सोळा आण्याच्या गोष्टी - चेटकीण - बोकलत

Submitted by बोकलत on 6 September, 2019 - 06:43

सगळा गाव चिंताग्रस्त होता. गावाबाहेरच्या पडक्या वाडयात एका भयंकर चेटकिणीने आपलं बस्तान मांडलं होतं. त्या नरभक्षक चेटकिणीला दर आठवड्याला एक नरबळी द्यायला लागायचा. बाकीचे दिवस ती कोंबड्या, कबुतरांवर गुजराण करायची. जर चेटकिणीची मागणी पूर्ण झाली नाही तर गावात मुत्यूचं तांडव सुरु व्हायचं. ज्या माणसाची बळी द्यायचा असेल तो स्वतः त्या वाड्याजवळ जायचा आणि दार ठोठवायचा. दार ठोठावल्यावर आतून मिटक्या मारल्याचा आवाज यायचा आणि दार ठोठावणारा त्या वाड्यात कायमचा गुडूप व्हायचा. आज बंड्याची पाळी होती. बंड्या घाबरत घाबरत त्या पडक्या वाड्याजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने दार ठोठावलं.
काही वेळाने आतून आवाज आला.............
मायबोलीवरच्या शशक वाचताना कशाला त्रास देता रं माकडीच्यांनो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Awesome:)
असं काहीतरी वाचायला मिळायला पाहिजे:)
सारखाच काय sad end!

Chhan

Happy भारीय ...

lol Lol Lol Lol Lol Lol