बुध -नेपच्युन‌ जोडी

Submitted by सामो on 17 September, 2019 - 12:39

नेपच्यून आणि बुधाने एकत्र यायचे कारण काही नव्हते,
दोघात‌ असे सामायिक काहीच‌ क‌धीच न‌व्ह‌ते,
.
मात्र‌ दोघे प्रेमात‌ आप‌ट‌ले.
.
बरं नेपच्यूनला तरी अंत:प्रेणा व्हायला हवी होती, की नाही, प्रेम आंधळे असते यात संशयच नाही.
बुधाचीही अक्कल कुठे चरायला गेली होती?,नेपच्यून बुधाची विजोड‌ जोडी जमली होती..
बुधाला वर्तमानपत्र जितके आवडीचे , नेपच्यूनला वास्तवाचे चटके तितके नकोसे.
बुधाने घेतलेला वैचारिकतेचा बसा, ,तिथे नेपच्यूनचा पाडाव लागावा तरी कसा?
मग व्हायचे काय दोघानचा मेळ बसेना,कुठे काय चुकतंय कोणाला कळेना.
बुध बोलू पाहायचा राजकारणावरती,मात्र नेपच्यूनला मेडीटेश‌न‌मधून फुरसत कोठे मिळायची?
फ्रस्ट्रेट व्हायचे दोघे, मुळी जमायची नाही गट्टी., अगदी उघडउघड नाही पण मनात व्हायची कट्टी.
प्रेमातसुद्धा तुझा हिशेब नेपच्यूनची नेहमीची तक्रार. बुध‌ मात्र काटेकोर त्याने केलेला कागदावर करार
नेपच्युन जायचा वाहावत फसण्यात त्याचा हातखंडा, बुध‌ मात्र पारखी भारी, तो ओळखून होता प्रत्येकाला
.
सामायिक काहीच मिळेना,
अरेरे :माझिया प्रियाला प्रीत कळेना."
.
पण ठरविले दोघानी राहायचे नाही असे miserable,आपापली बलस्थाने ओळखून करू त्यावर अंम‌ल
बुद्धाने विचार केला बराच तार्किक,शेव‌टी बुधच‌ तो पडला naturaly मार्मिक.
जरी नेपच्यून थोडा मठ्ठ वाटतो, बरेचदा वास्तव सोडून "spaced out" च‌ अस‌तो
जेव्हा प्रेम करतो करतो पुरासारखे , अलोट, असीम, अनावर अगदी वेड्यासारखे
का नाही सांभाळून घेऊ मी त्याला, शिवाय lossचा आहे जरा काडीमोड घेतला.
.
पाहील‌त‌ वाच‌क‌हो इथेही हिशेबीप‌णा Sad
.
नेपच्युन म्हणे बुधाला विश्लेषणातून वेळ मिळेल तर ना,किती romantic स्वप्ने पाहिलेली मी escape करताना .
पण हातून चुका होता नाही अजिबात त्याच्या , वागण्यातही perfect तो सांभाळतो मर्यादा
तसेही प्रेम उतरायचे लक्ष‌ण‌ दिसत नाही, मला मुळीच असे त्याला तोडाय‌चे नाही.
प्रयत्न तर करू यात ज‌ड‌व्याग‌ळ् लेख वाचायची भीती काढून टाकू डोक्यावरून ते जाण्याची
.
ऐक‌ताय‌ ना?
.
कन्या सोडून बुधाने मारला मीनेत फेरफटका, मीन सोडून नेपच्यूनही कन्येत जाऊन पडला.
सांगा त‌शा जातकांनो येते का तुम्हाला मज्जा
क्वचित जरी उडत असेल व्यवहारात फज्जा
परफेक्ट नसते काहीच तडजोड महत्वाची,
त्यानेच वाढते खुमारी गोड स्वप्ने पाहावयाची.
.
प‌ट‌त‌य‌ का ज्योतिषांचे म‌ग‌?

Group content visibility: 
Public - accessible to all site users