माझे चित्रकार मित्र श्री.लीलाधर कोल्हे यांनी काढलेल्या सुंदर चित्रासह माझी कविता-
*पोया*
(लेवा गणबोली)
सरावनाच्या शेवटाले
पिठोरी आमावसले
किसनानं पोयासुरा मारले
त्याही आठोन कऱ्याले
करु साजरा पोया
समदे व्हईसन गोया रे समदे व्हईसन गोया
बैलं माही गुनवान
करती हिरवगार रान
काया मायची आन
गह्यरी लावती लया
करु साजरा पोया
समदे व्हईसन गोया रे समदे व्हईसन गोया
माह्या घराची शान
संग खपती रात दिन
दिस सुगीचे आले
शेतकरी खुस झाले
करु साजरा पोया
समदे व्हईसन गोया रे समदे व्हईसन गोया
वढती शेतीचा भार
बयीराजाचा संसार
कशे ईसरू उपकार
दावू भक्तिभाव भोया
करु साजरा पोया
समदे व्हईसन गोया रे समदे व्हईसन गोया
घाला अंघोय सजोया
पायी नारय वाढोया
निवद पुरनाचा चढोया
फोडीसन गावपोया
करु साजरा पोया
समदे व्हईसन गोया रे समदे व्हईसन गोया
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(30.08.2019) पोळा
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita