आत्मा

Submitted by Yogita Maayboli on 17 September, 2019 - 01:59

आयुष्याच्या सुरवातीपासून ते शेवट पर्यंत जी गोष्ट आपल्याला सदैव साथ देते ती म्हणजे आपला आत्मा.... Your soul . "Nothing can replace your own Soul"

जी माणसे आपल्या अवतीभोवती आहेत ती एका नात्याने, किंवा काही कारणांनी , काही उद्देशाने आपल्याशी जोडलेली आहेत.

आई - आई हि आपल्याशी जन्मापासून जोडलेली एकमेव व्यक्ती....पण तीही एका उद्देशाने तुम्हाला या जगात आणते... तुमच्या जन्माने तिला मातृत्व प्राप्त होते हा त्या मागचा उद्देश.... आणि मग जन्मानंतर आपोआपच.... माया, प्रेम, काळजी या भावना आपण तिच्याशी व ती आपल्याशी जोडत राहते.. पण मी वाचलेल्या एक गोष्टीत आईचे एक वेगळेच रूप माझ्यासमोर आले... अर्थात ती गोष्ट एका कोंबडीची होती.... एक कोंबडी आणि तिचे पिल्लू एकदा विहिरीत अडकते आणि त्या विहिरीत हळू हळू पाणी भरू लागते.... कोंबडी पहिले आपल्या पिल्लाला पाण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच्या पाठीवर घेते.....थोडा वेळ असाच निघून जातो...हळू हळू तेच पाणी कोंबडीच्या तोंडात जाऊ लागते मग ती कोंबडी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी त्या पिल्लाला आपल्या पायाखाली घेते......हि गोष्ट वाचून त्यावेळेस मी सुन्न झाली होती. पण नंतर मी विचार केला आपण पक्षी प्राण्यांना माणसाशी compare नाही करू शकत....पण खरंच हि वेळ जर एका आई वर आली असती तर तिने नक्की काय केले असते.....हा प्रश्न उरतोच.

वडील - वडील आणि मुलं यांचे नाते एक वेगळेच नाते असते. किंबहुना वडिलांसाठी त्यांची मुले हि एक जबाबदारी भासते..... आपण एका मुलीचे / मुलाचे वडील या नात्याने आपल्याला त्यांना मार्गी लावायचे आहे. मुलगी असेल तर तिला शिकवून तिचे लग्न लावून द्यायचे आणि मुलगा असेल तर त्याला शिकवून, नोकरी लावून त्याच्या साठी घर किंवा अजून काही संपत्ती करून ठेवणे हे वडिलांचे कर्तव्य. आणि या कर्तव्य पोटी ते आपल्याशी बांधलेले असतात....

मित्र / मैत्रिणी / भावंडे - हे नाते देखील काही उद्देशाने आपल्याशी बांधलेले असते . अर्थात एकाच वयात असलेल्या भावंडांचे / मित्र- मैत्रिणीचे विचार जुळतात, ते एकमेकांशी आपले अनुभव share करतात. एकत्र वेळ घालवतात म्हणून ते एक नाते बनते

जोडीदार/ प्रियकर/ नवरा - हे एक असे नाते आहे ते रक्ताचे नाही आणि माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केले आहे. नवरा बायको हे सुरवातीला प्रेम या विशेषनाखाली एकमेकांसोबत असतात.. पण खरंच प्रेम हे एकच गोष्ट असते का त्या मागे. त्यामागे अनेक करणे असतात, शारीरिक सुख, मानसिक आधार, social स्टेटस, पैसा , म्हातारपणाचा आधार, मग या नात्यातून होणारे मूल . आणि त्यामुळे आपल्याला मिळणारे अजून एक नाते...आई व वडिलांचे

मग खरंच या व्यक्ती स्वार्थावीना आपल्याशी जोडल्या आहेत का.,...नाही....केवळ आत्मा आपल्याबरोबर आहे आपल्या सर्व सुखदुःखात तोच तुमच्या सोबत असतो.... तो तुमच्याशी कधीच खोटं बोलत नाही कारण तुम्ही तुमच्या भावना कधीच त्याच्याशी लपवू शकत नाही....तुम्ही सुखी असो किंवा दुखी तुम्ही यशस्वी व्हा किंवा अपयशी तो तुमची साथ सोडत नाही........मृत्यू हि एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या पासून तुमचा आत्मा हिरावून घेऊ शकते...बाकी अशी कोणतीच शक्ती नाही जी तुमाला आत्म्या पासून वेगळे करू शकेन....

