पाऊस

Submitted by Ravi Shenolikar on 18 September, 2019 - 11:17

नभातुनी झरती धारा
बेफाम वारा, घोंघावे

सागरी चाले थैमान
लाटा बेभान, उसळती

चपला चमकें आकाशीं
काळ्या ढगांची नक्षी, तिजसवे

अखंड पर्जन्यवृष्टी
हिरवी सृष्टी, चहुकडे

निसर्गाचे पाहतां तांडव
चाळवे शैशव, मनोमनीं

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैशव = बालपण
वार्धक्यातही निज शैशवास जपणे - म्हणतात ना
_____________
कविता - स्तुत्य प्रयत्न.

छान!