेहमी पुढे असायचे . भरत आणि आयुष्यमान मागुन जायचे . अश्वराज पवन हा त्यांच्या जमातीचा एकच होता . पृथ्वीतलावरती त्याच्या सारखा तो एकच होता . कमरेपर्यंत मनुष्याचे शरीर व तिथून पुढे संपूर्ण घोड्याचं शरीर असा तो अश्वराज पवन होता . त्याला मानवी भाषांचे ज्ञान होतं . तो माणसासारखा बोलू शकत होता . माणसासारखं विचार करू शकत होता . तो चांगली करमणूकही होता . त्याला विविध गाणी येत होती . तो पळत पळत गाणीही म्हणायचा . त्यामुळे आयुष्यमान भारत व मोहिनी यांचा वेळ जात होता . ते भराभर एका खड्ड्या मागोमाग दुसऱ्या खड्याकडे जात होते व प्रत्येक ठिकाणी बी टाकत होते . मोहिनीच्या बरोबर ती लहान मुलगीही होती . मोहिनीने मोहिनी करून त्यांना अंतःप्रेरणेने धावण्याची प्रेरणा दिली . त्यामुळे त्यांची यात्रा फार गतीने चालली होती . आता काहीच खड्डे शिल्लक राहिले होते . ते उत्तरेकडे आले होते , ज्या ठिकाणी ती भिंत संपत होती .

ज्यावेळी आयुष्यमाननज शेवटच्या खड्ड्यात बी टाकला त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटु लागला . मोहिनीच्या मागे बांधलेल्या झोळीत जी लहान मुलगी होती ती हवेत उडाली . तिच्या शरीराचे तुकडे झाले . निम्मा भाग भिंती पलीकडे पडला तर निम्मख भाग भिंती अलीकडे पडला . आकाशात चित्र-विचित्र रंगाचे ढग जमले . ढगांचा गडगडाट वाढू लागला . विजा चमकू लागल्या ....थोडा थोडा धरणीकंप जाणवत होता . काही काळानंतर आकाशातील वेगवेगळ्या रंगाचे ढग जाऊन त्या ठिकाणी फक्त दोनच रंगाचे ढग उरले . भिंतीकडच्या बाजुला काळ्या रंगाचे व भिंती अलीकडे लाल रंगाचे ढग . संपूर्ण आकाश लाल व काळ्या रंगात विभागले होता . विजांचा कडकडाट थांबला होता . सोसाट्याचा वारा अजूनही चालू होता . धरणीकंप थांबला होता .
आयुष्यमानला एक गोष्ट जाणवली . मोहिनी आणि अश्वराज आता त्या ठिकाणी नव्हते . अश्वराज जंगलात पळून गेला होता . हवेतून एक मोठा गरुड खाली आला होता . मोहिनी त्यावर आरूढ झाली व गरुड पुन्हा हवेत उडाला आयुष्यमान व भरत ते दृश्य पाहतच राहिले......

तो गरुड उंच उडून दक्षिणेकडे निघाला .

जन्म तिचा झाला आहे
प्रलय काळ आला आहे
मृत्यू आता तांडव करेल
गिधाडांसाठी मेजवानी उडेल
खरेखोटे सारे मरतील
हवेचे राजे फक्त उरतील.......

तो भिकारी हे गाणं मोठमोठ्या आवाजात ओरडत घरासमोरून फिरत होता . एकापाठोपाठ एक आवर्तने करत होता . त्याचा तारस्वर ऐकून कोणीही त्याला भीक देत नव्हतं . शेवटी तो एका तळ्याकाठी गेला . अगोदरच ज्या काही शिळ्या भाकऱ्या होत्या . त्या काढल्या व पाण्यात बुडवून खाऊ लागला .....

आयुष्यमान व भरत दोघांनी ही त्या अश्वराज पवनच्या मागे घोडे पळवले . तो अश्वराज जंगलात जाऊन लपून बसला होता . तो घाबरल्यासारखा वाटत होता . तो सहजासहजी कोणालाही दिसला नसता , पण आयुष्यमानची नजर तीक्ष्ण होती . त्याच्या तीक्ष्ण नजरेने त्याचे लपणे टिपले . आयुष्यमान जर सरळ सरळ जाऊन त्याला बोलला असता तर त्याने त्याचे ऐकले नसते . त्यामुळे आयुष्यामानने पहिल्यांदा दावे काढले . त्याला गाठ मारत त्याने ते दावे नकळत त्याच्या पायाभोवती फेकले व जोरात ओढून त्याचे दोन्ही पाय एकमेकात गुंतवून बांधून टाकले ......
त्याने ओरडत सुटायचा प्रयत्न केला , पण तो निष्फळ ठरला . त्याने हातात लाकूड उचलून त्यांच्या अंगावरती फेकायला सुरुवात केली . बराच वेळ त्याचा हा कालवा चालला होता . शेवटी त्याला शांत करत बोलण्याच्या स्थितीत आणत आयुष्यमान त्याच्याशी बोलू लागला .....

" मोहिनीला काय झालं ......? अश्वराज पवन ती कुठे गेले ......? तुला काही जाणवलं का.....?
" ती मोहिनी नव्हती . ज्यावेळी ते लहान मूल हवेत उडाले , मोहिनी त्यावेळीच गेली . त्यामुळे तर घाबरून मी जंगलाकडे पळालो . ती मोहिनी नव्हती . तिचे विचार फारच हिंस्त्र होते .......

" पण हे सर्व कशामुळे झाला.....? कसं झालं.....?

" मला काही माहित नाही......! मला जाऊद्या..... सर्वजण माझ्या मृत्यूवरती टपलेले आहेत . मला जाऊ द्या..... मला सोडा , मला अजून जगायचे आहे ......
त्या अश्वराजाने पुन्हा एकदा सुटायची धडपड केली . यावेळी तो यशस्वी झाला व चौखूर उधळत तो दिसेनासा झाला ...
प्रलय-१३

मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती . वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते . ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं . तिची संवेदना जणू नष्ट झाली होती . पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती . जणू तिचा नुकताच जन्म झाला होता . बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या , त्या गोष्टी तिला आठवत होत्या. आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या .
कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते , पण आता सारं काही अचानक तिच्या डोक्यात घुसत होतं . तिला हव्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तिने गरुडाला हाक दिली .

उंचच्या उंच डोंगरावरती काळ्या दगडाने बनलेली एक कपारी दिसत होत्या . एके ठिकाणी आत गुहा होती . त्या गुहेच्या समोरच्या बाजूला गरुड थांबवत त्यावरून ती खाली उतरली . त्या गुहेच्या आत संपूर्ण अंधार होता . त्या अंधारात कुठेतरी एक छोटीशी मशाल चमकली . मोहिनी निघाली , त्या मशालीच्या दिशेने.....

काही पाऊले अंधारात चालल्यानंतर तिचे डोळे अंधाराला सरावले . अंधारातच एक पायवाट सापडली व त्या पायवाटेने काही अंतर गेल्यावरती मशालींचा लख्ख उजेड पसरला होता . त्या मशालींच्या उजेडात बरेच लोक जमले होते. ते सर्व लोक जणू तिचीच वाट पाहत त्या ठिकाणी उभे होते . त्या सर्व लोकांच्या समोर असलेल्या उंचवट्यावरती उभी होती . ती आत गेल्याबरोबर सर्वांनी एकच जल्लोष करत आरडाओरडा सुरू केला .

ती काहीच न कळल्याने त्याच ठिकाणी उभी राहिली . नंतर तिच्या बाजूने , एक तिच्या सारखी मुलगी आली . तिच्याच वयाची असावी . ती आरूषी होती . तिने सर्वांना शांत करत बोलायला सुरुवात केली.....

" आता आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे ती म्हणजे प्रलयकारिका . आपल्या सर्वांना युद्धात मदत करून , पुन्हा एकदा पृथ्वीतलावरती आपली सत्ता आणण्यासाठी , मारूतांची सत्ता आणण्यासाठी , ती आपली मदत करणार आहे......
प्रलयकारिकेची मदत घेऊन आपण सर्वप्रथम जंगली सेनेवरती आपले स्वामित्व प्रस्थापित करणार आहोत . त्यानंतर जंगली सेना घेऊन आपण एकापाठोपाठ एक राज्य जिंकत जाणार आहोत . ज्या ज्या लोकांनी वरती अन्याय अत्याचार केला त्या लोकांना आता हा प्रलय झेलावा लागणार आहे ........

दूर कुठे तरी . तोच भिकारी पुन्हा एकदा तारस्वरात त्याचं गाण्याची आवर्तने करत होता . तो म्हणत होता....।

जन्म तिचा झाला आहे
प्रलय काळ आला आहे
मृत्यू आता तांडव करेल
गिधाडांसाठी मेजवानी उडेल
खरेखोटे सारे मरतील
हवेचे राजे फक्त उरतील.......

जलधि राज्याची सेना अजून त्याच ठिकाणी होती . संपूर्ण दिवसभर ते त्याच ठिकाणी थांबले होते . भिंती अलीकडे जलधि राज्याची सेना व भिंती पलीकडे त्रिशूळाची . त्रिशुळांची सेना दिवसभर आरोळ्या मारत होती , पण जसा सूर्यास्त झाला तसं त्या आरोळ्या बंद झाल्या . भिंतीपलीकडे कोणी आहे की नाही असा शुकशुकाट पसरला . ती सेना तिथेच होती , मात्र कोणावरही आक्रमण करत नव्हती . त्यामुळे जलधि राज्याची सेना संदिग्ध अवस्थेत होती . महाराज कैरव व बाकी युद्धकुशल नेते पुढे काय कृती करावी यावर ती चर्चा करत होते . चर्चे अंतिम एक गोष्ट निष्पन्न झाली . ती म्हणजे ज्या अर्थी त्रिशूळांची सैना आक्रमण करत नव्हती , त्याअर्थी भिंती अलीकडे येऊ शकत नव्हती . याचा अर्थ ते त्या सैन्यावर आक्रमण करू शकत होते बदल्यात ती त्रिशुळांची सैना काहीही करणार नव्हती.....

याचा अर्थ भिंत पडेपर्यंत ते सर्व सुरक्षित होते . भिंत पडल्यानंतर पलीकडे असलेली विराट सैना आक्रमण करणार होती . त्यामुळे भिंत पाडायला तर थांबवायलाच हवी होती . त्या बरोबरच कसेही करून ती सैना नष्ट करायला हवी होती . महाराजांनी एक दहा हजारी तुकडी महाराज विश्वकर्मा यांच्या मागे पाठवली , जेणेकरून त्यांना महाराज विक्रमांना थांबवायला सोपे जावे . बाकी दहा हजारांची तुकडी घेऊन ते त्या त्रिशूळांच्या सैन्याविरुद्ध लढणार होते .

सर्व सैनिक भिंतीवरती चढून धनुष्यबाण घेऊन उभारले . ज्या काही तोफा होत्या त्याही भिंतीवरती चढवल्या . मोठे दगडी गोळे टाकायची यंत्रे भिंती अलीकडे उभा होती . त्यावर ती खनिज तेल टाकून तीही तयार करण्यात आली . जलदी राज्याकडे दारूगोळा विपुल प्रमाणात होता . सर्व तोफांमध्ये गोळे भरण्यात आले . भिंतीपलीकडे जरी विराट सेना असली तरी भिंत असेपर्यंत अलीकडील सैनिकांना काहीच धोका नव्हता . कारण आतापर्यंत तरी परिस्थिती तशीच राहिली होती.......

मोहिनी व त्या लहान मुलघबाबत झालेल्या गोष्टीवरती विचार करत आयुष्यमान व भरत उत्तरेच्या जंगलात फिरत होते . त्यांना कसेही करून लवकरात लवकर दक्षिणेकडे पोहोचायला हवं होतं . महाराज विक्रमांच्या आदेशाला कसंही करून थांबवायला हवं होतं . जरी त्यांनी बिया टाकून पुढची व्यवस्था केली असली , तरीही काळी भिंत पाडण्यापासून महाराज विक्रमांना थांबवायलाच हवं होतं . त्यासाठी दक्षिणेकडे निघाले होते . मात्र राहून राहून त्या लहान मुलीचा विचार आयुष्यमान च्या डोक्यात होता . ती लहान मुलगी नक्की हवेत कशामुळे उडाली ....? तिच्यासोबत इतका क्रूर प्रकार का झाला असावा......? या सर्व गोष्टींचं त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा स्पष्टीकरण नव्हतं .....? एका लहान व निष्पाप मुलवरती दैवाने इतके अन्याय अत्याचार का करावेत.....? याचा त्याला मनस्ताप होत होता . त्याच्यासमोर एक लहान मुलीचा जीव गेला होता व त्याची प्रेयसी मोहिनी गरुडावर बसून दूर कुठेतरी निघून गेली होती . मोहिनी स्वतःहून त्याच्यापासून दूर जाणार नाही , याची त्याला खात्री होती ....मग ती दूर का गेले हा प्रश्न त्याला छळत होता . तो आतून चिडला होता . त्याला खूप राग आला होता .....? जे काही होतं , ज्याने कोणी त्याला मोहिनीपासून दूर केलं होतं व ज्याने कोणी त्या लहान मुलीचा जीव घेतला होता ; त्याला आयुष्यमान आता सोडणार नव्हता ......! तो आतून होरपळत होता...... प्रतिशोधाची ज्वाला त्याच्या अंतरात जळत होती.........

त्या दृश्यरूपांतरण कापडावरती शौनक ने त्याच्या वडिलांना जे काही दाखवलं , त्याच्यामुळे त्या तंत्रज्ञाची झोप उडाली . भिंत पडल्यामुळे शृंखला सुरू होणार होती . त्या शृंखलेचा शेवट प्रलयाने होणार होता . जरी शृंखला थांबवली नाही तर प्रलय काळाला सुरूवात होणार होती . जर भिंत पाडायचे थांबवले नाही तर पृथ्वीतलावरील सर्व जीवन धोक्यात येणार होते . पृथ्वीतल पूर्वी हे बऱ्याच वेळा भिंती पलीकडील सम्राटाच्या छत्रछायेखाली आले होते आणि पुन्हा त्याच्या छत्रछायेखालून बाजूला होत त्याला भिंतीपलीकडे ही डांबले होते . पण प्रलय हा भिंतीपलीकडील सम्राटाहूनही क्रूर होता . तो प्रलय होता आणि प्रलय कुणाची कदर करणार नव्हता......

आणि तो शोनकचा वडील असलेला तंत्रज्ञ हा साधासुधा नव्हता . कैक पिढ्यांपासून त्यांने ही कला जोपासली होती . त्याचं आयुष्य आता पृथ्वीतलावरती असलेल्या कोणत्याही व्यक्ती पेक्षा मोठं होतं . सर्वात अनुभवी असलेला असा तो तंत्रज्ञ होता. त्याने त्याच्या आयुष्यात बऱ्याच युगाची सुरुवात बऱ्याच युगाचा अंत पाहिला होता आणि तोही या प्रलय काळाला पाहून अंतरातून घाबरला होता . भितीने त्याला भक्ष्य केले होते....

