"शेवटची भेट" भाग २ - अंतिम

Submitted by eshwari on 27 September, 2019 - 01:59

पहिल्या भागाची लिंक https://www.maayboli.com/node/71731

त्या माणसाने त्याला आणि त्याच्या बाईकला नीट निरखून पाहिलं आणि म्हणाला," मदत तर काही करू शकत नाही हो पण हा इथून जवळच एक लहान गाव आहे. कदाचित तिथे तुम्हाला मदत मिळू शकेल " आणि इतक्यात जोरजोरात ढग गडगडू लागले , बहुतेक मोठा पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली होती. तो माणूस संदेशला म्हणाला ,"मला वाटतंय काही वेळ तुम्हाला इथे थांबायला हव. कारण आता जोराचा पाऊस येणार आहे असं दिसतंय." संदेशालाही तसं करण्यावाचून काही पर्याय न्हवता. मग त्या घराच्या आडोश्याला त्याने आपली बाईक पार्क केली आणि तो घरात गेला. आतमध्ये थोडा अंधारच होता.
तो थोडा आणखी आत गेला तेव्हा त्याला त्या माणसाव्यातिरिक्त तिथे एक स्त्री आणि माणूस बसलेले दिसले त्यांच्याबरोबरच जवळपास साधारण २२-२३ वर्षाची एक तरुण मुलगीही शांतपणे बसून होती अंधारामुळे संदेशला तिचा चेहरा नीट दिसू शकला नाही. बहुतेक तेसुद्धा आधारसाठीच तिथे थांबले असावेत असा त्यांच्याजवळील बॅगा पाहून त्याने अंदाज बांधला. मग काहीवेळ असाच शांततेत निघून गेला मग हळूहळू त्यांच्यात संभाषण सुरु झालं. मग ती स्त्री उठून आपली बॅग उचलून एका कोपऱ्यात ठेवत होती काही वेळानंतर ती मुलगी उठली आणि बाहेर जाणार इतक्यात कुठल्यातरी वस्तुला धक्का लागून ती अडखळली आणि ती पडणार इतक्यात समोर बसलेल्या संदेशने तिला सावरले. आता बाजूला असलेल्या दिव्याच्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा एकदम स्पष्ट दिसू लागला. तिला पाहताच संदेश एकदम दचकलाच, त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत न्हवता कारण ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून नुतनच होती , आज संदेश पुन्हा फिरून तिच्या प्रेमात पडला होता, काही क्षणाकरिता तो तिला पहातच राहीला.. त्या दिव्याच्या प्रकाशात ती फारच सुंदर दिसत होती , तिच्या चेहऱ्यावर केसांची एक बट फिरू लागली तसं तिने ती बट बाजूला करत समोर पाहिलं तर संदेश तिला एकटक वेड्यासारखा भान हरपून पाहत असल्यासारखा दिसला. तिने त्याला ओळखलं. पण आजूबाजूची परिस्थिती पाहता ती जास्त react झाली नाही
पण नूतनच्या चेहर्यावर मात्र काहीच भाव नव्हते. पण त्याला पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य, आनंद आणि दुखं हे असे भाव तरळून गेले. संदेशलाही थोडं अवघडल्यासारखं फील झालं.
मग अचानक त्याने भानावर येत आजूबाजूला पाहीले तर सर्वजण आपापल्या बोलणयात असे काही गुंग होते , जणू काहीच घडले नाही. त्याला या गोष्टीचे आश्चर्य वाटले. मग काही वेळाने सर्वजण थोडेफार काहीतरी खाऊन झोपी गेले, पण संदेशला काहीकेल्या झोप येत नव्हती. बाहेर पाऊसही थोडा थांबला होता. मग तो उठला त्याला समोर नूतन बसून त्याच्याकडेच पहात होती. संदेशला थोडे अवघडल्यासारखे झाले, जणू नूतन नजरेनेच त्याला काही विचारत होती. त्याला तिच्याजवळ जावेसे वाटत होते, तिच्याशी बोलावेसे वाटत होते, पण नाईलाजाने उठून बाहेर छपरात जाऊन बसला, तो बाहेर येउन बसलाच होता की त्याला आपल्या खांद्यावर एक कोमल स्पर्श जाणवला. त्याने मागे वळून पाहिले तर मागे नूतन उभी होती. तिला पाहताच त्याला फार आनंद झाला. तो उठून उभा राहीला. काही वेळ दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पहात उभे होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहीले, मग त्याने आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा पकडला आणि तिच्या कपाळावर एक चुंबन दिले.
"मला माहीत होते तू नाही राहू शकणार माझ्याशिवाय, एक ना एक दिवस माझ्याकडे नक्कीच परत येशील." नूतन त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.
