अशी ती - १

Submitted by Yogita Maayboli on 11 September, 2019 - 06:49

तशी ती मुळची गावची.....लग्न झाल्यावर १०-१२ वर्षे गावी राहिलेली..... खटल्याचा संसार करून खूप राबुन तिने संसाराचे १०-१२ वर्षे कसेतरी ढकलले. तिच्या बोलण्यातून नेहमीच कळून यायचे कि सासरी खूप जाच झाला....कधी कधी भाकरी बरोबर खायला भाजी देखील राहायची नाही....सर्व पुरुष आणि छोटी मंडळी जेवायची आणि मग शेवटी बायकांच्या पंगती....उरलेले जेवण त्यांच्या वाटेला.... आणि जर भाजी उरली नसली तर पाण्यात चटणी टाकून ती भाकरी बरोबर खायची

तिला २ मुली आणि एक मुलगा......तोही नवसाचा .....मुलींचा नेहमीच तिरस्कार त्या घरात.... मुलगा हि २ मुलीनंतर नव्हता झाला . त्यासाठी तिला आधी ३-४ जणांना पाडावे लागले.... आणि तेही गरिबी असल्यामुळे सरकारी दवाखान्यात खराब पद्धतीनें.

तर अशी ती.....आणि तिचा तो दगड स्वभावाचा नवरा.....तिला मुंबईला घेऊन आला आणि त्यांचा ३ मुले आणि नवरा बायको असा संसार सुरु झाला.....एका चाळीत तिच्या नवरायने कसे कसे करून घर विकत घेतले...... घरात खाणारी तोंड भरपूर आणि कमावणार एकच या समीकरणाने खाण्या पिण्याचे नेहमीच हाल . हो पण त्यातही मुलगा एकुलता एक म्हणून त्याला हवे ते खायला मिळायचे .... मुली भावाच्या तोंडाकडे बघत बसायच्या ...भावाचे खाऊन झाल्यावर उरलेले त्यांना मिळायाचे. पण यात आई म्हणून तिने कोणतीच भूमिका बजावली नाही.... तिला ना कधी तिच्या मुलींची दया आली आणि आली जरी असती तरी तिने काही केले नसते ...कारण तिच्या दगड नवऱ्या समोर तिचे काही चालत नसे.....जे काही होते ते फक्त मुलासाठी....मुली फक्त ओझे होते तिच्या साठी.

घरात नेहमीच काम आणि गरिबी....मुलींना कळू लागले तसे त्या देखील काही छोटी मोठी कामे करून बापाला हातभार लावू लागले.... मुलींचे शिक्षण हा विषय घरात कधी नव्हताच. फक्त मुलाने शिकावे...खावे ... जीवनातील आनंद घ्यावा अशीच सर्वांची विचारसरणी....

हळू हळू तिची तब्बेत खराब होऊ लागली....तिला पिशवीचा कॅन्सर झाला होता..... त्याची लक्षणे आधीच दिसू लागली होती ...पण तिच्या अडाणी पणामुळे तिने याकडे लक्ष् दिले नाही ...आणि दिले जरी असते तरी तिच्या नवऱ्याने तिचा औषध पाण्यासाठी तिला कधीच पैसे दिले नसते.....जेव्हा कॅन्सर झाले हे समजले तेव्हा तिच्या हाताशी आलेल्या मुलाने टाटा मध्ये तिची ट्रीटमेंट सुरु केली....

chemo रेडिएशन....या सर्व स्टेजेस झाल्या....तिची तब्बेत खूप खालावली....तरीही घरातील कामे तिला चुकली नाहीत .....आणि तिच्या दगड नवऱ्याला कधी पाझर फुटला नाही.....

अशा या ती ची हि कहाणी...... स्वतःचे काहीच विचार,,,,इच्छा ...मते .....नसलेली ती... पण फक्त जीवन ढकलायचे म्हणून जगत असलेली ती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऊसतोड कामगारांसोबत एक दिवस हेपण वाचा.

हेरंब कुलकर्णी

समीर गायकवाड
यांना फॉलो करा. असलंच लिहणारं अजूनकोणी माहित असेल तर मलापण सांगा.