हॅशटॅग यु

Submitted by Akku320 on 13 September, 2019 - 20:49

अर्थ अर्थ तुझा शोधतांना,
अर्थहीन मी होत जातो.

नव्या नव्या ह्या अपेक्षांच्या जगात,
हात तुझा मी शोधत असतो.

स्वप्न स्वप्न मी रंगवतांना,
अस्तित्वाची जाणीव विसरतो.
जन्म जन्म मी तुझ्याचसाठी,
अनंतापासुन भटकत असतो.
शब्द शब्दांत तुला मांडतांना,
शब्दही नकळत हरवुन जातात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
पण कविते प्रमाणे प्रत्येक ओळ सुटी सुटी कर.
हे ललित लिहिल्या प्रमाणे एकत्र झाले आहे.

बाकी कविते मध्ये दिप्ती इक्सपर्ट आहे....ती सांगेलच Happy