वर्क फ्रॉम होम (Work from home)

Submitted by Yogita Maayboli on 12 September, 2019 - 02:45

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळालेली एक सोय म्हणजे वर्क फ्रॉम होम (Work from home-WFH ).
त्यात होते असे कि आपण घर बसल्या ऑफिस मशीन ला कनेक्ट करून ऑफिस चे काम करू शकतो
तर अशाच या वर्क फ्रॉम होम चे काही किस्से
मी गरोदर असताना मला वर्क फ्रॉम होम approve झालेला . त्यावेळी माझी सासू घर बसल्या मला वेगवेगळ्या डीशेस देऊन माझे डोहाळे पुरवायची. अशा वेळेस इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झाला तर ऑफलाईन होऊन जायचो लगेच माझ्या मॅनेजर चा मैसेज.... "R U there ".....जो कोणी WFH असायचा त्यावर मॅनेजर चे जास्त बारीक लक्ष्य.... एक मिनिटे हि ती व्यक्ती ऑफलाईन होता काम नये..... आणि वर्क फ्रॉम होम असले कि दुपारी सर्रास खूप झोप येते ... आणि अशा वेळेस मॅनेजर ला नेमके आपल्याला काम द्याचे असते

WFH मुळे आपला प्रवासाचा वेळ वाचत असला तरी त्याबरोबर त्याचे काही तोटे देखील आहेत.
मी आता कधीही WFH घेतला तर माझ्या घरातल्यान असे वाटते कि हिने वर्क "फ्रॉम" होम नाही तर वर्क " फॉर" होम घेतले आहे Happy . घरातली सर्व कामे आपल्याला करावी लागतात. त्यात घरात लहान मूल असले तर झाले तुमचे बारा वाजले . सासू सासरे असे गृहीत धरतात कि आज हि घरी आहे मुलांचे करेल ... त्यामुळे खूप धांदल उडते.
वर्क फ्रॉम होम चा अजून एक किस्सा ...मेट्रो construction चालू असल्यामुळे आज काल गाडी खूप वेळ ट्राफिक मध्ये अडकली असते ....२-३ तास प्रवास करून employee ऑफिस ला पोहचतो .. त्यामुळे आमच्या एका collegue ने मॅनेजर ला वर्क फ्रॉम बस ची facility द्या अशी मागणी केली होती. बॉस ने त्याला सरळ सुट्टी घेऊन घरी बसा असा सल्ला दिला. त्याने पुन्हा एक महिनातंरी वर्क फ्रॉम होम चे नाव काढले नाही.
तर असा हा वर्क फ्रॉम होम.
तुमचे काही वर्क फ्रॉम होम चे किस्से असतील तर तुम्ही हि share करा

आणि हो एक मजेशीर गोष्ट अशी कि आज हा लेख लिहिताना पण मी वर्क फ्रॉम होम आहे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

WFH चा तोटा असा आहे की घरात असलेल्या व्यक्तींना तुम्ही डोळ्यांसमोर दिसता.
त्यामुळे छोटीमोठी कामे आपोआप सांगितली जातात.
कनेक्टिवीटी चा प्रोब्लेम येउ शकतो, घरच नेट गंडलं तर..
स्काईप मीटींग मध्ये घरातले आवाज येत रह्तात मुट नसेल तर..

बाकी फायदे भरपुर आहेत. Happy

हो क्लायंट कॉल चालू असताना घरात लहान मुले असली कि रडण्याचा सर्रास आवाज येतो....बाकी बँक आणि पर्सनल कामे कामे करण्यासाठी वर्क फ्रॉम होम उत्तम

मला काहीही काम घरून करायची परवानगीच नाही. इथेच कडमडा. बरे वाटे मला आता हे. घरी काही ही कटकट नेत नाही. माझे ऑफिसच घरासारखे आहे. वन बीएचके. कुत्रा आणायला परवानगी दिली तर बरे आटोचे पैसे वाचतील.

आणि आयटी वाले करुन करुन काय काम करणार ? स्क्रीन मध्ये डोकं खुपसुन बसुन राहणार, अध्ये मध्ये कळफल़आचा आवाज करणार..
आणि हो कॉल चालुये म्हणून सगळ्यांना घरात गप्प करणार, तापच जास्त बाई Proud

असं कुठं काम असतं होय? Proud
(टीपः मी पण आयटीवाली आहे, पण आम्च्याकडे WFH देत नाहीत )

घरी काही ही कटकट नेत नाही+१११

मला WFH आवडत नाही. कारण नीट एकाग्रता साधत नाही. ना घरका ना घाटका असे होउन जाते. एकदाचं ऑफिसात काम करुन मग घरी निवांतपणा आवडतो.
________
मुलगी साडे ५ महीन्याची असताना मी WFH करत होते तेव्हाती पलंगावरुन पडली होती. धस्स होते अजुनही आठवले की. नाही होत माझ्याच्याने WFH. कदाचित (९९%) ती आठवणच त्या नावडीच्या मूळाशी आहे.

