खाजगी संस्था आणि तेलगू लोक

Submitted by अजिंक्यराव पाटील on 16 September, 2019 - 12:12

माननीय राजसाहेब ठाकरे,

सप्रेम नमस्कार!
पत्र लिहिण्यास कारण की, सद्यस्थितीत आपण मराठी जनतेसाठी जे काम करीत आहात ते केवळ अतुलनीय असून त्यासाठी मी आपला शतशः आभारी आहे, परंतु आपला हा लढा आपण केवळ रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत का मर्यादित ठेवला असावा असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो.

आज महाराष्ट्रातील बहुतांश मराठी तरुण वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमधून काम करीत आहेत. त्यांपैकीच मी एक तरुण. मी आधी कर्नाटकात कामाला होतो. तिथे मी एक निरीक्षण केलं की कंपनी जरी कर्नाटकात असली तरी तिथले 90 टक्के लोक तेलगू होते. दोन वर्षे तिथे काम केल्यानंतर मी पुण्यातल्या एका बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करत आहे. इथली आणि इतर सर्वच खाजगी बहुराष्ट्रीय संस्थांमधली आकडेवारी पाहता किमान 70 ते 80 टक्के लोक तेलगू आहेत. या परिस्थितीच्या मुळापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला आणि मला असे आढळून आले की विविध हे तेलगू लोक जिथे जातात तिथे स्वतःच्या राज्याची लोकसंख्या वाढवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतात. पुढे एक उदाहरण देतो आहे.

पुण्यातील एक बहुराष्ट्रीय कंपनी, ज्याचे संस्थापक मराठीच होते तिथले हे एक प्रातिनिधिक उदाहरण.

संस्थेच्या पुण्यातील शाखेत एका प्रोजेक्टचा मॅनेजर तेलगू आहे, त्याच्या हाताखाली असणाऱ्या टीम लीड मध्ये देखील तेलगू लोक जास्त. तर यातल्याच एका टीम मध्ये महेश पाटील आणि अरुण बाबू हे दोन लोक काम करत आहेत. पैकी, महेश पाटीलला जे काम दिले जाते त्याची काठिण्य पातळी अरुणला दिल्या जाणाऱ्या कामाच्या तुलनेत बरीच वरची आहे. या दोघांचा टीम लीड जो एक तेलगू आहे त्याने अरुणचे काम evaluate करण्यासाठी दुसऱ्या टेलगुला ठेवले आहे जेणेकरून अरुण लवकरात लवकर वर सरकू शकेल. जो आज टीम लीड आहे त्यालादेखील असेच त्याच्या वरच्या तेलगू माणसाने वर ओढले आहे. ही अशी साखळी सुरूच राहते, परिणामी वरच्या पदांवर मराठी मुले पोचू शकत नाहीत. पुन्हा नवीन मुलांची मुलाखत घ्यायला अशीच साखळीतून वर गेलेली लोकं जातात आणि साखळी वाढतच राहते. याचाच परिणाम म्हणून आज पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये तेलगू लोक सर्वाधिक आहेत.

अर्थात या गोष्टीची शहानिशा करणे म्हटले तर फार सोपे आहे, म्हटले तर फार कठीण. रस्त्यावर उतरून ही आकडेवारी कळणार नाही पण खाजगी संस्थांमधुन काम करणारे माझ्यासारखे तरुण नक्कीच तुम्हाला या बाबत माहिती देऊ शकतील. शिवाय हे पत्र सोशल मिडियावर मी स्वतः viral करणार आहे त्यामुळेदेखील बरीचशी माहिती पुढे येऊ शकेल. आज खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी तरुणांची संख्या बरीच असून सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात या लॉबिंगचा त्रास होतो आहेच. आपण या प्रकरणात कृपया लक्ष घातले तर मोठ्या प्रमाणावर मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध होईल!

