पॅचअप (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 27 September, 2019 - 03:14

"खरं सांग, तू अजूनही भेटतेस त्याला? चोरून? "

महान पातकाची कबुली द्यावी तशी मान खाली घालून ती पुटपुटली.
"कधी कधी."

"पण तू त्याच्याशी रीतसर ब्रेकअप केलं होतंस"
"मला त्याची आठवण येते. एकेकाळी भरभरून प्रेम केलंय रे"

"एकांतात भेटलात?"
"एकदाच. दोन-तीन वेळा मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा भेटलेय"

"आवर स्वतःला."
"प्रयत्न केले. जमत नाहीये. विशेषतः अशा धुंद पावसाळी संध्याकाळी त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण.... "
"बास.. मला काहीही ऐकायचं नाहीये. एवढंच सांगतो, विसर त्याला"
"पहिलं प्रेम विसरता येतं?"
"तुझ्या पुढाकाराने ब्रेकअप झालं ना? मग आता अशी का वागतेयस?"
"नाही सांगता येणार. पण मी आता पॅचअप करणारे हे नक्की."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

असं म्हणून तिने वाफाळत्या चहाचा कप उचलला.

--------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------
संदर्भासाठी ब्रेकअप कसं झालं हे येथे वाचा.
https://www.maayboli.com/node/66680

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

D Lol Lol

Happy मला आधीची शतशब्दिका जास्त आवडली.

चहा'टळ आहे कथा नायिका असं वाटतंय न वाटतंय तोच 'चहा' ती निघाली ती चहाची >>> वाह हर्पेन वाह !

छान आहे कथा
आधी समजलीच नाही Lol
लिंकवर जाऊन जुनी वाचली तेव्हा संदर्भ लागला Happy

धन्यवाद पद्म, मन्या, हर्पेन , शाली, सामो, urmilas , सिद्धी, अधरा, विनिता.झक्कास, रिया, अज्ञातवास,, बोकलत, नौटंकी, नीलीमा, ॲमी, प्राचीन, मधुरा, कटप्पा, ऋन्मेऽऽष, आसा. Happy

'चहा'टळ आहे कथा नायिका असं वाटतंय न वाटतंय तोच 'चहा' ती निघाली ती चहाची>>> भारीच.. आवडलं Happy

धन्यवाद पद्म, मन्या, हर्पेन , शाली, सामो, urmilas , सिद्धी, अधरा, विनिता.झक्कास, रिया, अज्ञातवास,, बोकलत, नौटंकी, नीलीमा, ॲमी, प्राचीन, मधुरा, कटप्पा, ऋन्मेऽऽष

>>>> आमच्या नावाचं स्पेलिंग येत नाही का Angry Light 1 Lol

धन्यवाद atuldpatil Happy
आज ह्या धाग्यावर आले तेव्हा लक्षात आलं की तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिले नाही .
आवडले नाही तर सांभाळून घ्या आणि मस्त गरम गरमचहा प्या Happy