ट्रोलिंग आणि उपाय!

Submitted by मी मधुरा on 22 September, 2019 - 14:02

हा धागा विरंगुळा प्रकारात आहे. मनावर घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवायचं. Happy

तर लोकहो, या ठिकाणी, आजवर ट्रोलिंग चे एक सो एक प्रकार सादर झालेले आहेत. (माहिती नसतील, नविन असालं, तर एकदा फेर फटका मारून या सर्व धाग्यांवर आरामात आणि हो, हातात पॉपकॉर्न घेऊन बसा कारण काही अत्यंत मनोरंजक वाचावयास मिळणार आहे तुम्हाला.)

जर तुम्हीही ट्रोल झाला असालं तर अभिनंदन. कारण ट्रोल केवळ त्याच व्यक्तींना करता येत ज्यांची स्वतःची विशिष्ट अशी स्टाईल असते, शैली असते, जे लोकप्रिय असतात आणि ज्यांना हायलाईट करता येईल किंवा करावं वाटेल इतपत महत्त्व प्राप्त झालेलं असतं.

काही जण (खासकरून नविन सदस्य/राजकारण न जमणारे/ संवेदनशील वगैरे) मात्र ट्रोलिंगला कंटाळून उगाच डिप्रेस होतात. त्यांच्या करता हा धागा.

सोशल मिडियाला सिरियसली घेऊ नये अजिबात. - कोणीतरी लिहिलं होतं. आणि माझ्याकडून त्या वाक्याला +११११

तरीही काही उपाय आहेत त्यांच्याकरता, ज्यांना त्यांचे इथले अस्तित्व आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते.

तर, उपाय अगदी साधा आणि सोप्पा आहे. दुर्लक्ष!
हे जमलं नाही, अवघड वाटलं तर खालचा अभ्यासपुर्ण लेख वाचा! अनुभव आणि अभ्यास यांची सांगड वगैरे घातलेला......... Lol

ट्रोलिंगची सुरुवात कशी ओळखायची?

आपल्या धाग्यावर चित्र-विचित्र, आगाऊ, संबंध नसलेले प्रश्न विचारले जातात किंवा काही त्रासदायक प्रतिसाद लिहिले जातात. ट्रोलर्स भाषा अशी वापरतात की उलट उत्तर रागीट पद्धतीने वाईट शब्दात देण्यास प्रवृत्त होतो आपण.

पण थांबा. टाईप करणाऱ्या हातांना आवर घाला. कदाचित तुम्हाला लिहायचे आहेत ते शब्द तुमच्याच विरूध्द उभे केले जाऊ शकतात.
उत्तरे देण्याआधी विचार करा की हा प्रश्न का विचारला आहे. उद्देश नीट कळला नाही किंवा अयोग्य/अतार्किक वाटला तर उत्तर देणे टाळाच.

जे ट्रोल करतात ते मूळ मुद्दा सोडून एकच शब्द/वाक्य घेऊन त्यावर हैदोस घालतात. काहीही लिहित सुटतात. आशय समजून न घेता शब्दखेळ खेळत तुमच्या लिखाणाचा विपर्यास करतात.

अश्यावेळी काय करायच?

मौन व्रत! कारण त्यावर तुमचे मौन त्यांना अपेक्षित नसते. आणि तुम्ही तेच धारण केले म्हणल्यावर ट्रोलरचा उद्देश असफल होतो. सफशेल फसतो.

पण तुमच्या त्या धाग्यावर जाणे तुम्ही बंद करायचे नाही हं. त्यावरच जर दुसरा कोणी काही साधा प्रतिसाद दिला असेल तर त्यावर नक्की प्रतिसाद लिहा अगदी मुद्दामून आणि त्यात ट्रोलरचा उल्लेख (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेसुद्धा) पूर्णत: टाळा. अनुल्लेखाने मारणे म्हणतात याला. आणि याचा खूप त्रास होतो ट्रोलर्सना. फार घातक अस्त्र आहे हे! तडफडतात ट्रोलर्स अक्षरश:!!

अजून एक, इथले काहीच मनावर घेऊ नका; कारण ट्रोलिंग करणारे डुआयडीच असतात साधारणत: आणि त्या ट्रोलिंगला सपोर्ट करणारे आणि हसणारेही त्याच डुआयडीचे आणखी खोटे आयडीज् असण्याची घनदाट शक्यता असते. कंपुही असू शकतो एखादा.
त्यामुळे शांत रहा. तुम्हाला अस्वस्थ करण्याचा आणि चिडवण्याचा त्यांचा हेतू कधीच सफल होऊ न देणे हे तुमच्याच हातात आहे.

