ते दिवस परत हवेत

Submitted by सामो on 20 September, 2019 - 15:48

तुझी आठवण येत राहीली अन सुगंधी सुगंधी वाटत राहीलें. लाल लाल पळसासारखी मी फुलत राहीले, टपटपणार्‍या प्राजक्तासारखी बरसत राहीले - आतल्या आत, बसमध्ये, गर्दीमध्ये, कामामध्ये. केवड्याचा मादक सुगंध नव्हताच तो, लॅक्टोकॅलमीन अन लव्हेंडरचा शांत सुवास येत राहीला.
कॉलेजच्या दिवसांची आठवण येत राहीली. ते अबोल खरं तर मूकंच प्रेम आठवून आठवून, पाडस-वेडे दिवस आठवून सुगंधात भीजत राहीले. साधे प्रयोगशाळेतील, रसायनशास्त्राचे प्रयोग त्यात काय जादूमय असणारे? पण डेमो पहायला गटागटाने उभे रहाणे आठवले. माझी नजर तुला शोधायची. पण उभे मात्र आपण डायगोनलात. कारण जवळ येऊन इभे रहायची हिंमतच नसायची. फक्त दर्शनसुखाची लालसा.
किती तरी बोल्ड अँड ब्युटीफुल मुली होत्या तुमच्या ग्रुपमध्ये.माझ्यासारख्या बावळट खरं तर आत्मविश्वास नसलेल्या मुलीकडे पहायची तुला काय गरज होती? अन तरीही तेव्हाच्या तुझ्या कृती, आठवणी आता अ‍ॅनॅलाइझ करते अन वाटतं तुला जाणीव होती, तुझंही कदाचित प्रेम होतं.
परवा तू फेसबुकावर दिसलास अन भरुन आलं. अगदी तस्साच दिसतोस अजूनही. काळे (इतके काळेभोर डोळे कसे असतात बाई एखाद्याचे?) काळे डोळे अन करारीपणा. तुझी अतिशय गोड, किती किती गोंडस मुलगीदेखील पाहीली. OMG what a cutie!!!
खूप विचार करुन मेसेज अन रिक्वेस्ट पाठवली.
.
.
मेसेजला उत्तर दिलस पण रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली नाहीस. का ते माहीत नाही. एवढ्या ३००-४०० फ्रेन्ड्समध्ये सगळे काही बिझनेस इन्ट्रेस्ट्स किंवा खरेखुरे मित्र-मैत्रिण असतील असं वाटत नाही. मीदेखील गर्दीतील एक परीचीत म्हणून राहीले असते त्यांच्यात. पण इतक्या जुन्या ओळखीला अ‍ॅड करणंही तुला जड झालं.! का माझं इन्टरप्रिटेशन चुकतय? असो.
.
.
आज सुगंधात भीजताना परत परत एकच विचार मनात येत राहीला - Everybody gets what they deserve!
मला त्या कोवळ्या दवसातल्या निर्व्याज प्रेमाच्या आठवणीत भीजता येतय कारण त्या भावनांची ऊंची मोजायची, त्या भावना परत अनुभवण्याची माझी क्षमता आहे. कुठेतरी खूप निर्व्याज, निर्मळ प्रेम मी केलं आहे. खरं तर खूप अभिमानच वाटतोय.
.
.
कोणी मला परत ते जादूमय, मंतरलेले दिवस बहाल केले अन आत्ताचा आत्मविश्वास दिला तर तुला माहीते मी काय करेन? I will build you up. तुला आवडेल अशी वागेन. बेस्ट ऑफ लक देईन, कॉम्प्लिमेन्ट्स देईन. प्रयोगशाळेत, तुझ्या जवळ उभी राहीन , तुझ्याशी गप्पा मारेन. I will build you up.
फार काही नको, ते दिवस हवेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy करोगे याद तो हर बात याद आ ये गी
सगळ्यांना आपापल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देणारा लेख असे म्हणायला हरकत नसावी. खूपच छान लिखाण.

सर्वांचे, खूप खूप आभार.
>>>>>>कॉलेज वयात पाहिजे त्या ठिकाणी आत्मविश्वास अजिबात नसतो... आणि नको तिथे ओसंडून वाहत असतो..
हीच खरी त्या वयाची गंमत असते.>>>>> हाहाहा खरे आहे.

मस्तच लिहीलयस. मला अशी काही माणसं किंवा काही प्रसंग एका ठराविक वासाशी जोडले गेलेत. तो पर्टीक्युलर वास आला, कि ती माणसं आठवतात.मला तुझ्या सारखं लिहीता येत नाहीये. जसा
मे महिन्यात कैरीच्या चिकाचा आमच्या बागेत यायचा. मग हा वास आला कि उन्हाळ्याच्या सुट्टीतले काही प्रसंग आठवतात. बकुळीच्या वासाने पण बेचैन व्हायला होतं.

Loved One's & Dear One's Do Not Get A Place In Friend List
They Get Place In Heart List, Because They Are Not Friends,
They Are Special People, So A Special Place Is Reserved For Them (Always)

मला अशी काही माणसं किंवा काही प्रसंग एका ठराविक वासाशी जोडले गेलेत. तो पर्टीक्युलर वास आला, कि ती माणसं आठवतात. >>> कधी कधी नेमकी माणसं नाही आठवत पण तो काळ आठवतो.
एक peculiar perfume चा वास आहे , मला नेहमी कॉलेजचा काळ आठवतो. नक्की कोण वापरायचं माहित नाही.

Pages