हा धागा विरंगुळा प्रकारात आहे. मनावर घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवायचं.
तर लोकहो, या ठिकाणी, आजवर ट्रोलिंग चे एक सो एक प्रकार सादर झालेले आहेत. (माहिती नसतील, नविन असालं, तर एकदा फेर फटका मारून या सर्व धाग्यांवर आरामात आणि हो, हातात पॉपकॉर्न घेऊन बसा कारण काही अत्यंत मनोरंजक वाचावयास मिळणार आहे तुम्हाला.)
जर तुम्हीही ट्रोल झाला असालं तर अभिनंदन. कारण ट्रोल केवळ त्याच व्यक्तींना करता येत ज्यांची स्वतःची विशिष्ट अशी स्टाईल असते, शैली असते, जे लोकप्रिय असतात आणि ज्यांना हायलाईट करता येईल किंवा करावं वाटेल इतपत महत्त्व प्राप्त झालेलं असतं.
काही जण (खासकरून नविन सदस्य/राजकारण न जमणारे/ संवेदनशील वगैरे) मात्र ट्रोलिंगला कंटाळून उगाच डिप्रेस होतात. त्यांच्या करता हा धागा.
सोशल मिडियाला सिरियसली घेऊ नये अजिबात. - कोणीतरी लिहिलं होतं. आणि माझ्याकडून त्या वाक्याला +११११
तरीही काही उपाय आहेत त्यांच्याकरता, ज्यांना त्यांचे इथले अस्तित्व आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते.
तर, उपाय अगदी साधा आणि सोप्पा आहे. दुर्लक्ष!
हे जमलं नाही, अवघड वाटलं तर खालचा अभ्यासपुर्ण लेख वाचा! अनुभव आणि अभ्यास यांची सांगड वगैरे घातलेला.........
ट्रोलिंगची सुरुवात कशी ओळखायची?
आपल्या धाग्यावर चित्र-विचित्र, आगाऊ, संबंध नसलेले प्रश्न विचारले जातात किंवा काही त्रासदायक प्रतिसाद लिहिले जातात. ट्रोलर्स भाषा अशी वापरतात की उलट उत्तर रागीट पद्धतीने वाईट शब्दात देण्यास प्रवृत्त होतो आपण.
पण थांबा. टाईप करणाऱ्या हातांना आवर घाला. कदाचित तुम्हाला लिहायचे आहेत ते शब्द तुमच्याच विरूध्द उभे केले जाऊ शकतात.
उत्तरे देण्याआधी विचार करा की हा प्रश्न का विचारला आहे. उद्देश नीट कळला नाही किंवा अयोग्य/अतार्किक वाटला तर उत्तर देणे टाळाच.
जे ट्रोल करतात ते मूळ मुद्दा सोडून एकच शब्द/वाक्य घेऊन त्यावर हैदोस घालतात. काहीही लिहित सुटतात. आशय समजून न घेता शब्दखेळ खेळत तुमच्या लिखाणाचा विपर्यास करतात.
अश्यावेळी काय करायच?
मौन व्रत! कारण त्यावर तुमचे मौन त्यांना अपेक्षित नसते. आणि तुम्ही तेच धारण केले म्हणल्यावर ट्रोलरचा उद्देश असफल होतो. सफशेल फसतो.
पण तुमच्या त्या धाग्यावर जाणे तुम्ही बंद करायचे नाही हं. त्यावरच जर दुसरा कोणी काही साधा प्रतिसाद दिला असेल तर त्यावर नक्की प्रतिसाद लिहा अगदी मुद्दामून आणि त्यात ट्रोलरचा उल्लेख (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेसुद्धा) पूर्णत: टाळा. अनुल्लेखाने मारणे म्हणतात याला. आणि याचा खूप त्रास होतो ट्रोलर्सना. फार घातक अस्त्र आहे हे! तडफडतात ट्रोलर्स अक्षरश:!!
