दुर्मिळ व्हिडिओ अाणि अॉडीअो आणि कलाकारांची माहिती

Submitted by केअशु on 23 September, 2019 - 11:11

खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने आपणाकडे आलोय.नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.

1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?

3)खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर सुनिल बर्वे,रविंद्र मंकणी,रसिका जोशी,सुलभा देशपांडे यांची "भुमिका" नावाची मालिका लागायची.याचं शीर्षक संगीत नरेंद्र भिडे यांनी केलं होतं ते Mp3 स्वरुपात आंजावर कुठे मिळेल?

4)छ.शिवाजी महाराजांनी तमिळनाडूतील तंजावर पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.त्यांच्याबरोबर शेकडो मराठी कुटूंबे वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांच्याबरोबर तिकडे गेली;तिथेच राहिली.
त्यांनी तिकडे मराठी भाषा,संस्कृती अद्यापही जपली आहे.यावर मुंबई दुरदर्शनने चेन्नई दुरदर्शनच्या सहकार्याने एक व्हिडीओ रिपोर्ट बनवला होता.तो आंजावर कुठे मिळेल?

5)खाली मराठी शादीच्या एका व्हिडिओची लिंक देतोय.
https://m.youtube.com/watch?v=PQ866yYfDdM
यात अभिनेते रुषी देशपांडे यांच्या पत्नीचे काम केलेल्या अभिनेत्रीचे नाव काय?त्यांनी कोणत्या सिनेमात काम केले आहे का?

6) या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जिचा फोटो आहे त्या अभिनेत्रीचं नाव काय?

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=47815470330385...

सर्वांचे आधीच आभार!

Group content visibility: 
Public - accessible to all site users