"हो नूतन खरंच मी नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय ....... इतक्या दिवसात तूला खूप miss केलं..... पण मी माझ्या आईवडीलांशिवायही नाही राहू शकत" संदेश दुखी होऊन म्हणाला.
"आणि म्हणूनच मी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापुरला माझ्या मोठ्या ताईकडे निघून आले ,तरीही मी नाही थांबवू शकले तुझ्या आठवणींना..... आणि........" नूतन एकाएकी शांत झाली आणि शुन्यात पाहू लागली.
"आणि काय? नूतन " संदेशने तिला विचारले.
"काही नाही ....... पण मी खरच आता तुझ्यापासून खुप दूर आलेय." नूतन डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली.
"म्हणजे?" संदोशने विचारले.
"काही नाही......" नूतन शांतपणे म्हणाली.
मग काही वेळ दोघेही शांतपणे बसून राहीले,, नुतनही त्याचा हाथ हातात घेऊन काहीवेळ त्याच्या खांद्यावर डोक ठेवून जुन्या आठवणीत रमून गेली. मग अचानक संदेश तिला आठवणीतून जागं करत म्हणाला ,"नूतन उठ आता रात्र खूप झालीय. तू आतमध्ये जाऊन झोप. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल" संदेश सावधपणे म्हणाला ,
नूतन स्वतःशीच हसली आणि म्हणाली ," मला नाही पाहणार कुणी... सर्वजण झोपलेत अरे !!, खरं तर तुझ्यापासून दूर व्हावं अस नाही रे वाटत पण …… कदाचित आपली हि भेट शेवटची भेट असेल " अस म्हणता म्हणता ती मधेच थांबली, आणि उठून घरात निघून गेली. का कुणास ठाऊक पण आज संदेशला नूतन जरा वेगळीच वाटली , तिचं दिसणं , तिचं बोलणं याआधी कधीच अशी दिसली न्हवती. आज त्याला तिला आपल्या डोळ्यात कायमचं साठवून घ्यावसं वाटत होतं. मग तोही आतमध्ये गेला आणि एका कोपऱ्यात झोपण्याचा प्रयत्न करू लागला, अजूनही त्याचं संपूर्ण लक्ष नुतनकडेच होतं, ती शांत झोपी गेली होती. आणि मग संदेशही तिचा निरागस चेहरा न्याहाळत झोपी गेला.
सकाळी कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली. त्या स्त्रीची आणि तिच्या नवऱ्याची निघण्याची गडबड सुरु होती, संदेशचे डोळे नुतानला शोधू लागले पण……. नूतन मात्र त्याला कुठेच दिसली नाही, ती बाहेर आहे का हे पाहायला तो घराबाहेर आला पण ती त्याला कुठेच दिसली नाही. मग तो पुन्हा घरात आला , त्याला वाटले , त्या स्त्रीला आणि त्या माणसाला तिच्याबद्दल काही विचारावे पण त्याला ते बरोबर वाटले नाही. इतक्यात सामानाची आवराआवर करताना त्या स्त्रीच्या पर्स मधून काहीतरी संदेशच्या पायाजवळ पडले. त्या स्त्रीचे त्याकडे लक्ष नव्हते, संदेशने पहिले तर ती कसला तरी फोटो होता. त्याने तो उचलला आणि सरळ करून पहिला तर तो त्या स्त्रीचा आणि नुतनचा एकत्र फोटो होता. त्याला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. त्याने तो फोटो त्या स्त्रीला देत म्हंटले," हा फोटो तुमच्या पर्समधून पडला , तुमच्याबरोबर हि मुलगी ……. "
"माझी लहान बहिण आहे हि 'नूतन' " आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले.
"काय? तुमची बहिण ?" संदेशने आश्चर्याने तिला विचारले तेव्हा त्याला आठवले की रात्री नूतन म्हणाली होती की तिची मोठी बहिण कोल्हापूरला असते म्हणून …
"हो माझीच लहान बहिण आहे ती, पण आता ती या जगात नाहीये , २ महिन्यांपूर्वीच तिचा कोल्हापुरात अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाता जाताच वाटेत तिने प्राण सोडला ……आम्हा सर्वाना ती कायमची सोडून गेली " आणि आशा रडू लागली. मग आशाच्या नवऱ्याने तिला समजावले आणि आपले सामान घेऊन त्या माणसाचे धन्यवाद मानून बाहेर निघाले जाता जाता त्यांनी संदेशचाही निरोप घेतला ,
पण हे ऐकताच संदेशला जबरदस्त धक्का बसला. या धक्क्याने तो मागच्या भिंतीजवळ टेकला आणि खाली बसला संदेश आता स्व:ताच्याच भानात नव्हता , हळू हळू त्याला नूतनच्या रात्रीच्या गूढपणे बोलण्याचा अर्थ समजू लागला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता, की त्याची नूतन आता त्याच्यापासून खूप दूर निघून गेलीय आणि हे जग सोडल्यानंतरही नूतन त्याला विसरू शकली न्हवती, कदाचित ती त्याला रात्री शेवटचं भेटायला आली होती !