म्हणूनच तुम्ही फक्त तुमच्या आत्म्याचे तुमच्या मनाचे ऐकायला हवे....इतर माणसे जरी तुमच्या सुखदुःखात तुमच्या बरोबर असली तरी ते सर्व क्षणिक असते....विसरू नका नव्याचे नऊ दिवस..... जसे तुम्ही जुने होता तसेच नात्यांची वीण हि सैल होते.... कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवू नका....कारण आज जर कोणी तुमच्या साठी काही करत असेल तर जन्मभर त्या गोष्टी साठी तुम्ही त्याचे ऋणी असाल....आणि पुढे तेच नाते तुम्हाला काही स्वार्थासाठी तुमच्या जवळ बांधून ठेवेल.....क्षणिक सुखाने हुरळून जाऊ नका.... दूरचा विचार करा....तुम्ही तुमच्या मनाशी प्रामाणिक राहा.....

"Everything is temporary;
emotions,
thoughts,
people
only your SOUL is permanent
live for it....live for yourself".

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडंस पटलं , बाकीचं नाही ... बरीच नाती अपेक्षेतून निर्माण होतात आणि टिकून राहतात वगैरे ... त्या व्यक्तीकडून सुख मिळालं तर नातं ठेवायचं नाहीतर तोडायचं एवढा साधा सरळ मामला असतो का ? मग मतिमंद मुलं सांभाळणाऱ्या आईवडिलांना कुठल्या कॅटॅगरीत बसवणार ? वाऱ्यावर सोडून देणारेही असतात , नाही असं नाही पण तुलनेने खूप कमी .. बहुतेकांना पोटच्या मुलाला सोडण्याची कल्पनाही सहन करवत नाही , मर्सि किलिंगचा साधा उल्लेख करून पाहा कसे भडकतील ... त्या मुलांकडून कोणत्याही अपेक्षा पूर्ण होणार नाहीत , त्याच्या खस्ता खाणं एवढंच भविष्य आहे हे माहीत असूनही जीवापाड माया करतात ... ह्याला काय नाव द्याल ?

आजारी पती / पत्नी बरी होण्याची काही शक्यता नाही हे कळल्यावरही अहोरात्र सेवा करणारी माणसं पाहिली आहेत का ? ती कुठली अपेक्षा मनात ठेवून असतात ? नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असताना कधी सठीसामासी भेटणारे भाऊबहीण , नणंदा , चुलते डबा , औषधं , आलटून पालटून पावसापाण्यात 2 ट्रेन बदलून हॉस्पिटलात हजेरी वास्तव्य करताना पाहिले आहेत का आणि मित्रमंडळी सुद्धा स्वतःच्या घरचं कुणी ऍडमिट असावं अशी मदत धावपळ करताना पाहिले आहेत का ? हे सगळे कुठलीतरी अपेक्षा मनात ठेवून आलेले नसतात तर कुठेतरी आतडी गुंतलेली असतात म्हणून येतात ... मित्र वेळेला पैसे उभे करतात , परतीची अपेक्षाही ठेवत नाहीत ... त्याबद्दल काय म्हणाल ? तेव्हा असे निष्कर्ष काढण्याची एकदम घाई करू नका ...

" मृत्यू हि एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या पासून तुमचा आत्मा हिरावून घेऊ शकते...बाकी अशी कोणतीच शक्ती नाही जी तुमाला आत्म्या पासून वेगळे करू शकेन.... " " आयुष्याच्या सुरवातीपासून ते शेवट पर्यंत जी गोष्ट आपल्याला सदैव साथ देते ती म्हणजे आपला आत्मा.... Your soul . "Nothing can replace your own Soul"

Your soul म्हणता आहात .. मग हे you कोण आहे ? मन ? माझ्या समजुतीप्रमाणे you are the soul . आणि बाकी जे मी असं आपण समजतो ते मन आहे .. जन्माला आल्यावर शरीर छोटं असतं , अन्न पाणी यावर पोसत आज जे आहे तेवढं झालं आहे ... म्हणजे शरीर इथून गोळा केलेलं आहे .

