दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वटवृक्ष नावाने अशा पोस्ट लिहीणे हा केवढा मोठा विरोधाभास! नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा अशी गत आहे ही!

विचार मांडणे आवश्यक होतेच हो !
नाही तरी तुमचे नाव ' जिज्ञासा ' असून देखील महत्वाच्या विषयावर मत प्रदर्शित न करता " आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला " म्हण सार्थक केली !!

जिज्ञासा म्हणजे मत प्रदर्शित करणारी व्यक्ती असा नवीनच अर्थ काढलेला दिसतोय इकडे! असो या विषयाबद्दल भरपूर जिज्ञासा असल्याने या बद्दल काही धागे मी काढले आहेत तेव्हा केवळ इथे लिहीले नाही म्हणून म्हणींचा चुकीचा वापर करून दाखवू नका! नाव बदललेत तर बरे पण तुमची मते बदलली तर फार उत्तम! मतबदल अधिक आवडेल पहायला. त्यासाठी वडाच्या Ecological services काय असतात ते समजून घ्या! उपयोग होईल. शुभेच्छा!

मेट्रो कार शेड आरे मध्ये ठेवण्याचा निर्णय योग्य होता आणी आता तो कांजूर मार्ग ला हलवणे चुकिचे आहे असे मला वाटते. पर्यावरणस्नेहींच्या मते ही blasphemy असेल. नवी माहिती समोर आली तर माझे मत बदलेनही.
पहिल्या कि दुसर्‍याच पानावर दिलेले तात्कालीन सी ई ओ चे निवेदन वाचनीय आहे. त्या एक आय ए एस अधिकारी आहेत व कोणत्याही राजकीय विचारसरणीला बांधील नाहीत. किमान अक्राळ विक्राळ पसरलेल्या मुंबई बाबत तरी चॉइस हा "झाडे तोडणे" व "झाडे न तोडणे" असा नसून "इथे झाडे तोडणे" आणी "तिथे झाडे तोडणे" हा आहे. पर्यावरणाला धक्का न लागता विकास करणे अशक्य आहे.

थोडेफार असेच जीएमओ वांग्याच्या बाबतीत झाले होते. शहरी पर्यावरणवादी आणी एनजीओ यांनी गोंधळ घातला आणी जयराम रमेश यांनी moratorium आणले. बी टी वांग्याला कीड लागत नाही आणी किटकनाशक कमी वापरावे लागते वगैरे मुद्दे लक्षात घेतलेच नाहीत. बी टी कापसाला सुरुवातीला विरोध झाला होता पण आज ते ९०% च्या वर आहे.

विकु, एका आयएएस अधिकाऱ्यापेक्षा मी या बाबतीत एका पर्यावरणतज्ज्ञाचे म्हणणे काय आहे हे महत्वाचे मानेन. हे खरंच आहे की मुंबईत आता झाडे तोडायची की नाही असा प्रश्न नसून कुठली आणि किती तोडायची असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर हे पर्यावरणतज्ज्ञ अधिक चांगले देऊ शकतील. माझा याविषयी अभ्यास नाही पण थिअरीप्रमाणे one single large patch of land is always better than many small segregated patches in terms of conservation. साठ एकराच्या दहा विखुरलेल्या तुकड्यांतील जंगलापेक्षा सहाशे एकराचे सलग जंगल हे खूप अधिक चांगले.
So if in case of Aarey, the forest land is a larger continuous patch of land than the other construction site then the conservation of Aarey should be preferred over the other site.
बीटी बियाणे आणि मॉन्सँटो विषयी काहीच चांगले ऐकलेले नाही Sad जिथे सर्वात जास्त बीटी कॉटनची लागवड होते तिथेच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या नोंदल्या गेल्या आहेत. या बाबतीत आपले कायदे सुदैवाने खूप चांगले आहेत (thanks to people like Jayaram Ramesh) पण मॉन्सँटो सारख्या कंपन्या ह्या आडमार्गाने (by forming subsidiary companies in Bangladesh where they are allowed business) घुसल्या आहेत. ही संकरीत बियाणी सर्व स्थानिक परिसंस्थेची हानी करतात. त्यांचे दुष्परिणाम फार भयंकर आहेत.