अजून एक, इथले काहीच मनावर घेऊ नका; कारण ट्रोलिंग करणारे डुआयडीच असतात साधारणत: आणि त्या ट्रोलिंगला सपोर्ट करणारे आणि हसणारेही त्याच डुआयडीचे आणखी खोटे आयडीज् असण्याची घनदाट शक्यता असते. कंपुही असू शकतो एखादा.
त्यामुळे शांत रहा. तुम्हाला अस्वस्थ करण्याचा आणि चिडवण्याचा त्यांचा हेतू कधीच सफल होऊ न देणे हे तुमच्याच हातात आहे.
हे प्रकार बऱ्याच सोशल साईटस् वर चालतात.
त्यामुळे निघून जाणे, साईट सोडून देणे, लिखाण बंद करणे टाळा. कारण हाच हेतू असतो ट्रोलर्सचा!
ट्रोलिंग सेलिब्रिटीज् चे व्हायचे आधी. आता वाटतंय 'हम भी सेलिब्रिटिज् से कम कहॉ है!' 
ट्रोलर्स ना भरपूर मोकळा वेळ असतो आणि त्यांना खऱ्या आयुष्यात किंमत नसते म्हणून ते आपल्या मानगुटीवर येऊन बसतात वेताळासारखे.
ट्रोलर्स E-समाजसेवाकरण्याकरता जो त्यांचा अमुल्य (काहीच किंमत नसल्याने खरतरं 'विनामूल्य', 'पडिक') वेळ देतात त्याबद्दलची माहिती धाग्यावरील प्रतिसादात मिळेल.
टीप: ट्रोलर्स ना दुखावण्याचा हेतू होता, असे वाटले असेल, तर बरोबर ओळखले आहेत तुम्ही. दुखावले गेले असालं तर मस्तच! नाही तर अजूनच मस्त! कारण तुमच्यामुळेच आम्हाला न ओळखणारेही आम्हाला ओळखू लागले. जाम प्रसिद्ध करून सोडलंत आम्हाला! काम सुरु ठेवालंच ही खात्री आहे. पण बंद करावं वाटलंच तर करू शकता, हरकत नाही.
आजवर भरपुर कष्ट उपसून केलेल्या आमच्या प्रसिद्धीकरता धन्यवाद! इतकी मेहेनत तर कोणी पेड प्रोमोटर सुद्धा करत नाही नेत्याची, जितकी तुम्ही फुकटात आणि वर चार शिव्या खाऊन आमची प्रसिद्धी केलीत. याबद्दलची कृतघ्नता दाखवण्याकरता हा धागा.
मी कोणाचेही नाव लिहित नाही. कारण ज्यांचे राहिलं त्यांच्यावर अन्याय असेल तो. त्यामुळे सर्व ट्रोलर्सने स्वतःच समाधान मानून घ्या की त्यांच्या कष्टांना आम्ही मायबोलीकर जाणतो. (या धाग्यावर तुम्ही यालंच. त्यामुळे सर्वांना आम्ही ट्रोलर्सची नावे कळवायची गरज भासणार नाही. सुज्ञास सांगणे न लागे!)
- स्वघोषित प्रतिनिधी of ट्रोल्ड मायबोलीकर्स!
इथले अॅडमिन काही कामाचे
इथले अॅडमिन काही कामाचे नाहीये , सो मी तिकडे गेलेच नाही, फक्त एकाच गोष्टीचे आश्वर्य वाटले की ह्या कंपुतील स्त्रि आयडी , अमर९९ / शक्तिवान ला एक न्याय अन Akku320 ला दुसरा असे का वागतात?? माझ्यामते दोघेही सारखेच
धाग्यावर त्याच्याच प्रतिसाद
धाग्यावर त्याच्याच प्रतिसाद वाचून करू नये. ते तुम्ही केलेत. या तुमच्या कृतीला काय म्हणाल? हे हास्यास्पद नाही का जास्त?
नवीन Submitted by मी_मधुरा on 23 September, 2019 - 04:05
हा प्रतिसाद हलकट आणि नीचपणाचा कळस आहे. निर्लज्ज लोकांकडून वेगळं काय अपेक्षित आहे.
VB माझी तुलना त्या नीच अक्कू
VB माझी तुलना त्या नीच अक्कू बरोबर करुन मला त्याच्या रांगेत बसवलं हे बरोबर नाही.
