सोळा आण्याच्या गोष्टी - 'भाकडकथा ' - किल्ली

Submitted by किल्ली on 4 September, 2019 - 09:05

"तिच्या डोळ्यात पावसाळी ढगांसारखे मळभ दाटले होते"
"तिच्या डोळ्यांच्या गहिऱ्या डोहात उदासीचे काळेभोर पाणी साचले होते"
"तिचे डोळे दुःखामुळे खवळलेल्या समुद्राप्रमाणे भासत होते"

“भयानक उपमा सोडून दुसरं काही लिहिता येत नाही का तुला?”

“माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात. “

“काहीतरी भारी लिही, हे उदासी प्रकरण is too downmarket!”

“काय सुचावं ह्यावर माझं नियंत्रण नाहीये. अज्ञात शक्ती माझ्याकडून लिहून घेते.”

“What rubbish! कारणं नकोत. आजच fresh script लिहून झाली पाहिजे.”

धाडकन दार आपटून ती आत निघून गेली.

“काहीही फेकतो हा.
ह्याने लिहिलेलं खरं झालं असतं तर चमत्कारांच्या भाकडकथा प्रत्यक्षात घडल्या असत्या.”

---------------------------------------------------------------------------------------------------------------

तिने सताड खिडकी उघडली आणि पंख फडफडवत खिडकीबाहेर झेप घेतली!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कळली नाही म्हणून आवडली नाही. आता किल्लीने सांगितले तरी काही पटली नाही. किल्लीची गोष्ट म्हणून हे हक्काने लिहितेय.

ही कथा मी जशीच्या तशी वाचलीये, तिथे फक्त माणूस असतो, आणि सर्कशीचा की संपादकाचा रेफरन्स होता, आठवत नाहीये.
अशा शशक चालतील का?

हे एकदा मिसळपाववर आलं होतं, पण मूळ कथा अजूनही मला सापडत नाहीये.

एक माणूस एकदा एका सर्कसमध्ये
24 Dec 2015 - 7:38 am | बोका-ए-आझम
एक माणूस एकदा एका सर्कसमध्ये नोकरी मागायला गेला.
सर्कस मालक - काय करु शकतोस तू?
माणूस - पक्ष्यांची नक्कल करु शकतो!
मालक - हॅ!हे असे पक्ष्यांची नक्कल करणारे पैशाला पासरी आहेत माझ्याकडे!
माणूस - म्हणजे मला नोकरी मिळू शकत नाही?
मालक - नाही!

माणूस खिडकीतून उडून गेला.

अजून एक कथा होती, त्यात संपादक असाच लेखकावर अविश्वास दाखवतो, पण शेवटी कळत तोच एलियन आहे.

> अजून एक कथा होती, त्यात संपादक असाच लेखकावर अविश्वास दाखवतो, पण शेवटी कळत तोच एलियन आहे. > माझु बोबला अन प्रुफरीडिंग (विज्ञानचुंबित कथिका*)

मला वाटले होते , तो लिहितो ते आधी खरे होत नसते , पण ती परी होती असे तो लिहून जातो अन मग तो लिहिलेले त्यानंतर खरे व्हायला सुरुवात होते

मला वाटले ती खिडकीतून खाली पडली अपघाताने आणि ती उदासी वगैरे खरी झाली. मला कळली नाही आणि स्पष्टीकरणपण पण कळलं नाही.

किल्ली तुम्ही लिहिलेली कथा खरंच चांगली आहे. खाली दिलेलं स्पष्टीकरण मात्र वेगळं हवं होतं (असं मला वाटतं).

हिचकॉकचा एक सिनेमा आहे ज्यात त्याचा नायक ओपनर विक्रेता आहे. आधी त्याच्या ओपनरचा खप फारच कमी असतो पण पुढे त्याला एक सिद्धी गवसते की ज्यामुळे तो जे काही त्या ओपनर संबंधी भविष्यात घडण्याविषयी बोलेले ते खरं ठरत जातं. अर्थातच मग त्याचा ओपनरचा खप प्रचंड वाढतो आणि तो कमिशन घेऊन विक्री करत असल्याने अर्थातच त्याचं उत्पन्नही वाढतं. पण पुढे त्याचं हे अवाढव्य कमिशन टाळण्याकरिता त्याचा वरिष्ठ त्याला बायपास करुन थेट ओपनरची विक्री करु पाहतो.

तेव्हा हा ओप्नर विक्रेता असलेला कथा नायक चिडून म्हणतो, "त्याला वाटतंय ओपनर विकला जातोय याचं श्रेय ओपनरला आहे तर तो त्याचा गैरसमज आहे आणि त्याला इतकाच जर तो ओपनर महत्त्वाचा वाटत असेल तर घे तो ओपनर *+-/~!@#$% मध्ये घालून"

त्यानंतर त्या वरिष्ठाची अवघड जागेची शस्त्रक्रिया केली जाऊन तो ओपनर काढला जातो.

असो. तर इथेही तुमच्या कथेतली 'ती' त्याच्या कथांना भाकडकथा म्हणते म्हणून चिडून जाऊन तो असे काही लिहितो की तीच खिडकीतून उडून जाते (म्हणजे स्वेच्छेने किंवा ती परी आहे म्हणून नव्हे तर त्या अज्ञात शक्तीकडून जबरदस्तीने शिक्षा म्हणून असे काहीतरी) असा मला तरी कथेचा अर्थ वाटला होता.

धन्यवाद मन्या, महाश्वेता, BLACKCAT, देवकी, चंपा,y बिपीन चन्द्र Happy

Submitted by देवकी on 8 September, 2019 - 10:17, आणि चंपा >> ज्जे बात! नो प्रोब्लेम..
मी लिहीण्यात कमी पडले असेन

@ महाश्वेता: तुम्ही नमूद केलेलि कथा मी वाचलेली नाही,
माझु बोबला अन प्रुफरीडिंग (विज्ञानचुंबित कथिका*) => ही वाचली होती.
पण लिहीताना संदर्भ डोक्यात नव्ह्ता.
maybe, great minds think alike Proud

@y बिपीन चन्द्र@:
तुमचं स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे:)

ज्यांना कथेतल्या तिचं परी असणं पटलेलं नाही त्यांनी तिला 'इच्छाधारी पक्षी, बर्ड्वूमन असं सम्जायला माझी हरकत नाही

कथा आवडली , हटके लेखन .
पण कदाचित १०० शब्द मर्यादेमुळे समजायला सोपी जात नाहीये

Pages