त्या तंत्रज्ञाने आपल्याबरोबर बऱ्याच गोष्टी घेतल्या व उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिकी तळाकडे निघाला . हेच ते सैनिकी तळ होते ज्या सैनिकी तळाकडे भिल्लव सार्थक व त्याचे साथीदार आणि अधिरथ , अद्वैत , सरोज आणि त्यांचे साथीदार निघाले होते . त्या तंत्रज्ञाचे हे छोटासे खोपटेही उत्तरेच्या जंगलातच होतं . त्यातच तो तंत्रज्ञ व त्याचा मुलगा राहत होते. तंत्रज्ञाला बऱ्याच गोष्टी अवगत होत्या . त्याने त्याला माहीत असलेल्या विज्ञानाच्या व तंत्राच्या साह्याने बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतल्या . व फटाफट निर्णय घेतले . तो स्वतः उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिकी तळावर जाणार होता , आणि त्याने त्याच्या मुलाला त्याच जंगलात फिरत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला शोधून त्या सैनिक तळावर आणण्याचा आदेश दिला.....
प्रलय-१४

" मी कोण आहे......?
मोहिनी विचारत होती .
" तू प्रलयकारिका आहेस.....?
आरुषी तिला सांगत म्हणाली..
" पण मला इतक्या दिवस हे सारं आठवत नव्हतं ......आणि अचानक आठवायला का सुरुवात झाली.....?
" तुला संधी दिलेली होती , आतापर्यंत तुला तुझं जीवन जगण्यासाठी दिलं होतं । तू आतापर्यंत यासारखी बरीच आयुष्य जगली आहे . ती आयुष्य तुझ्या खऱ्या जीवनाचा भाग नाहीत . तुझे खरे जीवन आहे मारुत राज्याची सेवा . मारूतांची सेवा .....त्यासाठीच तुला इथं बोलावले आहे . आता तू आमच्या बरोबर येशील . माझ्या आदेशाचे पालन करणे तुला बंधनकारक असेल आणि तू ते न सांगता करशीलच .तुझ्या रक्तातच आहे ते .
" पण माझे वडील त्या गावातील धर्मशाळेत एकटे आहेत.... आणि आयुष्यमान माझा शोध घेत असेल .....मला त्यांना सांगितलं पाहिजे...."
" पुरे ....आज जाऊन विश्रांती कर . उद्या पर्यंत तू हे सर्व विसरून जाशील . तुला मागच्या आयुष्यातील काही आठवणार नाही आणि तुझ्या पुढे फक्त एकच उद्देश असेल तर तो म्हणजे मारुत राज्याची सेवा . उद्या सूर्योदयाला आपण जंगली सेनेवरती आक्रमण करायला निघणार आहोत ......
" जंगली सेने बाबत एक खास गोष्ट सांगते . जंगली सेनेची सर्व बिषाद त्यांच्या प्राण्यांवर अवलंबून आहे . त्यांच्याकडे बरेच प्राणी आहेत . त्याच प्राण्याचा उपयोग करून जंगली सेना आतापर्यंत प्रत्येक युद्ध जिंकता आलेली आहे . त्याच प्राण्यांना तुला आता आपल्या बाजूने करून घ्यायचा आहे . हे तुला काही नवीन नाही . माहिती असावे म्हणून सांगितलं . त्यांचे प्राणी जरा फारच वेगळे आहेत , हे मात्र लक्षात ठेव . बाकी काही नाही...... जाऊन विश्रांती घे.... बाकीच्या गोष्टी आपण परत बोलू ......

मोहिनीच्या मनामध्ये द्वंद्व चालू होतं . एक मन आरूषींने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यासाठी धडपडत होतं , तर दुसर्‍या मन त्या आदेशांविरुद्ध जाऊन , आयुष्यमानला , तिच्या वडिलांना भेटायला जाण्यासाठी सांगत होतं . तेच मन तिला सांगत होतं , हे सर्व खोटे आहे . खर आयुष्य आधी जे होतं तेच आहे.... तिला कळत नव्हतं खरं काय खोटं काय.......?

तिनं एक निर्णय घेतला . तिने ठरवलं आत्ताच्या आत्ता या ठिकाणाहून बाहेर पडायचं , आणि आयुष्यमान भेटायचं .....ती एका उंच डोंगरातील गुहेमध्ये होती . ज्या ठिकाणी उतरली होती , त्या ठिकाणी ती पोहोचली , तिथे गरुड नव्हता . तिने आजूबाजूला पाहिले . तिथे कोणताच प्राणी किंवा पक्षी नव्हता . तिने अंतःप्रेरणेने कोणता प्राणी दिसतो का हेही पाहण्याचा प्रयत्न केला.... पण तिच्या पदरी घोर निराशा पडली . तिला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग माहीत नव्हता . ज्या मार्गाने जाता येत होतं , त्या मार्गाने जाता येणे शक्य नव्हते..... शेवटी नाइलाजाने ती आत गेली . ज्या ठिकाणी तिला विश्रांतीसाठी कक्ष देण्यात आला होता , त्या ठिकाणी गेली आणि निपचित पडून राहिली........

मंदार त्या तंत्रज्ञानाचे नाव मंदार होतं . पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान त्याच्यापाशी होतं , त्याने स्वतः अभ्यास करून व प्रयत्न करून कमावलेले ज्ञानही त्याच्या जोडीला होतं . त्याला या विश्वातल्या अशा बऱ्याच गोष्टी माहीत होत्या , ज्या कोणीही कधीच ऐकला नव्हत्या किंवा पाहिल्या नव्हत्या. भिंती बाबतच्या बऱ्याच गोष्टी बरेच जण सांगत असायचे . ती भिंत कधी बांधली गेली ....? का बांधली गेली....? आणि कशी बांधली .....? भिंत बांधण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले गेले ....?
प्रत्येक जण आपापल्या परीने भिंतीची गोष्ट सांगायचा . पण ज्यावेळी भिंत बांधली गेली त्यावेळचा एक मंदार सोडला तर आज कोणीही जिवंत नव्हतं . त्याला माहित होतं की भिंत का बांधली गेली होती... कशासाठी बांधली गेली होती .....कुणी बांधली होती .....कधी बांधली होती आणि भिंत पडल्यानंतर काय होईल.........?

मंदार उत्तरेच्या सैनिक तळाकडे निघाला होता . ते सैनिक तळ चालत जाण्यासाठी फार दूर होते . त्यामुळे त्याला घोडा शोधणे भाग होते . त्याने त्याच्या पिशवीतून एक बासरी सारखी दिसणारी गोष्ट बाहेर काढली . त्याने बासरी जोरात शिट्टी सारखी वाजवली . त्यानंतर त्याच्या आजूबाजूला बरेच प्राणी गोळा होऊ लागले . लहानातल्या लहान मुंगीपासून मोठ्या प्राण्यापर्यंत सर्व प्राणी आले जे बासरीचा आवाज ऐकू शकत होते . त्याच बरोबर त्या ठिकाणी तो अश्वराज पवनही आला होता .
त्या अश्वराज पवनच्या जवळ जात , मंदारने पुन्हा एकदा शिट्टी वाजवली . बाकी सर्व प्राणी आल्या वाटेने निघून गेले . पण आज मात्र तिथेच होता....

" मला वाटलं तुझा बळी दिला असेल कोणीतरी.....? त्यामुळेच तू दिसला नव्हतास इतकी वर्षे.....
" बळी जाताजाताच वाचलो , हाताच्या मुठीत जीव धरून पळत होतो , तेव्हाच तुझी शिट्टी ऐकली वाटलं कोणीतरी सापडला आपला मित्र .....
" कोणापासून पळत होतास एवढं जीवाच्या आकांताने.....
" मंदार तुला कळालंच असेल ....प्रलयकारिकेचा चा जन्म झालेला आहे.....? अरे ती माझी जुनी मैत्रीण होती रे...... मोहिनी नावाची .....प्राण्यांच्या मनात पाहू शकणारी , त्यांच्याशी बोलू शकणारी , त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागूवू शकणारी..... तीच प्रलयकारिका असेल असं मला वाटलं नव्हतं...।
" अरे बऱ्याच गोष्टी असतात अशा..... मलाही वाटलं नव्हतं की मी जिवंत असेपर्यंत कधी प्रलय येईल ....पण येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा एकत्र व्हावे लागणार आहे.........
" तुला म्हणायचे आहे का कि भिंतीपलीकडे सम्राट जागृत झाला आहे....
" अरे भिंतीपलीकडे सम्राटाला कसेही करून आपण पराभूत करू शकतो , पण प्रलयाचं काय करणार आहे......? सुरू होणारी जी शृंखला आहे , ती जर तोडली नाही तर आपलं वाचणं सर्वथैव अशक्य होऊन बसेल......
" त्यासाठीच मी उत्तरे कडे चाललोय , उत्तरेकडे असलेल्या सैनिक तळावरती आणि तू मला मदत करणार आहेस .....।
मंदार अश्वराजावरती स्वार झाला व उत्तरेकडे निघाला......

इकडे मंदारचा मुलगा शौनक , आयुष्यमान व भरतला शोधण्यासाठी फिरत होता . त्याच्या वडिलांनी रूपांतरणकापडा वरती त्याचे चित्र दिलं होतं . तो जंगलात चालून चालून थकला होता . त्याने त्याच्या वडिलांकडून एक शिट्टी चोरली होती . ती शिट्टी त्याने काढली व वाजवली . एक एक करत सगळ्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी जमा झाले . काही क्षण थांबल्यानंतर दोन घोडेही त्या ठिकाणी आले.....

त्या घोड्यावरती बरेच सामान लादलेले होते . याचा अर्थ हे घोडे कोणातरी यात्रेकरूचे होते . उत्तरेच्या जंगलात सहसा यात्रेकरू नसतात आणि असलेच तर ती माणसे साधी नसतात . त्याला कळून चुकले की ते दोन घोडे आयुष्यमान व भरतचेच होते . त्यामुळे तो पटकन एका घोड्या जवळ गेला व त्यावर ती बसला . त्याने पुन्हा शिट्टी वाजवली . आलेले सर्व प्राणी आल्या मार्गाने निघून गेले . दुसरा घोडा हे ही आलेल्या मार्गाने निघाला . शौनक ही त्या घोड्या मागोमाग आपला घोडा दामटवत निघाला . काही अंतर गेल्यानंतर त्याला आयुष्यमान दिसला........

जंगली सैना संसाधन राज्याच्या उत्तरेस असलेल्या जंगलात वास्तव्याला होती . त्यांचा निश्चित ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता . आतापर्यंत कोणीही त्या जंगलात गेलेला जिवंत बाहेर आलेला नव्हता . त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा माहीत असलेला माणूस या पृथ्वीतलावरती नाही असं म्हटलं जायचं . जंगली सेनेचा संख्या फार मोठी नव्हती आणि कमीही नव्हती . चार ते पाच हजारांच्या आसपास त्यांची सैना होती . जंगलामध्ये ते टोळ्याटोळ्यांनी राहायचे , आणि ज्यावेळी एखादं शहर किंवा गाव लुटायचं असेल त्यावेळी ते मिळून हल्ला करायचे . त्यांना जे काही हवं असायचं ते सर्व काही लुटून पुन्हा जंगलात जायचे . त्यामुळे जंगली सेनेच्याबद्दल भीती सर्वांच्या मनात होती . जंगली सेनेचे नाव ऐकल्यावर ती मोठ-मोठे राजेही घाबरायचे . त्यांच्याकडे असलेले प्राणी आणि योद्धे संपूर्ण जगातील महान योद्ध्यांना सहज राहू शकतील इतके शक्तिमान होते...

जंगली सैना प्रसिद्ध होती की त्यांच्या गतीसाठी , त्यांच्या व्युक्तीसाठी , त्यांच्या शक्तीसाठी आणि मुख्यत्वेकरून त्यांच्याकडे असलेल्या प्राण्यांसाठी.... ज्या कोणी जंगली सेनेच्या प्राण्यांना पाहिले तो माणूस एकतर जिवंत राहत नसे आणि जर एखादा जिवंत राहिला तर लोक त्याला वेड्यात काढत . त्यांच्या प्राण्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या सर्व ऐकिव होत्या . कुणी म्हणायचं त्यांच्याकडे फार मोठे हत्ती सारखे प्राणी आहेत जे हरणाच्या गतीने धावू शकतात , कुणी म्हणायचं त्यांच्याकडे लहान मुंग्यासारखे प्राणी आहेत ज्यांच्याकडे हत्ती एवढी शक्ती आहे . कोणीही काही म्हणायचं पण कोणालाच त्यांच्याकडे खरंच काय आहे हे माहीत नव्हतं .

आरुषी व मोहिनी आता त्यांच्यच शोधात निघाले होते ....
प्रलय-१५

आरुषी व मोहिनी जंगलात पोहोचल्या होत्या . काही अंतर चालल्यानंतर जंगली लोकांसारखी वेशभूषा केलेला माणूस त्यांच्याकडे येऊ लागला . मोहिनी घाबरली पण आरुषी मात्र तिच्या जागी ठामपणे उभी होती . कारण त्या मनुष्याने जरी जंगली लोकांसारखी वेशभूषा केली असली तरीही तो मारुतांचा एक विशेष हेर होता . त्याला आरुषीनेच जंगली सैन्यात सहभागी व्हायला सांगितलं होतं . त्याप्रमाणे तो सहभागी झाला होता आणि आता तोच त्यांना जंगली सैन्याच्या ठिकाण्यावर ती घेऊन जाणार होता .

" आरुषी मला नाही वाटत तू हे योग्य करतेयस..... तुम्ही दोघी त्याठिकाणी जाऊन काय करणार आहात ........?
तो माणूस जवळ येत बोलला......
" रुद्र हे सर्व अगोदरच ठरलं होतं . त्यासाठी त्यांच्यात तुला मिसळायला लावलं होतं....
" होय ते मला माहित आहे . पण तुला खात्री आहे का ही प्रलयकारिका काम करेल......?
" होय आता वेळ घालवायला नको लवकर चल......।
" ते सर्व ठीक आहे पण वाटेत पाहण्याच्या तीन टोळ्या आहेत त्यांचं काय......?
" ते आमचं आम्ही बघून घेऊ तू फक्त पुढे जात राहा....
" आरुषी , मी सांगतो तुझा विचार बदल . ही आत्महत्या आहे....
" रुद्रा तू माझी इतकी काळजी नको करत जावूस..... मी माझी काळजी घेऊ शकते . आणि मला कोणी मारायला आलाच तर त्यांची काळजी घ्यायला तू आहेस ........
तिने लाडीकपणे त्याचे गालगुच्चे घेतले व ते पुढे निघाले.

रुद्रा पुढे घोड्यावर जात होता त्याच्या मागे दोघी चालत निघाल्या होत्या . ते तिघेही दोन उंच झाडापाशी आले . झाडावरती पहारा देण्यासाठी लाकडाने चौक्या बांधल्या होत्या . त्या ठिकाणी सैनिक होते . त्याबरोबर झाडाखाली आजूबाजूला सैनिकांचा पहारा होता. रुद्र त्या दोन झाडाखालून पुढे गेला पण जेव्हा या दोघी आत निघाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर चार बाण येवून रुतले ...

त्याठिकाणी वर उभारलेल्या एका सैनिकाचा आवाज आला....
" सुंदरींनो तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी नाही......
तो एक तगडा पैलवान गडी होता . त्याच्या कमरेला फक्त वस्त्र होते , बाकी संपूर्ण उघडा होता . बाकी सैनिकही तसेच होते . सर्वात सैनिक बलदंड होते दंड व छखती फुललेली , मांड्याची पट फिरत असलेले . एकुणात ते सर्वजण शक्तिशाली होते
" आत्ताच्या आत्ता माघारी फिरला अन्यथा .....
त्या सैनिकाचे वाक्य पूर्ण होण्या अगोदर त्याला मागून कुणीतरी जोरात लाथ मारली तो सैनिक खाली आपटला . ज्यांना लाथ मारली , तो सैनिक पुढे येत बोलू लागला . तो बहुदा टोळीचा प्रमुख असावा

" मी याच्या वतीने माफी मागतो . तुमच्यासारख्या सुंदर स्त्रियांचा असा अपमान करणं हे कदापि उचित नाही...
तो आता खाली उतरला होता . त्या दोघींकडे सरकत होता . त्याच्या नजरेत स्पष्टपणे वासना दिसत होती .

" तुमच्या सौंदर्याचा मान ठेवायला पाहिजे ....
तो आता आरुषीच्या जवळ पोहोचला होता त्याने हात पुढे केला . तो आरुषीच्या नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.....

डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच आरूषीने तिचा खंजीर काढला व एकदम जलद हालचाल केली . जो हात पुढे आला होता , तो मनगटापासून कापला गेला . हात कापल्याबरोबर तो जोरात ओरडत मागे सरला व त्या बाणाला थटून खाली पडला . त्याच बरोबर बाकी सैनिक सावध झाले. आरूषीने मोहिनीकडे हेतूपूर्वक पाहिले . मोहिनीला समजले . तिने डोळे मिटले . आरुषी पुढे सरली . तो सैनिक अजूनही ओरडत होता . ज्या डोळ्यात वासना होती ते दोन्ही डोळे आरूषीने खंजीराने बाजूला काढले नंतर त्याच खंजीराने तिने त्याच्या काळजाचा वेध घेतला .