आणि खरे असेल की तुम्ही माझे
आणि खरे असेल की तुम्ही माझे लिखाण आणि प्रतिसाद वाचत नाही तर माझ्या आयडी ने लिहिलेला धागा म्हणल्यावर तुम्ही ही लिंक ओपन करणेच अपेक्षितच नव्हते. मग प्रतिसाद वाचायची वेळ आलीच कुठून? ज्या व्यक्तीचे लिखाण आपण वाचत नाही असा दावा आपण करतो आहोत तो दावा निदान त्याच्याच धाग्यावर त्याच्याच प्रतिसाद वाचून करू नये. ते तुम्ही केलेत. या तुमच्या कृतीला काय म्हणाल? हे हास्यास्पद नाही का जास्त? Biggrin
Submitted by मी_मधुरा on 23 September, 2019 - 13:35 >>>> माझ्या मते तुमच्या कंपुत खुपसारे ट्रोल भरलेत , काल तो प्रकार झाला अन मग हा धागा, भारी योगायोग.. त्यामुळे खात्रिच होती की ईकडे माझे नाव असेल अन ते होते हे सत्य नाही का???
आता आला तुम्ही खर्या ट्रॅकवर , किप ईट अप
माझे पेशन्स संपलेत, मी खरच थांबते, , वाद घालण्यात मला रस नाहीये
& our trollers are here
& our trollers are here.
Please welcome them and have a fun. Just observe how effortlessly they try to make a mess.
वरुन तुम्ही कितीही हसायचं
वरुन तुम्ही कितीही हसायचं नाटक केले तरी आत खोलवर दुखतंय हे कळतंय. त्यासाठीच हा धागा काढला आहे. करा दु:ख हलकं करा. Get well soon.
माझ्या मते तुमच्या कंपुत
माझ्या मते तुमच्या कंपुत खुपसारे ट्रोल भरलेत , काल तो प्रकार झाला अन मग हा धागा, भारी योगायोग.. त्यामुळे खात्रिच होती की ईकडे माझे नाव असेल अन ते होते हे सत्य नाही का???>>>>>>>>>>>>> काय संबंध? अक्कुला विचारा की त्याने संपादित केलेल्या प्रतिसादात तुमचे नाव होते का नाही ते! आणि आपण इतके बोललो ही नाही की मी स्वतःहून तुमचे नाव घेईन. बरं त्यात तुमच्या बद्दल वाईटही काही लिहिलेले नाहीये मी.
आणि कसला कंपु? हा अक्कु तरी कुठे आला आमच्या बाजूने admin च्या विपुत लिहायला? आम्ही ( मी आणि श्वेता ) ट्रोलला कंटाळून विपु केला पण admin शांतच! बाकी आमच्या बाजूने एखाद दुसरा आयडी बोलला असेल.
VB, तुमच झालेलं ट्रोलिंग वाहून सुद्धा गेलं वाहत्या धाग्यावर. आमचे झालेले ट्रोलिंग अजूनही आहे इथे.
तुम्ही आमचा विचार केलात?
आणि न्याय आमच्याकडे काय मागत आहात? जर हातात असते तर मी असे ट्रोलिंग होऊ दिले असते का? निदान स्वतःचे तरी नसते ना होऊ दिले. आयडी उडवणे, धागा उडवणे, प्रतिसाद उडवणे हे अधिकार मला admin ने दिलेले नाहीत. इथे प्रत्येक जण स्वतःची बाजू स्वतःच मांडतो. आणि आम्ही तुमच्या ट्रोलिंग विरूध्द आवाज उठवावा असे तुम्हाला वाटते आहे का? मग आमच्या बाजूने तुम्ही कधी काही का लिहिले नाहीत ट्रोलिंग विरोधात हा प्रश्न उरतोच अनुत्तरित!
ट्रोलर्स ना वाईट वाटलेले आहे
ट्रोलर्स ना वाईट वाटलेले आहे असे दिसते.