> जिथे सर्वात जास्त बीटी कॉटनची लागवड होते तिथेच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या नोंदल्या गेल्या आहेत

जिज्ञासा, तुमची पर्यावरण संबंधी कळकळ प्रामाणिक आहे व त्याबद्दल मला आदरही आहे, पण आपण अपप्रचाराला बळी तर पडत नाही ना ? हेही तपासून पहहाणे जरूरीचे अहे. वरील विधान खोटे आहे व eco- fascist लोकांनी पसरवलेले आहे. आज भारतात बहुसंख्य शेतकरी बीटी कापूसच लावतात. बीटी ३ ला तर सरकारी मान्यताही नाही पण सर्रास उपलब्ध आहे व शेतकरीही त्यालाच पसंती देतात. ते वेडे आहेत का? शेतकरी संघटना बीटी ला परवानगी द्या म्हनून आंदोलने करत आहे, त्यांनी सविनय कायदेभंगासारखी बीटी वांगे पेरलेही आहे. असो, बीटी वर बरीच चर्चा झाली आहे इथे.

विकु, तुमचे बरोबर आहे. सध्या माझे वाचन हे फार echo chamber मधले झाले आहे. जर तुम्ही कुठली लिंक देऊ शकलात तर मी यावर अजून वाचेन. मला आत्ता जे एक review article मिळाले त्याची लिंक देत आहे (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5427059/#__ffn_sectitle). त्यात शेतकरी आत्महत्या आणि बीटी कॉटन याचा काही संबंध नाही असे म्हटले आहे. So you are correct in this regard and I stand corrected.
पण त्याच बरोबरीने review मध्ये हेही म्हटले आहे की बीटी कॉटन मुळे अनेक आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न हे साध्या बियाणापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा फारसे अधिक नसते. तेव्हा शेतकऱ्यांना यामुळे फायदा होतो असे म्हणता येत नाही. बहुतेक शेतकरी हे दुसऱ्या शेतकऱ्याच्या यशस्वी प्रयोगाने भूलून जाऊन बीटी कॉटन लावतात मात्र त्याचे आर्थिक आणि शेतकी नियोजन फारच थोड्या जणांना शक्य होते. Monsanto is not a charitable organization and therfore requires the farmers to buy seeds from them every season and thus the farmers lose their seed sovereignty. This is not the best case scenario for the marginalized Indian farmers who are in the majority.
माझा बायोटेक्नॉलॉजी आणि इकॉलॉजीचा अभ्यास असं सांगतो की कोणतेही genetically modified वाण हे नैसर्गिक वाणापेक्षा अधिक नाजूक असते आणि त्याला अधिक देखभालीची आवश्यकता असते. अर्थात अशा वाणांसाठी अधिक खते घालावी लागतात. जर शेतजमीनीत अतिरिक्त खते वापरली तर कालांतराने शेतजमीन नापीक होऊन जाते. Excess fertilizer use always leads to eutrophication and increase in nitrate and phosphorus levels. ही रसायने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नद्या, नाले, तलाव यांच्यामधे जातात आणि त्या जलस्रोतांचे प्रदूषण करतात ज्यामुळे अनेक जलचरांना धोका निर्माण होतो. निसर्गात नेहमी host आणि parasite यांमध्ये tug of war सुरू असते. काही ठिकाणी BT resistant boll worms सापडायला सुरूवात झाली आहे. It is just a matter of time for this strain to spread everywhere and that would render BT cotton useless and even more susceptible to pests. A monoculture of any kind is the easiest breeding ground for resistant varieties. Therefore, it is in the best interest of the nature as well as humans to preserve and cultivate the indigenous varieties of crops and not to rely on the monoculture of GMOs. त्यामुळे आज जरी शेतकरी या वाणांना सहजी भूलत असले तरी सर्वंकष विचार केला तर ही वाणे अतिशय अयोग्य आहेत असेच माझे मत आहे.