मन किंवा मी त्यात आवडीनिवडी , राग , लोभ , इच्छा , अनिच्छा , प्रेम , मत्सर , मोह सगळ्याच भावना आल्या .. हे सगळं सुद्धा बाहेरूनच घेतलं आहे ... ज्या माणसांबरोबर , ज्या परिस्थितीत वाढलो - राहत आहोत, ज्या परिस्थितीमधून गेलो त्यांच्याकडून , माहितीचा महासागर आहे , त्यातूनच काही ना काही घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्त्व घडलं आहे .... मला हे आवडत नाही किंवा ते आवडतं , कोणाचं असं वागणं आवडत नाही किंवा माझ्याशी असं वागलेलं आवडतं ... हे सगळं इथूनच घेतलेलं आहे ... ह्या सगळ्यालाच आपण मी समजतो ...

पण मी म्हणजे हे सगळं नाही ... खरा मी म्हणजे आत्मा .. शरीर म्हणजे आपण नाही हे आपल्याला समजतं पण मन म्हणजे आपण नाही हे समजणं कठीण जातं कारण आपण त्याच्याशी एकरूप झालेलो असतो ... मनाशी निर्माण झालेली ही एकरूपता / तादात्म्यता कमी करून आत्मरूप कळून घेणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे ....

प्रत्यक्ष अनुभव काहीच नाही , त्यामुळे हे बोलण्याचा अधिकार आहे का नाही माहीत नाही .. पटलं नाही तर सोडून द्या ... हेच खरं असा माझा काही दावा नाही ...

thanks ashok ....aani radhanisha tumi je lihile te hi patate pan reality la baghnyacha दृष्टीकोन vegla vegla asu shakato

कोंबडी नाही ओ माकडीन Lol Lol
ती अकबर बिरबलची गोष्ट आहे. अकबर बिरबलला विचारतो 'माणसाला सर्वात प्रिय काय असतं?' बिरबल उत्तरतो 'स्वतःचा जीव'. मग राजा चिडतो 'माणसाला सर्वात प्रिय त्याच मुल असतं!' म्हणतो. मग बिरबल त्याला तो विहीरतल्या माकडीनीचा डेमो देतो.
===

radhanisha,
तुम्ही जे मतिमंद मुल सांभाळणे, आजारी जोडीदारची काळजी घेणे, नातेवाईकला भेटायला जाणे वगैरे लिहलं आहे त्यापैकी किती गोष्टी केवळ बालपणापासूनच कंडिशनिंग किंवा समाजीक दबावामुळे केल्या जातात हे कसं कळणार? त्यांना इतर पर्याय उपलब्ध करून दिला आहे का? जज न करता तो निवडायची मुभा दिली आहे का?
===

डीडी आणि जिप्सीरोज या खऱ्या आईमुलीवर बनलेली The Act ही मालिका बघा जमलं तर.
Munchausen syndrome by proxy म्हणजे काय असतं ते माहित करून घ्या.
स्वतःच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या वडलांच्या बातम्या वाचल्या असतीलच.
समीर गायकवाड ४ आणि ६ वयाच्या बालवेश्याबद्दल लिहतात. कोण लावतं त्यांना धंद्याला? परवाच १० वर्षांची वेश्या आणि तिच्या आईचा फोटो टाकला होता....
असो...

कोंबडी नाही ओ माकडीन + १
- माकडीन पाण्यामध्ये पडते, आधी पिल्लाला कमरेवर घेते, मग डोक्यावर. हळुहळु पाण्याची पातळी वाढत जाते. पातळी एवढी वाढते की, शेवटी ती तीच्या पिल्लालाच पायाखाली घेते आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते. अशी गोष्ट आहे

- बाकी ठिक लिहिल आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात म्हणा.

Life is real, life is earnest
And the grave is not its goal;
"Dust thou art to Dust returneth"
Was not spoken of the soul.
I slept and dreamt that life is beauty
I awoke and found that life is duty.

The ultimate duty of a human being is to strive for realization and emancipation

लेख वाचून कुठेतरी वाचलेल्या ह्या ओळी आठवल्या...

रच्याकने इतके निगेटीव्ह का लिहताय?

ॲमी .. खरोखरच वाईट वागणारी खूप लोकं आहेत जगात हे मान्य आहे .. पण सगळीच स्वार्थी आहेत असा ग्रह करून त्याच दृष्टीकोनातून सगळ्यांकडे पाहू नये असं मला वाटतं ... मी जे लिहिलं आहे ते सामाजिक दबावापोटी / कंडिशनिंग मुळे नाही हे मला माहित आहे ... अर्थात तशीही उदाहरणं असतील घडलेली पण प्रत्यक्ष नजरेने पाहणाऱ्यालाच समजतं की कुठलं वागणं पोटातून आहे आणि कुठलं जीवाच्या रामरामाने किंवा लोकलज्जेस्तव केलं आहे .... प्रत्येक केस वेगळी असू शकते .