मधुरा मला तुझा रागही नाही ना
मधुरा मला तुझा रागही नाही ना तुझ्या लेखनाचा मी चाहता आहे. मी तुला ट्रोल केले नाही. तू महाभारत तुझ्या पद्धतीने लिहिले. मला आवडलं नाही मी वाचायचं सोडून दिले.
मधुरा, तुम्ही आता जास्तच
मधुरा, तुम्ही आता जास्तच हास्यास्पद होताय?? माझ्यासाठी मी एकटी पुरेशी आहे, मी तुमच्याकडे न्याय मागतेय?
I mean seriously?? बाहेर या या गैरसमजुतीतुन. मी आधीही लिहीलेय की जर ईकडे माझे नाव नसते तर मी ईकडे लिहीले नसते, माझ्या प्रतीसादाला प्रतित्यूर करत तुम्हीच विषय ताणलात, अन मी वेळोवेळी लिहुन सुद्धा की आता नको लिहायला, तरी तुम्हालाच लिहावे वाटले अन प्रत्येक वाक्य स्वत:वर ओढुन घ्यायचे असेल तर मी काही करु शकत नाही
अन खरेच थांबते, कारण मला नाही
अन खरेच थांबते, कारण मला नाही वाटत तुमचा ईगो तुम्हाला थांबु देईल.. अन या वाद विवादात काहीच साध्य होणार नाही, करुन सारुन तो विक्रुत तर नामानिराळा, त्याच्यात हिम्मत असती तर त्याने त्याचा प्रतिसाद एडीट केलाच नसता न काल त्याची चुक समोर आणणारे प्रतिसाद घालवले असते.
तुम्ही, तुमचा कंपु, तो विक्रुत अन त्याला सपोर्ट करणार्या स्त्रि आयडी चालु द्या, अन आता नविन कोणीतरी पकडा
कंपुतील स्त्रि आयडी , अमर९९ /
कंपुतील स्त्रि आयडी , अमर९९ / शक्तिवान ला एक न्याय अन Akku320 ला दुसरा असे का वागतात??>>>>>>> तुम्हीच लिहिले होतेत. असो.
मी थांबायचे म्हणले की तुम्ही उगीच अपमान करत वाढवता आहात. माझा कोणताही कंपु नाही. (अजूनतरी) मला बॅड इगो नाहीये. सो त्यावर नको बोलायला. पर्सनल होत आपणच भांडत बसू नाहीतर.
बाकी तुम्ही हे मला उद्देशून लिहित नाही आहात हे स्पष्ट झाले असल्याकारणाने मी थांबते.
सर्व सोशल साईड वर एक आयपी
सर्व सोशल साईड वर एक आयपी अड्रेस एक आयडी असा निर्णय घेण्याची वेळ आली आहे .
स्वतंत्र वर घाला अशी बोंब होईल .
आणि अडचणी सुद्धा येतील आपण दुसऱ्या मोबाईल किंवा लॅपटॉप चा वापर तर करू शकू पण दुसरा आयडी आपण कोणत्याच मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरून बनवू शकणार नाही .
आता स्थिती खूप गंभीर आहे .
यू ट्यूब,फेस बुक सारख्या ठिकाणी असंख्य बोगस आयडी आहेत आणि ते समाजाला घातक ठरतील अस्य पोस्ट ,comment देत असतात .
स्त्री वर्गाला ह्याचा सर्वात जास्त त्रास होतो .
आपल्या इथे सुधा असे खूप बोगस आयडी आहेत .
पोस्ट तेच टाकतात positive आणि निगेटिव्ह कमेंट सुधा तेच टाकतात .
एकच व्यक्ती पोस्ट पण टाकते आणि दोन्ही प्रकारचे कमेंट सुधा देते .
Mp,ऐसी अक्षरे,myboli वर एकच व्यक्ती विविध नावाने प्रगट होत आहे .
आणि ह्या तिन्ही मराठी साईड चे अतोनात नुकसान करत आहेत .
अडमिन नी वेळीच सावध होणे गरजेच आहे .
खोगीर भरती नको
सदस्य कमी असतील तरी चालेल पण दर्जा राखला जावा
राजेश, संपूर्ण प्रतिसादाला
राजेश, संपूर्ण प्रतिसादाला +१११११११.....