त्याच्या पाठोपाठ इतर सैनिकांच्या थोड्याफार ओरडण्याचा आवाज येता येता बंद झाला . त्या ठिकाणी जे काही प्राणी होते ते सर्व सैनिकांवरती तुटून पडले.... आणि काही क्षणात ती पहारा देण्यासाठी असलेली टोळी होत्याची नव्हती झाली . तेथीलच दोन घोडे घेऊन त्या दोघी पुढे निघाल्या.....

आयुष्यमान व भरत दोघांचे घोडे सुटून पळत गेले होते . ते जेवणासाठी थांबले असता त्यांचे घोडे शिट्टीचा आवाज ऐकून त्या दिशेने पळत गेल्याचा त्यांच्या लक्षात आलं . ते दोघेही त्या घोड्याच्या मागोमाग गेले आणि काही अंतर जातच त्यांचा एक घोडा परत येताना दिसला. त्या घोड्याच्या मागून दुसरा घोडा होता , परंतु त्यावरती कोणी तरी मनुष्य बसलेला दिसत होता . आयुष्यमानच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . अगोदरच त्याला झालेल्या घटना बद्दल वैताग होता . मोहिनीचा विरह सहन होत नव्हता , आणि कुणीतरी त्यांची भलतीच टिंगल करत होते . त्यामुळे जो कोणी मनुष्य घोड्यावर होता त्याच्याकडे पळत जात आयुष्यमाने त्याला घोड्यावरून खाली खेचले . आयुष्यमानने त्याला काहीही न विचारता वैतागून त्याच्या दोन कानाखाली लगावल्या.....

" घोडा वरती उडालेल्या मुलीला शोधत आहात ना तुम्ही.....
शौनक बोलला ...
पण मोहिनीच्या उल्लेखाने आयुष्यमानला अजूनच राग आला . एक अनोळखी माणूस येतो काय ..आपले घोडे चोरतो काय , आणि मोहिनीच्या नाव घेऊन त्यांना फसवतो काय.....? त्याचा पारा अजूनच चढला , त्याने शोनकलख अजून दोन कानाखाली लगावात त्याच्या पोटात ही गुद्दे मारून दिले.....

" अरे मला काय मारतोय , मी तुमची मदत करायला आलोय .....! काळी भिंत पडणार आहे ....प्रलय येणार आहे ....... सगळ्या पृथ्वीवरती संकट आहे आणि वारसदाराच्या सभेचा प्रमुख प्रेम आराधना करतोय.....

आयुष्यमानला आता राग अनावर झाला होता . तो त्याला अजून मारणार होता , पण भरतने त्याला मागे ओढत शांत केले.....

" तुला कसं माहित काय भिंत पडणार आहे ते.... आणि मोहिनी बद्दल तुला कसं माहित....।? सांग लवकर नाहीतर तुझं काही खरं नाही .....भरतने शोनकला विचारले....

त्याने त्याच्या कमरेला असलेला कापड बाहेर काढलं .रुपांतरण कापडावरती असलेले दृश्य दिसण्यासाठी त्याने त्याच्या वरती काहीतरी रसायन टाकले व त्या दोघांना तो कपडा दाखवला.....

त्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली . शोनक म्हणाला , माझे वडील मंदार तंत्रज्ञ आहेत . जेव्हा काळी भिंत बांधली त्या वेळी ते जिवंत होते . त्यांना इतका घाबरलेला मी कधीच पाहिले नाही . ते उत्तरेला असलेल्या सैनिकी तळावरती गेलेले आहेत . त्यांनीच मला तूमच्याकडे पाठवलेलं आहे . वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला तिकडे घेऊन येण्यासाठी सांगितला आहे......

ती मरो काळी भिंत आणि मरो सगळे लोक . मला आता काही पर्वा नाही . वारसदारांची सभा मी आता सोडून देत आहे . भरत तु सभेचा पुढचा प्रमुख , मी आता चाललोय माझ्या मोहिनीच्या शोधार्थ.....

भरतने त्याला समजवायचा प्रयत्न केला , पण तो घोड्यावरती बसला आणि ज्या दिशेने मोहिनी उडत गेली होती त्या दिशेकडे घोडा दामटवत निघाला...

प्रलय-१६

उत्तरेचा सैनिक तळ हा सैनिक तळ कमी आणि देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून जास्त ओळखला जायचा . ज्यावेळी महाराज सत्यवर्मांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला . त्यावेळी महाराज विश्वकर्मानी राज्याची सूत्रे सांभाळली . त्यावेळी महाराज विश्वकर्माचे बरेच समर्थक होते . पण ज्यावेळी दुसरा राजपुत्र जन्मला व त्याच्या नावे राज्याभिषेक करण्याचा प्रश्न आला , त्यावेळी महाराज विश्वकर्मा महाराज पदावरून बाजूला झाले . मात्र त्यांचे समर्थक अडून राहीले .. त्यामुळे त्या सर्वांना शिक्षा देण्याचे ठरले . मात्र ते समर्थक पलायन करण्यात यशस्वी झाले व उत्तरेचा जंगलात स्थायी झाले . सैनिकांबरोबर बरेच सामान्य नागरिक ही त्याठिकाणी स्थायिक झाले होते......

त्याच सैनिकाच्या तळावरती आज सर्व जण जमले होते. महाराणी शकुंतला ही त्या ठिकाणी उपस्थित होत्या . ज्या लोकांनी महाराणीचं अपहरण केलं होतं ते तळावरील सैनिक होते . ज्या सैनिकांनी अपहरण केलं होतं त्यांना माहित नव्हतं त्या महाराणी आहेत . नंतर तळावरती आल्यावर सुरक्षक प्रमुखाने महाराणीची सुटका केली व नम्रता पुर्वक त्यांचा आदर सत्कार केला . महाराणी त्या ठिकाणाहून राज्याकडे जाऊ इच्छित होत्या . महाराज विश्वकर्मा यांना फाशी झाली असा त्यांचा समज होता , पण सुरक्षा प्रमुख रघुरामाने तो समज काढून टाकला . त्याने महाराणींना सर्व हकीकत सांगितली व त्यांना तळावर राहण्यासाठी विनंती केली . त्या विनंतीला मान देऊन महाराणी त्यांच्यासोबत असलेल्या छोट्या राजपुत्रासह तळावरती स्थायिक झाल्या . जोपर्यंत महाराज विश्वकर्माचा पुढील आदेश येणार नव्हता तोपर्यंत त्या तिथेच राहणार होत्या . त्याठिकाणी अजूनही बरेच लोक होते . भिल्लव होता , सरोज होती , अधिरथ होता , अद्वैत होता आणि त्या दोघांचे साथीदारही होते . त्याचबरोबर उत्तरेच्या तळाचे सुरक्षा प्रमुख रघुराम आणि त्यांचे महत्त्वाचे साथीदार सैनिकही होते . सर्व लोक व सैनिक आजूबाजूला जमले होते , कारण त्या ठिकाणी तंत्रज्ञ मंदार काहीतरी बोलण्यासाठी उभारले होते . सर्वत्र शांतता होती . तंत्रज्ञ मंदारने बोलायला सुरुवात केली..........

" येथील बरेच जण मला ओळखतात आणि बरेच जण नाहीत . पण जे मला ओळखतात त्यांना माहित आहे मी सहसा बाहेर पडत नाही . प्रवासाला तर मुळीच नाही . पण आता अशी गोष्ट झाली आहे , ज्या गोष्टीमुळे मला बाहेर पडावे लागले. तुम्हाला प्रलयबाबतची काही कल्पना नसेल , या पृथ्वीतलावर असलेल्या वेगवेगळ्या संस्कृती प्रलयाची वेगवेगळी वर्णने आहेत . कोणी सांगतात , ज्यावेळी प्रलय येईल त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडून जाईल , कुणी सांगतात ज्यवेळी प्रलय येईल त्यावेळी आकाशातून आगीचा वर्षाव होईल व सर्व पृथ्वी जळून जाईल . कुणी सांगतात ज्या वेळी प्रलय येईल त्यावेळी पाऊस पडणार नाही व सर्व पृथ्वी सुकून जाऊन पाण्यावाचून तडफडून मरेल . ज्या त्या संस्कृतीत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात . प्रत्येकाच्या संस्कृतीत प्रलयाची वर्णने आहेत पण मी म्हणतो ती सारी वर्णने खोटी आहेत . तसं काही होणार नाही , त्याहून भयंकर होणार आहे .......प्रलय येणार आहे आणि आपल्याला विळख्यात घेणार आहे , जर आपण लवकरच कृती केली नाही तर प्रलय कोणीच थांबवू शकणार नाही........

त्यावेळी बराच जणांच्या चेहऱ्यावर ती त्याला प्रश्न चिन्ह दिसले मंदारने अजून सविस्तर सांगायला सुरुवात केली......

" तुम्हाला जास्तीत जास्त वाईट काय माहित आहे ......तर ती माहित आहे काळी भिंत , भिंतीपलीकडील महाल आणि त्यातील सम्राट ...।।त्याची खरी कथा कोणालाच माहित नाही . ज्यावेळी भिंत बांधली होती . त्यावेळी मी जिवंत होतो . मला त्याची कहाणी माहित आहे . पण पण त्याहूनही भयानक काहीतरी आहे हे कुणाला माहीतच नाही , आणि त्याहूनही भयानक आहे तो म्हणजे प्रलय .....

त्यावेळी सैन्याची तुकडी घेऊन काळी भिंत पाडण्यासाठी निघालेला अभिजीत अद्वैत म्हणाला.....

" तुम्हाला चूकीचं ठरवण्याचा माझा उद्देश नाही , पण मी स्वतः सैनिकांची तुकडी घेऊन काळी भिंत पाडण्यासाठी गेलो होतो . त्या ठिकाणी मी जे काही पाहिलं त्याच्याहून भयानक या जगात काहीच असू शकणार नाही....

हा तोच अभिजीत अद्वैत होता . ज्याच्या तुकडीची संपूर्ण विल्हेवाट त्यां अंवभक्तांनी लावली होती......

" मला माहित आहे अभिजीत अद्वैत ..... तू काय पाहिलं असशील......? तंत्रज्ञ मंदार

" नाही , तुम्हाला कल्पना येऊ शकत नाही . त्या पंधरा लोकांनी , त्या फक्त पंधरा लोकांनी आमच्या तीनशे जणांच्या तुकडीचा संपूर्ण निकाल लावला . आमची तुकडी साधीसुधी नव्हती . संपूर्ण पृथ्वीतलावर सर्वात पराक्रमी , अनुभवी असलेल्या आमची तुकडी , तुकडीतील 300 सैनिक , या साऱ्यांच्या बरोबर युद्ध करून त्यांना पराभूत केलं , फक्त पंधरा लोकांनी .....आणि त्यानंतर ते जे काही कृत्य करत होते ते तर कोणाही माणसाच्या अंगावरती काटा आणणारा होतं . ही लोक जर भिंतीपलीकडे असतील तर भिंतीहून भयानक या जगात काहीच असू शकत नाही ......

" अद्वैता मला माहित आहे तू काही अंधभक्तांना पाहिलं असशील पण अंधभक्त हे भिंतीचे नाहीत तर दक्षिणेकडील देवाची आपत्ये आहेत . त्यांना बासरीचा ठराविक धुनीवरती आपल्या ताब्यात करता येते . आणि पूर्वीप्रमाणे मनुष्यात आणता येते , त्यात काही फारसं अवघड नाही ; पण त्याहून अवघड आहे ती म्हणजे काळी भिंत आणि काळ या भिंतीहुन भयानक आहे तो म्हणजे प्रलय ........

यावेळी प्रथमच भिल्लव बोलत होता ,
तो म्हणाला " अंधभक्त जर काहीच नसेल , तर भिंतीपलीकडे त्याहून भयानक असे काय आहे.....?

" काळा भिंतीची खरी गोष्ट कुणालाच माहीत नाही ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या ऐकिव आहेत . आज मी तुम्हाला कळ्या भिंतीची खरी गोष्ट सांगतो जी मी स्वतः अनुभवलेली आहे.....
मंदारने काळ्या भिंतीची गोष्ट सांगायला सुरुवात केली . ज्यावेळी भिंत बांधली जात होती आणि त्या पूर्वी घडलेल्या बऱ्याच गोष्टी या साऱ्या गोष्टींचा जिवंत साक्षीदार फक्त मंदार होता , आणि तो आता भिंतीची गोष्ट साऱ्यांना सांगत होता... त्याने बोलायला सुरुवात केली........

" या पृथ्वीतलावरती अजूनही बऱ्याचशा जागा आहेत ज्या जागांवर ती मनुष्याला जाणे अशक्य आहे किंवा मनुष्याचे जाणे निषिद्ध आहे प. ण मनुष्य नेहमीच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहिलेला आहे . त्याची ही उत्सुकता बऱ्याच वेळा त्याच्या विनाशाचे कारण बनते . मनुष्याने उत्सुक असाल तरी निसर्गाच्या विरुद्ध , निसर्गनियमांच्या विरुद्ध जाणे त्याने टाळले पाहिजे . ज्यावेळी चालत आलेल्या गोष्टींच्या विरोधात जाऊन त्यांना काही करायचा प्रयत्न केला त्यावेळी निसर्गाने त्याला धडा शिकवला आहे . काळ्या भिंतीच्या गोष्टीचीही सुरुवात अशा गोष्टींनीच होते.....

" मनुष्याला नेहमीच सत्ता व संपत्ती याची हाव राहिलेली आहे . प्रत्येक मनुष्य या दोन गोष्टींच्या प्राप्तीसाठी संपूर्ण आयुष्यभर धडपडत असतो . प्रत्येकाला या गोष्टी हव्या असतात आणि या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबण्याचा तो प्रयत्न करत असतो . फार पूर्वी , पृथ्वीवर एकछत्री राज्य येण्यापूर्वी , ज्यावेळी पृथ्वीवर छोट्या छोट्या भूभागावर , गावागावात राज्य असायचे त्या काळी.....
एका छोट्याश्या गावाचा राजा होता तो . त्यालाही संपत्तीची हाव होती . त्यालाही सत्ता हवी होती . तो एका गावाचा अधिपती होता . त्याच्याकडे एका गावाची सत्ता होती . पण त्याने त्याची हौस भागली नाही . त्याने गावातील तरुणांना गोळा करून अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली . त्याने स्वतःचे सैन्य बनवायला सुरुवात केली . सैन्य बनवून आजूबाजूची गावे त्याने जिंकायला सुरुवात केली....

एकापाठोपाठ एक गावे तो जिंकत गेला . त्यांच्या आजूबाजूची जेवढी म्हणून मनुष्यवस्ती होती ती सर्व त्याने त्याच्या अधिपत्याखाली आणली तो त्या प्रदेशाचा राजा झाला . जो गाव तो जिंकायचा त्या गावातील काही तरुणींबरोबर तो लग्न करायचा . असे करता करता त्याच्या शेकडो राण्या झाल्या . त्याचे एक छोटेसे राज्य तयार झाले . मग त्याने त्या राज्यासाठी महाल बांधायला सुरुवात केली......

तो राजा सुखी समाधानी झाला होता . त्याचे स्वतःचे छोटेसे राज्य होतं . त्याला वाटलं आपल्याला जे मिळवायचे होतं ते आपण मिळवले आहे...... त्याने राज महाल बांधला व त्याच्या राण्या बरोबर तो राजमहाला मध्ये राहू लागला .. तो राण्यांना घेऊन समुद्रकिनारी जलक्रीडा करण्यासाठी जात असे . त्या दिवशीही तसाच तो त्याच्या रिण्यांबरोबर समुद्रकिनारी गेला होता , पण समुद्रात दूरवर ती त्याला काहीतरी हालचाल दिसली . समुद्रात कोणता तरी विचित्र प्राणी त्याला दिसला . त्यांनी त्याच्या सैनिकांना बोलावले व छोटीशी नाव काढून ते त्या ठिकाणी जायला निघाले . जेव्हा ते त्या प्राण्याच्या जवळ गेले तेव्हा त्याला जाणवले की तो कोणत्याही प्रकारचा प्राणी नव्हता तर भली मोठी नाव होती । त्याने इतकी मोठी नाव त्याच्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते तो ती नाव पाहून हबकून गेला .