त्याच संभ्रमात तो बाहेर पडला आणि आपली बाईक घेऊन निघाला जाता जाता तो माणूस त्याला निरोप देत होता पण त्याचे त्याकडे लक्षच नव्हते.
त्या माणसालाही त्याच्या या वागण्याचे आश्चर्य वाटले. विचार करून त्याचं डोकं सैरभर झालं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले “आपल्यावर इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीचं आपण मन दुखावलं पण तरीही ती आपल्यावरच प्रेम करत राहिली आणि तिच्या या निष्पाप प्रेमाला मृत्यूही थांबवू शकला नाही.”
अचानक संदेशला पुन्हा आपल्या खांद्यावर एक कोमल स्पर्श जाणवला , त्याने मागे वळून पाहिलं तर नूतन उभी होती आणि त्याच्याकडे पाहून स्मितहास्य करत होती.
" हे काय झालं नूतन ?… plz मला माफ कर , अशी का एकट्याला सोडून गेलीस मला ? दूरच पण मला जवळ असल्याची जाणीव होती तुझी, मी नाही समजू शकलो तुझ्या प्रेमाला , मी लायकंच नाहीये ग तुझ्या या प्रेमाच्या “ आणि तो तिच्यासमोर गुढघे टेकून बसला आणि तिचे पाय पकडून रडू लागला.
इतक्यात नुतनने त्याच्या खांद्यांना धरून त्याला उभं केलं आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याला म्हणाली," नाही संदेश !! असं नको म्हणूस , तू माझ्या प्रेमाच्या लायक आहेस कि नाही हे ठरवायचा हक्क माझा आहे तुझा नाही , पुन्हा कधीच असं म्हणू नकोस , आणि आता जे झालं त्याला आपणही नाही बदलू शकत , पण तुला माझ्या प्रेमाची मनापासून जाणीव झाली, हिच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे , आता मी आनंदाने मुक्ती घ्यायला मोकळी आहे, फक्त तुला शेवटचं डोळेभरून पाहायचं होतं म्हणून आले "
मग संदेशचा हाथ आपल्या हातात घेत ती म्हणाली,"संदेश मला एक वचन दे कि , यापुढे कधीच तू माझी आठवण काढून रडायचं नाहीस, कारण त्यामुळे सगळ्यात जास्त दुखं मलाच होईल. नेहमी सुखात आणि आनंदी राहा, आपण एकत्र घालवलेल्या क्षणांना आठवून आनंदी हो दुखी नाही !”
मग एक उसासा टाकत ती म्हणाली," चल आता मला हसत हसत निरोप दे "
आणि हळू हळू नूतन मागे वळून निघून जावू लागली
संदेश अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या नूतनकडे पाहत राहिला आणि काही क्षणातच नूतनचं अस्तित्व हवेत विरून गेलं....

समाप्त
10250090_627291950696261_5852164966301265477_n.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलं आहे.
कधीकधी आपल्याला आयुष्यात काय मिळालं ह्याची किंमत तो/ती प्रत्यक्ष असताना लक्षात येत नाही आणि मग आपल्या लेखी ते असणे आपसुक गृहीत धरले जाते. जीवनात आलेले आपुलकीचे मित्र/मैत्रीण असो की प्रेम ! खरी किंमत कळते ते त्या व्यक्तीच्या आपल्या आयुष्यात नसण्याने आणि मग सुरु होतो प्रवास अखंड झुरण्याचा आणि आठवणीत तळमळण्याचा. Sad

छान!