सोळा आण्याच्या गोष्टी - 'सावली' - रागिणी

Submitted by राग on 11 September, 2019 - 02:34

हो ! माझं नावच आहे ते ... सावली. कारण मला स्वतंत्र अस्तित्व कधीच नव्हते आणि कदाचित पुढेही नसणार. तरीही मी जगतेय अन् जगत आलीय. तसं माझं वय फार नाही पण लोक म्हणतात की मी यंदा ७२ वर्षाची झालेय. अजुन किती काळ जगणार माहीत नाही पण ही आजुबाजूची मंडळी माझी इतकी काळजी घेत असतात की मला तर कधीकधी वाटून जाते मी अमर होणार. माझंसुद्धा सर्वांवर सारखेपणाने लक्ष असतं बरं का ! मी नाही कधी जातपात मानत, त्यामुळे भेदभाव करायला कधी जमलाच नाही. शेवटी भूक सर्वाना सारखीच असते ना ! कोणाची अन्नाची, पैशाची तर कोणाची वासनेची. जी रूपं घेऊन येईल तिची मी सावली... मालकाच्या भावनेवर विसंबलेली !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अक्कु
खरं तर स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे होऊनही आपल्या नेत्यांची भूक संपतच नाहीये त्यावर लिहिण्याचा प्रयत्न होता. लेकिन लगता है जम्या नै कुछ !!

तुम्हाला नेमकं काय सांगायच होतं ते खरंच कळत नाहीये कथा आणि तुमचा प्रतिसाद वाचुन..
कथेत कुठेच देशाचा उल्लेख नाहीये त्यामुळे हे फक्त सावलीचं मनोगत वाटतंय.. Happy