त्याला वाटलं होतं समुद्र किनाऱ्या पलीकडे देवांची वस्ती आहे आणि साक्षात देवच त्याच्या भेटीसाठी आले आहेत . पण त्याला माहित नव्हतं ती ही माणसे होती आणि समुद्रकिनाऱ्या पलीकडे अजून जमीन होती , भली मोठी जमीन होती आणि त्या जमिनीवर तीही अनेक राज्ये होते , ज्यांचे अनेक राजे होते.... त्या मोठ्या जहाजावरील माणसांना, नि ह्या बेटावरील राजाला एकमेकांची भाषा समजत नव्हती . पण जहाजावरील माणसांनी या राजाला बंदी बनवले व याला घेऊन त्यांच्या राज्यात गेले....

जेव्हा बेटाचा राजा त्यांच्या शहरात फिरत होता त्यावेळी तेथील गोष्टी पाहून तो वारंवार आश्चर्य करत होता . तेथील इमारती , तेथील रस्ते सर्वच त्याला नवीन होता. त्याच्या संपूर्ण जमाती मध्ये पहिल्यांदाच तो या भूमीवर ती आला होता . त्याला वाटलं होतं त्या बेटावरतीच तेवढे जग आहे , आणि मी संपूर्ण जगाचा राजा झालो आहे . त्या लोकांना संपूर्ण जगाची माहिती नव्हती , पण याला आता संपूर्ण जगाची माहिती झाली होती . त्याला कळलं होतं जग खूप मोठा आहे , त्यात खूप राज्ये आहेत , खूप बेटे , आहेत खूप लोक आहेत.... आणि तरीही त्याला संपूर्ण जगावर राज्य करण्याची इच्छा झाली होती ......

त्याला कैदी म्हणून त्या राज्याचा राजा समोर पेश केलं होतं , पण त्या राज्याला बेटावरील लोकांची भाषा येत होती.....
तो राजा बेटावरील लोकांच्या भाषेत त्याला म्हणाला.....
" क्षमा करा , आमच्या सैनिकांकडून चूक झाली . त्यांना तुमची भाषा समजत नसल्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज झाला असावा .........
आणि त्या राजाने त्याच्या सैनिकांना बेटावरील लोकांना सोडण्याचे आदेश दिली...
" आपला परिचय .....
त्या राज्याच्या राज्याने बेटावरील राजाला विचारले..।
" मला तुमच्या राज्यांचे ते जहाज दिसेपर्यंत असेच वाटत होते कि मी या संपूर्ण जगताचा राजा आहे..... पण मला आता कळाले ला आहे मी फक्त त्या बेटाचाच राजा आहे....
" त्या बेटावरतीही आता एक राजा आहे म्हणायचा . मागच्या दशकापासून त्या बेटा सोबत आमचा संपर्क तुटला आहे...... मागच्या वेळी मी जेव्हा भेटा वरती आलो होतो त्यावेळी एका टोळीकडून आम्हाला लागणारी खनिजे आम्ही उकरून घेतली होती.....
" सर्व टोळ्यांना एकत्र करून , काही जणांबरोबर युद्ध करून , काही जणांबरोबर नातं जोडून , काहीजणांना मुळापासून उपटून टाकून मी बेटावरती साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे आणि तुमच्या लोकांनी मला बंदी बनवून आणलं हे काही मला आवडलेला नाही....

" मी माझ्या लोकांच्या वागणुकी बद्दल क्षमा मागतो . तुम्ही काही दिवस , तुम्हाला जेवढं वाटतं तेवढंच ,आमच्या राज्यात वास्तव्य करा , आमच्या पाहुणचाराचा लाभ घ्या , ज्यावेळी तुमचं समाधान होईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या राज्यात सोडू......

तो राजा बरेच दिवस तेथे राहिला . तेथील भाषा , समाज , रूढी , परंपरा , प्रथा इतर शास्त्रे , युद्ध , युद्ध कला आणि त्यांची शस्त्रे ......। त्याने सर्व काही शिकून घेतलं बरेच दिवस राहिल्यानंतर त्याला त्या ठिकाणचे राजकारणही समजलं....... तुझ्या राज्यात राहत होता ते राज्य पृथ्वीतलावर फार मोठं नव्हतं पण त्याच्याकडे बरीच साधनसंपत्ती होती , पण सैन्याच्या बाबतीत ते राज्य मागं होतं . त्यामुळे त्या राज्याला बऱ्याच वेळा इतर राज्याकडून त्रास सहन करावा लागे व कर म्हणून त्याच्या जवळील बरीच साधनसंपत्ती इतर राज्यांना द्यावी लागे. हे सर्व जाणून घेऊन तो राजा त्याच्या बेटावर आला....

ज्यावेळी तो बेटावरून माघारी आला , पुन्हा त्याच राज्यात . त्यावेळी त्याच्या जवळ बऱ्याच गोष्टी होत्या . ज्या शस्त्र म्हणून वापरता येण्यासारख्या होत्या . ज्या राज्यात तो राहिला होता त्या राजाच्या मदतीने त्याने शेजारील राज्यांवर आक्रमण ठरवले . त्या राज्याचा राजा परस होता . आणि बेटावरील राज्याचे नाव वासुकी होते . वासुकी ने अशा काही गोष्टी आणल्या होत्या ज्या पाहून राजा परस हा वासुकीच्या परम मित्र झाला . वासुकी व परस राजा दोघांनी मिळून शेजारच्या राज्यावर आक्रमण केले . त्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी त्यांनी स्वतःची सैना वापरले नाही , ती सैना त्याच राज्याची होते . ज्या राज्यावर आक्रमण करणार होते त्यांची सैना त्यांच्याच विरुद्ध लढली . या साऱ्या मागे एक वाक्य होतं ते म्हणजे.....
" सिरकोडा इसाड कोते.......
हे अंधभक्तांचं प्रकरण फार मागे जातं . त्या भक्ताच्या प्रकरणाची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती . आणि हे वाक्य त्या बेटावरील भाषेतील वाक्य आहे ........

त्याच वेळी त्या उत्तरेकडील सैन्यतळाच्या अवतीभोवती मोठ्या आवाजात
" सिरकोडा इसाड कोते "
या वाक्याचा पुनरुच्चार होत होता..........

काळ्याभिंतीपाशी जलधि राज्याची सेना जमा झाली होती . भिंती पलीकडे असलेल्या त्रिशूळ सेने वरती त्यांनी आक्रमण केलं होतं . भिंतीवरती चढवलेल्या तोफा आग ओकत होत्या . धनुष्यबाण एकापाठोपाठ एक त्यांच्या काळजाचा वेध घेत होते . एवढं सगळं होऊनही त्या सैनिकाकडून कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं जणू त्यांना हल्ला करण्याचा आदेश मिळाला नव्हता......

त्याठिकाणी मृतदेहांचा खच पडला होता . रिकामी झालेली जागा भरण्यासाठी दोन्ही बाजूने आणखी सैनिक येत होते . तेही मृत पावल्यानंतर त्यांच्या वरती अजून सैनिक येतच राहिले . जिकडे तिकडे रक्ताचा चिखल झाला होता . कुठे तुटून पडलेला हात दिसायचा , कुठे पाय ....कुठे एखाद्याचे शीर ....कुठे एखाद्याचा राहिलेलं धड . सर्वत्र तुकडे झालेले अवयव विखरून पडले होते..... पण येणारे सैनिक काही कमी होत नव्हते .एका पाठोपाठ एक एक रिकाम्या झालेल्या जागा भरून निघत होत्या इतकं अफाट सैन्य भिंतीपलीकडे जमा झालं होतं ......

हल्ला करण्यापूर्वी राज्याच्या एका मंत्र्याने हल्ला न करण्याचा सुचवलं होतं . त्याचं म्हणणं होतं की सैना जरी त्रिशूळाची असली , तरी त्यात असलेले लोक आपल्या सारखेच सामान्य होते . त्यांना काहीही करून त्यांच्या सामान्य व्यवस्थित आणनं भाग होतं . पण ते कसे करायचे याचं मात्र उत्तर त्यांच्याकडे नव्हतं . त्यामुळे त्याची ही सूचना स्पष्टपणे धुडकावून लावली गेली . आणि बऱ्याच जणांच्या मतानुसार आक्रमण करण्याचं ठरलं . मात्र सुरू झाल्यानंतर कितीतरी तास आक्रमण चालू होतं , पण सैनिकांची संख्या काही कमी होत नव्हती . मढ्यांचा ढीग लागला होता तरीही सैनिक येत होते आणि जागा घेत होते.....

पण अचानक हल्ला करणारा एक सैनिक जोरात ओरडला . तोफांच्या आवाजात त्याचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही..... पण एका पाठोपाठ एक बऱ्याच सैनिकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या , आणि तोफांचा आवाज थांबला . बऱ्याच सैनिकांचे नातेवाईक त्यांना समोर दिसत होते . कोणाची आई होती , कुणाचे वडील होते . कोणाचा भाऊ होता . बरेच लोक त्यांच्या ओळखीचे त्यांना समोर दिसत होते .........

झालेला सर्व प्रकार कैरव महाराजांच्या कानावर गेला.।। आणि ही गोष्ट कानावर जाते न जाते तोच राज्यातून एक दुत संदेश घेऊन आला होता....

" राज्यातील बरेच लोक बेपत्ता झाले होते.........

याचा अर्थ त्यांच्या स्वतःच्या राज्यातीलच लोक त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भिंतीपलीकडे उभा होते . हे कसं झालं .....? काय झालं....? हे महाराजांना काही कळत नव्हतं ........?

आयुष्यमान घोडा चालवण्यात पटाईत होता . त्याने घोडा इतक्या जोरात पुढे आणला की भरत व शोनकला त्याचा पाठलाग करणे शक्य झाले नाही . उत्तरेचे जंगल पूर्व-पश्चिमेला समांतरच संपूर्ण भूखंडावरती पसरला होतं आयुष्यमानने मोहिनीला उत्तरेच्या जंगलावर उंच उडत जाताना पाहिलं होतं . याचा अर्थ तीं उत्तरेच्या जंगलातच कुठेतरी असेल असा त्याने कयास बांधला....त्यामुळे उत्तरेच्या जंगलातच पूर्व-पश्चिम असा शोध घ्यायचा आयुष्यमान ठरवलं . तो लगेच पूर्वेकडे निघाला .

आयुष्यमानने कळ्या भिंतीपाशी त्याचा शोध सुरू केला होता , पण पूर्वेकडे जाईल तसं ते जंगल अधिक घनदाट होत होतं . जंगलातील झाडे झुडपे प्राणी व पक्षी सुद्धा वाढत होते. पुढे पुढे त्याला घोड्यावरुन जाणे अशक्य झाले . तो खाली उतरला व पायी जाऊ लागला . जंगल इतके होते कि त्याला पुढे जाण्यासाठी त्याच्या तलवारीने वाट करावी लागत होती . तो बराच वेळ चालत होता . चालून चालून त्याच्या पायाला फोड आले होते . जंगलातील लहान लहान किटकामुळे संपूर्ण अंगावर ते लाल रेषा उमटल्या होत्या . जंगलात बरेच विषारी कीटक होते , त्याचा दंष झाल्यामुळे त्याला दरदरून घाम फुटला होता . तो कोणत्याही क्षणी बेशुद्ध होऊ शकत होता तरी तो चिकाटीने चालत होता. हळूहळू त्याची एकेक जाणीव कमी होत होती . त्याच्या सर्व जाणिवा बधिर झाल्या होत्या . त्याला तहान लागली होती . त्याच्या जवळील पाणी संपले होते . तो आता बेशुद्ध होऊन पडणारच तोपर्यंत समोरच्याला एक लहानसा ओढा दिसला....

त्याने कसेतरी ओढ्या पर्यंतचे अंतर पार केले . ओढ्यापाशी पोहोचल्यावर त्याने त्याचे कपडे काढत ओढ्यामध्ये उडी घेतली . त्यातील पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या शरीराची जळजळ कमी झाली . फुटणारा घाम थांबला . हळू एक एक जाणीव येऊ लागली . वरून पाझर फुटला होता , त्या दगडा जवळ जात त्याने वरून पडणारे थोडे पाणी प्याले तेव्हा त्याला हुशारी वाटली . सर्व शरीर स्वच्छ धुतले . नंतर तो त्यातून बाहेर आला पण त्याचवेळी हवेत उचलला गेला . त्याच्या पायाला दोर बांधला गेला होता . तो हवेत उलटा लटकला होता . तो नक्कीच कोणत्यातरी सापळ्यात सापडला होता , जे कोणीतरी हेतुपूर्वक त्या ठिकाणी ठेवले होते....
प्रलय-१७

ज्यावेळी आयुष्यमान हवेत उलटा लटकला . त्याच्या मानेवरती काहीतरी टोचल्या सारखे वाटले . हळूहळू त्याच्या सर्व जाणीवा व संवेदना बधीर होत गेल्या . शेवटी डोळ्यापुढे संपूर्ण अंधार पसरला . तो बेशुद्ध झाला .

ज्या वेळी त्याला जाग आली तो जमिनीवरती पालथा झोपला होता . हात वरच्या बाजूला केले होते व लोखंडी हात बेड्या ज्या जमिनीत रुतलेल्या होत्या त्याच्यात अडकवले होते . पायांच्या बाबतीतही तसंच होतं . त्याचे हात व पाय दोन्ही गुंतवले होते . जमिनीला असलेल्या त्या बेड्या मध्ये त्याचा हात व पाय गुंतवले होते . त्याच्यातून निसटणे अशक्य होते . त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती . त्याने मान वळवून इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण काही नाही , सर्वत्र अंधार होता.......

पण तेव्हाच त्याच्या कानी आवाजाची कुजबुज आली . कोणीतरी त्याठिकाणी येत होतं . त्यांनं मान वळवून पाहिलं , अंधार असल्याने त्याला काही दिसले नाही . मात्र हळूहळू त्या माणसाबरोबर खोलीत उजेड आला . त्यांच्याकडे मशाल असावी . ती दोन लहान मुले वाटत होती...

हळूहळू खोलीतल्या गोंगाट वाढत होता . ती दोन लहान मुले आपापसात वेगळ्याच भाषेत बोलत होती . त्यांचं एकमेकात भांडण चाललं असल्यासारखं वाटत होतं.भांडता भांडता त्यातील एकाने कोणतीतरी साखळी ओढल्यासारखा आवाज आला . आयुष्यमान हळूहळू वर जात होता . त्याला इतका वेळ वाटत होतं की तो जमिनीवरती आहे मात्र तो एका छळणीयंत्रावरती बांधलेला होता ...... त्याच्या हाता पाया वरील बेड्यांची य पकड सैल झाली . त्याच्या समोर असलेली फळी काढून घेतली . त्याला आता खोलीतील सर्व देखावा दिसत होता.....

जी दोन मुले भांडत होती ती दोन मुले नव्हती . आयुष्यमानला आता कळलं की ते दोन बुटके होते . ते दोघे नवरा-बायको असावेत असं वाटत होतं . त्या खोलीत एक दिवा व ते छळणी यंत्र सोडलं तर दुसरं काहीच नव्हतं . एखाद्या तळघराच्या खोलीसारखी ती खोली वाटत होती .

बुटक्यांची प्रजात ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय आला होता त्या वेळीच नष्ट झाली होती असं म्हणतात . पाच ते सहा वितांचे हे बुटके असायचे . पण हे दोन बुटके जिवंत कसे राहिले ...? या जंगलात काय करत होते....? आणि त्यांनी आयुष्यमानला का पकडलं होतं हे काही कळायला मार्ग नव्हता.....? आयुष्यमान ला मोहीनीची आठवण येत होती . तिला शोधण्यासाठी तो निघाला होता , मात्र वाटेत या बुटक्यांनी पकडला . त्याला त्या बुटक्यांचा भयानक राग आला . तो त्यांच्यावरती संतापला . त्याने सैल झालेल्या बेड्यातून सुटायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला . ते बुटके त्याच्यावरती जोर-जोरात हसू लागले.... त्यामुळे आयुष्यमानला अजूनच राग आला . तो रागाच्या भरात बोलून गेला.....
" आयुष्याच्या घटका भरल्या आहेत . तुमचा दोघांचा मृत्यू फार दूर नाही......
हे ऐकून ते दोघे पुन्हा जोरजोरात हसू लागले . त्यातला बुटका त्याच्या बायकोला उद्देशून म्हणाला ....

