तो आणि ती!!

Submitted by निन्या सावंत on 27 September, 2019 - 00:40

तो आणि ती...

ती दिसायला गोरी गोरी पान, फुलासारखी छान, आणि तो काळा-सावळा.
त्यांची ओळख झाली ती ऑरकुट च्या माध्यमातून, आता फेसबुक आहे तसं तेव्हा ऑरकुट चा भारी नाद होता सगळ्यांना. कोणी तरी कोणाला तरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि सुरु झाली त्यांची कहाणी.
तो मुंबईच्या एका कॉलेज मधे एफ़.वाय.बी.कॉम ला तर ती 12 वी च्या वर्षाला. आधी ऑरकुट वर ऑनलाइन बोलणं मग इथे डिस्टर्ब करतात बाकीचे म्हणून पर्सनल ईमेल वर गप्पा मारणं सुरु होत, काही दिवसाने त्याने नविन मोबाइल घेतला आणि अर्थात सर्वात आधी आपला नवीन नंबर तिलाच दिला..
तेव्हा व्हॉट्सऍप नव्हतं तर महिन्याला मेसेज पैक टाकला जायचा... रात्रं-दिवस गप्पा गप्पा आणि गप्पा... पण अजुन प्रत्यक्ष भेटीचा योग आला नव्हता, कधी त्याला वेळ नसायचा तर कधी तिला, असं होत सहा महिन्यांच्या काळ ओलांडला आणि दोघनिहि कॉलेज बंक करून भेटायचं ठरवलं.
दिवस ठरला वेळ ठरली आणि बऱ्याच वाद-विवादानंतर जागा पण ठरली ती म्हणजे जुहू चौपाटी...
पावसाळा होता त्यामुळे रिमझिम पाऊस सुरूच होता, आणि अशातच त्यांची नजरा-नजर झाली. तिने फिकट हिरव्या रंगाचा टी-शर्ट त्यावर मैचिंग बांगडयाआणि डार्क ब्लू जीन्स, गळ्यात रंगी-बेरंगी मोत्यांची माळ, कपाळावर छोटुशि टिकली कानात डुल हातात गुलाबी रंगाची लेडीज छत्री आणि सर्वात महत्वाच म्हणजे नाकातली इवलिशि फुल्ली आणि चेहऱ्यावर एक सुंदर हास्य...
तो स्लीव्स फोल्ड केलेलं ब्लू शर्ट, ब्लैक जीन्स डाव्या हातात घड्याळ, उजव्या हातात कसलासा लाल दोरा बांधलेला, डोळ्यावर चश्मा आणि हातात काळी छत्री...
दोघनिहि पाहता-क्षणी एकमेकांना ओळखलं, ती चैटिंग करताना म्हणायची तू भेटलास की तुझे गाल ओढ़णार मी पण ती हे गाल ओढणं इतक्या सिेरियसली घेईल असं वाटलं नव्हतं, तिने भेटल्या-भेटल्या इतक्या जोरात गाल ओढले की तो बिचारा तिथून निघे पर्यंत गालाला हात लावून बसला होता.
दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या, पावभाजी खाल्ली,पाण्यात धमाल केली...
तो दिवस आजही जसाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि तो दिवस तो कधीच विसरु शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ...
तो तिला लाडाने ऐंजल म्हणायचा...
काही महिन्यानी तिचा बारावीचा निकाल लागला आणि ती चांगल्या मार्क्स ने पास झाली पण त्याच्या लाख वेळा समजावून पण एखाद्या चांगल्या कॉलेज मधे प्रवेश न घेता तिने त्याच्या कॉलेज मधे प्रवेश घेतला.
मग काय, कॉलेज चालु झालं. साधारण महिन्याभरात या दोघांची मैत्री संपूर्ण कॉलेज ला माहीत झाली होती..
कॉलेज मधे एक वाहयात मुलगा त्याच्या बॅच ला होता, तो सहसा त्याच्या पासून लांब राहायचा, त्या मुलाची नजर तिच्यावर पडली आणि त्याने फेकलेल्या जाळ्यात ती सहज गुरफटली गेली. त्याला जेव्हा हे समजल तेव्हा त्याने तिला समजावण्याचा खुप प्रयत्न केला, पण तिने त्याचे काही-एक ऐकले नाही आणि त्याला वाट्टेल तसं बोलून निघुन गेली.
आता ते दोघ शक्यतो एकमेकांसमोर येण टाळायचे, आलेच तर एखादी स्माइल देऊन पुढे जायचे बाकि बोलण जणू खुंटलच होतं...
आणि एक दिवस अचानक ती आली त्याच्याकडे रडत, तिला समजून चुकल होत की तो जे सांगत होता ते खरं होत, तिला पश्चाताप होत होता,स्वतःची चूक कळली आणि त्यानेही तिला मोठ्या मनाने माफ़ केल...
सगळं छान सुरु होतं त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली, तिला तो आवडतं होता आता आणि ती प्रेमात पडली होती त्याच्या.
त्याची प्रत्येक गोष्ट तिला आवडतं होतं... तिने तिच्या मनातले भाव तिला बोलून दाखवले, पण त्याच्या मनात तसं काहीचं नव्हतं, ती त्याच्यासाठी आयुष्य होती पण या मैत्रीचं रूपांतर प्रेमात करायचं नव्हतं... कारण त्याची काही कारणं होती आणि तिनंही समजून घेतलं पण मनातलं प्रेम कमी नव्हतं झालं आणि होणार पण नव्हतं...

ती त्याच्या साठी अजुनही त्याची ऐंजल होती, तो तिचा जोड़ीदार होऊ शकत नसला तरी आयुष्यभर मैत्रीचं नात तो टिकवणार होता...

एकदा ती तिच्या गावी जात होती कुटुंबासोबत, रात्री खुप वेळ गप्पा मारायचे दोघेही, त्या दिवशी सुद्धा अश्याच गप्पा सुरु होत्या...याच्या एका मेसेज नंतर तिचा reply नाही आला बराचं वेळं.
नेहमीप्रमाणे बोलता बोलता झोपली असावी असा विचार केला आणि "सकाळी पोचल्यावर कळवं" इतके बोलून तो पण झोपला...
सकाळी त्याला जाग आली ती फ़ोन च्या अवाजाने, तिच्या बहिणीचा फ़ोन होता, कॉल answer केल्या केल्या याने विचारलं अदु पोचली का गं गावी पण तीच उत्तर ऐकून तो पार उडाला, तिची बहिण म्हणतं होती, "काल गावी जाताना तिच्या गाड़ीला अपघात झाला आणि त्यात ती जागीच गेली"...

तो कोलमडला,बिथरला, सर्वस्व हरवल्याचा भास झाला त्याला त्यावेळी. आता तिच्या जाण्याल 2 वर्ष होऊन गेलीत पण त्याच्या आठवणीतुन ती कधीच जाणार नाही कारण याचंहि प्रेम होत तिच्यावर, मैत्रियुक्त प्रेम...
आजही तिची आठवणआली की लहान मुलांसारखा ढसाढसा रडतो तो, ज्या दिवशी तो तिला पहिल्यांदा जिथे भेटला तिथे प्रत्येक वर्षी तो जातो... कारण त्याला त्याची ऐंजल परत हवीय ती ऐंजल जी कधीच परत येणार नाही...

समाप्त!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users