माझा बायोटेक्नॉलॉजी आणि इकॉलॉजीचा अभ्यास असं सांगतो की कोणतेही genetically modified वाण हे नैसर्गिक वाणापेक्षा अधिक नाजूक असते आणि त्याला अधिक देखभालीची आवश्यकता असते. अर्थात अशा वाणांसाठी अधिक खते घालावी लागतात.

>>>>
जिज्ञासा जरा इस्कटून सांगता का हे कसा काय बरं ? आणि बी टी चा नक्की फायदा काय आहे जर त्याला कीटकनाशके आणि खते जास्त लागतात तर?

प्रयत्न करते. A genetically modified plant contains a new gene inserted into its genome at a random site that does not affect the overall fitness. However, there is always a possibility of mutation. Plus, these varieties are bred under controlled conditions and may not be able to show the same fitness as indigenous varieties developed locally in the field. अर्थात या साऱ्या पिकांची प्रत्यक्ष शेतात पेरणी करून trials घेतल्या जातात आणि जर पिक बऱ्यापैकी robust असेल तरच commercial वापराला परवानगी मिळते. तरीही या पिकांना अधिक खत आणि पाणी घालावे लागते कारण ती तशी नाजूकच असतात देशी बियाणांच्या तुलनेत. बीटी कॉटनला कमी किटकनाशके लागतात कारण त्याच्या पानांत boll वर्म या किडीला मारणारे विष हे नवीन घातलेल्या जीनमुळे तयार होते. मात्र याचा अर्थ एखाद्या दुसर्‍या किडीला ते झाड बळी पडणार नाही असा होत नाही. या पिकाचे उत्पन्न अधिक येते कारण एरवी किडीमुळे वाया जाणारे पिक वाचते आणि किटकनाशकाचा खर्च वाचतो. मी दिलेले आर्टिकल वाचलेत तर त्यात त्यांनी बीटी कॉटन विषयी असे लिहिले आहे की हे बियाणे मुख्यतः अमेरिकेतील शेतात लावण्यासाठी विकसित करण्यात आले. याच्या भारतात ट्रायल्स झाल्या पण त्या तितक्या extensive नव्हत्या. आता जेव्हा सुरूवातीला शेतकऱ्यांनी बीटी कॉटन घेतले तेव्हा त्यांचा फायदा झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्याचे अनुकरण केले. मात्र अशी पिके घ्यायला जे technical know-how लागते ते सगळ्याच शेतकऱ्यांकडे नव्हते आणि त्यामुळे सगळे जण यशस्वी झाले नाहीत. शिवाय उत्पन्नातून मिळणारा फायदा हा खर्चाच्या तुलनेत तेव्हाच जास्त असतो जेव्हा तुम्ही किमान काही क्षेत्रफळावर लागवड करता. ते ही गणित अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जमत नाही.
शिवाय मी आधीच्या प्रतिसादात मांडलेले पर्यावरणाच्या हानीचे मुद्दे देखील महत्त्वाचे आहेत. अधिक खते आणि पाणी देऊन जमीन लाँग टर्म मध्ये नापीक होणार आहे. उद्या बीटी रेझिस्टन्ट बोलवर्म्स तयार झाल्या की मॉन्सँटो दुसरे वाण आणेल! ती कंपनी कधीच पर्यावरणाचा किंवा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करणारी नाही. हे सगळे पाहिले तर बीटी कॉटनचा सरसकट हट्ट धरण्यात फारसा अर्थ नाही हे लक्षात येईल.

जी एम वाण असलेले अन्न खाऊन कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कापसाबाबत घेतलेला निर्णय वांग्याबाबत घेणे योग्य ठरणार नाही.

जेनेटिकली मॉडीफाईड बियाणे याबद्दल खूप चांगली माहिती या लेखात आहे.
जिज्ञासा, वि.कु., जमल्यास नवा धागा काढून यावर चर्चा करता येईल का?
तसेच टर्मिनेटर सीड वगैरे मुद्देही.