" याचं मांस खायला मज्जा येईल असं वाटतंय . खूप गर्मी आहे याच्यात . कितीतरी वर्ष झाला आपण असलं मांस खाल्लेले नाही.....
म्हणजे त्यांनी त्याला भक्ष्य म्हणून पकडलं होतं . त्याला त्याच्याबद्दल , त्यांच्या इतिहासाबद्दल फार काही माहिती नव्हती . पण ते नरभक्षी नव्हते हे त्याला माहीत होतं . त्यामुळे त्याला वाटलं हे बुटके त्याला घाबरवण्यासाठी मुद्दामून अशा गोष्टी करत आहेत . त्यामुळे तो म्हणाला...
" बुटके कधीच नरभक्षी नव्हते . तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न केला , पण मी घाबरणारात्याला नाही.....
त्यावेळी त्या त्याला खूप राग आला . त्याचा चेहरा रागाने फारच विचित्र दिसत होता . बाजूला पडलेला लखलखता चाकू घेत त्याने आयुष्यमानच्या डाव्या हाताची करंगळी कापून बाजूला काढली....
आयुष्यमान वेदनेने जोराने ओरडला . त्याचा डावा हात बधीर झाला. त्यातून पडणारा रक्ताचा थांबवत बुटका म्हणाला
" मग तुला हे ही माहीत असेल की बुटके कधी खोटं बोलत नसतात.......
असं म्हणत त्याने ती करंगळी तोंडात टाकली व करकरून चावत तो करंगळी मजेने खाऊ लागला . आयुष्यमानचि डावा हात बधीर झाला होता . तो पुन्हा बेशुद्ध होतो की काय असे त्याला वाटत होतं , आणि समोरचे दृश्य पाहून त्याला पोटात मळमळू लागले . त्याला ओकारी आली . त्याच्या डोळ्यापुढे सारकाही फिरत होतं . त्याला खूप भीती वाटली . आयुष्यात पहिल्यांदाच इतका घाबरला होता.....

वारसदाराच्या सभेत जाण्यापूर्वी ही नि सभेत गेल्यानंतरही त्याने बरेच अनुभव घेतले होते . बऱ्याच गोष्टींना सामोरे गेला होता . पण त्याला इतकी भीती कधीच वाटली नव्हती . तो मृत्यूलाही कधी घाबरला नव्हता , पण आता त्याला मृत्युंहुन भयानक भीती समोर दिसत होती.....

उत्तरेला असलेल्या सैनिकी तळाभोवती अंध भक्तांचा गराडा पडला होता . सर्वजण मध्यभागी गोळा झाले होते . बाजूला उभे राहून अंधभक्त त्यांची घोषणा देत होते . कोणताही अंधभक्त पुढे सरत नव्हता .

" सिरकोडा इसाड कोते ....
फक्त हाच आवाज ऐकू येत होता . शंभरच्या वर तरी अंधभक्त त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले असावेत....

" दक्षिणेच्या देव जेव्हा जागृत होतो तेव्हा अंधभक्त तयार होतात पण दक्षिणेचा देव दक्षिणेकडे भक्त उत्तरेत काय करत आहेत .... "
सुरक्षा प्रमुख रघूराम म्हणाला....
" अंधभक्त आणि दक्षिणेचा देव यांचा काही संबंध नाही . ज्यांना थोडस तंत्र माहीत आहे . तो भक्तांना जागृत करु शकतो . नक्कीच आपल्यातल्याच कोणाचातरी काम आहे , ज्यांना हा उत्तरेतील सैनिक तळ नको आहे , त्यांनी भक्तांना पाठवलं असावं .....
त्यावेळी भिल्लव म्हणाला....
" म्हणजे महाराज विक्रमांना भक्तांना जागृत करण्याची किवा महाराज विक्रमांचे एखाद्या विश्वासुला भक्तांना जागृत करण्याची पद्धत माहीत आहे का काय.....

" तुला काय वाटतं भिल्लवा महाराज विक्रम ते स्वतः भक्त अंधभक्त असू शकत नाहीत......

त्यावेळी अद्वैत म्हणाला ...
" ते काहीही असो. ते फक्त पंधराजन होते . त्यांनी आमच्या तीनशे जणांच्या तुकडेच हाल बेहाल केलं होतं..... आता तर शंभरच्या वर आहेत . आपण यांच्याशी लढा देऊ शकत नाही . हे अनैसर्गिक आहे.......

त्यावेळी मंदार म्हणाला " म्हणूनच मी मघाशी म्हणालो होतो निसर्गाच्या विरोधात गेलं की निसर्ग त्याचा हिसका बरोबर दाखवतो ....
असं म्हणत त्याने आपल्या पिशवीतून पुन्हा एकदा शिट्टी काढली आणि मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात केली....... शिट्टीचा आवाज सर्व पर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचावा म्हणून त्याने तिच्यासमोर ध्वनिवर्धक धरला होता . त्या ध्वनिवर्धकामुळे शिट्टीचा आवाज फारच मोठा झाला होता .
त्या शिट्टीची धून बाटी समाजाच्या बासरी प्रमाणानेच होती . फक्त थोडासा फरक होता . ती धून ऐकताच भक्तांची घोषणा बंद झाली व ते हळू हळू शांत होवू लागले . आणि आल्या पावली परतू लागले......

त्याच वेळी कोणीतरी झाडावरून तंत्रज्ञ मंदाररावरती चाकू फेकून मारला . त्या चाकूचा घाव मंदारच्या हृदयाजवळ झाला . तो खाली कोसळला . त्याबरोबर आल्या पावली परत निघणारे अंधभक्त पुन्हा मोठ्या आवाजात घोषणा देत पुढे सरकू लागले......

सर्व सैनिक त्या गोलाच्या बाहेरच्या बाजूला झाले व आत सामान्य नागरिक होते . अंधभक्त आता पुढे सरकत होते . एक सैनिक त्वेषाने चालून गेला , त्याने तलवारीचे घाव केले . अंध भक्ताने चपळतेने सर्व गाव चुकवले व त्याचीच तलवार घेऊन त्या सैनिकांचे शिर धडापासून वेगळे केले......

त्या सैनिकाचे धडावेगळे झालेले शरीर पाहून सर्व सैनिकांना राग आला . अधिरथ तावातावाने आपली तलवार घेऊन पुढे चालत गेला . त्याने एका अंधभक्त वरती वार केला . तो भक्त त्याचे वार चपळतेने चुकवायचा प्रयत्न करत होता , पण अधिरथ सारखा पट्टीचा तलवारबाज संपूर्ण राज्यात नव्हता . बराच वेळ त्यांचं ते द्वंद्व चालू होतं . अधिरथ वार करायचा आणि तो भक्त चुकवायचा . शेवटी अधिरतने त्या भक्ताचे दोन्ही हात खांद्यापासून वेगळा केले . नंतर त्याने त्याचे शीर धडापासून वेगळे केले . काही मिनिटांसाठीच हे द्वंद्व चाललं होतं . इतरांना फक्त जलद हालचाली दिसल्या होत्या .फक्त एका अंधभक्ता बरोबर लढूनच अधिरथ ला थकवा आल्यासारखे वाटत होते .तो चक्कर आल्यासारखं होऊन खाली पडला . आता त्याच्या वरती एकदम चार ते पाच अंधभक्त चालून आले होते . भिल्लव , अद्वैत व इतर सैनिक अधिरताचा बचाव करण्यासाठी पुढे सरले... त्याचवेळी आवाज आला .....
" थांबा आपल्याला कोणतीही जीवित हानी नको आहे.....
त्यांच्यासमोर झाडावरती एक काळसर आकृती साकारली होती . ती काळसर आकृती कसल्यातरी काळसर ढगावरती किंवा पक्ष्यावरती असल्यासारखे वाटत होते... तो आवाज खर्जातला होता.....
" महाराणीचा लहान पुत्र म्हणजेच नवीन राजकुमार , फक्त त्यांना घ्या व माघारी फिरा .....इतर एकाचीही जीवितहानी आपल्याला नको आहे.......

पुन्हा एकदा भक्त त्वेषाने पुढे सरले . वाटेत जो कोणी येत होता त्याला ते बाजूला सारत होते , नाही झाला तर बेशुद्ध करत होते आणि पुढे सरत होते . त्यांना आता कोणीच थांबवू शकत नव्हतं . महाराणी शकुंतलेच्या कुशीत असलेल्या नवीन राजकुमारा वरती हे संकट आलं होतं......

त्रिशूळांच्या सैन्याबरोबर सुरू असलेल्या जलधि राज्याचं युद्ध थांबलं होतं . बऱ्याच सामान्य लोकांचे त्यात जीव गेले होते , जे सैनिक म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिले होते . काळ्या भिंतीपलीकडे असलेली त्रिशूळ सैना आणि त्यामध्ये असलेले सामान्य लोक . त्यांना कसेही करून त्यांच्या सामान्य स्थितीत आणायला हवं होतं . हे कसं शक्य झालं आणि ते लोक भिंतीपलीकडील सैन्यात कसे गेले हेही शोधायला हवं होतं . सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आले होते आणि काय करायचे याचा विचार करत होते .....? पलीकडे जाऊन एका त्रिशूळ सैनिकाला धरून त्यांनी अलीकडे आणलं होतं . त्याला समोर उभा केलं होतं . पण तो पुन्हा पुन्हा बोललं तरीही शांतच राहत होता . तो बोलतच नव्हता जणू काही तो कोणाला ओळखतच नव्हता . अलीकडे आणलेला तो सैनिक दुसरा दुसरा कोणी नव्हता तर राज्याच्या सेनापतीचा पुत्र होता , ज्याने अजून वयाची सोळावी ही ओलांडली नव्हती......

त्याठिकाणी कोणाचीच काहीच बुद्धी चालत नव्हती . सर्वांनी राजमहश्री सोमदत्तना काहीतरी बोलण्याची विनंती केली . त्यावेळी राजमहर्षी सोमदत्त उभारले व बोलू लागले......

" कोणतीही गोष्ट नष्ट करण्यासाठी ती कशाची व कोणत्या गोष्टी पासून बनलेली आहे हे माहीत असणं गरजेचं असतं . जर आपल्याला त्रिशूळाची सेना नष्ट करायची असेल किंवा आपल्या लोकांना आपल्या माणसात आणायचं असेल तर ते त्रिशुळाचे सैनिक बनले कसे हे जाणून घ्यावे लागेल......
त्रिशूळ तलवार व धनुष्यबाण या तिन्ही सेना भिंतीपलीकडे सम्राटाने बनवल्या होता । ज्यावेळी काळी भिंत बांधली , त्याच्याही आधी या अस्तित्वात होत्या . तो वेळोवेळी या सेना बनवायच्या नंतर तो या गरज संपल्यानंतर नष्टही करून टाकायचा.....

तुम्ही त्या त्रिशूळ सैनिकाच्या पाठीवरती पहा , एक त्रिशूळाचा व्रण असेल . "

सर्वांनी त्या सेनापतीच्या मुलाच्या पाठीवरती पाहिलं . एक तापलेला त्रिशूळ पाठीवर ठेवल्यानंतर जसा व्रण होतो तसा भलामोठा व्रण त्याच्या पाठीवरती होता.....

" तो कसा बनवला गेला तसाच नष्ट करता येऊ शकतो . त्यासाठी फक्त आपल्याला काळ्या महालाच्या शस्त्रागारात असलेला तो त्रिशूळ आणावा लागेल......
तो त्रिशूळ आणण्यासाठी आपल्याला गती हवी आहे आणि गतीसाठी उडत्या बेटांच्या मदतीशिवाय आपल्याला पर्याय नाही .....
प्रलय-१८

भिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता . त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते , पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता . नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता .

त्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते . पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले . मात्र ते वर जाण्याआधीच तळघराचा दरवाजा तोडत काहीतरी आत आले . खोलीत अंधार असल्यामुळे नक्की काय होतं ते कळत नव्हतं . ते तळघराच्या पायर्‍या उतरत होती खाली आले . आयुष्यमान जवळ जात त्याने आयुष्यमान छातीवर काहीतरी टेकवले.....

खाली आलेला प्राणी होता . त्यांन आयुष्यमानच्या छातीवरती आपल्या शेपटीचा टोक टेकवलं होतं . त्याच्या शेपटीच्या टोकाला वर्तुळाकार होता . लोखंडासारखा तापलेला तो गोलाकार आयुष्यमान छातीवर टेकल्यानंतर आयुष्यमान वेदनेने जोरात किंचाळला . त्याच्या छातीवरती कसलीतरी चिन्ह तयार झालं होतं . त्या प्राण्याने त्याला ज्या छळणी यंत्रावर ती बांधलं होतं ते तोडून टाकलं . आयुष्यमान आता जमिनीवरती पडला होता......

ज्यावेळी त्या प्राण्याने आयुष्यमानच्या छातीवरती ते चिन्ह उमटलं . त्यावेळी आयुष्यमान च्या डोक्यात आठवणींचा कल्लोळ माजला . त्या आठवणी फक्त त्याच्या आयुष्यातील नव्हत्या , तर विचित्र होत्या . त्या कधी त्याने अनुभवल्या नव्हत्या . कितीतरी आठवणी होत्या ....एकामागून एक आठवणी त्याच्या डोक्यात नव्याने निर्माण झाल्या होत्या . अचानक आलेल्या या सार्‍या आठवणी मुळे तो चक्रावून गेला . त्याचं डोकं भणभणू लागलं . डोळ्यासमोर चित्र विचित्र दृश्ये दिसू लागली . आठवणींच्या डोंगराखाली त्याचा जीव गुदमरून चालला होता.....

' त्याला दिसत होती काळी भिंत . तिथे विक्रम उभा होता . बाजूला त्याचे सैनिक , ती भिंत पडत होती......
' त्याला दिसत होते अंधभक्त ते सामान्य नागरिकांना मारत होते......
' त्याला त्रिशूळ , तलवार आणि धनुष्‍यबाण सैना दिसत होत्या...
' त्याला संपूर्ण पृथ्वीचा राजा दिसत होता . त्याचे तीन राजपुत्र दिसत होते...
' त्याला पहिला प्रलयकाळ दिसला . ज्यावेळी सर्व माणसे एकमेकांची शत्रू झाली होती . पृथ्वीवरून माणूस ही प्रजाती नष्ट होणार होती . सर्वत्र त्याचं साम्राज्य असणार होतं . सर्वत्र प्रलय माजला होता........

ते दृश्य पाहून आयुष्यमानच्या डोक्याच्या ठिकऱ्या उडायच्या बाकी राहिल्या होत्या . तो वेदनेने बेशुद्ध झाला...........

जंगली सेनेच्या प्रमुखाचा तळ त्याठिकाणी होता . जंगली सेनेच्या अनेक टोळ्या संपूर्ण जंगलात विखुरलेल्या होत्या . त्या दोघींनी मुख्य तळावर जाण्यासाठी असलेल्या पाहऱ्याच्या तीनही टोळ्या पार केल्या . पण जेव्हा त्या आत गेल्या तेव्हा तेथील सैनिकांनी त्यांना बंदी बनवलं . दोघेही गुपचूप बंदी झाल्या.....

जंगली सैन्याची आता सभा होणार होती . त्यांना त्यांच्या प्रमुख समोर नेण्यात आले . आजूबाजूला सर्व नागरिक व सैनिक उपस्थित होते.....

" या दोघीसाठी तर कोणीही तयार होईल ........
बोला तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात.....?
तुमच्या इकडे पुरुषांची कमी आहे काय.....?

