मायबोली गणेशोत्सव २०१९ - स्वरचित आरत्या

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 06:17

मायबोली गणेशोत्सव २०१९चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहूया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोहोचवूया. आरत्या लिहिण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
ओवी, भजन, पोवाडा अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रार्थना/आरत्या लिहू शकता .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयाच्या स्मरणे । नित्य समाधान ।
तो श्रीगजानन । वंदू आता ।।

नमो भालचंद्रा । विघ्न विनाशका ।
मंगल कारका । नमोस्तुते ।।

मस्तकी विराजे । सुंदर मुगुट ।
सुरत्नजडित । सुवर्णाचा ।।

नेत्र दिप्ती तव । अतुल प्रेमळ ।
तोषवी सकळ । भक्तांलागी ।।

भाल प्रदेशीं का । रेखियले गंध ।
तयाचा सुगंध । आसमंती ।।

शुंडा रुळतसे । थेट दोंदावरी ।
आयुधे का करी । नानाविध ।।

सुरस मोदक । धरीसी आवडी ।
जयालागी गोडी । भक्ती एक ।।

कटीवर शोभे । पीतांबर दिव्य ।
रेशमी सुरम्य । तलमसे ।।

ऐसा श्रीगणेश । लाभला भक्तांसी ।
पूजिता तयासी । सुखलाभ ।।

जगी जे पवित्र । आणि मनोरम ।
सर्वही सुगम । जयाठायी ।।

तो श्रीविनायक । का सिद्धीदायक ।
हो सुखकारक । सर्व जना ।।

अर्चिता प्रेमाने । श्रीगणाधिपती ।
लाभो सुख शांति । अखंडित ।।

गणपती आले घरा
आले आले गणपती आले घरा
फूलमाळा, तोरणे बांधा दारा
दुमदुमू द्या सनईच्या मजूळस्वरा
सजविले सुबक नाजूक मखरा........

लाडू,पेढे,मोदकांनी भरले ताट
बसाया मांडला रुपेरी सोनेरी पाट
दिवे समयांचा लखलखाट .........

रक्तवर्ण पुष्प ,हिरव्या दुरवा
पीतवर्ण अंबरा शेंदरी शेला हवा
केतकीपर्ण नि गोकर्णांनी नटवा .........

सारे मिळूनी सुस्वरे गाऊ आरती
मनोभावे आळवूनी मंगलमूर्ती
पावेल गणांचा हा अधिपती .........
विजया केळकर ______
ग्रुपवर सदस्य बनण्यासाठी काही समजले नाही मग इथेच
स्वरचित रचना पाठवत आहे

चाहूल
बाप्पा आगमनाची
चाहूल
जास्वंद फुलांस बहरुन येण्याची
चाहूल
दवात न्हालेल्या नव दुर्वांकुरांस प्रसन्नतेने उभारीची
चाहूल
वाद्यांस,वादकांस स्वर लयीत नृत्य गायनास साथ देण्याची
चाहूल
खमंग वासाची,रांगोळीत एकजूटीची
गुंता सोडवून मखर सजविता निसर्ग संरक्षणाची

विजया केळकर_____

शशांक, आरती सुंदर लिहीली आहे. फारच छान !

विजया, तुमचं लिखाण पण आवडलं. छान लिहिलं आहे, पण हे कविता प्रकारात मोडतं ना? आरती नाही ही.

या हो या गणराया
या माझ्या बाप्पा मोरया
दुर्वांकुराची जुडी त्या वाहूया ।

कशी गावी तव अगाध किर्ती
संकटनाशका मंगलमूर्ती
लवकरी या करण्या वचनपूर्ती ।।

अश्रू दाटले की नयना
आस पूर्ण होईल तुझ्या दर्शना
प्रथमेशा करीन पूजा अर्चना ।।

भाद्रपद चतुर्थी दिनी या
मम गेहा पावन करण्या या
करते स्वागत गौरीतनया ।।

विजया केळकर_____

ॐकार स्वरुपा देवा येसी आकारा
भक्तांसी ताराया, देवा गणराया, जय देव जयदेव

लंबोदर शुंडासह घेसी सगुणात्मक काया
रुप मनोहर साचे नच ये वर्णाया, जय देव जय देव

मोदक आवडीचा बहु भक्तीभावाचा
आशीर्वादा देई नित संतोषाचा, जय देव जय देव

दुर्वांकुर शोभे तव मस्तकी गणनाथा
पुष्पे कुंकुमवर्णी, केतकी, मांदारा, जय देव जय देव

द्यावे आशीर्वचना देवा सद्बुद्धीलागी
चरणी वंदूनि भावे प्रेमे ओवाळी, जय देव जय देव