मायबोली गणेशोत्सव २०१९ - बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 06:15

तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका.. अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कुळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंच खाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत... हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...
देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं??? नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
नैवेद्याची प्रकाशचित्रे, खास आठवणी इथे प्रतिसादात भरभरून द्या. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतीच्या धाग्यावरच टाका.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली किती छान सजवले आहे ताट, मस्तच. फक्त आमच्याकडे भाज्या उजवीकडे ठेवतात आणि पुऱ्या गोड वस्तू, कोशिंबीर, चटणी वगैरे डावीकडे, भात मध्ये.

अंतरा छान सुबक मोदक.

नैवेद्यः हळदीच्या पानातले उकडलेले मोदक
82E4BC7F-2D31-4BC9-9A5E-E2691DB4DFFD.jpeg

मस्त.

ब्लॅककॅट, तुमचे मोदकात सारण काय आहे.?

सिद्धी, हे उकडीचे मोदक आहेत ना, का माव्याचे?

VB मस्तच नैवेद्य दोन्ही, मोदक काय नी पुपो काय नी सोबत भजी, बाप्पा खुश एकदम.

देविका मोदक मस्तच, कळ्या सुरेख, करंजी आणि कचोरीची मुरड छान, हळदीच्या पानांचा सुवास पोचला, आहाहा.

अंजुताई ☺️, आमच्याकडे रोज वेगळा गोडाचा नैवेद्य असतो. काल निवऱ्या केल्या होत्या अन आज खास गौराई चा आवडता बेत, सोबत गुलाबजाम

Screenshot_2019-09-05-21-48-31-219_com.miui_.gallery.png

मला ह्या धाग्यावर यायचंच नव्हत. पण शेवटी राहवलच नाही आणि क्लिक झालं. सगळ्या ताईंच्या मोदक आणि बाकि गोड गोड डिशेश बघुन तोंपासु झालं. मला खुप आवडले सगळ्यांनीच बनवलेले पदार्थ.

हा बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीचा नैवैद्य.
ह्यात तवश्याचे आणि भोपळयाचे गोड वडे आणि तिखट वडे आहेत. अळुची मिक्स भाजी ही हवीच विसर्जनच्या दिवशी.

IMG_20190915_233153.jpg