तो पर्याय जमणार नाही म्हणून आधारकार्ड जोडायला लावायचे सगळ्या ठिकाणी. एक आधारकार्ड एक आयडी!
अरे वाह ! फारच गमतीशीर धागा
अरे वाह ! फारच गमतीशीर धागा आहे. पण अँग्लर्स पॉइंट चुकलाय इकडे एवढं नक्की, कारण ज्यासाठी गळ टाकलाय ते मोठ्ठे शार्क्स उथळ पाण्यात येत नाहीत.
शार्क को पकडना है तो समुंदर में डुबकी लगाके उसके सामने जाके छेडखानी करो तो जानो । इस तरह किनारे की दुसरी छोर पे बैठने से कुछ नही होने वाला ।
रच्याक - माझ्याकडे २ आधार आहेत ...
(No subject)
VB, तुमच्या अक्कु या
VB, तुमच्या अक्कु या आयडीबद्दलच्या काही मुद्यांशी मी सहमत आहे. (मधुराबद्दलच्या नाही. पण त्यासाठी हा धागा नाही.)
सर्वप्रथम मीतरी तुम्हाला ट्रोल वगैरे म्हणणार नाही, कारण I know you are genuine ID. मागे कऊने वर्षूताई मी तुझ्या घरी येईन असं पुसटसं वाचलेलं आठवतंय.
अक्कु ह्या आयडीबाबत मात्र माझं मत आधीपासून सेम आहे, जे आज VB यांनी मांडलय. कुठल्याही स्त्री आयडीच्या अतिशय जवळ आहोत असं दाखवण, ओळख पाळख नसली तरीही विचित्र वाटेल असं वर्तन करणं (यावरून मी त्याला सुनावलं देखील होतं, पण असो.) कुणी बोलत नसेल, पण ऑकवर्ड वाटत असं वाचायला. आणि असं वागून कुणी इम्प्रेस होत असेल, तर गॉड सेव द कपल!!!
मी तो धागा ओझरता वाचला होता, त्याचे प्रतिसादही मी वाचले होते, आणि अक्कु ज्या पद्धतीने VB शी भांडत होता, ते अक्षरशः चीड आणणारं होतं.
अज्ञा आणि समाधीच्या वादात मुद्दाम उडी घेऊन वाद दोन्हीही बाजूने खालच्या थरावर नेण्यात अक्कुचा सिंहाचा वाटा होता. नेहमी स्पष्टीकरण काय? ती मन्याला बोलली, तो सुपुला बोलला, ती मधुराला बोलली? अरे स्त्री आयडीनी तुला official स्पोकपर्सन ठेवलंय का? स्त्रिया समर्थ आहेत त्यांची बाजू लढायला. हिरो बनायला जायची गरज नाही प्रत्येक गोष्टीत.
VB, मी धागा वाचला विनोदाचा.
VB, मी धागा वाचला विनोदाचा. आत्ता लक्षात आलं की तुम्ही कोणाबद्दल बोलत होतात. मला वाटलं मला बोलताय. आणि म्हणून मी स्पष्टीकरण देत बसले की मी ट्रोलिंग ला मदत करत नाहीये वगैरे...... आत्ता नाव पाहिलं मी धाग्यावर जिने मदत केली तिचं.
पण आमचा कंपु आहे हे तुम्ही चुकीचे म्हणाला होतात. असं काही नाहीये.
बाकी मला कळत नाही हे का सुरु झालं? विनोदाचा धागा होता ना तो? तिकडे पण?? कमाल आहे!
मधुरा मलाही धाग्याची लिंक
मधुरा मलाही धाग्याची लिंक देशील प्लिज!
विनोद धाग्याची ना? ही बघ!
विनोद धाग्याची ना? ही बघ!
https://www.maayboli.com/node/1567
अरे वा, वेबमास्टर ऍक्टिव
अरे वा, वेबमास्टर ऍक्टिव दिसतायेत.