त्या प्रमुखाच्या डोळ्यात वासना होती . बोलण्यात गर्व होता ...... आरुषीने सरळ मुद्याला हात घालतात बोलायला सुरुवात केली...
" तुम्ही माझ्या आदेशा खाली माझे सैनिक होऊन माझ्यासाठी लढायला येणार आहात . मी तुम्हाला आदेश देते , तुमचे सर्व सैनिक घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला......
आरुषीच्या वाक्याबरोबर त्याठिकाणी हास्याचे फवारे उडाले . सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले.....
" आमच्या येथे बायका फक्त झोपण्यासाठी , पुढचा वारस देण्यासाठी आणि आणलेलं अन्न बनवून घालण्यासाठी असतात . बाकी गोष्टी बोलायचा त्यांना अधिकार नसतो...... माझ्या राणीचा आदेश देखील येथील सैनिक मानत नाहीत , मग तू तर कोण कुठली......?
" मी शेवटचे सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही माझा राणी म्हणून स्वीकार करा ......अन्यथा तुम्हाला तुमच्या मृत्यूला सामोरे जावे लागले....
" आमच्या येथे राणी होण्यासाठी प्रमुखा बरोबर एक रात्र झोपावे लागते........
त्याठिकाणी असलेल्या प्रमुखाच्या शेजारी उभा असलेला एक सैनिक निर्लज्जपणे बोलला . त्याबरोबर पुन्हा एकदा सर्वजण हसू लागले . आरूषीने मोहिनी कडे बघितले .
" फक्त जो बोलला त्यालाच....
मोहिनीने काही क्षणासाठी डोळे झाकले....
जो सैनिक ते वाक्य बोलला होता त्याचं शीर धडापासून वेगळे झालं होतं .
जंगली सेनेकडे असलेल्या प्रमुख प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे जुगलू.... ते सामान्यता छोटे असतात आणि प्रत्येक जंगली कडे एक जुगलू असतोच. ते सांगेल ते काम करतात . प्रत्येकाच्या पाठीवर असलेल्या दोरीला एक छोटीशी झोळी असते त्या झोळीमध्ये जुगलू असतोच ........

त्याचे शीर जेव्हा धडापासून वेगळे झाले आणि रक्ताचे शिंतोडे उडाले ; त्यावेळी सर्वजण अवाक् झाले भीतीने घाबरले....
" म्हणून मी म्हणते , तुम्हाला अजून जीवितहानी नको असेल ; तर आत्ताच्या आत्ता माझा राणी म्हनून स्विकार करा..... परंपरेने चालत आलेल्या मारुती घराण्याची मी वंशज आहे . या संपूर्ण पृथ्वीतलावर माझा अधिकार आहे . म्हणून मी तुम्हाला आदेश देण्यास पात्र आहे....

पण आरुषीचे हे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच आजूबाजूला उभे असलेले चार-पाच जंगली त्याच्यांवरती धावून आले . त्याबरोबर मोहिनी त्यांच्या त्यांच्या जुगुलुचा वापर करून त्या चारही जंगली लोकांची शीरे धडापासून वेगळी केली ......

त्याच वेळी आजूबाजूला असलेल्या सर्व चांगली लोकांनी संतापून आवाज काढायला सुरुवात केली . मोहिनीने तिचे डोळे झाकले . जंगली लोकांकडे प्रामुख्याने तीन प्रकारचे प्राणी होते . त्यातील एक म्हणजे जुगलू , दुसरे म्हणजे घोडे ... हे दोन प्राणी जास्त प्रमाणात होते . जेव्हा जंगली बाहेर भेटायला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर हे दोन प्राणी हमखास असायचे . तिसरा प्राणी फक्त जंगलातच असायचा व जंगलातील तळाची सुरक्षा करण्यासाठी वापरले जायचा...
तिसरा प्राणी म्हणजे शिकारी कुत्रा . हे कुत्रे नेहमीच्या कुत्र्यापेक्षा मोठे होते....

जंगली लोकांचे घोडे इतर सर्व घोड्यापेक्षा पेक्षा हुशार असत . असे म्हणतात त्यांच्यावर ती लावून दिलेली लुट ते बरोबर त्यांच्या तळावर नेऊन सोडतात . त्यांना म्हणे ठिकाणांची नावे सांगितली की ती त्या ठिकाणी पोहोचवतात ......

मोहिनीने जेव्हा डोळे उघडले , त्यावेळी प्रत्येक जंगलीच्या गळ्यावरती तलवार होते , ती तलवार त्याच्या जुगलूनेच धरली होती.....।।।

" जर तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल तर तुम्ही हालचाल कराल अन्यथा मी जे बोलत आहे ते ऐकाल मारुतांची बारावी वंशज , मी मोहिनी संपूर्ण पृथ्वीतलाची राणी तुम्हाला आदेश देत आहे , तुमच्या सर्व टोळ्यांना व त्यांच्या सैनिकांना एकत्र करा ....आपण संसाधन राज्यावर आक्रमण करणार आहोत.....

त्यावेळी जंगली लोकांचा प्रमुख चालत पुढे येऊ लागला.....
" परंपरेने असलेले राजा आणि राणी आम्ही जंगली लोक मानत नाही . आम्ही राजा व राणीची निवड करतो . प्रत्येक टोळीचा प्रमुख प्रमुखाची निवड करतो . ज्यावेळी जुना प्रमुख म्हातारा होतो , त्यावेळी ही निवड प्रक्रिया असते . निवडीसाठी प्रत्येक जंगलीला युद्ध खेळावं लागतं . त्या युद्धात समोरच्याला हरवावे लागतं......
तेही नीतिमत्ता आणि नियमाने.....

प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही
कुणापुढे स्वतःचं मस्तक झुकवत नाही......

पुढचं बोलल्या अगोदरच आरुषीने मोहनीला त्याचं मस्तक उडवायला सांगितलं . त्याच्या जुगुलूने तलवार चालवतात त्याचं मस्तक धडावेगळे केले.....
सर्व जंगली मध्ये संतापाची लाट पसरली.....
पण कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही . त्याच वेळी प्रमुखाची पत्नी पुढे येऊ लागली तिचाही मस्तक धडावेगळे केले .......

प्रमुखाला असलेली दोन लहान मुले पुढे येण्याची धडपड करत होती पण जंगली लोकांनी त्यांना थांबवून ठेवणार सर्वांची मस्तके आरुषी पुढे झुकले होते पण त्यांच्या नजरेत संताप होता . संधी मिळताच ते आरुषीला मारायलाही मागेपुढे बघणार नव्हते .....

आरुषीने रुद्राला पुढे बोलावलं त्याच्याकडे हात करत ती म्हणाली......
" हा तुमचा नवीन प्रमुख असेल .....
पण आरुषीचं हे वाक्य पूर्ण होण्याअगोदर कुणीतरी चाकू फेकून मारला . आरुषीच्या खांद्याला जखम झाली..........

तो एक लहान मुलगा होता . दहा वर्षाचा असेल .
" मारुन टाक त्याला......
रागाने ओरडत आरुषी म्हणाली.......
" आरूषी नको..........
असं ओरडत रुद्र त्या मुलाकडे धावला तोपर्यंत एका जुगुलूने चाकू चालवत त्याचा गळा कापला होता . गळ्यातून पडणाऱ्या रक्ताबरोबर तोही जमीनीवर पडू लागला पण जमिनीवर पडण्या अगोदर रुद्राने त्याला त्याच्या मिठीत घेतले . रुद्रा रक्ताने भरून गेला . तो मोठ्याने रडत होता.
तो रुद्राचा मुलगा होता . त्याला एका जंगली मुलीपासून पासून झाला होता.....

प्रलय-१९

जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती . त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला.....

" तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्‍या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन . ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......
ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी , किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची निवड करतो.....
मारुतांचा मुख्य पुजारी आहे , त्याच्याकडे प्रलयकारिकेस जागृत करण्याची शक्ती आहे . प्रलयकारिका त्यांची सेवा करत राहिली आहे , पण प्रलयकारिका जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा प्रलय निश्चित असतो .....
जो कोणी प्रलयकारिकेला जागृत करतो , ती त्यांची सेवा करते मात्र तिचा जन्मच प्रलयकाळ घेऊन होतो... या जगतात पहिल्यांदा जेव्हा प्रलयकारिकेला जागृत केलं गेलं होतं , त्यावेळी जो प्रलय आला त्यानंतर प्रलयकारिकेला जागृत करण्याच्या सर्व पद्धतीवरती बंदी घातली गेली होती . पण काही लोकांनी गपचूप तो अभ्यास सुरूच ठेवला . नंतर काही पूजाऱ्यांना मारुतांनी आपला राजआश्रत्र दिला . पण मारूत राजांनी कधीच प्रलयकारिकेला जागृत केलं नाही . कारण त्यांना प्रलयाची माहिती होती . मात्र काळ्या भिंतीच्या प्रकरणानंतर प्रलयाबाबत सर्वजण विसरले आहेत . त्यामुळे त्यांनी कदाचित प्रलयकारी केला जागृत केलं असावं......
त्या प्रलयकारिके चा सामना करण्यासाठी त्यावेळी काही गोष्टीची गरज होती. तिला हरवण्यासाठी किंवा तिच्या सोबत लढण्यासाठी सामान्य मनुष्य , त्याची सामान्य हत्यारे , सामान्य प्राणी काहीच करू शकत नाही... त्याच्यासाठी सुरुकुची निर्मिती केली होती . सुरुकू हा एक प्रकारचा प्राणी आहे . पण पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्यापेक्षा तो सर्वस्वी वेगळा आहे . सुरुकु स्वतःहून त्याच्या वाहकास निवडतो आणि त्या सुरूकूने तुझी निवड केलेली आहे . तू आता प्रलयकारिकेचा सामना करणार आहेस .........

" पण प्रलयकारी का कोण आहे ....? मला याबद्दल काही माहीत नाही . मी तिला कसं हरवणार....? मला माझेच वैयक्तिक भरपूर प्रश्न आहेत ....? ज्यांची उत्तरे मी शोधत आहे.....?

" तुला एक गोष्ट माहित नसेल . ती मी सांगेन .... प्रलयकारिका म्हणून एका स्त्रीचीच निवड केली जाते . आणि तिला हरवण्यासाठी सुरूकच स्वतःहून त्या स्त्रीच्या सर्वात जवळच्या पुरुषांचीच निवड करतो . तो तिचा भाऊ , वडील किंवा पती असतो....

" म्हणजे मोहिनी प्रलयकारिका आहे तर........
आयुष्यमानला धक्काच बसला होता . कारण ज्या स्त्रीच्या शोधात निघाला होता , ती प्रलय घेऊन येणार होती . आणि प्रसंग पडला तर तिला मारावे लागणार होतं.... त्याचं हृदय पिळवटून निघाले . त्यांना आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा प्रेम केलं , तेही त्याच स्त्रीवर जी स्त्री प्रलयकारिका होती . आणि त्याला स्वतःला आता तिच्या विनाशासाठी जावं लागणार होतं....

" पण मोहिनीच निवड प्रलयकारिका म्हणून का झाली.....?

" प्रलयकारिकेसाठी पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली स्त्रीचीच निवड केली जाते......

आयुष्यमान पुढे काही बोलणार होता त्याआधीच तो म्हातारा म्हणाला ....

" हे बुटके माझे नोकर आहेत जंगलातील हा महाल आणि त्याच्या संरक्षणासाठी त्यांची निवड केली आहे . त्यामुळे जो कोणी मनुष्य किंवा प्राणी इकडे येताना त्यांना दिसतो त्याबरोबर ते त्याला पकडतात . पण आम्हाला माहीत नव्हतं की तुझी निवड होणार आहे . त्यामुळे त्यांनी बोट कापलं त्याबद्दल मी क्षमा मागतो......

त्यावेळी पुन्हा एकदा तो मोठा आवाज आला . समोर असलेल्या खिडकीतून तो प्राणी आत आला . तो कक्ष भला मोठा होता त्यामुळे तो प्राणी सहजपणे आत येऊ शकला . घोड्यासारखे चार पाय , मोठे च्या मोठे पंख , लांब शेपटी व शेवटला वर्तुळाकार आणि एखाद्या पक्षाप्रमाणे लांब मान व चोच .....

" हाच सुरूकू ....
तो म्हातारा म्हणाला

सुरुकु जवळ येत आपल्या चोचीने आयुष्यमानला डवचत होता . जणू काही आयुष्यमानला तो जन्मापासून ओळखत होता......

उत्तरेच्या सैनिक दलाचे स्मशान झाले होते .
कोणाचा हात गेला होता , कोणाचे पाय जागेला नव्हते . ज्याचं सारं काही व्यवस्थित होतं तो बेशुद्धावस्थेत होता . जेव्हा एक दोघेजण शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी जे बेशुद्ध होते , पहिल्यांदा त्यांना उठवायला सुरुवात केली . नंतर त्या सर्वांनी मिळून जखमींच्या उपचारास सुरुवात केली . ते अंधभक्त एखाद्या महान योद्ध्यासारखे लढले होते . ते त्यांच्यासाठी काहीच अवघड नव्हतं . त्यांना सर्व प्रकारची युद्ध कौशल्य आत्मसात होती . त्यामुळे त्यांच्यापुढे सामान्य सैनिकांचा टिकाव लागणे कधीच शक्य नव्हते . मात्र ही सारी सामान्य माणसे त्यांच्या महाराणीसाठी , त्यांच्या राजकुमार साठी लढली होती . जखमी झाली होती . आणि हे सर्व निष्फळ ठरलं होतं . कारण राजकुमार त्याठिकाणी नव्हताच . राजकुमाराला घेऊन जाण्यात भक्त यशस्वी झाले होते......

जखमींना औषध पुरवले जात होते . जो तो ज्याच्या त्याच्या परीने उपचार करत होता . पण सारे तंत्रज्ञ मंदाराविषयी विसरूनच गेले होते . तो काहीतरी सांगत होता , त्याच्याविषयी विसरून गेले होते . तो जिवंत आहे की मृत , तो कुठे आहे याचेही त्यांना भान नव्हतं . मात्र तो तंत्रज्ञ मंदार जिवंत होता . चाकू जरी त्याच्या हृदयाजवळ लागला असला तरी त्याच्या हृदयात गेला नव्हता.....

भिल्लवाने मंदारला पाहिले . सैनिकांच्या मदतीने त्याला उचलून बाजूला घेत त्याच्या वरती उपचार केला . हृदयाच्या जवळ गेलेला चाकू काढून मलमपट्टी केली . काही वेळ अजून गेला असता तर मंदार नक्कीच मृत्युमुखी पडला असता . एवढा मोठा तंत्रज्ञ इतके वर्ष जिवंत राहिला पण या साध्या गोष्टीने त्याला मरण येणार होतं....

" अश्वराज , अश्वराजाला पाहिले का ....? तो कोठे गेला.....?
मंदार अडखळत अडखळत बोलत होता....
" नाही , आम्ही पाहिलं नाही ....... "
भिल्लव म्हणाला....
" माझी पिशवी , शिट्टी महत्त्वाची आहे .... अश्वराजला माघारी पाठवले पाहिजे ..... आता लगेच आपण नाही जाऊ शकत विक्रमाला थांबवण्यासाठी ....
तर एका सैनिकाने शिट्टी आणून मंदारजवळ दिली . त्याने शिट्टी वाजवली . अश्वराज धावत आला .
" अश्वराज परत माघारी जा , शौनकचा शोध घे.... त्याच्यासोबत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखा सोबत काळ्य विहिरीपासून पुढे निघालेल्या विक्रमाच्या सेनेकडे जा ..... शौनक जवळ दृश्य रूपांतरण कापड आहे . त्याची मदत घेऊन तुम्ही सैनिकांना परावृत्त करू शकता......लवकर निघ......

तेच दृश्य रूपांतर कापड ज्यामध्ये मंदारने तो प्रलय , त्याची काही झलक पाहिली होती . ते कापड शौनक जवळ होते . अश्वराज वाऱ्याच्या वेगाने तिकडे निघाला.....

महाराणी शकुंतला एका कोपर्‍यात बसली होती . तिचा पहिला पुत्र तिच्यासमोर जिवंत जाळला गेला . दुसरा पुत्र ' त्याच्यापासून ' झाला होता . त्या पुत्राने आता संपूर्ण पृथ्वीतल विनाशाच्या वाटेवर आणून ठेवला होता . तिसरा मुलगा जो तिचा एकमेव आशेचा किरण होता , तोही आता ' त्यानेच ' नेला होता . होय तिला माहित होतं . तो आवाज तिच्या ओळखीचा होता . ती काळी सावली तिच्या ओळखीचे होती.....