आपला,
राव पाटील

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कम्पनी मोठी असेल अन प्रोडकटीव्हीटी मेंटेन असेल तर अशा तक्रारीचा उपयोग शून्य आहे,

हे प्रकार अमेरिकेत देखिल फार आहेत. गुल्टे लोकानी वाट लावली आहे.
त्यात सदा आपल्या भाषेत बोलत बसतात. थोडी देखिल कर्टसी नाही.
फेक अनुभव दाखवुन घुसायाचे, नंतर काम शिकायचे.

{{{मी पुण्यातल्या एका बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये काम करत आहे. इथली आणि इतर सर्वच खाजगी बहुराष्ट्रीय संस्थांमधली आकडेवारी पाहता किमान 70 ते 80 टक्के लोक तेलगू आहेत. }}}

पुण्यात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी आणि त्यानंतर स्वतंत्र व्यवसाय यात पन्नास वर्षे घालविल्यानंतर ही आकडेवारी खोटी आहे हे ठामपणे लिहू शकतो. त्यामुळे बाकी लेखच बिनबुडाचा झाला आहे.

कैच्या कैच. राज ठाकरे कुटं कुटं बगणार? तूमी शेपूट घालून बसा. डोकं असतं तर कलेक्टर नाही तर तहसीलदार झाला असताव.

आय टी उद्योगात तेलुगु लोक इतरांपेक्षा अधिक संख्येने आहेत हे वास्तव आहे. ह्याचे मूळ पार १९८०-९० मधल्या चंद्रबाबू नायडू यांच्या धोरणांत कदाचित शोधता येईल . आंध्र प्रदेशात त्या काळात इंजीनीअरिंगची खाजगी कॉलेजे उघडण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे सरकारी कॉलेजांपेक्षा कितीतरी अधिक जागा उपलब्ध झाल्या. इतर राज्यांपेक्षा अनेक पटींनी तेलुगु पदवीधर तयार झाले. 2 K च्याआधी तीन चार वर्षे Y 2K चा पेचप्रसंग सोडवण्यासाठी अमेरिकेत शिक्षित मनुष्यबळ कमी पडू लागले आणि या सुसज्ज पदवीधर तेलुगु तरुणांना आयतेच घबाड सापडले. तेलुगु तरुण झुंडींनी अमेरिकेत गेले, त्या सर्वांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांचे चांगलेच बस्तान बसले. Y2K संकट संपताना हे लोक अनुभवसंपन्न झाले होते, सुस्थापित होते, बॉस बनले होते त्यामुळे ते खूप पुढे राहिले. पुढेही त्यांचे वर्चस्व टिकून राहिले; भारतातून आयात चालूच राहिली. भारतातही त्यांचे बाहुल्य आणि प्राबल्य राहिले.

कर्नाटकात ९०,% >> हे मात्र अगदी खर आहे .
मी बेंगलोरला ३ कंपनीम्धे काम केल , सगळे गुल्टी . अगदी मला कन्नड शिकवायलाही कोणी मिळायचा नाही Sad

अहो पत्रासाठी किमान विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी वाट बघायची. सध्या त्यांच्या स्वतःच्या रोजगाराचेच वांदे आहेत, ते तुमच्या रोजगाराची काय व्यवस्था बघणार ?

दुर्दैवाने आमच्या कंपनीत पण या लोकांची समजातींवर एकदम जास्त मेहेरबानी व इतरांशी सरळसरळ दुजाभाव हा प्रकार बराच होता, इतका की बरेच गोरे सोडुन गेले. त्यांना तक्रार करायला पण भिती वाटली इतके हे वरपर्यंत पदावर होते. मग हळुहळु बहुधा याला वाचा फुटली व भारतीय नकोच असाही एक प्रवास झाला (पण ते जरा अवघड होते). (हल्ली बायका बर्‍या असा विचारप्रवाह चालुये असं ऐकलं).

कोकणी लोकसुद्धा असेच आक्रमक झाल्याचे कानावर पडले होते. बाहेरुन शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ न देणे, नोकरी साठी आलेल्या लोकांना भिती दाखवून पिटाळने वगैरे...

