पुरुषार्थ

Submitted by छोटी on 21 September, 2019 - 06:37

#पुरुषार्थ

शुभम तणतणत घरात शिरला.... आई आणि बाबा त्याच्या मागुन रूममध्ये आले... दोघांनाही कळेना नेमकं झालं काय ते...आपला मुलगा एवढा का चिडला ते..
"शुभम काही सांगशील का? आता किती छान मूड होता, सर्वेशच्या मुलाला किती छान सांभाळलं , वहिनी किती खुश झाली... तुझं कौतुक ऐकून एकदम भरूनच आलं मला " आईने शुभमचा मूड चांगला करायचा प्रयत्न केला.
"कौतुक म्हणे, तो सर्वेश माझा मावसभाऊ म्हणे त्याच्या मुलाला माझ्याकडे सोडून गेला... तुम्ही सगळे उठून गेलात...मन रमले त्या मुलामध्ये,5 आजूबाजूला कोण आलं कळलं नाही तर त्या सावीची आई मला बघुन म्हणते काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटत एकटे मुलं असेच असतात...बायल्या आहे म्हणे... असा राग आला त्या बाईचा.. बाजूलाच सावी बसली होती...मनात आलं तिला घेऊन जाऊन सावीच्या आईला पुरुषार्थ काय असतो तो दाखवावा..."
"पुरूषार्थ? काय असतो पुरुषार्थ ?" इतक्या वेळचे शांत असलेल्या बाबांनी प्रश्न विचारला...
शुभमला काय बोलून गेलो ह्याची जाणीव झाली..."पप्पा रागात विचार आला माझ्या मनात"
"अच्छा, तेव्हा रागात होतास आता शांत आहेस ना मग सांग की काय असतो पुरुषार्थ?" बाबांच्या शब्दातली खोच शुभमला कळली...
"Manliness किंवा manhood"
"मी अर्थ विचारला, भाषांतर नाही... पण ते जाऊ दे ... तु जे काही करण्याचा विचार केला तो maliness होता का?... त्याला पुरुषार्थ म्हणतात का?" बाबांच्या ह्या प्रश्नावर शुभम एकदम गप्पच झाला.
"बाळा आज आम्ही हरलो रे... तुझ्या मनात हा विचार आला म्हणजे आम्ही कुठेतरी तुला मोठं करताना आमचं संगोपन ,आमचे विचार तुझ्यापर्यंत पोहचवायला चुकलो" आईच्या स्वरातला हताश सूर शुभमला जाणवला
"म्हणजे मीच चुकलो असं ना.. ती बाई मला बायल्या म्हणाली त्याच काही नाही असंच ना" शुभमला आई बाबांचं वागणं खटकायला लागलं... हे दोघे मला अजूनही लहानच समजतात.. कोणीही या टपली मारा... संस्कारांच्या नावाखाली द्या मोठे मोठे lecture...
"ती बाई म्हणाली म्हणून तू बायल्या का? कोणीतरी म्हणत म्हणून आपण असतो का? तु स्वतः कोण आहे त्यावर तुला doubt आहे का? बाळ आयुष्यात असे बरेच क्षण येतील ज्यात लोक तुला काहीही बोलतील त्यांना उत्तर द्यायला थांबु नकोस...आपलं ध्येय काय आहे त्याकडे लक्ष दे..कुचाळक्या काय चालूच असतात" आईनेही त्याला समजवायचा प्रयत्न केला
"मी कुठे त्या बाईला काही बोललो... मी तर मनात विचार केला" शुभमंच प्रतिउत्तर तैयारच होत
"आणि जो विचार केला त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का?" बाबांनी त्याला प्रतिप्रश्न केला...
"तुम्हाला नाही वाटत का तुम्ही मुद्दा कुठल्या कुठे नेता आहात... एखादे आई वडील असते तर त्या बाईची खरडपट्टी काढली असती.. आणि आमच्या घरी बघा..." त्याचा राग इतका अनावर होत होता की त्याला आपली चुकीसुद्धा मान्य नव्हती..
"जगाने कसं वागावं हे आम्ही का सांगावं...आमच्या मुलाने कसं वागावं हा आमचा प्रश्न आहे... ती बाई काहीही बोलली तरी तुझ्या शरीराला छिद्र पडली की तु खरंच बायल्या झालास? "
"आघात होतोच ना? की संवेदना मेल्या आहेत माझ्या की मला काहीच फरक पडत नाही" शुभम वादालाच पेटला होता.
"रश्मी आत्या तुझ्या पप्पांची कोण माहिती आहे का?"आईने आपला पुढचा प्रश्न विचारला...
"आता हे काय नवीन? पप्पांची सख्खी बहीण"