<< सरकारच्या तंत्रज्ञांच्या समितीने त्या वेळी आणि आताही कांजूर येथील जागा कारशेडसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र सरकार आधी आरे आणि आता या जागेसाठी भांडत आहे, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. >>
हल्ली खरं काय आणि खोटं काय, हेच कळेनासं झालं आहे. Uhoh

खोटेपणा आणि गुजराती भामट्यांच्या पायावर वाहिलेली स्वामीनिष्ठा हाच ज्यांच्या विचारधारेचा पाया आहे त्यांच्या कोल्हेकुईला खरे मानण्याची चूक करुच नये.

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन कामकाज लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=O6g5brikWE4

इथे ५१.०० पासून पुढे सुधीर मनगुंटीवार बोलतात. काय मस्त बोलले आहेत ते आणि उठा, अपा यांना मधून मधून मस्त चिमटे काढले आहेत.

"जे लोक आधी कुंडल्या वाचत होते ( सरकारच्या.. हं..!) ते आता अहवाल वाचत आहेत.. ही चांगली प्रगती आहे...!" या वाक्याने सुरुवात करत उठांनी विरोधकांच्या पाठीत चांगलाच गुद्दा घातला.. त्यानंतर विरोधकांची तोंडं अगदी बघण्यालायक झाली होती.. त्यानंतर मुमंनी त्यांच्या भाषणात जाळ-धूर काढत विरोधकांची पुरती भंबेरी उडवली.

कांजूर कार शेड प्रकरणी न्यायालय ने केंद्र सरकार च्या बाजूने निकाल दिल्या मुळे संपादक ने आता ठाकरी शैलीत उच्च न्यायालय ला झापले !
" आमच्या मध्ये पडू नका ! नाही तर जे सी बी चालवून कोर्ट पाडू " असे म्हणायला ही कमी करणार नाहीत
Lol

असं कोणी म्हणतं का..? नै म्हणजे वयाने मोठी झालेली अन विचारी समाजातील माणसं तरी असं बोललेली पाहिली नाहीत कधी म्हणुन विचारलं..!

नेत्यांचे अहंकार भुर्दंड जनतेला
अगदी चपखल शीर्षक.
मविआ सरकार जास्तीत जास्त पोरकटपणा करायचा विक्रम करणार बहुदा.
कंगनाच्या ट्वीटकडे दुर्लक्ष करायला हवे होते, अशी अनेक ट्वीट्स अनेक जण करतात. पण नाही, तिचे घर पाडून कोर्टात चपराक खाल्ली. वकिलाला एक कोटी रुपये दिले ते वेगळेच (हे लोकांच्याच खिशातून येणार )
कांजुरमार्ग ची जागा वादात आहे हे माहित असूनही तिथे कार शेड नेण्याचा प्रयत्न, तो ही फसला. आता बीकेसी मध्ये नेण्याचा प्रयत्न आहे, नंतर बहुदा नाशीकला कारशेड करतील.
मोठा गाजावाजा करून आर्णब ला चाळीस पोलिसांकरवी अटक केली, त्याला सोडून द्यावे लागले व सातशे पोलिसांच्या मिरवणूकीत त्याने हिरोगीरी केली. कंगना व आर्णब आजही वाकुल्या दखवीत आहेत,. दरम्यान टी आर पी चे प्रकरण उकरून पोटासाठी रिपब्लिक टेव्ही वा बार्क मध्ये नोकरी करणार्‍या अनेकांना आत टाकले आहे. यातही फार काही हाताशी लागणार नाही. आर्णब ला आत टाकण्यासारखे अनेक कलमे होती थेट यू ए पी ए ही लावता आला असत, पण किरकोळ प्रकरणे हुडकून काढली. शिवाय विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला. हक्कभंग म्हणजे नक्की काय हेही सरकारला कळत नसावे बहुदा. फडणवीसांचे भाषण अभ्यासपूर्ण होते.

