वर्क फ्रॉम होम (Work from home)

Submitted by Yogita Maayboli on 12 September, 2019 - 02:45

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळालेली एक सोय म्हणजे वर्क फ्रॉम होम (Work from home-WFH ).
त्यात होते असे कि आपण घर बसल्या ऑफिस मशीन ला कनेक्ट करून ऑफिस चे काम करू शकतो
तर अशाच या वर्क फ्रॉम होम चे काही किस्से
मी गरोदर असताना मला वर्क फ्रॉम होम approve झालेला . त्यावेळी माझी सासू घर बसल्या मला वेगवेगळ्या डीशेस देऊन माझे डोहाळे पुरवायची. अशा वेळेस इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झाला तर ऑफलाईन होऊन जायचो लगेच माझ्या मॅनेजर चा मैसेज.... "R U there ".....जो कोणी WFH असायचा त्यावर मॅनेजर चे जास्त बारीक लक्ष्य.... एक मिनिटे हि ती व्यक्ती ऑफलाईन होता काम नये..... आणि वर्क फ्रॉम होम असले कि दुपारी सर्रास खूप झोप येते ... आणि अशा वेळेस मॅनेजर ला नेमके आपल्याला काम द्याचे असते

WFH मुळे आपला प्रवासाचा वेळ वाचत असला तरी त्याबरोबर त्याचे काही तोटे देखील आहेत.
मी आता कधीही WFH घेतला तर माझ्या घरातल्यान असे वाटते कि हिने वर्क "फ्रॉम" होम नाही तर वर्क " फॉर" होम घेतले आहे Happy . घरातली सर्व कामे आपल्याला करावी लागतात. त्यात घरात लहान मूल असले तर झाले तुमचे बारा वाजले . सासू सासरे असे गृहीत धरतात कि आज हि घरी आहे मुलांचे करेल ... त्यामुळे खूप धांदल उडते.
वर्क फ्रॉम होम चा अजून एक किस्सा ...मेट्रो construction चालू असल्यामुळे आज काल गाडी खूप वेळ ट्राफिक मध्ये अडकली असते ....२-३ तास प्रवास करून employee ऑफिस ला पोहचतो .. त्यामुळे आमच्या एका collegue ने मॅनेजर ला वर्क फ्रॉम बस ची facility द्या अशी मागणी केली होती. बॉस ने त्याला सरळ सुट्टी घेऊन घरी बसा असा सल्ला दिला. त्याने पुन्हा एक महिनातंरी वर्क फ्रॉम होम चे नाव काढले नाही.
तर असा हा वर्क फ्रॉम होम.
तुमचे काही वर्क फ्रॉम होम चे किस्से असतील तर तुम्ही हि share करा

आणि हो एक मजेशीर गोष्ट अशी कि आज हा लेख लिहिताना पण मी वर्क फ्रॉम होम आहे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< आम्हाला दिलेले वर्क फ्रॉम होमसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही रात्री हाफीसातून घरी परतल्यावर व सकाळी हाफीसात जायच्या आधी, शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी आणि कधीमधी घेतो त्या सिएल/पीएल सुट्ट्यांच्या वेळी वापरावी व 24x7x365 दिवस कंपनीच्या सेवेत राहावे ही अपेक्षा आहे. सुट्टी मागायला गेलो की बॉसचे पहिले वाक्य, लॅपटॉप सोबत ठेवा. >>>
ही असली थर्डक्लास कंपनी कुठली आहे? तुमच्या त्या दिव्य बॉसला माझ्यातर्फे हा लेख पाठवा.

माझ्यामते घरून काम करण्याचा काही प्रमाणात फायदा कंपनीलाही होतो. त्यांचं इन्फ्रा कॉस्ट, पॉवर कॉस्ट (एसी-इले इ.) कर्मचार्याला ट्रॅफिक मधून सुटका इ. काही फायदे.
माझ्यामते कंपनीनं वर्क्स्पेस ऑडिट घेऊन व्फ्रॉहो द्यावं, जसं बॅकग्राउंड व्हेरीफिकेशन ला लोक घरी येतीत तसे होम ऑफिस ऑडिट स्पेस करावं आणि मग अप्रूव्ह्ल्स द्यावेत. एंप्लॉयीला ही त्रास नाही अणि कंपनीलाही.

Hi,
Malaa work from home karaayche aahe.....saapdatch nahi.... sadhya Master in engineering kelay aani two mulanchi aai aahe...job pan kayachay...but paalanaa gharaachi maansik taiyari hoinaa.....kahi suchat nai...

ताई आपल्या गुगलबाबा किंवा युटुबताईंना शरण जाऊन ये एकदा, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात म्हणे.

अहो तुम्ही गरोदर असताना तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळाला. माझी जुन्या ऑफिसमध्ये एक कलीग होती. तिच्याबाबत नेमके या उलट घडले होते.

ओके. असो.

तर एकदा माझा बॉस ऑफिसमध्ये दिसला नाही म्हणून मी त्याला "कुठे आहेस?" असा इंग्लिशमध्ये मेसेज टाकला. तर त्याचा रिप्लाय आला wfh. ते मी चुकून WTF असे वाचले. मला राग आला. मला कळेना असा का रिप्लाय दिला याने. मी पण त्याला रागाने रिप्लाय देणार होतो. पण पुन्हा वाचले. मग लक्षात आले ते WTF नसून WFH आहे. थोडक्यात वाचलो.

मि तिन वर्ष wfh केले आहे. नंतर नविन कम्पनी ज्वोइन केली तेन्वा सुरुवातिला फुल त्रास झाला होता आठ तास बसायाला.

Parichit....lol.
थोडक्यात वाचला तू.

मला प्रेग्नन्सी मध्ये हवं होतं WFH पण तेव्हा माझ्या कंपनीची पोलिसी नव्हती . मला 7-8th मंथ मध्ये खूप अवघड गेलं.
कंपनी पोलिसी नुसार 9 तास कम्पलसरी होतं काम करणं त्यामुळे फारच कठीण गेलं.
मी IT मध्ये 9 वर्ष जॉब केला पण मला कधीच WFH मिळालं नाही. ह्याच मला फार फार वाईट वाटत. (Sad bahuli)
ह्या उलट नवऱ्याचं होत त्याला लॅपटॉप दिला होता त्यामुळे तो कधीही wFH करू शकायचा.
BFS प्रोजेक्ट असेल तर WFH नसतंच. Security reasons च्या नावाखाली देत नाहित.

आमच्या टीममध्ये तर अगदी 20 मिनिटांवर घर असणारे लोकही WFH हक्काने मागत असतात. WFH कुठल्याही कंपनीत हक्क म्हणून दिलेले नसते. बरेचसे लोक WFH cha गैरफायदा उचलत असतात. उदाहरणार्थ, एखादा गावाला जाऊन काम करणे, तास दोन तासांसाठी गायब असणे वगैरे. त्याशिवाय कस्टमर कडून बॅकग्राऊंड नॉईज ची तक्रार येणे...

अशा फायदा उचलणाऱ्या लोकांमुळे सरसकट WFH काही टीम बंद करून टाकतात ज्याचा त्रास ज्यांना खरोखर WFH chi गरज आहे त्यांना भोगावा लागतो.

लांब राहणाऱ्यांकरता अत्यंत सोयीचा मार्ग आहे हा. त्याने जाण्यायेण्याची कटकट वाचते आणि प्रदूषणही तितकेच कमी होते.

बाकी घरी असलं की ऑफिसच काम करावसं वाटतं का, हा एक प्रश्नच आहे. Lol

Pages