ऑफिसात बसून काम करणे सगळ्यात बेश्ट. नऊ तास त्यांना द्यायचे बाकी वेळ फक्त आपला. लॅपटॉप देऊ का विचारले तर स्पष्ट नाही म्हणून सांगायचे. रोज तो लॅपटॉप घेऊन मुंबईत प्रवास म्हणजे विकतचं दुखणं, स्वतःला काही झालं तर चालेल पण लॅपटॉपला जीवापाड जपायचं, कोणी सांगितले नको ते उदयोग. माझ्या आधीच्या कंपनीत सगळ्यांना लॅपटॉप दिले होते, लोक ऑफिसात बसून youtube बघायचे आणि घरी जाऊन काम करायचे. मी तर एकदा ऑफिसचं डोंगल चुकून तोडलं होतं, दुसऱ्या दिवशी ऐकून घ्यावं लागलं.

आम्हाला वर्क फ्रॉम होमसाठी सर्व सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) कंपनीने दिलेली आहेत. नेट बंद पडते हेही कारण आम्ही देऊ शकत नाही, कारण तेही कंपनीचेच आहे आणि तेच वापरणे आम्हाला बंधनकारक आहे. असे असतानाही कोणीही वर्क फ्रॉम होम करू नये यासाठी कंपनीने दिवसा अकरा ते पाच हा कोअर टाइम आहे व त्या वेळात तुम्ही हाफीसात असायलाच हवे, नसल्यास पगार मिळणार नाही हा फतवा काढलेला आहे. फारच थोडे नशीबवान लोक आहेत ज्यांचे वर्क फ्रॉम होम त्यांचे साहेब अटेंडन्समध्ये रेगुलराईज करून देतात.

आम्हाला दिलेले वर्क फ्रॉम होमसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही रात्री हाफीसातून घरी परतल्यावर व सकाळी हाफीसात जायच्या आधी, शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी आणि कधीमधी घेतो त्या सिएल/पीएल सुट्ट्यांच्या वेळी वापरावी व 24x7x365 दिवस कंपनीच्या सेवेत राहावे ही अपेक्षा आहे. सुट्टी मागायला गेलो की बॉसचे पहिले वाक्य, लॅपटॉप सोबत ठेवा.

सुट्टी मागायला गेलो की बॉसचे पहिले वाक्य, लॅपटॉप सोबत ठेवा. >> लोल, आमच्या इथे लोक सुट्टी मागतानाच सांगतात don't worry I will be carrying my laptop. आमच्या इथे शनिवार रविवार म्हणजे सुट्टीच्या दिवशी चालते घरून केले तर काम.

लोक ऑफिसात बसून youtube बघायचे आणि घरी जाऊन काम करायचे>>>>

ऑफिसचे आयटी डिपारमेण्ट झोपलेय का? आमच्या ऑफिसच्या पॉलिसीनुसार मायबोली साईटसुद्धा सोशल मीडिया साईट आहे व सर्व सोमि साईट्स, सर्व मेलिंग साईट्स (गुगल, याहू व.) लॅपटॉपवर banned आहेत. आधी लॅपटॉप कंपनी नेटवर्कच्या बाहेर नेला की सो मि साईट्स पाहता यायच्या. आता चंद्रावर नेला तरी सो मि साईट्स पाहता येणार नाही.

आमच्या इथे शनिवार रविवार म्हणजे सुट्टीच्या दिवशी चालते घरून केले तर काम.>>>

शनिवार रविवार हे नोकरांना खुश ठेवण्यासाठी द्यावे लागतात. त्या दिवशी काम आले तर ते करायलाच हवे ही अपेक्षा आहे. काम केलेले चालते वगैरे गुळमुळीत धोरण अजिबात चालवून घेतले जात नाही.

रच्याकने, आमच्याकडे वर्क फ्रॉम होमसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना दिलेले आहे. आईटी व नॉन आईटी असा भेदभाव केलेला नाही.