शुभमच्या ह्या उत्तरावर आई आणि बाबांची नेत्रपल्लवी झाली.."तु कधी रश्मी आत्या आणि बाबांचा लहानपणीचा फोटो बघितला आहे?" शुभम विचारात पडला खरंच की पप्पा आणि रश्मी आत्याचा लहानपणीचा आपण कधी फोटोच नाही बघितला... त्याचा विचारमग्न आणि प्रश्नार्थक चेहरा बघुन आईनेच बोलायला सुरुवात केली
"रश्मी आत्या तुझ्या बाबांची मानलेली बहीण आहे...आत्याचे Mr airforce मध्ये आहेत हे तर तुला माहितीच आहे. त्या वेळी 1999 मध्ये कारगिलच युद्ध सुरू झालं आणि आत्याची due date साठी आलेल्या मामांना अचानक पणे परत जावं लागलं...आत्याची आई किंवा आजीला बोलवलं होत ते पोहचणार त्याच्या आधीच आत्याला कळा सुरू झाल्या होत्या ...आणि तेव्हाच मी सुद्धा तुझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचली होती तुझ्या आजी आणि पप्पांसोबत ...मला ऍडमिट केलं आणि बाबांना आत्या दिसली ... पप्पा काहीही विचार न करता आत्याकडे धावत गेले...आणि तिला धरलं कारण तिला घेरी आली होती...हातातली purse आणि फोन नंबरचा कागद पप्पांचा हातात देऊन तिने इतक्या वेळ धरलेला संयम सोडला... पप्पांनी आत्याला उचलून घेतलं आणि तेवढ्यात स्ट्रेचर आणलं वॉर्डबॉयने, पप्पानीच फॉर्म sign केला... आत्याला ऍडमिट केलं... आपली सई येईपर्यंत पप्पा तिथेच उभेचे उभे होते.. सगळा खर्च त्यांनी स्वतः केला, आत्याची purse त्यांच्याकडे असताना... आणि त्या कागदावर जो नंबर लिहिला होता तिथे फोन लावला आणि मामांना कळवलं... इकडे तु पण आला ..मी पप्पांची विचारणा केली... पण आजीने औषध घ्यायला गेले म्हणून सांगितलं... ह्यात सगळ्या प्रकारात अजुन एक प्रकार झाला... पप्पा जेव्हा आत्याला उचलून घेऊन स्ट्रेचर वर ठेवलं आणि मध्ये नेलं तेव्हा एक nurse काहीही माहिती नसताना बाबांना काय काय बोलली... आधीच कॉल करून ठेवायचा ना बाईला अडकवून ठेवलं male chauvinist pig पण बोलली होती... पण पप्पानी त्याकडे लक्ष तर दिलंच नाही पण आत्याची मात्र पुर्ण काळजी घेतली... त्या दिवशी पप्पांनी केला तो होता धर्म पुरुषार्थ म्हणजे पुरुष धर्म पाळला आणि स्त्री धर्माला जगवल... तो होता अर्थ पुरूषार्थ म्हणजे पैशाचा विचार न करता माणुसकी दाखवली... तो होता काम पुरुषार्थ ...दुसर्र्या स्त्रीला माते-भगिनी समान मानलं....तो होता मोक्ष पुरूषार्थ फळाची अपेक्षा न करता त्यांनी कोणाला तरी निरपेक्ष मदत केली होती...आणि जन्म भराची नाती कमवली... ह्याला म्हणतात पुरूषार्थ (पुरुष + अर्थ) म्हणजे माणसाच्या जीवनातली ध्येय किंवा उददेश ... आणि एका बाईच्या काहीतरी बोलण्यावर तुला तिच्या मुलीच्या आयुष्यशी खेळायचा विचार येतो आणि त्याच तुला वाईट वाटत तर नाहीच उलट वाद घालतो आहे तु... आणि गोष्ट करतो आहे तुझ्या संवेदनांची"
शुभम नुसता निशब्द नाही झाला तर त्याच्या चुकीची जाणीव होऊन त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले...
"बाळा, ह्या अश्रूंची आठवण जन्मभर मनात ठेव आणि खरा पुरूषार्थ गाजव" बाबांनी आणि आईने एकत्र त्याला आशीर्वाद दिला....

@अर्चना चौधरी

Group content visibility: 
Use group defaults

+१ मन्या
फारच संयत सुरेख मांडणी आहे.

Dhnaywad

कोणीही मुलगा, पालकांना असे सांगायची (कथेत सुद्धा) हिंमत खरंच करेल? बाकी, मग पालक जे समजावतात ते छान लिहिले आहे.

धन्यवाद radhanisha

धन्यवाद सुनिधी, काही घरामध्ये मोकळेपणी बोलतात त्यामुळेच त्यांच्या घरात discussion होतात... पण तुम्ही घेतलेली शंका पण रास्त आहे ... पुढे कधी लिहिताना नक्कीच विचार करेन ...