तेलगू म्हणजे फक्त आंध्र वाले की त्यात तामिळी,केरळ etc नाहीत ना .
ह्यांचा एवढं त्रास असेल ह्याची आता पर्यंत जाणीव नव्हती
कारण ही लोक राजकीय क्षेत्रात हस्तक क्षेप करत नाहीत दुसऱ्या राज्यात .
शांत असतात त्या मुळे नजरेत येत नाहीत .
आणि उत्तर भारतीय जास्त सक्रिय असतात राजकीय,सामाजिक क्षेत्रात म्हणून टार्गेट बनतात अस तर नाही .
म्हणजे महाराष्ट्र नी उत्तर भारतीय वर रोखलेल्या तोफांचे तोंड आंध्र कडे केले पाहिजे

दक्षिण भारतीय विरूद्ध राज ठाकरे कामाला येणार नाहीत .
महाराष्ट्र सह दक्षिण भारताची आघाडी निर्माण करून उत्तर भारतीय लोकांना शह देण्याचे त्यांच्या डोक्यात असावे .
कारण मध्ये ते जयललिता वैगरे असताना प्रयत्न करत होते असे बातम्या वरून वाटत होते .
मराठी लोकांनी आघाडी करूनच हे प्रश्न सोडवणे गरजेचं आहे .

ते लोक राजकीय हस्तक्षेप , फसवणूक करत नाहीत.

ते कामाला चोख असतात , जागा रिकामी असली की त्यांच्या लोकांनाच बोलावतात , हा मुद्दा आहे

आपल्याकडे बाबुराव व्यक्ती खूप, अगणित आहेत. "असे केले पाहिजे. ते झाले पाहिजे. यांना धडा शिकवला पाहिजे" वगैरे वगैरे या बाबुराव लोकांची आवडती वाक्ये असतात. राजेश भाऊ हेसुद्धा बाबुराव आहेत असे माझं मत आहे.

खरंतर हा सगळा छुपा मामला असल्याने पुढे येत नाही हे दुर्दैव, नसता हा मुद्दा राजकारण्यांनी सोडला नसता...

@बिपीन: कुठं कामाला होतात आपण? व्यवसाय कधी सुरू केलात? तुमचे लिखाण आणि विविध प्रतिसाद वाचले असता तुमचे वय पन्नासच्या आसपास वाटत नाही. मी जे काही लिहिले ते माझ्या डोळ्यांनी पाहिलेले, स्वतः अनुभवलेले लिहिले आहे.

@अमर ९९: टिकेपूरती टीका करायची असल्यास तसे करू शकता, पण स्पष्टपणे तसे सांगा.. अनेक धाग्यांवर तुमचे काही काही अभ्यासू प्रतिसाद वाचले आहेत, अर्थात तुमचा हा अवतार जुने शत्रू शिंगावर घेण्यासाठी असला तरी तुमच्या कोणत्या अवतारात मी तुम्हाला शिंगावर घेतले आहे * याची कल्पना नाही. तरी, मला तुमचा अनादर करावासा वाटत नसल्याकारणाने जर * ही शक्यता असेल तर तसे स्पष्ट करा, जेणेकरून मला माझी शिंगे टोकदार करायची आहेत किंवा कसे ते कळेल.

एवढं चिडू नका. पण क्वालिटी मिळत असेल तर व्यवस्थापन नफ्याचा विचार करून चांगली क्वालिटी सेवा देणारांनाच प्राधान्य देणार. तेलगु लोकांमध्ये असे काहीतरी खास असल्याशिवाय ते नव्वद टक्के या क्षेत्रात आले असतील ना. आपलेच लोक वाढवून ते एकमेकांना मदत करीत जॉब सुरक्षित करत असतील. आपण तर खेकडा वृत्तीचे लोक, आपला कुणी वर जातोय हे आपल्याला सहन होत नाही ना.