>>नेत्यांचे अहंकार भुर्दंड जनतेला<<

अरेच्चा! आयडी हॅक झाला का काय?
पण बघून बरे वाटले..... राजकीय कल एका विशिष्ट बाजूला असतानाही त्या बाजूच्या चुका दिसणे आणि समोरच्याच्या एखाद्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करावेसे वाटणे हे राजकीय आणि वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे Happy

{{{ अरेच्चा! आयडी हॅक झाला का काय? }}}

त्या गँगच्या तेवढ्याच एक आयडीला जाणीव आहे की शिवसेना इतकी वर्षे भाजपसोबत आणि कॉंग्रेस विरोधात होती आणि पुन्हा कधीही तशीच होईल त्यामुळे ते शिवसेनेच्या कौतूकसोहळ्यात वाहवत जात नाहीत. गँगमधल्या इतरांचे मात्र गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशी अवस्था होणार आहे लवकरच.

हाहा, मविआ सरकारचा उल्लेख असला तरी रोख सेनेवर आहे (हे लपविलास तु हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का; या चालीवर वाचावं... Wink ) असो.

जोवर रागां ह्यांच्या कडेवरुन उतरत नाहित, आणि जोवर भक्त मोदि+शहांची धुणी सोमि वर धूत नाहित, तोवर वैचारीक/राजकिय प्रगल्भता इ. सब झूठ (पांघरलेली झूल?) आहे, असं खुशाल समजावं... Lol

मविआ सरकार जास्तीत जास्त पोरकटपणा करायचा विक्रम करणार बहुदा.
कंगनाच्या ट्वीटकडे दुर्लक्ष करायला हवे होते, अशी अनेक ट्वीट्स अनेक जण करतात. पण नाही, तिचे घर पाडून कोर्टात चपराक खाल्ली. वकिलाला एक कोटी रुपये दिले ते वेगळेच (हे लोकांच्याच खिशातून येणार )
>>>>>
हल्ली बाळ राहुल ला सोडून जयराम रमेश , सिब्बल , आझाद यांना फॉलो करायला सूर वात केली की काय ?
Happy
पण किमान सत्य स्वीकारण्यास सूर वात झाली हे प्रगल्भ तेचे लक्षण आहे !!!

बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८०%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!,” असं आवाहन फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/devendra-fadnavis-uddhav-thack...

मुंबईकरांनी खूप भोगले आहे म्हणे , गेला एक वर्ष सोडला तर फडणवीसच मुख्यमंत्री होते, तेंव्हा भोगले का ?

नाही , काही लोकांची मगजमारी, बाष्कळ बडबड, मी माझे , तुम्ही तुमचे हे भोगलयं मुंबईकरांनी. परत कंगनावरील कोर्टाचा खर्च मुंबईकरांनीच द्यायचाय. जमले तर मामु व संपादक यांनी हातभार लावावा.

मुख्यमंत्री राज्याचा असतो हे १०-२० मार्काचे नागरिकशास्त्र शिकलेल्यांच्या निदर्शनास आणून देवू इच्छितो!

1985 पासून जवळपास सगळी वर्षे (मधला एक ९२-९६ चा अपवाद वगळता) शिवसेनेचाच महापौर आहे..... त्यामुळे फडणवीसांच्या टीकेत चुकीचे काही वाटत नाही!

केंद्राची जागा आहे म्हणे

केंद्र जागा घेऊन काय करणार ?

देऊन टाकावी जनतेला,

जनतेला दुःख देणाऱ्या सेने बरोबर भाजप 35 वर्षे होती , आणि फडनविसनाही अजून 5 वर्षांसाठी सेनेचा सपोर्ट हवा होता , हेही मग आश्चर्यच म्हणायचे

कोर्ट केस अभि बाकी है म्हणे
फेबुरवारीत केस व कांजूरमार्ग जागा महाराष्ट्राकडे येईल म्हणे

“प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

“३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय चार वर्षांचा विलंब वेगळा कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?,” असा प्रश्न फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

हे सगळे सोडून फक्त मुंबईकरांच्या भोगण्याबद्दलच्याच वाक्याला प्रतिक्रिया द्यावीशी वाटली यावरुन तुमची किती गोची झालीय हे समजू शकतो Lol

Pages