हापिसात नाही बोलवत हो त्या दिवशी घरून पाट्या टाकल्या कॉल घेतले तरी चालते, त्यात फारच किचकट काही आले आणि ठोकळे रेफर करावे लागणार असतील तर झक मारत जावेच लागते. ऑफिस बरे पण वीकेंडला कुठे ट्रॅव्हल नको वाटते बाहेरच्या शहरात. ऑफिसच्या काही लीगल रिसर्च इजिनचा ऍक्सेस फक्त ऑफिसमध्ये बसून करता येतो की मग जावेच लागते.

काही लोकांच्या कामाचे प्रकार असे असतात की त्यांना ते घरी बसून करता येत नाही ऑफिस मध्ये जावेच लागते .
पोलीस सारखी नोकरी असेल तर .
तेव्हा अशा लोकांना भारी कौतुक वाटतं it वाल्यांचे .

सर्व्हिस व मनुफॅक्टअरिंग इंडस्ट्री सोडता जिथे मुख्य काम लॅपटॉपमध्ये डोके घालून करावे लागते तिथे वर्क फ्रॉम होम करता येईल. आमच्या लपटॉपवरन कंपनीच्या नेटवर्कलाही वेगळे लॉगिन करता येते, ज्यामुळे सर्व सर्व्हर्स अकॅसेस होऊ शकतात. त्यामुळे आईटीसोबत अकौंटस, टेक्सशन, लीगल, शेअरड सर्विसेस व काही प्रमाणात मार्केटिंग वालेही घरून काम करू शकतात. ऑफिसात डेस्कटॉप काढून टाकले. अर्थात ही सुविधा कधी वापरणे अपेक्षित आहे ते मी वर लिहिले आहे. Happy Happy

पण नीट काम होण्यासाठी ऑफिसच बरे असे मला वाटते. घरी इतर व्यवधाने त्रास देतात.

मी उत्साहात एस ए पी चा होम अ‍ॅक्सेस मागितला होता तेव्हा दिला नाही. आता काहीही मागत नाही. आहे त्यात दहा ते पाच कायते इथेच उपसायचे. काही आत्मे शनिवारी फोन करतात त्यांना सोमवारी बोलु मेल करू न ठेवा सांगते.

माझा बिझनेस होता तेव्हा घरून मुली बरोबर ऑर्डर एंट्री पेमेंट फॉलो अप वगिअरे करत होते. ते अलग आहे पण तो २४ गुणीले ७ जॉब होता.
फोन ऑन की बिझनेस ऑन. कायम अ‍ॅक्सेसिबल व अवेलेबल राहवे लागे कारण कस्ट मरास काही ही क्वेरी उद्भवू शकते.
आता फारच आग लागली तर फोन करतात. बाकी मेल वर झिंदाबाद. आयटी प्लस सपोर्ट असे म्हणता येइल.

WFH जेव्हा आमच्याकडे नविन सुरु झाले होते तेव्हा सुरुवातीला प्रत्येक डिपार्टमेंटमधुन एक ते दोन मुलींची नावे द्यायची होती सहा महिन्यासाठी त्यानंतर दुसरी बॅच घेणार होते. तेव्हा एक क्षण मनात आले होते की ट्राय करुया का? जरी काम जास्त लागले तरी दिवसाचे ५-६ तास वाचतील जे प्रवासात जातात, पण सोबत हेही वाटत होते की प्रवासाची सवय अन आवड दोन्ही आहे सो ईतके दिवस करमेल का घरी? सो काहिही निर्णय घेतला नाही, म्हटले दिलेच जर बॉसने नाव तर करु WfH, पण लकिली बॉसने माझे नाव दिले नाही नविन प्रोजेक्टचे कारण देऊन.
जेव्हा नंतर ज्यांनी WfH घेतले होते त्यांचे अनुभव ऐकले तेव्हा खुप बरे वाटले की मला ती संधी मिळाली नाही. बिचार्या सगळ्या, लॅपटॉप वरुन जरा जरी नजर हलली कि तो लॉक व्हायचा, प्रोडक्टीव्हीटी तर खुप काटेकोरपणे मोजत त्यामुळे खुप वेळ काम करावे लागायचे. मान खुप दुखायची त्यामुळे त्यांची.
यानंतर तर मनात गाठच बांधली की काही झाले तरी आपण कधीच वर्क फ्रॉम होम घ्यायचे नाही, ईतकेच काय गेल्या वर्षी ऑफीसचा लॅपटॉप मिळत होता तो ही नाही घेतला. मला ऑफिस वेळेनंतर ऑफिसचे काम करायला आवडत नाही. माझी टीम बसते ऊशिरा पर्यंत पण शक्यतो खुपच तातडीचे नसेल तर मी थांबत नाही

आईटीसोबत अकौंटस, टेक्सशन, लीगल, शेअरड सर्विसेस व काही प्रमाणात मार्केटिंग वालेही घरून काम करू शकतात >> लिगल वाले नाही. पुस्तक रेफर करावी लागतात सारखी त्यामुळे शक्य नाही.

