अ परफेक्ट मर्डर

Submitted by Ravi Shenolikar on 20 September, 2019 - 07:36

काही दिवसांपूर्वी "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक पाहिले. अल्फ्रेड हिचकाॅकचा गाजलेला चित्रपट "Dial M for murder" चे हे सुंदर नाट्यरूपांतर. पहिल्या क्षणापासून खिळवून ठेवणारे. चित्रपट खूप वर्षांपूर्वी पाहिला असला तरी पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. नाटकाचे लेखन फार उत्तम झाले आहे. अनिकेत विश्वासराव व पुष्कर श्रोत्री ह्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेषत: पुष्करने पोलिस ऑफिसरची भूमिका मस्तच केली आहे. हे नाटक ते भूमिकांची अदलाबदल करून सुद्धा सादर करतात. त्यामुळे तुम्ही नाटक बघाल तेव्हा पुष्कर वेगळ्या भूमिकेत बघायला मिळण्याची शक्यता आहे. शिवाय कधीकधी अनिकेत विश्वासरावह्यांच्या जागी सतिश राजवाडे काम करतात. प्रिया मराठेने काम चांगले केलेय. पण जरा नवखी वाटते. कथेच्या दृष्टीने नेपथ्य फार महत्वाचे होते व ते समर्थपणे सांभाळले आहे. प्रयोग जवळजवळ हाउसफुल होता. नाटक चांगली गर्दी खेचत आहे व त्यात नवल नाही. अवश्य बघावे असे नाटक.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
मलाही पहावे वाटत होते
लव्ह बर्ड नन्तर सस्पेन्स नाटक पाहिले नाही