अंकाईचा अनुभव

Submitted by Narsikar Vedant on 27 September, 2019 - 13:02

अंकाई किल्ला मनमाड ह्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तरीही हा किल्ला काहीसा दुर्लक्षित आणि पोरका आहे.
अंकाईचे पावसाळ्यातील मनोहर दृश्यएक वर्षापूर्वी मी या गडाचा शेतीच्या वाफ्यातून काढलेला फोटो पाहिला होता. तो फोटो पावसाळ्यातला होता. गावातून दिसणारा किल्ल्याचा फोटो पाहूनच ठरवले की आपण किल्ल्यावर चढाई करायची. त्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली या नंतर असे कळले की पावसाळ्यात या किल्ल्यावर ती चढाई करायला अडचणी येतात. या किल्ल्याबद्दल नकारात्मक गोष्टीच जास्त ऐकल्या, त्यामुळे अशा किल्ल्यावर कधी एकदा जातोय असं झालं होतं.
एक दिवस नियतीच्या मनात आलं आणि आम्ही त्या किल्ल्यावर जायचे ठरवले सुट्टीचा अडचणींमुळे 19 फेब्रुवारी ची तारीख ठरवली. मी आणि माझे दोन मित्र संदीप आणि दीपक त्या दिवशी सकाळी सहा वाजता रेल्वेनी मनमाडला जाणाऱ्या गाडीत बसलो जवळजवळ दहा वाजता अंकाई किल्ल्याला पोहोचलो. अंकाईचा किल्ला अंकाई रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्टेशन वरूनचे दृश्यआम्ही तिथे उतरलो मात्र वाहनांची कुठलीही सोय नसल्याने आम्हाला जाताना जवळजवळ सात किलोमीटर पायी चालावे लागले. सकाळची वेळ आणि त्यातही उत्साह असल्याकारणाने आम्हाला ते सात किलोमीटरचे अंतर जास्त वाटलं नाही. त्यानंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी आलो थोडावेळ आराम केला आणि नाष्टा करून गड चढायला सुरुवात केली. गडाच्या सुरुवातीलाच असलेल्या जैन गुहांनी आमचे मन मोहून टाकले. गडाबद्दल आता अधिकच उत्सुकता लागून राहिली होती जी काही वेळात आमची मिटणार होती.
आम्ही अंकाई गड चढायला सुरुवात केला. अंकाईचा बाजूलाच लहान भावाप्रमाणे उभा असणारा टंकाई आम्हाला खुणावत होता. आम्ही अंकाई किल्ल्यावर चढाई करायला सुरुवात केली थोडावेळ चढाई केल्यानंतर ऊन आणि चढायला यामुळे थकावट आली होती, तरीही आम्ही चढत होतो. काही काळानंतर रस्त्यामध्ये अतिशय खडतर अशी वाटली या वाटेवर माती होती, केवळ आणि केवळ माती. त्या मातीवरून वर जाताना पाय सरासर खाली घसरत होते त्यामुळे अशा ठिकाणांवर चढणं अधिकच खडतर झालं होतं. तरीही आम्ही तिघांनी मिळून चढाई करायचं ठरवलं होतं, मागे वळण्याचा प्रश्नच नव्हता.आम्ही हळूहळू धीम्या गतीने वर चढत होतो. वर गेल्याच्या नंतर आम्ही एका पडक्या दरवाजापाशी आलो. पडक्या दरवाज्यापाशी जरा सावली असल्याने थोडावेळ तिथे विश्राम केला आणि मग पुन्हा पुढे मार्गस्त झालो. पुढे जात असताना आम्हाला सतत जाणवत होते, की या किल्ल्यावर पावसाळ्यात येणे अत्यंत जिकरीचे आहे कारण किल्ल्यावरील निसरड्या पायऱ्या आणि त्यावर आलेलं शेवाळं, यामुळे ही ट्रेकिंग पावसाळ्यात करणे जवळजवळ अशक्य होऊन जाते. तरीही आम्ही उन्हाळा असल्याने  हळूहळू वर जात होतो.पडके प्रवेशद्वारवर गेल्यानंतर आम्हाला मंदिर लागले किल्ल्याची 80% चढाई पूर्ण झाली होती. तिथे गेल्यानंतर दुपारी दोन वाजता ही उन्हाचा कुठलाही त्रास होत नव्हता. अतिशय अल्हाददायक असं वातावरण निर्माण झालं होतं एक मोहून टाकणारी हवा वाहत होती. किल्ल्याची उंची जवळजवळ तीन हजार फूट उंच असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत होती, पण आम्हावर त्याचा कुठलाही परीणाम होत नव्हता.थोडावेळ फोटो सेशन करून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. येताना मावळतीला जात असलेल्या सुर्याचे विलोभनीय दर्शन झाले. गडावर यशस्वी चढाई केल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या किल्ल्यावर आणि आजूबाजूला पाण्याची कुठलीही सोय नाही. या किल्ल्यावर जाताना पाण्याची सोय आपल्यालाच करावी लागते.आज अंकाई किल्ला काहीसा दुर्लक्षीत आणि एकाकी पडलाय. इथे मोठ्या संख्येने दूर्गप्रेमीनी भेट देण्याची गरज आहे. प्रामुख्याने पावसाळ्यातील या गडाचे रांगडेपण चारी बाजूने कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जलप्रपातामुळे उठून दिसते. पावसाळ्यातील चार महीने अंकाई ढगांची पांढरी दुलई पांघरून असतो.इंग्रजांनी इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बरीच नासधूस केली. त्यामुळे या गडावर जाणाऱ्या वाटा दिवसेंदिवस अवघड होत चालल्या आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

शिल्प असणार्या गुहा टंकाईच्या पोटात आहेत. पण वरून पाणी पाझरत असल्याने आणि दगड चुनखडीचा असल्याने शिल्पे पाघळली आहेत. वरच्या पठारावर तुटलेल्या इमारतींचे फक्त पायाकडचे भाग शिल्लक आहेत. नंतर अंकाईवर गेलो. ( अंकाई-टंकाई जोड डोंगर आहेत.) अंकाईवर जाण्यासाठी छान फरसबंदी पायऱ्या आहेत. ज्या एक दोन लहान गुहा आहेत त्यास लोखंडी दार ठेवून साधू लोकांनी बंद केल्या आहेत. मोठ्या गुहेत देऊळ थाटले आहे.