WFH चे फायदे लिहु का?
-----------------------------------
आम्च्या ह्यांना भारतातील सणांच्या सुट्ट्या नसतात.. मग आला सण की घे WFH असं धोरण आहे.. (कारण सगळ्याच सणाना सर्वाना सुट्टी मिळत नाही) Lol [नवरा समोर दिसतोय म्हणून मी खुष, घरातले सगळे मुलग घरी आहे म्हणून खुश, डेवलपर काम्करतोय म्हणून क्लाएन्ट कम्पनी खुश, पण असं सगळ्यासोबत घरी असता ना हापिसतल काम करायला लागतय म्हणून डेवलपर्/नवरा/मुलगा ह्या भुमिका पार पाडणार 'तो' मात्र मनाच्या एका कोपर्‍यात नाखुश ]
सणांचं सेलेब्रेशन होईपर्यन्त हे साहेब आम्च्यासोबत असतात, बाकी दिवसातले ८-९ तास खोलीत बन्द करुन घेतात स्वत।ला कामासाठी..
एकदा दिवाळी होती, सन्ध्याकाळी पुजा झाल्या नन्तर साहेब पुन्हा कामात गर्क.
इथल्या फटाक्यांचे आवाज अमेरिकेत ऐकु गेले त्या दिवशी.. क्लाएन्ट विचारत होता, "काय झालं तु सेफ आहेस न, काळजी घे वगैरे" Lol

गेल्या सहा महिन्यांपासून माझे घर हेच ऑफिस आहे. घरच्यांनी व्यवस्थित समजूतदारपणा दाखवला तर काहीही अवघड जात नाही.
उलट मस्त घरचा नाष्टा, गरम गरम जेवण, ब्रेक मध्ये आपणच आपल्याला हवी तशी कॉफ़ी करून घेता येते, गप्पा टप्पा होतात, संध्याकाळी जो वेळ प्रवासात, ट्राफिक मध्ये धूर खात घालवावा लागतो त्या वेळात मस्त व्यायाम, सायकलिंग किंवा रनिंग करतो.
पोराला वेळ देता येतो, त्याला अभ्यासात मदत करता येते, किंवा आपण काम करताना त्याला शेजारी बसवून होमवर्क करून घेता येत.
अर्थात सगळ्यांचे कामाचे स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचे असते हे मान्य आहे त्यामुळे सगळ्याच लोकांना असे करता येईल हे सांगू शकत नाही पण मला तरी मानवल आहे.
थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील पण ही सिस्टीम बेस्ट आहे

काही घरगुती कारणांमुळे बरेचदा घरून काम करावे लागले आहे. खूप पाऊस, ट्रॅफिक आणि मोर्चे, सत्संग चे फलक ऑफिस च्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर दिसले की हमखास दिवस लक्षात ठेवून घरून काम केले आहे. गैरसोय पण होते आपली आणि घरातील इतरांची. मोठे घर असेल आणि वेगळ्या रूम मध्ये असाल तर त्रास नाही, पण जर हमखास दिवाणखान्यात बसून काम करत असाल तर सगळे नाखूष, टीव्ही , फोन वापरावर बंधन येते त्यांच्या. ऑफिस ला जाऊन जितका कंटाळा येत नाही तितका घरून काम केल्यावर येतो कारण हालचाल खूप कमी होऊन जाते. ऑफिस मध्ये चहा, जेवण वेळेवर तरी होते, घरी असून सुध्दा ते बरेचदा शक्य होत नाही. त्यामुळे जितके फायदे आहेत तितकेच तोटे पण आहेत.

वेळ अन त्रास दोन्ही वाचतो! अर्थात भारतीयांची बॉस समोर असेल तर काम करेल ह्या वृत्तीनं बऱ्याच टीम्सनी बंद केलंय आमच्याकडे.

बट घरून काम जास्त चांगलं होत, अन घरचेही काम उरकता येतात हा अनुभव आहे माझा.

बिचार्या सगळ्या, लॅपटॉप वरुन जरा जरी नजर हलली कि तो लॉक व्हायचा, प्रोडक्टीव्हीटी तर खुप काटेकोरपणे मोजत त्यामुळे खुप वेळ काम करावे लागायचे.
>>
हे मायक्रोमॅनेजमेंटच ओव्हरकिल आहे. इतकं कशाला काम मोजायच? अवरली बिलिंग करून पगार द्यायचे का?

Pages