हे प्रकार बऱ्याच सोशल साईटस् वर चालतात.
त्यामुळे निघून जाणे, साईट सोडून देणे, लिखाण बंद करणे टाळा. कारण हाच हेतू असतो ट्रोलर्सचा!

ट्रोलिंग सेलिब्रिटीज् चे व्हायचे आधी. आता वाटतंय 'हम भी सेलिब्रिटिज् से कम कहॉ है!' Lol

ट्रोलर्स ना भरपूर मोकळा वेळ असतो आणि त्यांना खऱ्या आयुष्यात किंमत नसते म्हणून ते आपल्या मानगुटीवर येऊन बसतात वेताळासारखे.
ट्रोलर्स E-समाजसेवाकरण्याकरता जो त्यांचा अमुल्य (काहीच किंमत नसल्याने खरतरं 'विनामूल्य', 'पडिक') वेळ देतात त्याबद्दलची माहिती धाग्यावरील प्रतिसादात मिळेल.

टीप: ट्रोलर्स ना दुखावण्याचा हेतू होता, असे वाटले असेल, तर बरोबर ओळखले आहेत तुम्ही. दुखावले गेले असालं तर मस्तच! नाही तर अजूनच मस्त! कारण तुमच्यामुळेच आम्हाला न ओळखणारेही आम्हाला ओळखू लागले. जाम प्रसिद्ध करून सोडलंत आम्हाला! काम सुरु ठेवालंच ही खात्री आहे. पण बंद करावं वाटलंच तर करू शकता, हरकत नाही.

आजवर भरपुर कष्ट उपसून केलेल्या आमच्या प्रसिद्धीकरता धन्यवाद! इतकी मेहेनत तर कोणी पेड प्रोमोटर सुद्धा करत नाही नेत्याची, जितकी तुम्ही फुकटात आणि वर चार शिव्या खाऊन आमची प्रसिद्धी केलीत. याबद्दलची कृतघ्नता दाखवण्याकरता हा धागा. Lol

मी कोणाचेही नाव लिहित नाही. कारण ज्यांचे राहिलं त्यांच्यावर अन्याय असेल तो. त्यामुळे सर्व ट्रोलर्सने स्वतःच समाधान मानून घ्या की त्यांच्या कष्टांना आम्ही मायबोलीकर जाणतो. (या धाग्यावर तुम्ही यालंच. त्यामुळे सर्वांना आम्ही ट्रोलर्सची नावे कळवायची गरज भासणार नाही. सुज्ञास सांगणे न लागे!)

- स्वघोषित प्रतिनिधी of ट्रोल्ड मायबोलीकर्स!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. Happy

दोन पोस्ट थिल्लर पणाच्या आल्या की एक सूचना देवून चोध्या वेळेस सरळ आयडी उडवून टाकायचे प्रशासक चे धोरण असले पाहिजे .
ही trol करणारी विष वल्ली जास्त फोफावू देणे फायद्याचे नाही

ट्रोलिंग....
विषय छान आहे याचा बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे, माझ्या बाबतीत सुध्दा दोनदा घडले आहे.

मधुरा ताई आपण घेतलेल्या विषयावर बरेच लोक व्यक्त होतात याचा प्रत्यय आला असून आता मला ही थोडे काही व्यक्त व्हायला आवडेल.

माझ्या कामाच्या बाबतीत दोन तीन लोकांनी मला ट्रोलिंग करणे सुरू केले, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष करून कामे करत राहिलो तरी सुद्धा ट्रोलिंग काही थांबले नाही. शेवटी कंटाळून मी एक प्रतिक्रिया fb वर व्यक्त केली.....

ती अशी.......

विचित्र विचारांचा भुगां भिरभिरतोय

उगाच कोणाच्याही कानात गुरगुरतोय

विचारांच्या विचारात स्वतः घुटमळतोय

आडात नसता पोह-यात हुशारी पाझरतोय

वरील शब्द कोणालाही उद्देशून लिहिले नाही हे लक्षात घ्यावे.......

या अशा प्रतिक्रिये नंतर ट्रोलिंग करणे थांबले. तेव्हा ट्रोलिंग करतात त्याच्या वर दुर्लक्ष करणे आवश्यक आहे पण जर अगदीच त्रास झाला तर त्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे.

पुनश्च एकदा

वरील चारोळी आपल्या ग्रुपमध्ये कोणालाही उद्देशून लिहिली नाही.

बरोबर आहे यतिन.
आणि चारोळी अगदी डिट्टो लागू होतात त्यांना.

Happy

Pages