आज जो अंधभक्तांना घेऊन आला होता , तो तोच होता तोच होता , जो काही वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आला होता . तो होता ज्याने तिच्यावरती भुरळ घातली होती . तो तोच होता ज्याच्या संमोहनाखाली येऊन तिने त्याला सर्वस्व अर्पण केले . तो तोच होता ज्याच्यापासून तिला विक्रमाची प्राप्ती झाली.....

तिने त्याला ओळखले होते , पण ती काहीच बोलू शकली नाही . ती काहीच करू शकली नाही. ती त्याला विरोध करू शकली नाही . तिला स्वतःचा मनस्वी राग येत होता . ज्यावेळी तिचा पहिला पुत्र जिवंत जाळला जात होता त्यावेळी ती गप्प राहिली . ज्यावेळी तो तिच्या आयुष्यात आला त्यावेळी ती संमोहनाखाली होती . मात्र आता तसं काहीही नसताना ती त्याला विरोध करू शकली नाही . ती त्याच्याशी लढू शकली नाही . तिचं काळीज पिळवटून निघत होतं . तिला राग येत होता . तिला राग येत होता स्वतःचा , तिला राग येत होता राजा सत्यवर्माचा , तिला राग येत होता साऱ्या अंधभक्ताचा.....

पण ती काही करू शकत नव्हती . तिला माहित नव्हतं तो कोण होता . तो कुणासाठी काम करत होता . तो कशासाठी हे सर्व करत होता .....? त्यांन रक्षक राज्याचा खरच निर्वंश केला होता......

महाराज विश्वकर्मा जलधि राज्याची पाच हजारांची सैना घेऊन महाराज विक्रमाला थांबवण्यासाठी आले होते . महाराज विक्रमाचा तळ आता त्यांच्या दृष्टिपथात होता .
" महाराज इथून पुढं गेलो तर त्यांना दिसू शकेल त्यामुळे आपल्याकडे युद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही......
महाराष्ट्र विश्वकर्मा बरोबर कौशिक चा विश्वासू हेर भार्गव आला होता......
" भार्गवा आपला तळ इथेच टाक . तू माझ्यातर्फे विक्रमासाठी संदेश घेऊन जा आपले सैन्य त्यांची शक्ती त्यांची शस्त्रे साऱ्यांचे वर्णन करा . मी जे पत्र लिहून देतोय ते त्याच्या पुढे जाऊन वाच.......

जलधि राज्याच्या त्या पाच हजार सैन्य तुकडीचा तळ तिथेच पडला . महाराज विश्वकर्म्याने भार्गवा जवळ पत्र लिहून दिले . तो विक्रमाच्या तळाकडे रवाना झाला......

दक्षिण-पूर्व समुद्रात असलेल्या बेटांना उडती बेटी म्हणून ओळखलं जायचं . ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय काळ आला होता . त्यावेळी या बेटावरील लोकांनी सर्व पृथ्वीतलावरील लोकांना प्रलय थांबवण्यासाठी फार मदत केली होती . उडत्या बेटावरील लोक कधीच पृथ्वीच्या इतर राज्यांशी किंवा राजाशी संपर्कात नसत . ते नेहमीच अलिप्त राहात आले होते .

जेव्हा राजमहर्षी सोमदत्तने उडत्या बेटांचा उल्लेख केला , त्यावेळी सर्वांमध्ये कुजबुज झाली . कारण उडत्या बेटांची आख्यायिका सर्वांनीच ऐकली होती . राजमहर्षी पुन्हा एकदा बोलू लागले......

" उडत्या बेटांनी त्यावेळी शपथ घेतली होती ज्यावेळी प्रलयसदृश्य स्थिती येईल त्यावेळी ते आपल्या मदतीला येतील..... आपल्याला फक्त तो अग्निस्तंभ पेटवायचा आहे जो आपल्या राज्यात आहे . त्यानंतर काही प्रहारच्या अवधीतच त्यांची मदत आपल्याला पोहोच होईल.....

ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली होती त्यावेळी पृथ्वीवरती शेकडो राजे होते . पण ज्या राज यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण लढले होते ते राज्य आपल्या राज्याच्या राजधानीचे ठिकाणच होतं . त्यामुळेच तो अग्निस्तंभ आपल्या राजधानीच्या जवळच आहे . तो फक्त आपल्याला प्रज्वलीत करायचा आहे....।
त्यावेळेस महाराज म्हणाले...

" महर्षी आता ही निकडाची वेळ आहे . अशावेळी आपण अशा आख्यायिकावरती वेळ न घालवता . खरे प्रयत्न करण्याची गरज आहे . मी काही सैनिकांना तो स्तंभ पेटवण्यासाठी पाठवून देतो . पण आपली खरी समस्या आहे ती म्हणजे हे लोक त्रिशूळ सैनिकांमध्ये कसे परावर्तित झाले.....?

राजमहर्षी सोमदत्ताने उडत्या बेटा विषयी माहिती सांगितली खरी , पण उडत्या बेटांची निव्वळ आख्यायिका होती , ती खरेच आहेत का .....? असली तर त्यावरील लोक मदत करतील का .....? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते . जर भिंती पलीकडील महालातील शस्त्रागारात असलेला त्रिशूळ आणायचा असेल तर इतरही काही मार्ग असू शकतील असं लोकांचं म्हणणं होतं . एका आख्यायिकेमागे धावत जाण्यापेक्षा काही शूरवीरांना भिंतीपलीकडे पाठवून तो त्रिशूळ आणावा असच बर्‍याच जणांचं म्हणणं होतं........

या सर्वाच मूळ होतं , ते म्हणजे त्रिशूळ सैन्यात असलेले सामान्य नागरिक . ते सामान्य लोक त्रिशूळाचे सैनिक कसे बनले हाच मोठा प्रश्न होता....
प्रलय-२०

महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी राजकुमारास घेतले . तो राजकुमार त्यांनी ' त्याच्या ' ताब्यात दिला . तो तोच होता . संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला , विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला . त्याच्याभोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे . बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत होता . त्यामध्ये महाराणी शंकूतलेचाही समावेश होता . ज्यावेळी राजकुमार त्याच्या ताब्यात दिला . त्यावेळी भक्त त्याच्या मागोमाग निघाले . मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेला अभिजीत अद्वैतही निघाला . हा तोच अद्वैत होता , जो तीनशेजनांच्या तुकडीचा प्रमुख होता . ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसांपूर्वी नष्ट केले होते . त्याच्या हृदयात प्रतिशोधाची आग धडधडत होती . त्यामुळे तो भक्तात मिसळून त्यांना नष्ट कसे करता येईल याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागोमाग निघाला होता..... मात्र काही अंतर चालत गेल्यानंतर तो काळा आकार म्हणजे ' तो ' थांबला . त्याने काहीतरी हालचाल केली . ती कोणाला दिसली नाही , मात्र ते अंधभक्त आता आपापल्या वाटेने चालले होते . जणू त्यांच्यावरच नियंत्रण कुणीतरी काढून घेतलं होतं . आणि ' तो ' आता वेगाने निघाला होता ; ज्या ठिकाणी त्याला जाणं गरजेचं होतं......

मारूत राजे जितकी वर्षे लपून होते तितकी वर्ष त्यांचे अस्तित्व टिकून होते. तेही फक्त लपून राहून . मात्र आता ते खुल्या मैदानात आले होते . त्यांनी प्रलयकारिकेला जन्म दिला होता . प्रलयकारिका संपूर्णपणे आरुषीच्या आज्ञेत होती . ज्यावेळी मारुत राजांनी प्रलयकारिकेला निर्माण करणाऱ्या पुजाऱ्यांना आश्रय दिला , त्यावेळी त्यांना पुढील संकटाची जाणीव नव्हती . मात्र त्या पुजाऱ्यांकडून जन्मोजन्मी सेवा करण्याची शपथ मारुत राजे घ्यायला विसरले नव्हते . त्यामुळे ते पुजारी मारुती राजांसाठी बांधले गेले होते . अशाच एका पुजाऱ्याच्या एक मुलगा म्हणजे तो होता.....

त्याचं नाव पार्थव होतं . मारूत राजांचा मुख्य पुजारी ज्याने मारुत राज्यांसाठी प्रलयकारिकेला निर्माण केलं . त्या पुजाऱ्याचा मुलगा म्हणजे तो पार्थव होता....

तो त्या लहानग्या राजकुमाराला घेऊन त्याच्या वडिलांसमोर उभा होता .
" बाबा आता ती वेळ जवळ आली आहे . प्रलयकारिकेची शक्ती वाढवण्याची . प्राणिमात्रांवर चालत असलेली तिची शक्ती आता वाढवायला हवी . मनुष्यांवर नियंत्रण करणे तिला फारशे अवघड जाणार नाही . आपण लवकरात लवकर या प्रक्रियेसाठी सुरुवात करायला हवी.....
" पार्थ तू खरच भोळा आहेस . तू मी सांगितलेलं सर्वकाही ऐकतोस . एकही प्रश्न न विचारता सर्वकाही करतोस . तुला वाटतं की मी हे जे सर्व काही करतो आहे ते मारुत राजांसाठी करतो आहे.....
" म्हणजे आपण हे त्यांच्यासाठी करत नाही का...?
" किती आणि काय काय नाही केलं आपण , इतकं सर्व आपण दुसऱ्यासाठी करायचं काय गरज आहे ......? महाराज सत्यवर्माच्या महर्षीची हत्या करून , त्याची त्वचा चोरून तू जे काही बोललास , राजाला ते खरं वाटलं . त्याने स्वतःच्या राजपुत्राला राजमहालासकट जाळून टाकलं . ते आपण मारूतांसाठी नाही स्वतःसाठी केलं . नंतर महाराणी शकुंतलेला तुझ्या जाळ्यात ओढून घेऊन तिच्या पोटी गर्भ ठेवला तेही आपण मारुतासाठी नाही केलं . विक्रम जन्मल्यानंतर त्याला रक्षक राज्याचा महाराज बनवण्याचा जो खटाटोप केला तो मारुतांसाठी नाही केला . जेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली तेव्हा आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुवर्ण पात्र व त्यामधील मदिरा आपण मारुतांसाठी नाही निर्माण केली......

आपण महाराज विक्रमांना आपल्या ताब्यात ठेवलं त्यांच्याकरवी आपण भिंत पाडण्याची आज्ञा दिली . मी स्वतः बाटी जमातीच्या लोकांबरोबर समजूत करून त्यांच्या बासरीची शक्ती वापरून सामान्य जनतेला त्रिशूळ सैनिक बनवलं आणि जलधिंच्या सैनिका विरुद्ध उभा केले . मी जलधि आणि रक्षक राज्यांमध्ये युद्ध लावले . मी सर्वत्र कोलाहल माजवला . हे सर्व मारुरतासाठी नाही केले...... तर हे सर्व मी माझ्यासाठी केलं . आता त्या लहान मुलाचा वापर करून , प्रलयकारिकेची शक्ती वाढवून तिला माझ्या नियंत्रणाखाली घेऊन मी संपूर्ण पृथ्वीतलावरती राज्य करणार . काळ्या भिंतीचे भय दाखवून मी माझा हेतू साध्य केला आहे . काळ्या भिंतीपलीकडील सम्राट कधी जागृत झालाच नव्हता . सर्व काही मीच केलंय. ते अंधभक्त , ते त्रिशूळ सैनिक ही सर्व माझीच कारस्थाने आहेत . एकदा भिंत पडल्यानंतर सम्राटाला जाग येईल , तेव्हा त्या सम्राटाचा वापर करून संपूर्ण पृथ्वीतलावरती माझे एकछत्री साम्राज्य असेल......

" पण बाबा तुम्ही तुम्ही असं कसं करू शकता .....
पार्थव खरच खूप साधा भोळा होता . त्याला त्याच्या वडिलांचा हा अवतार पाहून काहीच कळेना.....
" तू काही काळ काही काळ विश्रांती घे पार्थव .....
असं म्हणत त्या पुजार्‍याने हवेत हात फिरवला . पार्थव त्या लहान मुलाला घेऊन त्याच्या कक्षात निघाला....

राजमहर्षी सोमदत्तांनी सांगितल्याप्रमाणे राजमहाला नजीक असलेला दीपस्तंभ पेटवून उडता बेटांच्या मदतीसाठी संदेश पाठवला होता , पण ती मदत येईल तेव्हा खरे...... त्रिशूळ सैनिकांवर ती कोणता उपाय करावा यासाठी सर्वजण विचार-विमर्श , चर्चा करत होते . आपल्याच लोकांना मारणे कुणालाही शक्य नव्हते , आणि त्यांना न मारावे तर त्यांचा स्वतःचा मृत्यू अटळ होता . एका बाजूला विहीर तर एका बाजूला आड अशी त्यांची परिस्थिती झाली होती . त्रिशूळ सैनिकांना मारावे तर सामान्य नागरिक मरत होते , सैनिकांना न मारावे तर त्यांना स्वतःला मरावे लागणार होते . आपल्याच राज्यातील सामान्य नागरिक त्रिशूळ सैनिक कसे झाले हे त्यांना माहीत नव्हते . त्यांना त्यांना माणसात कसे आणायचे याबद्दल त्यांचा याबद्दल त्यांची चर्चा चालू होते......
राज्यात जाऊन आलेल्या हेरांनी हेरप्रमुख कौशिकला बाजूला घेत काहीतरी सांगितले . कौशिकच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव आले होते . तो समोर येत बोलू लागला.....
" महाराज आपण ज्या काही बाटी जमातीच्या टोळ्यांना आश्रय दिला होता , त्यातील बऱ्याच टोळ्या निघून गेल्या आहेत . आपल्या विश्वासू हेरांनी आणलेल्या बातमीनुसार बाटी जमातीच्या काही लोकांनी बासरी वाजवत आपल्या सामान्य जनतेला नियंत्रित करून त्यांच्या मागोमाग नेलं आहे....
" म्हणजे आपल्या लोकांना त्रिशूळ सैनिक बनवण्यामागे बाटी जमातीच्या लोकांचा हात होता तर........" महाराज कैरव रागाने बाटी जमातीच्या नायकाकडे बोट करत म्हणाले
" ताबडतोब त्याला अटक करा.....
" नाही महाराज माझा यात काही दोष नाही ....मी फक्त एका टोळीचा प्रमुख आहे . अशा अनेक टोळ्या आहेत . आमच्या टोळीतील लोक अजूनही तुमच्या आश्रयात आहेत . महाराज ज्या इतर टोळ्यांना तुम्ही आश्रय दिला होता त्यातील एक टोळी नेहमीच मारूतांच्या संपर्कात राहिलेली आहे . त्या टोळीतील लोकांचा हा उपद्व्याप असावा असा मला संशय आहे.....
तो बाटी जमातीचा नायक कळवळून बोलला.....
" आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. जर तुमचे लोक त्रिशूळ सैनिक बनवू शकतात , तर त्या सैनिकांना सामान्य माणूसही बनवू शकतात . आत्ताच्या आत्ता मला माझे लोक माणसात आणायचे आहेत . तुम्ही तयारी करा अन्यथा शिक्षा भोगायला तयार राहा......
महाराज कैरव संतापाने बोलले...
" क्षमा करा महाराज क्षमा करा ... त्रिशूळाचे सैनिक बनवण्याची शक्ती , बासरी ती धुन बाटी जमातीतील नाही... मारूतांच्या पुजाऱ्यांची ती प्रक्रिया आहे . आमच्या काही टोळ्या मारुताच्या पुजाऱ्यांच्या संपर्कात आहेत , त्या टोळ्यांचे हे कारस्थान असावे ......
तो नायक रडकुंडीला आला होता
" आत्ताच्या आत्ता सांगा आपण त्या लोकांना कुठे शोधू शकतो ...... तुम्हाला इतके सारा माहित असून तुम्ही इतका वेळ गप्प राहिला.... तुम्हाला आता शिक्षा नक्की होणार आहे....
सैनिकांकडे पाहत महाराज कैरव म्हणाले त्यांना बंदिस्त करून टाका...