ते मुलींवर बलात्कार करणारे लोक तर वडील काय माणूस म्हणवण्याच्याही लायक नसतात ... पण म्हणून या बातम्यांचा धसका घेऊन उद्या एखादी मुलीने स्वतःच्या वडलांना संशयाच्या नजरेने बघणं किंवा जपून राहणं किंवा आपल्या लहान मुलीला आपल्या अनुपस्थितीत नवऱ्याच्या हाती न देणं... असं वर्तन हेल्दी आहे का ? असं सहसा कुठे होत नाही... माणसाच्या चांगुलपणावरच्या विश्वासावर जग चाललं आहे .. , इतकाही निगेटिव्ह दृष्टिकोन घेऊ नये की - समोरच्याचं कुठलंही वागणं हे कुठल्या ना कुठल्या स्वार्थातूनच उपजलेलं आहे अशी मनाशी खूणगाठ बांधलेली असावी ... दिवस चांगले नाहीत , खरं आहे ... आंधळा विश्वास नकोच सगळ्यांवर महत्वाच्या बाबतीत ... पण जिथे आपला वैयक्तिक संबंध नाही तिथे तरी लोकांना जज करण्यापेक्षा ते चांगले आहेत असं समजणं मानसिक शांतीसाठी बरं असतं काहीवेळा असं मला वाटतं .... निदान आंखो देखे हाल माहीत नसेल त्यावेळी वाईटाचा शिक्का मारण्याएवढं आपण निगेटिव्ह असू नये .. एक उदाहरण बघा पटतं का - काही काळापूर्वी कुठेतरी एक व्हिडिओ पाहण्यात आला - कोईमतोर मध्ये एक गरीब म्हातारी 1 रुपयात 1 अशी दिवसाला 1000 इडल्या - वडे बनवून कामगार आदी गरीब लोकांना विकते ... मला अर्थशास्त्रातलं शून्य कळतं , एका इडलीला किती खर्च येत असेल वगैरे , त्यामुळे तो व्हिडीओ पाहून मी जराशी इमोशनल झाले - वा वा , काय या काळातही निःस्वार्थी लोक टिकून आहेत वगैरे ... तर आणखी 2 - 3 कमेंट्स होत्या की या बाईला आर्थिक मदत मिळत असणार धनिकांकडून आणि खूप प्रॉफिट मिळत असणार खरंतर , तो कोणाला कळू देत नसणार , नाहीतर कोण असा न परवडणारा धंदा करेल इत्यादी इत्यादी ... एकूण बाई प्रॉफिटसाठी धंदा करत आहे असा त्या कमेंट्सचा सूर होता ... आता कधी न बघितलेल्या बाईच्या हेतुसंबंधी वाईटच निष्कर्ष काढावेसे का वाटले यांना ? माणसाच्या चांगुलपणावर यांचा विश्वास नाही असाच याचा अर्थ होतो ... त्या बाईंना मिळत असलेलं समाधान याला कदाचित स्वार्थ म्हणता येईल वाटल्यास ... धाग्याचा विषय आहे आत्मा ... ज्याच्याबद्दल 0 अनुभव आहे पण काहीवेळा वाटतं ह्या बाईला जे समाधान मिळत असेल त्या प्रकारच्या समाधानाच्या अनुभवांनाच आत्मिक समाधान म्हणत असावेत .

only your SOUL is permanent
live for it....live for yourself".
>> नैनं छिन्दंती...... जी गोष्ट पाहिली नाही ती आहे म्हणणं चुकीचं आहे. जो आत्मा काळा की गोरा आहे हे माहीत नाही. फक्त असतो या गृहितकावर अध्यात्म आधारलेले आहे. माणसानं नैसर्गिक रित्या जगलं पाहिजे. राग आला व्यक्त केला, दु:ख झाले रडलं पाहिजे.

काळ्या, पांढर्या, राखाडी सगळ्याच शेडची लोक आहेत या जगात. "पेराल तसं उगवेल" या उक्तीप्रमाणे वर्तन करणं एवढंच आपल्या हातात आहे.