खाजगी संस्था आणि तेलगू लोक

Submitted by अजिंक्यराव पाटील on 16 September, 2019 - 12:12

माननीय राजसाहेब ठाकरे,

सप्रेम नमस्कार!
पत्र लिहिण्यास कारण की, सद्यस्थितीत आपण मराठी जनतेसाठी जे काम करीत आहात ते केवळ अतुलनीय असून त्यासाठी मी आपला शतशः आभारी आहे, परंतु आपला हा लढा आपण केवळ रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत का मर्यादित ठेवला असावा असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो.

आज महाराष्ट्रातील बहुतांश मराठी तरुण वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमधून काम करीत आहेत. त्यांपैकीच मी एक तरुण. मी आधी कर्नाटकात कामाला होतो. तिथे मी एक निरीक्षण केलं की कंपनी जरी कर्नाटकात असली तरी तिथले 90 टक्के लोक तेलगू होते. दोन वर्षे तिथे काम केल्यानंतर मी पुण्यातल्या एका बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करत आहे. इथली आणि इतर सर्वच खाजगी बहुराष्ट्रीय संस्थांमधली आकडेवारी पाहता किमान 70 ते 80 टक्के लोक तेलगू आहेत. या परिस्थितीच्या मुळापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला आणि मला असे आढळून आले की विविध हे तेलगू लोक जिथे जातात तिथे स्वतःच्या राज्याची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतात. पुढे एक उदाहरण देतो आहे.

पुण्यातील एक बहुराष्ट्रीय कंपनी, ज्याचे संस्थापक मराठीच होते तिथले हे एक प्रातिनिधिक उदाहरण.

संस्थेच्या पुण्यातील शाखेत एका प्रोजेक्टचा मॅनेजर तेलगू आहे, त्याच्या हाताखाली असणाऱ्या टीम लीड मध्ये देखील तेलगू लोक जास्त. तर यातल्याच एका टीम मध्ये महेश पाटील आणि अरुण बाबू हे दोन लोक काम करत आहेत. पैकी, महेश पाटीलला जे काम दिले जाते त्याची काठिण्य पातळी अरुणला दिल्या जाणाऱ्या कामाच्या तुलनेत बरीच वरची आहे. या दोघांचा टीम लीड जो एक तेलगू आहे त्याने अरुणचे काम evaluate करण्यासाठी दुसऱ्या टेलगुला ठेवले आहे जेणेकरून अरुण लवकरात लवकर वर सरकू शकेल. जो आज टीम लीड आहे त्यालादेखील असेच त्याच्या वरच्या तेलगू माणसाने वर ओढले आहे. ही अशी साखळी सुरूच राहते, परिणामी वरच्या पदांवर मराठी मुले पोचू शकत नाहीत. पुन्हा नवीन मुलांची मुलाखत घ्यायला अशीच साखळीतून वर गेलेली लोकं जातात आणि साखळी वाढतच राहते. याचाच परिणाम म्हणून आज पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये तेलगू लोक सर्वाधिक आहेत.

अर्थात या गोष्टीची शहानिशा करणे म्हटले तर फार सोपे आहे, म्हटले तर फार कठीण. रस्त्यावर उतरून ही आकडेवारी कळणार नाही पण खाजगी संस्थांमधुन काम करणारे माझ्यासारखे तरुण नक्कीच तुम्हाला या बाबत माहिती देऊ शकतील. शिवाय हे पत्र सोशल मिडियावर मी स्वतः viral करणार आहे त्यामुळेदेखील बरीचशी माहिती पुढे येऊ शकेल. आज खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी तरुणांची संख्या बरीच असून सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात या लॉबिंगचा त्रास होतो आहेच. आपण या प्रकरणात कृपया लक्ष घातले तर मोठ्या प्रमाणावर मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल!

आपला,
राव पाटील

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तेलगु तरूणांत पीअर प्रेशर खुप असते. आयटी नोकरी, उसगावात नोकरी, मालकीची चाळ/ जमिनी यांमुळे त्यांची लग्नात पत वाढते आणि वधुपिता जास्त हुंडा देतो. त्यांची संख्या जास्त म्हणून सगळीकडे ते दिसतात.

तेलगु लोकांची लॉबी गेल्या २० वर्षांपासून अबाधित आहे. आयटी मध्ये परदेशी असणारी ऑन्साइट संधी तर तेलगु मॅनेजर असेल तर अ-तेलगु लोकांना फार क्वचित मिळते. अशीच लॉबी बंगाल्यांची सुद्धा आहे.