म्हणजे आपलं झालेलं ट्रॉलिंग, दिलेल्या शिव्या मुद्दाम ठेवल्यात. मज्जाच!!!
मग आता विपु करून काय उपयोग? मायबोली आता ओपन फॉर everything
२५ सप्टेंबरची वाट पाहुया !!
२५ सप्टेंबरची वाट पाहुया !!
निकाल लागेल नाहीतर निकालात तरी निघेल.
धन्यवाद ऊर्मिला.
धन्यवाद ऊर्मिला.
मी तुम्हाला प्रतिसाद द्यायलाच विसरले आधी. म्हणून आत्ता लिहिले.
ज्यांना ज्यांना आम्हाला ट्रोल
ज्यांना ज्यांना आम्हाला ट्रोल केलं जातं असं वाटतं अशा महाभागांनी आपले आधार कार्ड आयडीसोबत जोडून ते सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करावी. अक्कू सारखे आयडी राहु केतु सारखे प्रत्यक्षात अस्तित्वात नसतातच पण काही विकृत असे आयडी अशा आयडीच्या आडून विकृतीची खाज भागवून घेत असतात. वीक्ष्य हा आयडी असाच प्रकार होता.
ओ वीबी ताई मला दुसर्या आयडीशी
ओ वीबी ताई मला दुसर्या आयडीशी संबध जोडु नका. कारण मी तुमच्याशी एकदा पण घाण भाषेत किंवा शिवराळ भाषेत बोललो नाहीये.
आणी काय घाण भाषा विकृत भाषा लावुन दिलेय
तुमच्या भाषेच्या विकृत भाषेच्या व्याख्येनुसार कोणती भाषा विकृत किंवा घाण असते सांगाल का??
अहो मी आत्ताच नवा लॅपटॉप
अहो मी आत्ताच नवा लॅपटॉप घेतलाय
सो त्याचे किज एवढे नाजुक आहेत की मला त्या क्लिक करतांनाही अपराधी पणाच वाटत.
सो तुमच्याशी आत्ता जास्त भांडण नाही करु शकत सॉरी.
आणि एक माबोवर जे आयडी मला
आणि एक माबोवर जे आयडी मला एवढे बोलतायत त्यांच्याशी एकदाही काही खालच्या दर्जाच कधीच बोललो नाही.
एवढेच काय वीबी यांच्याशी सुद्धा शाब्दिक भांडलो
कुठेही चुकीचा शब्द वापरला नाही.
अरे धागा कोणासाठी आणि वाद कोण
अरे धागा कोणासाठी आणि वाद कोण घालतय? काहीतरी संबंध आहे का?
कुणाच्या खांद्यावर.......!
admin ने लक्ष द्यावं, ट्रोल्ड लोकांना एकटं वाटून त्रास होऊ नये म्हणून धागा काढला होता. आणि इथे वेगळीच लोक वातावरण आणि डोकी तापवून स्वतःची भाकरी भाजून घेत आहेत. कमाल आहे.
अक्कु, vb, हा धागा तुमच्या मुळे/ तुमच्याकरता लिहिला गेला नव्हता. मी लेखात वरती कोणाची नाव लिहिली नाहीत कारण हे कोणा एकाला उद्देशून आणि केवळ एकाच घटनेवर आधारित नाही.
मायबोलीवर स्त्रियाचे
मायबोलीवर स्त्रियाचे ट्रोल्लिंग इतके वाढलेय की मी फक्त वाचनमात्र असते हेच बरे. अमर99 , akku320 हे सगळेच सारखे. एकावर कारवाई केली मग दुसरयला का मोकाट सोडला. म्हाश्वेता मधुरा चे जे ट्रोल्लिंग झाले ते सगळ्यांनी बघितले. विनोदाच्या धाग्यावर akku320 जे वागला त्यासाठी vb ने जे लिहिल त्याला अनुमोदन.
या सगळ्या ट्रोल्स वर अडमीन योग्य कारवाई करतील ही अपेक्षा. नाहीतर ही साईट महिलांसाठी चांगली नाही असेच म्हणावे लागेल
रसिका अनुमोदन.
रसिका अनुमोदन.
Pages