बाटी जमातीच्या त्या टोळीच्या नायकाला एका खांबाला बांधले होते . कौशिक त्याच्यासमोर उभा होता...
" मला सांग त्यात त्रिशूळ सैनिकांना सामान्य माणसात कसं आणायचं...? तुम्ही त्यांचं वशीकरण कसं केलं..? त्यांच्यावरील नियंत्रण कसं काढायचं....?
कौशिक त्याला त्वेषाने प्रश्न विचारत होता...

" मला खरच माहित नाही आमच्या टोळीचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही ....आणि मला त्याबद्दल माहिती असतं तर मी आधीच सांगितलं असतं. मला फक्त एवढच माहीती आहे की आमच्या काही टोळ्यांचा मारुतांशी संबंध आहे ; पण मला माहीत नव्हतं की या त्रिशूळ सैनिकाच्या प्रकरणामागे त्यांचा हात असेल. म्हणून मी बोललो नाही .....
तो नायक खरा बोलत होता
"मला सांग कोणत्या टोळ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि आता आपण त्यांना कुठे शोधू शकतो....

" मी खरं बोलत आहे मला काहीच माहित नाही . माहित असतं तर मी सांगितलं असतं , मी पहिल्यापासूनच तुमची मदत करत आलेलो आहे . मी खोटं का बोलेन...?

" तुला काहीतरी सांगितलं पाहिजे .....!
कौशिक वैतागला होता . रागाला जाऊन त्याने त्या त्याच्या श्रीमुखात भडकवली.....

" मी खरं बोलत आहे याच्याहुण अधिक मला काही माहीत नाही . मी एवढी तुम्हाला मदत केली मी तुम्ही मलाच आरोपी समजत आहात ......"
तो नायक आता मुसमुसून रडत होता
तेवढ्यात एक हेर सैनिक त्या ठिकाणी आला . त्याने कौशिकला काहीतरी सांगितलं . कौशिकने ताबडतोब महाराजांचा कक्ष गाठला....
" महाराज व्यत्ययाबद्दल क्षमा असावी . बाटी जमातीच्या काही टोळ्या मारूतांच्या जुन्या महालाकडे कडे जाताना दिसल्या आहेत.... महाराज या त्याच टोळ्या आहेत ज्यांनी आपल्या सामान्य नागरिकाला त्रिशूळ सैनिक बनवले . आपल्या राज्यातील थोडेफार लोक या टोळ्यांच्या मागोमाग जाताना दिसत आहेत......
" म्हणजे या टोळीतील लोकांना जर आपण पकडून आणलं तर आपल्या समोरील त्रिशूळ सैनिकाचं आव्हान संपुष्टात येऊ शकते. आपले लोक पुन्हा व्यवस्थित होऊ शकतात....
" होय महाराज..... पण त्यांनी काही लोकांना त्यांच्या बरोबर नेले आहे . वेळ पडली तर ते लोक आपल्या सैनिकांना विरुद्ध लढू शकतात . त्यामुळे आपण सरळ सरळ युद्ध करू शकत नाही.....
" भिंती पलीकडील त्रिशूळ सैनिक भिंत पडल्याशिवाय लढू शकणार नाहीत . त्यामुळे याठिकाणी थांबण्यात अर्थ नाही . सर्व सैनिकांना सामान्य माणसात आणायचा असेल तर त्या टोळीला कसेही करून पकडायला पाहिजे . आणि त्यां टोळीला पकडण्याच्या अगोदर भिंत पाण्यापासून थांबवलं पाहिजे..... म्हणून काही सैनिक याठिकाणी थांबतील . बाकीचे सैनिक महाराज विक्रमावरती आक्रमण करायला जातील व उरलेले बाटी जमातीची ती टोळी पकडण्यासाठी........

महाराज विक्रम आणि महाराज विश्वकर्मा , रक्षक राज्याचे जुने प्रधान हे दोघेही वाटाघाटीसाठी जमले होते . एका बाजूला विक्रमाची छावणी होती तर ददुसऱ्या बाजुला महाराज विश्वकर्माचे जलधि राज्याकडून आणलेली सेना होती....
महाराज विशश्वकर्मा बोलले...
" विक्रमा तु माझा पुतण्या आहेस आणि तू हे जे काही चालवले आहेस ते योग्य नाही . माझ्यामागे जलधि राज्याची सुसज्ज पाच हजारांची सेना आहे . उरलेली सेना कोणत्याही क्षणी या ठिकाणी येऊन पोचू शकते . तुझ्याकडे फक्त पाच हजाराची सेना आहे , आणि ते सैनिकही आपल्याच राज्याचे आहेत . आपल्या राज्यातील लोकांचा निष्कारण बळी देण्याचा माझा मुळीच हेतू नाही . म्हणून मी तुला सांगायला आलो आहे. आत्ताच्या आत्ता आम्हाला शरण ये आणि भिंत पाडण्याचा तुझा आदेश मागे घे , अन्यथा युद्धा वाचून आम्हाला पर्याय राहणार नाही...

" देशद्रोही आणि विश्वासघातकी माणसाला राज्याच्या हिताचे बोलण्याची काही गरज नाही . माझ्या राज्याचे हित कशात आहे हे मला माहीत आहे . भिंतीपलीकडे कोणाकोणाचे काय धंदे चालतात हे मला चांगलंच माहित आहे . भिंत पडल्यानंतर कुणाचं नुकसान होणार आहे हेही मला माहीत आहे . राजाने काय करायचं काय नाही हे तुम्ही शिकवण्याची मला गरज नाही....
" तू म्हणतो तसे असुदे . भिंतीपलीकडे काही चालत असुदे , पण भिंतीवरून पलीकडे जाऊन तू त्या लोकांचा समाचार घेऊ शकतोस . त्यासाठी भिंत पाडण्याची गरज नाही . हे तुझ्या स्वतःचे विचार नाहीत . तुझ्यावरती कोणाचा तरी नियंत्रण आहे . तू कोणाच्या तरी नियंत्रणाखाली हे सारं करतोयस ...तू असा नाहीस...
प्रधानजीच्या या वाक्यानंतर विक्रम क्षणभरासाठी थांबला . त्याच्या डोळ्यात निरागसतेची एक छटा दिसून गेली . पण काही क्षणांतच तो बोलू लागला ....
" कोण कोणाच्या नियंत्रणाखाली आहे , हे सारं जग पाहत आहे . राजसत्तेच्या हव्यासापोटी दुसऱ्या राज्याची सेना घेऊन स्वतःच्या राज्यावर आक्रमण करणारा राजा जगाने पूर्वी कधीच पाहिला नसेल....
" विक्रमा मी तुला कसं सांगू . तु हे सर्व का करतोय , ते मला कळत नाही . भिंतीच्या कितीतरी गोष्टी तू लहानपणापासून ऐकत आला असशील . भिंत पडल्यानंतर होणारा मृत्यूचा तांडव तुला माहित नाही काय......?
" आता गपचूप तुम्ही तुमच्या सैन्यातळावरती जा . नाही तरी या ठिकाणी मृत्यूचा तांडव व्हायला वेळ लागणार नाही.... हेच बोलण्यासाठी तुम्ही इतक्या सैनिकांनिशी आला आहात का ....? गपचूप माघारी जा अन्यथा तुमचा मृत्यू फार दूर नाही.....
महाराज विक्रम घोड्यावरती बसत म्हणाले
" विक्रमा तु आम्हाला युद्ध करण्यावाचून पर्याय ठेवलेला नाही....
" कोण युद्ध करणार , तुम्ही....? महाराज विक्रमाने कुत्सित हास्य केले . त्याबरोबर महाराज विक्रमा बरोबर आलेल्या सैनिकांनी महाराज विश्वकर्मा बरोबर आलेल्या सैनिकांवर ती एकाच वेळी धावा बोलला . अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडून गेले महाराज विश्वकर्माचे सैनिक जागीच ठार झाले . वाटाघाटी करण्यासाठी सर्व प्रमुख लोक आले होते . सर्व प्रमुखांना महाराज विक्रमाने बंदी बनवलं . जलधि राज्याची सेना आता नायकाविना पोरकी होती . त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतं....

" जलधि राज्याच्या सैन्याकडे एक दूत पाठवा . त्यांना म्हणावं तुमच्या सर्व प्रमुखांना जिवंत पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता उलट्या दिशेने कूच करून जलधि राज्याकडे निघा....
महाराज विक्रम त्या बंधकांना घेऊन त्यांच्या सैन्यतळाकडे निघाले...

तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक आणि वारसदाराच्या सभेचा भरत दोघे मिळून उत्तरेकडील सैनिकी तळाकडे निघाले होते . पण वाटेतच त्यांना अश्वराज पवन गाठ पडला . त्याने उत्तरेच्या तळावर घडलेला सर्व किस्सा शौनकला सांगितला....

" मग आता काय करायचं....? भरत म्हणाला .
" मंदारने तुम्हा दोघांना कसेही करून भिंत पाडण्यापासून रोखण्याची आज्ञा दिली आहे . त्याने हे दृश्यरूपांतरण कापड दिले आहे . त्याचा वापर करून सैनिकांना काहीतरी दाखवण्या बाबत मंदार बोलत होता..... अश्वराज पवन म्हणाला....
" बरोबर आहे भिंत पडल्यानंतर जे काही होईल तर सामान्य माणसाला कळलं म्हणजे सैनिकांना कळलं तर भिंत पाडायला कोणी धजावणार नाही . एकदा भिंत पडण्यापासून रोखलं तर पुढच्या बऱ्याच गोष्टी टळतील . बाबांचं म्हणणं बरोबर होतं . आपण लवकरात लवकर विक्रमाच्या सैनिकी तळाकडे निघायला हवं . त्या ठिकाणी आपण सैनिकांना काय होणार आहे ते सांगू.... परिणाम कळाल्यानंतर कोणीच भिंत पाडायला धजावणार नाही....
भरत व शौनक बरोबर अश्वराजही विक्रमाच्या सैनिकतळाकडे निघाले . त्या सैनिकांना सर्व काही सांगून भिंत पडण्यापासून थांबवायचा त्यांचा हेतू होता......

आयुष्यमान आता पूर्णपणे बरा झाला होता . त्याच्या समोर तो म्हातारा बसला होता बाजूला दोन बुटके आज्ञाधारकपणे उभे होते . सुरुकु आता त्याच्या चांगल्या सवयीचा झाला होता . सुरुकु वरती बसून त्याच्यासोबत त्याने एक दोन छोटे प्रवासही केले होते . आता त्याची प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी प्रलयकारिकेला रोखण्यासाठी जाण्याची वेळ आली होती .
" तू जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे.....
तो म्हातारा बोलू लागला
" तू मला बरेच प्रश्न विचारले . काही प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली आहेत . काहींची तुला शोधावी लागतील ...आणि आता एका प्रश्नाचे उत्तर सांगतो ते म्हणजे प्रलय म्हणजे नक्की काय आहे.... तुझी निवड फक्त प्रलयकारिकेला थांबवण्यासाठीच नाही तर इतरही बऱ्याच गोष्टींसाठी झाली आहे . प्रलय नक्की कशामुळे येतो आणि का येतो हे मी आता तुला सांगणार आहे....
कितीतरी हजारो वर्षांपूर्वी देव आणि मानव एकत्र हसायचे एकत्र राहायचे . ईश्वराने कितीतरी प्रकारचे प्राणी निर्माण केले . वनस्पती निर्माण केल्या . वेगवेगळे जीव निर्माण केले . त्यातील बरीच जीव मानवा हून बुद्धिमान होते . मानवाहुन संवेदनशील होते . मात्र मानव हा नेहमीच ईश्वराचा लाडका प्राणी राहिला आहे....
जरी मानव हा विश्वाचा सर्वात लाडका असला तरी मानवानेच ईश्वराला सर्वात जास्त त्रास दिला आहे मानवाला नेहमीच शक्तीचा मोहर राहिलेला आहे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कोणतेही कृत्य करायला मागेपुढे पाहिले नाही फार पूर्वी ज्या वेळी देव आणि मानव एकत्र राहायचे . त्या वेळी एका मानवाने एक घोर पापकर्म केले . आणि त्याचे फळ म्हणूनच त्या ईश्वराने संपूर्ण पृथ्वीला श्राप दिला . आणि तो श्राप म्हणजेच प्रलय होय....
" कोणते पाप कर्म केले , आणि श्राप म्हणजे नक्की कशा प्रकारचा दिला ......" आयुष्यमान विचारले . पण तेव्हाच सुरुकु जोरजोराने ओरडू लागला . त्या म्हाताऱ्याला आणि आयुष्यमानलाही त्या ओरडण्याचा अर्थ समजला . आयुष्यमानला आता निघावे लागणार होतो . सुरूकुला प्रलयकारिकेची जाणीव झाली होती . तिचा सामना करण्यासाठी आयुष्यमान सुरूकुवरती स्वार होत हवेत उडाला.....

सुरुकुची गती प्रचंड होती . काही काळ उडाल्यानंतर त्याने गती कमी करत सुरुकु खाली उतरला . आयुष्यमान ला एका बाजूला मोहिनी बसलेली दिसली तिच्या डोळ्यात आसवे जमा झाले होते ज्या वेळी तिने रुद्राचा तो लहान मुलगा मारला त्यावेळी तिला काहीतरी वेगळीच जाणीव झाली . आपलं जीवन हे नाही . आपले जीवन काहीतरी वेगळा आहे . त्या ठिकाणाहून बाजूला होत गरुडावर बसून ती दूर आली होती . तिला त्रास होत होता . तिला काहीच आठवत नव्हतं.....

ज्यावेळी तिला आयुष्यमान दिसला त्यावेळी तिला सारं काही आठवलं . तिने पळत येत आयुष्यमानला मिठी मारली . दोघेही एकमेकांच्या सहवासाचे भुकेले होते..... वस्त्रांचा अडसर बाजूला झाला . ते दोघे एकमेकांचे शरीर अनुभवत होते.... ओठाला ओठ मिळाले . दोघे सुखाच्या गर्तेत बुडून गेले.... ती मोहिनी होती आणि तो आयुष्यमान होता आणि दोघेही एकरूप झाले होते . सुखाच्या परमोच्च क्षणी मोहिनीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली . तिच्या हातात खंजीर होता आणि त्या खंजीराने आयुष्यमानच्या वेग घेतला.....

" प्रलय येणार आहे मनुष्यजात नष्ट करण्यासाठी .... एकही मनुष्य प्राणी या पृथ्वीतलावर जिवंत राहणार नाही . पण जो कोणी माझं अनुकरण करेल आणि जो कोणी माझा अनुयायी होईल . त्याला या पृथ्वीतलावर कशा पासूनच धोका नाही . जो कोणी माझा अनुग्रह नाकारेल , जो कोणी माझा अनन्वय नाकारेल त्याला प्रलयाची भीती आहे . माझ्या अनुयायांना प्रलयापासून संरक्षित करण्याची माझी जबाबदारी आहे ......

माझा अनुयायी होण्यासाठी तुम्हाला फार काही करायचे नाही . हे पवित्र जल तुम्ही प्राशन करा . जे माझे पवित्र पाय धुऊन काढलेले आहे , आणि माझ्या सर्व आज्ञांचे पालन करा ...... "

मोठ्या जनसमुदायासमोर उभारून तो भाषण करत होता . तो स्वतःला देव म्हणत असे . प्रलयानंतर येणाऱ्या नवीन जगाचा जणू तो स्वामी असणार होता .

" तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा .....

असं म्हणत त्याने त्याच्या अनुयाकडे हेतुपूर्वक पाहिले . त्याच्या अनुयायांनी हवेत दोन गोळे फेकले . हवेत गेल्यानंतर ते फुटले . त्याच्यातून धूर बाहेर निघाला . व त्यांच्यासमोरील संपूर्ण आकाश एक काळ्या छायेखाली भरून गेलं . हळूहळू त्यामध्ये दृश्ये दिसू लागली . ती दृश्ये पाहून जनसमुदायाचा थरकाप उडाला . सर्वजण त्याच्या पुढे गुढगे टेकून पवित्र जल पिऊ लागले.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विषय छान वाटतो आहे.
सवडीने पुर्ण वाचेन.
अनेक ठिकाणी व्यस्त हा चुकीचा शब्द वापरला आहे. कृपया तो व्यग्र असा करा.