फक्त कंपनी काय घेउन बसलाय आता आमच्या गावात ३ राजकीय पार्टयांतर्फे २ तेलगु आणि १ मल्याळी लोकं उभी आहेत, नगरसेवक च्या निवडणूकी साठी. 'तेलगु असोशिएशन' किंवा तत्सम लोकल चॅरिटी ग्रुप रजिस्टर करतात आणि 'डायव्हर्सिटी' / 'सोशल जस्टिस ' इ. लेबल खाली म्युनिसिपाल्टीकडून बरीच वार्षिक ग्रँट घेतात. त्या पैशात हे तेलगु भाषेचे क्लास घेतात..अर्थात त्या क्लासला तेलगु मुलंच जातात. उरलेल्या पैशाचं काय करतात कोणास ठाउक.

https://www.loksatta.com/anyatha-news/girish-kuber-article-on-satya-nade...

अडोब’चे शंतनू नारायण, ‘कॉग्निझंट’चे फ्रान्सिस्को डिसुझा, ‘नेटअ‍ॅप’चे जॉर्ज कुरियन, ‘सॅनडिस्क’चे संजय मेहरोत्रा, ब्रिटनच्या ‘रेकीट बेन्किसर’ या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपनीचे लक्ष्मण नरसिंहन अशी अनेक नावं सांगता येतील. हे सर्व विविध कंपन्यांचे मुख्याधिकारी वगैरे. नावं पाहिल्यावर लक्षात येते ती बाब म्हणजे, यातले बरेचसे हे दक्षिण भारतीय आहेत. सुंदर हा चेन्नईचा तर सत्या हैदराबादचा. हे असं दक्षिणेत काय विशेष असावं, हा प्रश्न पडतो का कधी आपल्याला? या कंपन्यांचंच असं नाही, तर आपल्या टाटा समूहाचा उत्तरधिकारीदेखील असाच दक्षिणदेशी आहे. एन. चंद्रशेखरन. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरची यादी काढून पाहिली तर त्यातही हे दक्षिण भारतीय प्राधान्याने आढळतील. ते पारंपरिक असतात वगैरे आरोप/टीका करायला आवडते आपल्याला त्यांच्यावर. तसे आपण मराठी आधुनिक आणि पुरोगामी वगैरे वगैरे. पण जागतिक, वैश्विक किंवा देशांतर्गतही परिस्थितीला वळण देऊ शकतील अशा जागांवर अधिकाधिक दाक्षिणात्यच कसे काय निवडले जातात? इथे शिवसेना किंवा तत्सम संघटना म्हणेल की, त्यांचं मोठं लॉबिइंग असतं, म्हणून. पण जगातल्या सर्वच देशांत कसं काय असं लॉबिइंग जमतं त्यांना? लॉबिइंग, गटबाजी या अशा आरोपांपलीकडे जाऊन आपण काही शिकणार आहोत का यांच्यापासून? सिटी बँकेचे एक विक्रम पंडित सोडले, तर अशी मराठी नावं का नाहीत? आपल्या शिक्षण पद्धतीत, व्यवस्थेत काही चुकतंय असं आपण कधी मान्य करणार?

अजुन आपण आडनावावरुन, भाषेच्या शैलीवरुन गाव, प्रांत शोधण्यातच आनंद मानतो. मराठी म्हणुन एक केव्हा होणार आणि दबावगट केव्हा तयार करणार? आणि असे करायला आपल्याला सण, उत्सव, राजकीय चर्चा, फे.बु., व्हाटसएप मधुन वेळ तर मिळाला पाहिजे.

पाहिले तर स्वाभिमान जागवा म्हणजे स्वतःला कमी लेखन सोडून ध्या.
महाराष्ट्र हा ह्या देशाचे आर्थिक इंजिन आहे.
काही तरी खास आहे इथे.
मानसिक खाच्चीकरण करण्यासाठी मीडिया मध्ये नेहमी अशा प्रकारच्या चर्चा घडवल्या जातात बघा कसे सर्व उद्योगपती पर प्रांतीय आहेत.
नोकऱ्यांत अमकी जमात कशी हुशार आहे.
ते आपल्या पेक्षा श्रेष्ठ आहेत असं तुमच्या मनावर बिबवल की आपण हाय खातो.
तमिळ नाडू,आंध्र,राजस्थान ही राज्यातील लोक जीवन आपल्या पेक्षा उच्च दर्जाचं नाही.
ते बिहारी बघा देशात
सर्व बाबतीत मागास राज्य पण त्यांच्या नेत्यांची आणि लोकांचे वर्तन असे असतं जसे जगातील सर्वात संपन्न राज्य बिहार च आहे.
आपल्या कडे तर सर्व आहे.
बुध्दी आहे ,देशातील सर्वात चांगल्या राज्यात राहत आहात.
तरी कसले कच खावू विचार करताय.

Pages