झुळूक

Submitted by संयम.... on 27 September, 2019 - 04:51

मित्रांनो/ मैत्रिणींनो पहिलीच वेळ असली तरीही मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केलेला आहे.
तुमच्या अनुभवाच्या आधारे काही सूचना आणि प्रतिसाद अवश्य नोंदवा जुनेद मला पुढच्या वेळेस लिहायला फायदा होईल. ............

हि कविता मी मित्रांबरोबर सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेलो तेव्हा मला जाणवलेल्या भावनांच्या आधारे लिहिलेली आहे. तेव्हा किंवा तश्या सारख्या सर्व ट्रेकिंग च्या वेळेस जाणविणाऱ्या भावना मी कागदावर उतरविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

झुळूक
पहिलीच वेळ ही धुंदी -बेधुंदीची
निसर्गाच्या सानिध्यात हरविण्याची
जुन्या विचारांना नवे पंख फुटण्याची
मनातील भावनांना कागदावर उतरवण्याची
पहिलीच वेळ ही धुंदी -बेधुंदीची
पहिलीच वेळ हि माझ्यातल्या मला शोधण्याची
कवी मनाला प्रोसाहन देण्याची
निसर्गाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची
वाऱ्याच्या झुळुकांबरोबर वाहून जाण्याची
पहिलीच वेळ हि ......
पहिलीच वेळ हि काही भन्नाट करण्याची
मेंढरांच्या कळपातून वेगळं होण्याची
जाणिवेनं, उसंतीने श्वास घेण्याची
श्रवणातिल बहराला सलाम करण्याची
पहिलीच वेळ ही धुंदी -बेधुंदीची......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर जमली आहे की. अगदी संपूर्ण मुक्तछंदात लिहीली असती तरी चालली असती. म्हणजे शेवटचे शब्द 'ईकारान्त' ठेवले आहेत ते नसते ठेवले तरी चालून गेले असते अधिक फुलवता आली असती.