>>आपलेच लोक वाढवून ते एकमेकांना मदत करीत जॉब सुरक्षित करत असतील. आपण तर खेकडा वृत्तीचे लोक, आपला कुणी वर जातोय हे आपल्याला सहन होत नाही ना.<< सहमत.
>>व्यवस्थापन नफ्याचा विचार करून चांगली क्वालिटी सेवा देणारांनाच प्राधान्य देणार. तेलगु लोकांमध्ये असे काहीतरी खास असल्याशिवाय ते नव्वद टक्के या क्षेत्रात आले असतील ना. << असहमत.
स्पष्टीकरणासाठी लेख आणि प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा

मराठी लोक सोडली तर सर्वच भाषिक लोक मध्ये ही वृत्ती असते.
गट तयार करायचा आणि आपल्याच लोकांना सहाय्य करायचे .
अगदी चुकिवर सुद्धा पांघरूण घालून लॉबी तयार करायची .
ह्यात कंपनीचा फायदा होत आहे प्रोडक्शन चांगले होत आहे .
काम करणारे उच्च दर्जाचे आहेत हे सर्व मुद्दे योग्यच असतील असे नाही .
उलट एकच प्रकारच्या भाषिक आणि ठरवून एकत्र आलेल्या लोकांकडून कंपनीचे च शोषण होण्याची शक्यता वाढते .
गैर कामं लपवली जावू शकतात.
कामगार वर्ग हा नेहमी एका विचाराचा नसावा .
कंपनीच्या फायद्याच्या मानणे होणाऱ्या पैस्या चा गैर व्यवहार छोटा असल्या मुळे मालक सुधा जास्त लक्ष देत नाहीत माहीत सर्व असते त्यांना .स्वतःचे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आल्या मुळे अशी वृत्ती निर्माण होत असेल .
कारण हैदराबाद बऱ्या पैकी सर्व भाषिक आहे .
मग हा बनलेला ग्रुप बाकी लोकांना टिकून देत नाही पद्धत शिर पने
त्रास दिला जातो.
दुसऱ्या व्यक्ती मुळे गैर कामाची साखळी तुटेल ही सुद्धा भीती असते.
लोक एकत्र येतात ह्याचा अर्थ नेहमीच चांगला नसतो .
मग अशा वेळेस ह्या साखळी ला उघड विरोध न करता सुरुंग लावायला ज्याला येतो.
तो व्यक्ती अशा कंपूत सुद्धा टिकून तर राहतोच उलट दरारा ठेवून

>> कामगार वर्ग हा नेहमी एका विचाराचा नसावा .>> सहमत आहे. आचार-विचार-स्वभाव-कामाची पद्धत-कौशल्य आणि अनुभव या सर्वांत वैविध्य हे हवेच. तरच कामात ऑप्टिमम फायदा होउ शकतो.

मग रहा कँपणीत दरारा ठेवून,

ठाकरेला पत्र लिहून काय होणार ?

नागड्याकडे उघडे गेले , अशी म्हण आहे ना ?

ब्लॅक कॅट
बाळासाहेब ठाकरे चा होता आणि राज ठाकरे आता चांगला दरारा
ठेवून आहेत मराठी द्वेशी लोकात .

@बिपीन: कुठं कामाला होतात आपण?

टाटा मोटर्स , फोर्स मोटर्स इथे नोकरी केली. मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये काम असल्याने सीएन्सीचे ड्राइव रिपेअरिंग करिता सिमेन्स, फानुक, हेलर इत्यादी अनेक कंपन्यांच्या सर्विस इंजिनिअर्सच्या संपर्कात होतो. बहुतांश मराठीच सापडले.

व्यवसाय कधी सुरू केलात?

२००३ पासून तोही सीएन्सी व हायड्रोलिक्सच्या ट्रेनिंगसंदर्भातच आहे. त्यामुळे पुन्हा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संबंध आलाच पण इतक्या मोठ्या संख्येने तेलुगु भाषिक आढळले नाहीत.

तुमचे लिखाण आणि विविध प्रतिसाद वाचले असता तुमचे वय पन्नासच्या आसपास वाटत नाही. मी जे काही लिहिले ते माझ्या डोळ्यांनी पाहिलेले, स्वतः अनुभवलेले लिहिले आहे.

डोळ्यांनी पाहून तुम्हाला माझे वय देखील पन्नास वाटणार नाही कारण ते सत्तरीपार आहे कधीचेच. आता अमृतमहोत्सवाची तयारी करायची आहे.

Pages