स्वप्न --- नशीब

Submitted by Yogita Maayboli on 13 September, 2019 - 08:54

स्वप्न खरंच कधी खरी होतात का .....कि ती फक्त झोपेत बघण्यासाठी असतात.....

लोक बोलतात स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करायची असतात...पण खरंच स्वप्न हे फक्त स्वतःच्या कृती मुळे पूर्ण होतात का.....

त्यात इतरांचा हस्तक्षेप पण असतोच कि....

खरंच.... पण स्वप्न फक्त स्वप्नातच कुर्वळायची असतात.....अस्तित्वात ती खरी होतीलच असे नाही.....

आणि जर एखाद्याचे सर्व स्वप्न पूर्ण होत असतील तर तो /ती नशीबवान तरी असेल नाहीतर सर्वांचा प्रिय तरी असेल ..

कधी कधी वाटते स्वप्नापेक्षा नशीबच खरे असते.....जे नशिबात असते तेच घडते...... तुम्ही कितीही हातपाय मारा....जे तुमच्या कपाळावर कोरले आहे तेच तुमच्या आयुष्यात उठणार....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

प्रयत्न vs नशीब हा हा आयुष्याच्या शेवटापर्यंत चालणारा खेळ आहे योगिताजी, त्याला कंटाळू नका. मरण प्रत्येकाच्या नशिबात आहे, पण म्हणून कोणी श्वास घ्यायचं थांबवतं का?

स्वप्ने पाहावीत आणि ती खरी करण्यासाठी जरूर प्रयत्न करावा..
पण अपेक्षा ठेऊ नये...आणि नशिबाचा म्हणालं तर काय माहीत नशिबात लिहलं असेल प्रयत्न केला तरच मिळेल तर...

नशीब आपण बदलू शकत नाही पण प्रयत्नाने आपण एक पायरी जरूर पुढे जाऊ शकतो..

माझा अनुभव सांगतो...जर मी ठरवलं नसतं ,स्वप्न पाहीलं नसतं आणि प्रयत्नच केले नसते तर आज मी जेमतेम दहावीच शिकू शकलो असतो..

किमान पदवीपर्यंत शिकण माझं स्वप्न होतं...आज मी प्रयत्नांनी पदव्युतर शिक्षण घेतलं आहे आणि अजुनही शिकतोच आहे..

मला माहीतेय हे तर बेसिक आहे पण नशिब खराब असलं की, बेसिक गोष्टीसाठीही खुप संघर्ष करावा लागतो ..सो नकारात्मक विचारांना दुर लोटा.. स्वप्ने पाहा...ती पूर्ण करण्यासाठी झटा ..आज किंवा उद्या नक्की यश मिळेलं....नशिबापेक्षा इच्छा, प्रयत्न आणि घेतलेली मेहनत खुप मोठी असते....

अजयदा, प्रतिसाद आवडला.. Happy

स्वप्न आणि सत्यातली दरी कमी करायला मेहनत लागते ती करायची की नाही एवढंच आपल्याला ठरवायचं असतं.
विचार पक्का असेल तर नशिबाला सुद्धा आपली साथ द्यावीच लागते.. Happy

<<< विचार पक्का असेल तर नशिबाला सुद्धा आपली साथ द्यावीच लागते.. >>>
हाहाहा, ते असे नसते. नशीब म्हटले की मुळात त्यात अनिश्चितता (chance or uncertainty) आली. असे ठरवून नशीब बदलता येत नाही.
नशीबाने साथ दिली तर आपले कष्ट, क्षमता हे दुय्यम ठरतात. याउलट नशीबाने साथ दिली नाही तर कष्ट करूनही मनासारखे होईलच याची खात्री नसते.
I would rather be lucky than good - Lefty Gomez, American baseball player

जन्मतःच जे दिव्यांग आहेत, अथवा दुर्दैवाने ज्यांना नंतर विकलांगता आली आहे त्यांनी आणि त्यांच्या आप्तांनी नशीबाला दोष देणं समजू शकते. बाकी हाती पायी धड असणार्यांनी उगाचच करीअर मध्ये अथवा रिलेशनशिप मध्ये अपयश आलं की नशीबाला दोष देणं म्हणजे निव्वळ फालतुपणा आहे.

उपाशी बोका>> तुमच्या आजुबाजुला नीट बघा.मग तुम्हालाही शेकडो लोकं दिसतील ज्यांनी त्यांच्या 'फुटक्या नशिबावर?' मात करुन सन्मानान जगत आहेत.

एखाद्याला शब्दाने डिसकरेज करायचं कि त्याला तु करु शकते/शकतो असा धीर द्यायचा. हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर डिपेंट असतं. Happy
(हलकेच घ्या..)