सोळा आण्याच्या गोष्टी - '२५०००' - रागिणी

Submitted by राग on 4 September, 2019 - 08:27

"भड़कमकर तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, पंचवीस हजारची सोय करा नाहीतर.... ! "

"हॅलो ss कोण बोलतंय ....हॅलो ...!!!"

अगं, चिंटू क्लाससाठी म्हणून गेला तो सरांकडे पोचलाच नाही ! आणि आत्ताच एक फोन आला की त्याला घरी सुखरूप आणायचं असेल तर पंचवीस हजार द्यावे लागतील...पुढे काही बोलायच्या आत फोनच कट झाला !!

"थांबा... मी पोलिसांनाच तक्रार करते "

"अगं पण ...त्यांनी आपल्या मुलाला काही केले तर !!"
.
तुम्ही विसरलात का माझा मावसभाऊ घोडबंदरला एसआय आहे... त्याच्या कानावर घालते.

थोड्यावेळाने पुन्हा फोन येतो.

"माझा साडू पोलिसात आहे, बऱ्याबोलाने चिंटूला सोडा परत"

हे बोलणे ऐकून फोन करणारी व्यक्ति बोलली..

" ... आम्हीपण पोलिसच आहोत... गाडी चालवताना नियम मोडलेत तुमच्या कार्ट्याने..!!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच
पण हा joke स्वरूपात किस्सा whatsapp, fb वर फिरतोय, काल वाचला आणि आज इथे शशक स्वरूपात आला सुद्धा!

भारीच
पण हा joke स्वरूपात किस्सा whatsapp, fb वर फिरतोय, काल वाचला आणि आज इथे शशक स्वरूपात आला सुद्धा!

नवीन Submitted by किल्ली on 4 September, 2019 - 08:39

इथून घेतला असेल तर ग्रेटच !

Lol मस्त!

पण २५००० रुपये दंड (ऑ वासणारी बाहुली).. एव्हढा कसला नियम मोडला चिंटूने?